काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
'कसला आवाज? आत्ता तर कुठे डोळा लागला होता.' ती मनातल्या मनात बोलली.
' एवढ्या पावसात , दुपारी अंगावर पांघरूण घेऊन झोपण्यात कसली मज्जा असते ! शाळेत असताना बऱ्याचदा आम्ही हेच करायचो.'
' ओ मॅडम, पण लग्न झालंय आता आपलं. आठवडाच झालाय. सासूबाईंना काही दुपारी झोपायची सवय नाही. त्यामुळे मलाही मनसोक्त लोळता येत नाही. उगाच अपराधी वाटतं, तरीच मनाला हुरहूर लागलीय.'
' आता उठावंच लागेल. ' तिने डोळे उघडले.
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचे स्वातंत्र्य .
अजुन काय हवे वाटत असतानाच समोर लक्ष गेलं .
समोर एक मॅरेज ब्युरो दिसला. खास अमेरिकेतील चांगल्या घरातील लग्नाळू मुलांची स्थळे आहेत. अशी काहीशी पाटी दिसली आणि मला हसूच आलं.
साल २०००. मला अमेरिकेतलाच मराठी,शामळू, हुशार,यशस्वी मुलगा हवा होता आणि तसा मी गटवलाही. प्रेम-बिम हा शुध्द बावळटपणा आहे असे माझे मत होते. आणि मी माझेच मत नेहमीच खरे करते.
आता हेच बघा ना, माझ्या चैनीच्या, मनमौजी आयुष्यात मुलांना,नातेवाईकांना जागा नाही हे आधीच ठरवून टाकले होते.
या विषयाच्या निमित्ताने सदस्यत्त्व जाऊन बघितले तर माझ्या मायबोली वयाचे सोळावे वरीस नजिकच्या भविष्यकाळात लागणार असल्याचे दिसले. काळाचा वेग खरोखर अचंबित करणारा आहे!. अगदी काल परवा तर मी जपानमध्ये होते. २००५ साल. परदेशात मराठीची भूक अधिक जाणवतेच. त्यामुळे केलेल्या आंतरजालीय शोधाशोधीत मनोगत डॉट कॉमचा शोध मला आधी लागला होता. व नंतर मायबोलीचा (बहुतेक)
मनोगतावर सायुरी (माझे आवडते जपानी नाव) या नावाने काही लेखन केले होते.
"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास- निरु"
बकेट लिस्ट म्हटल्यानंतर बहुतेक लोकांच्या मनातल्या इच्छा या कळत्या वयामधल्या असतात.
कुठेतरी बकेट लिस्ट हा शब्द ऐकलेला असतो, बर्यापैकी वाढलेल्या वाचनात आलेला असतो…
कुठेतरी, कोणाच्यातरी बकेट लिस्टबद्दल माहिती आलेली असते, तर कधी चित्रपट आलेले, पाहिलेले असतात.
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. आणखी काय हवं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि तिला ते दृष्य दिसलं.
ती गाडी सुरू करून घरासमोरून निघणार तितक्यात रस्त्यावर अचानक सुरू झालेली धांदल. गाण्यांच्या आवाजाने बाहेरचा आवाज झाकोळला जात होता. पण तरीही तो सहन न होणारा वास हळूहळू झिरपायला लागला आणि तिला अंदाज आलाच.
सगळी तयारी इतकी वेळेत करून खरतर आता तिला निघायला उशीर करायचा नव्हता. पण न थांबता तसच निघून जाणंही शहाणपणाचं नव्हतं. नाईलाजाने तिने गाडी बंद केली. दार उघडलं आणि आला तो परिचित घंटेसारखा आवाज आणि मागून ऐकू आली ती नेहमीचीच आरोळी "बाई sssssss कचरा !!!"
"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ..."
कोणीतरी एका कारला टेकून उभे आहे असं वाटलं …
तो नाहीयंना??
छे..तो कशाला इथे येईल…..
सोनेरी काड्यांचा चष्मा,सडपातळ शरीरयष्टी,चेक्सचा फुलशर्ट
वाटतोय तर तोच…
मी डोळे फाडफाडून बघतच राहिले…
द्यावी का ओळख…
विचारावं का त्याला…असा २० वर्षापूर्वी आपला अचानक ब्रेकअप का झाला?
जाऊ दे…जुनी मढी कशाला उकरायची?
आपलं काही वाईट झालं नाही आणि त्याचंही बरंच दिसतयं चेहर्यावरून…
आपण फारच बारकाईने बघतोय का त्याला…
भारतात तेव्हा नेट बाल्यावस्थेत होतं. १२० रुपयात एअरटेलच रिचार्ज करून डेटा मिळवायचा आणि त्यात नेटवर हुंदडून घ्यायच कॉल करायचे, sms ही पाठवायचे!!! हुश्श. नेटवर हुंदडायचे म्हणजे तरी काय , तर गुगल ओपन करून गुगल जे दाखवेल ते वाचत बसायचं.
माझ्या आठवणीतली मायबोली- निरु
आया है मुझे फिर याद वो जालीम..
गुजरा जमाना बचपन का...
मायबोलीला 25 वर्ष झाली म्हणताना असं काहीसं मनात यायला हवं होतं.
पण नाही आलं. कारण मी तर अजून नवतरुण, खरं तर बाल्यावस्थेत. त्या सुरुवातीच्या गुजऱ्या जमान्यामधला नाहीच.
कारण माझं मायबोली वय : सहा वर्ष चार महिने.
थोडक्यात मी मायबोलीचं एकोणीसावं वर्ष म्हणजे तिचं टीनएजरपण संपता संपता या परिवारात सामील झालो.
हां, आधी वर्ष, दीड वर्ष वाचनमात्र होतो. सुरुवातीला क्रमशः कादंबऱ्या वाचल्या. नंतर कथांकडे वळलो.
बकेट लिस्ट हा शब्दप्रयोग मला अगदी अलीकडच्या काळात कळला. त्या आधी माझ्या फक्त इच्छा होत्या. इच्छा हा शब्दही मी चुकीचाच वापरतेय. जे काही होते त्यातल्या काहीना मुंगेरीलाल के हसीं सपने म्हणायला हवे. थिंक बिग ड्रिम बिग वगैरे मोटीवेशनल स्पिकरवाल्यांच्या बाता कानांना कितीही गोड वाटल्या तरी जर्रा फुलके आफताब नही होता हेच खरे.