नमस्कार मायबोलीकरहो..
इथे असणार्या बहुतेकांना मायबोलीचा (म्हणजे मायबोली डॉट कॉमचा) लळा आहे.. जिव्हाळा आहे..
इथे एक आपलेपणा वाटतो.. मातृभाषेत गप्पा मारता येतात, धीर देता येतो, मदत करता आणि मागता येते, भांडता येते, लिहिता येते, वाचता येते आणि बरेच काही.. आपण सारे कितीही भांडलो तरी मायबोलीच्या या कुटुंबाचा भाग आहोत हे सगळ्यांनाच मान्य आहे. आपण इथे (मायबोलीवर) कसे आलो, का आलो, का आहोत, आपल्याला मायबोली का आवडते यावर बराच काथ्याकुट झाला आहे.. होतो आहे..
तर.. भविष्यात (म्हणजे नक्की कोणत्या वर्षी ते मला ठरवता येत नाहीये.. आपापली कल्पनाशक्ती लढवा) आपली मायबोली (म्हणजे आपलं हे लाडकं संकेतस्थळ) कसं असेल असं तुम्हाला वाटतं? इथे कश्या प्रकारचे लोक आणि लेख असतील? आपण सगळे जख्ख म्हातारे होऊन इथे येऊन किबोर्ड बडवत असु का? सुप्रसिद्ध विषयांवरची भांडणं तशीच चालू असतील का? काय बदल झाले असतील? काही सुचतंय का?
तुम्हाला काय वाटतं? इथे लिहाल का?
देशात, समाजात बदल होतील काय
देशात, समाजात बदल होतील काय ?
नसतील तर भांडणे न होण्यासाठी सदस्य कुठल्या गटाचे असावेत याचा फिल्टर लावण्यात आली आणि सारेच सम विचारी लोक असतील तर " सुप्रसिद्ध" विषयावरची भांडणे दिसणार नाहीत.
पण तरी वाद थांबतील याची खात्री कोण देईल ?
आपण सगळे जख्ख म्हातारे होऊन
आपण सगळे जख्ख म्हातारे होऊन इथे येऊन किबोर्ड बडवत असु का?
>>>>
काहीही.. मी इथे म्हातारा व्हायला नाही आलोय. माझी एक गर्लफ्रेंड आहे, आठ-दहा वर्षांनी कधीतरी आम्ही लग्न करू.. पुढे आठ-दहा वर्षांनी फॅमिली प्लानिंग.. त्यानंतर आणखी दहा-बारा वर्षांनी आमचा संसार जुना होईल.. मग काय तेच ते रूटीन.. ना आयुष्यात काही नवे घडेल, ना माझ्याकडे कोणाला काही सांगायला असेल.. बस्स तेव्हा मी मायबोलीची आणि मायबोलीकरांची रजा घेईन.
मायबोली :२०५० : खरेच खूप छान
मायबोली :२०५० : खरेच खूप छान कल्पना आहे पियु (आ)जी !!!
भविष्यात, (२०५० धरा) प्रस्तुत
भविष्यात, (२०५० धरा)
प्रस्तुत धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचण्यासाठी योग्य फॉंट शोधता शोधता नाकी नऊ येतील.
आणि ३००० साली..
जे काय लिहलयं त्याचा अर्थ लावण्यासाठी डोकेफाडू संशोधनं होतील!
४००० साली...
मायबोलीवरचं कोणतचं लेखन ना वाचता येईल ना ते कोणाला समजेल , कारण त्यावेळी वेगळीच भाषा, वेगळेच इंटरनेट , वेगळीच सॉफ्टवेअर असतील...
५००० साली
एखादा हौशी इतिहासकार मायबोलीचे ऊत्खनन करेल. मग काय जगासाठी तो एक अमूल्य ठेवा असेल
१०००० साली
त्यावेळी मानव अस्तित्वात असेल का हिच शंका आहे!!!!
मी इथे म्हातारा व्हायला नाही
मी इथे म्हातारा व्हायला नाही आलोय. माझी एक गर्लफ्रेंड आहे, आठ-दहा वर्षांनी कधीतरी आम्ही लग्न करू.. पुढे आठ-दहा वर्षांनी फॅमिली प्लानिंग.. त्यानंतर आणखी दहा-बारा वर्षांनी आमचा संसार जुना होईल.. मग काय तेच ते रूटीन..
सुप्रसिद्ध विषयांवरची भांडणं
सुप्रसिद्ध विषयांवरची भांडणं तशीच चालू असतील का? >>> ती तर चालूच राहतील. वरून टेक्नोसॅव्ही सासूबाई ग्रुप ची संख्या वाढून येथे सासू सुना असे वाद सुरु होतील :p
गहन प्रश्न विचारले आहेत.
गहन प्रश्न विचारले आहेत. उत्तरे मिळे पर्यंत. ... रुमाल.
पियू, एका तपापेक्षा जास्तकाळ
पियू, एका तपापेक्षा जास्तकाळ वावरतोय इथे.. थोडेफार तंत्र बदलले बाकी काहिही बदलले नाही..
तेव्हाची तरुण पिढी मायबोलीवर
तेव्हाची तरुण पिढी मायबोलीवर येईल का? त्यांना एखाद्या मराठी संकेतस्थळावर येण्यात रस असेल का हा मोठा प्रश्न ठरावा.
आले तर जे आपल्या नशिबी नाही ते त्यांच्या नशिबी असेल, म्हणजे ४०-५० वर्षांपूर्वीचे धागे वाचून त्यांना आताच्या समाजजीवनाबद्दल समजेल. आताचे राजकारण, क्रिकेट, चित्रपट, सुपर्रस्टार यांच्या समकालीन चर्चा त्यांना वाचायला मिळतील..
१) कदाचित मायबोली 'मॉमटॉकी'
१) कदाचित मायबोली 'मॉमटॉकी' म्हणून ओळखल जाईल
२) मायबोली टच स्क्रीन होईल
३) लॉग इन बायोमेट्रीक असेल त्यामूळे ड्यु आय चे वान्दे होतील
४) प्रोफाईल वेब कॅम बेस्ड होईल
३) लॉग इन बायोमेट्रीक असेल
३) लॉग इन बायोमेट्रीक असेल त्यामूळे ड्यु आय चे वान्दे होतील
>>>
आमेन
मी माबोवर १५ वर्षे आहे. बदल
मी माबोवर १५ वर्षे आहे. बदल बघितलेत त्यात मुख्य बदल म्हणजे माबो चे अॅव्हरेज वय २०-२५ बदलून आता बहुधा ३५+ झाले आहे
पूर्वी लग्नाळू मुले, प्रेमकहाण्या, एकमेकाचे फोटो 'निरुपद्रवी हेतूने' बघणे , मग लग्ने , ती कधी करावीत, लग्नात वाकून नमस्कार करावा का, मंगळसूत्र घालावे का, मुले व्हावीत का, असले बाफ चलतीत असायचे, आता राजकारण, रिटायर्मेन्ट, वृद्धाश्रम हे महत्त्वाचे टॉपिक्स दिसतायत.
थोडक्यात काय तर पूर्वी इथे एक झक्की होते. आणखी काही वर्षांनी सगळेच झक्की होतील
बदल असे आहेत: साहित्याच्या
बदल असे आहेत:
साहित्याच्या बाबतीत माबोची अधोगती झालेली आहे.
इथल्या बायका नको तितक्या जहाल स्त्रीवादी आणि कर्कश भांडकुदळ झालेल्या आहे.
स्त्रियांच्या पुढे पुढे करणारे पुरुष वाढले आहे.
ज्यांना छान लिहिता येत ते आळशी बनले आहे.
प्रचींची रेलचेल आहे.
निखळ मैत्रीपेक्षा दिखावा लोकांना आवडत चालला आहे.
डू-आयडी आजूनही राज्य करून आहे.
कदाचित साहीत्य पाडायचे
कदाचित साहीत्य पाडायचे सॉफ्टवेअर निघेल त्यामुळे साहित्याचा महापूर निघेल
प्रतिसादान्चे वेगळे सॉफ्टवेअर निघेलच
मन्गळ बाफ निघेल
काही काही गोष्टी खरंच बदलत
काही काही गोष्टी खरंच बदलत नाहीत... यु नो!!!
भविष्यात हे असे बाफ निघतीलः -
भविष्यात हे असे बाफ निघतीलः
- मला सबक्युटेनिअस मेड-व्हेरि-चिपने खाज सुटते. काय करू?
- मूनवॉक : तुम्ही केला आहे का? अनुभव सांगा.
- चांगला जेटप्याक **त कुठे मिळेल?
- लंच-पिल गिळताना तुम्ही कुठला द्रव वापरता?
- मला आपल्या ग्रहमालेतला नववा ग्रह बघायचाच!
- मी अमोरासमोर पाहिलेले ह्यूमन सायबॉर्ग्ज
- पृथ्वीवरून मंगळावर कसे जायचे?
.... अँड द लिस्ट गोज ऑन!
पृथ्वीवरून मंगळावर जायला सोबत
पृथ्वीवरून मंगळावर जायला सोबत हवी आहे. जाताना थालिपीठाची भाजणी नेऊ देतात का?
मृण्मयी
मृण्मयी
पण, समजा भविष्यात तोपर्यंत
पण, समजा भविष्यात तोपर्यंत वेगळे राज्य झालेले असले तर महाराष्ट्रातीलच मराठी लोकं इथे येतील की तिकडचे मराठी पण येतील?
हे सगळे बाफ त्यांच्या वेगळ्या साईटीवर निघतील की इकडेच निघतील?
पृथ्वीवरून मंगळावर जायला सोबत
पृथ्वीवरून मंगळावर जायला सोबत हवी आहे. जाताना थालिपीठाची भाजणी नेऊ देतात का? >>>
भाजणी तर नेऊ देतातच. आणी मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे तिथे नॉन नॉनस्टीक तव्यावर भोकं न पाडता थालिपीठ लावलं तरीही तव्याला चिकटत नाही.
मंगळावर थालीपीठ करताना
मंगळावर थालीपीठ करताना तव्याला भोकं पडली. मा.का.चु?
२०५० साली: १. ऋन्मेष
२०५० साली:
१. ऋन्मेष झक्कींप्रमाणे भारतावर टीका करत असेल.
२. 'आजही ओपीडी नातूच बघणार आहे' असे म्हणून साती अड्ड्यावर येऊन ठाण मांडून बसतील.
३. प्राचीन सहिष्णू कला दालन ह्या नावाने टीपापा आर्ट गॅलरीची एक ऐतिहासिक वास्तू होईल.
४. जानवे घालणे कसे घातक आहे ह्यावर ब्रेनवॉश झालेले लिंबूटिंबू हिरीरीने प्रतिक्रिया देत असतील.
५. 'माझ्या पोस्टवर येत जाऊ नका' असे राकु अॅडमीनसकट सर्वांनाच म्हणत असतील.
६. विशाल म्हस्केंना 'लाईफटाईम सातत्य पुरस्कार' मिळाल्याबद्दल कमलेश पाटील त्यांचे अभिनंदन करतील.
७. जामोप्या हाजहून मोबाईलवरून प्रतिसाद टायपतील.
८. निनाद २०१६ सालचे स्क्रीनशॉट्स डकवून एक, दोन आय डी उडवण्याचा प्रयत्न करतील.
९. 'हे पण पहा' मध्ये 'हे पान पाहायची परवानगी नाही' अशीच सगळी पाने असतील
१०. मी जामोप्यांना गझल आणि जामोप्या मला गुरूचरित्र शिकवत असतील.
(No subject)
जल्ले इतके बदल होतील पण
जल्ले इतके बदल होतील पण मिर्झा बेफी गझलेच्या कार्यशाळा घेणे सोडणार नाहीत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=HeXVLcvG0lE&t=31m55s
रच्याकने, भविष्यातील अडडा
रच्याकने, भविष्यातील अडडा कोणत्या राज्याच्या ग्रुप मधे असेल? की थेट नव्या देशाच्याच ग्रुप मधे असेल?
साती
साती
मला वाटले ते मीर 'बेफी' मीर
मला वाटले ते मीर 'बेफी' मीर आहेत.
कुठेही असला तरी काहीलोक चोरून
कुठेही असला तरी काहीलोक चोरून नजरा ठेवतीलच
भारी भारी बा!
भारी भारी बा!
Pages