विज्ञान
नाशिकमध्ये ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी माहिती हवीय.
नमस्कार. मी सध्या एका कंपनीत कामाला आहे. मला लहानपणापासून ज्योतिषशास्त्राची आवड आहे. परंतु योग्य माहिती नसल्याने, खूप वेळा नुकसान होऊन पदरी निराशाच आहे.
नाशिकमध्ये जॉब करून संध्याकाळी कुणी ज्योतिषशास्त्र शिकवणारे असतील, तर कृपया मदत करावी.
धन्यवाद!
मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग १/३ (आकारमानाने पडणारे फरक)
अधुरी एक कहाणी... (शतशब्दकथा)
पाऊस सुरू झालेला पाहून अॅना मोहरली. फेलिक्सने ज्याला ती लाडाने फेलिस म्हणायची, नुकतीच तिला मागणी घातली होती. आज संध्याकाळी त्यांच्या मीलनाचा मुहूर्त ठरला होता. मीलनाची ओढ आणि हा पाऊस तिची हुरहुर वाढवत होता.
दिवसभर पडणारा संततधार पाऊस आता थांबला होता. प्रणयरंगात रंगण्यासाठी दोघांनी एक जागाही शोधली होती. बागेतला हवा तसा एकांत देणारा कोपरा होता तो.
ती घटिका आली आणि फेलिस तिथे पोहोचला तेव्हा अॅना त्याची वाटच पाहत होती. त्याला पाहून अॅना झक्क लाजली. फेलिसने तिला आपल्या बाहुपाशात ओढले आणि...
रामानुजनचे कोडे!
भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ह्याच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग पुढे देतो. ह्या प्रसंगाच्या अनुषंगाने आलेल्या कोड्याची मजा आपण ह्या लेखात घेऊ.
अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर
मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण
अंधश्रद्धा आणि मेंदूविज्ञान
जीवनात ही घडी अशीच राहू दे (स्व-साधर्म्य - भाग २)
मागच्या भागात (आकाश के उस पार भी आकाश है (स्व-साधर्म्य - भाग १)) आपण मँडेलब्रॉटने उपस्थित केलेला प्रश्न पहिला. त्या अनुषंगाने कोखचा वक्र आणि अपूर्णांक भूमिती याबद्दलही काही वाचले. या स्व-साधर्म्यामुळे अतिशय कमी क्षेत्रफळाच्या आत प्रचंड मोठ्या लांबीची रेष, रेष म्हणण्यापेक्षा वक्र, कसा काय सामावू शकतो ते पाहिले. सृष्टीमध्ये विलसत असलेले स्व-साधर्म्य मँडेलब्रॉटच्या ध्यानात आले आणि यातूनच प्रेरणा घेऊन त्याने आकृत्यांशी बरेच खेळ केले.
परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण _ चित्रपट चर्चा
परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण
काल सिनेमागृहात जाऊन पाहिला.
एकदातरी पाहायला हवा असा चित्रपट !!
या चित्रपटाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर, माझं मत असं आहे :
कथा : सत्यकथा आहे, देशप्रेम जागृत करते , प्रेरित करते
अभिनय: उत्तम
गाणी : सुश्राव्य
जमेची बाजू: देशाने केली अण्वस्त्र चाचणीची यशस्वी कथा !!
खटकलेल्या बाबी : नायकाचं खाजगी आयुष्य थोडंसं जास्त दाखवलं आहे, गरज नव्हती. सुरुवातीला चित्रपट संथ आहे, नंतर पकड घेतो.
विज्ञान निष्ठ बनणे काळाची गरज
विज्ञान निष्ठ बनणे काळाची गरज
आज जागतिक विज्ञान दिन. अंधश्रद्धा निर्मूलन करून विज्ञानाची कास धरण्यासाठी संकल्प करण्याचा आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागाची शहरिकरणाकडे वाटचाल सुरू असली तरी अंधश्रद्धेच्या विळख्यातून हा परिसर अद्याप दूर झालेला नाही. आजच्या युवा पिढीकडून त्या दृष्टीने योगदान होण्याची गरज आहे.
मानसशास्त्रातील रंजक प्रयोग - १
Pages
![Subscribe to RSS - विज्ञान](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)