माझ्या आठवणीतली मायबोली- निरु
आया है मुझे फिर याद वो जालीम..
गुजरा जमाना बचपन का...
मायबोलीला 25 वर्ष झाली म्हणताना असं काहीसं मनात यायला हवं होतं.
पण नाही आलं. कारण मी तर अजून नवतरुण, खरं तर बाल्यावस्थेत. त्या सुरुवातीच्या गुजऱ्या जमान्यामधला नाहीच.
कारण माझं मायबोली वय : सहा वर्ष चार महिने.
थोडक्यात मी मायबोलीचं एकोणीसावं वर्ष म्हणजे तिचं टीनएजरपण संपता संपता या परिवारात सामील झालो.
हां, आधी वर्ष, दीड वर्ष वाचनमात्र होतो. सुरुवातीला क्रमशः कादंबऱ्या वाचल्या. नंतर कथांकडे वळलो.
तळटीप -
०१. हा ‘हलकट’पणा नसून ‘हलकासा’ प्रयत्न आहे.. मायबोलीच्या (विहीरीतल्या) खवळलेल्या लाटांवर स्वार होण्याचा.. ‘वल्हवासकट होडी बुडणार’ म्हणजे ‘आयडीसकट धागा उडणार’ ह्याची खात्री असून उडी मारतोय..
०२. माबोच्या बाहूबली योद्ध्यांपुढे मी म्हणजे केस खेत की आयडी... अनुल्लेखानं मारलंत तर शेवटपर्यंत वाचणार नाही. (म्हणजे मी वाचेन, पण तुम्ही लेख वाचणार नाही..) म्हणुन तळटीप उजळ माथ्यावर टाकली आहे..
०३. ‘मेरा वचन ही है शासन’ असं आपलं काही नाहीये.. त्यामुळं लेखात लिहलेल्या मतांशी लेखक स्वतःसुद्धा प्रामाणिक नाहीये. फारच जोडे पडले तर लेखक पलटी खाऊ शकतो..
नमस्कार मायबोलीकरहो..
इथे असणार्या बहुतेकांना मायबोलीचा (म्हणजे मायबोली डॉट कॉमचा) लळा आहे.. जिव्हाळा आहे..
इथे एक आपलेपणा वाटतो.. मातृभाषेत गप्पा मारता येतात, धीर देता येतो, मदत करता आणि मागता येते, भांडता येते, लिहिता येते, वाचता येते आणि बरेच काही.. आपण सारे कितीही भांडलो तरी मायबोलीच्या या कुटुंबाचा भाग आहोत हे सगळ्यांनाच मान्य आहे. आपण इथे (मायबोलीवर) कसे आलो, का आलो, का आहोत, आपल्याला मायबोली का आवडते यावर बराच काथ्याकुट झाला आहे.. होतो आहे..