“किती वाजले?”
“नक्की नाही माहिती, पण १० वाजले असावेत.”
“हम्म … जॉन-हेनरी गेल्यापासून वेळेची फारच पंचाईत होते.”
साल 1856 मध्ये हा संवाद जणू रोजच व्हायचा. अशातच मारियाला ऐयरी साहेबांचा निरोप मिळाला. लंडनच्या गोठवणाऱ्या हिवाळ्यात मनाला ऊब देणारी बातमी होती ती. त्यांनी मारियाला जॉन-हेनरीचे काम पुढे चालू ठेवायला परवानगी दिली होती! पण एका अटीवर - जॉन-हेनरी प्रमाणे तिला ते नोकरीवर ठेवणार नाहीत, तिने आपल्या मेहनतीचा मोबदला म्हणून व्यापाऱ्यांकडून वर्गणी घेतली तर त्याला त्यांची ‘ना’ नव्हती पण नोकरी देणार नाही. मारियाला ते अगदी मान्य होते.
उन्हाळा सुरु झालाय. पाणी साठवण्यासाठी मातीचे माठ विक्रीस आलेत ते अनेकांनी विकत घेतले असतील, तर इतर अनेक जणांनी मागच्या वर्षी उन्हाळ्यानंतर पोटमाळ्यावर ठेऊन दिलेले माठ वापरायला काढले असतील. आजकाल घरोघरी फ्रीज आहेत. पण माठातल्या नैसर्गिकरित्या थंड झालेल्या पाण्याची गोडी वेगळीच. गमतीचा भाग असा कि फ्रीजमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी उर्जा लागते (इलेक्ट्रिसिटी) पण हेच या मातीच्या माठात मात्र कोणतीही उर्जा खर्च न करता अगदी फुकटात पाणी थंडगार करून मिळते. असे काय असते बुवा या माठात? उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी थंड का राहते? तसा हा जुनाच प्रश्न आहे.
रात्री आकाशात दिसणाऱ्या तारे, ग्रह, चंद्र, धूमकेतू अशा सगळ्यांबद्दल मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव नुसत्या डोळ्यांनी आकाशाचे निरीक्षण करत आलेला आहे. इ.स. सोळाव्या शतकात गॅलिलिओने आकाशाकडे दुर्बीण रोखण्यापूर्वी केवळ डोळ्यांचा वापर करून भारतीय, चिनी, ग्रीक, इन्का इत्यादी संस्कृतींमधल्या माणसांनी रात्री दिसणाऱ्या चंद्राचे, ताऱ्यांचे, ग्रहांचे भरपूर निरीक्षण केलेले होते आणि त्यांच्या गतीविषयीही आपले अंदाज मांडलेले होते. दुर्बिणीचा वापर सुरू झाल्यापासून मात्र माणसाच्या खगोलशास्त्रविषयक ज्ञानात मोलाची भर पडली.
छद्मविज्ञान किंवा pseudoscience हा गेल्या काही वर्षांतील एक परवलीचा शब्द झाला आहे. विज्ञानाच्या प्रचलित परिघाबाहेर चालणारे कित्येक उपक्रम हे कसे शास्त्रीय आहेत याचे दावे आपण समाजमाध्यमांतून पाहत वाचत असतो. त्याचवेळी काही विशिष्ट गट हेच उपक्रम कसे अशास्त्रीय आणि म्हणून छद्मविज्ञान आहेत असा हिरीरीने प्रचार करत असतात. सर्वसामान्य व्यक्तींसाठी हे वरवर पाहता खरे ठरणारे दावे जेव्हा महनीय व्यक्ती जेव्हा छद्मविज्ञान म्हणून नाकारतात तेव्हा मनाचा गोंधळ होणे साहजिक आहे.
पावसाळा सुरु झाला की मलेरियाची (हिवताप) साथ हमखास असते. एके ठिकाणी वाचलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी मलेरियामुळे १००० मृत्यू नोंदवले जातात. असा हा मलेरिया हजारो वर्षे जुना आजार मानला जातो. पूर्वी युरोप आणि अमेरिकेमध्येदेखील मलेरियाचा धुमाकूळ होता. असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा पाडाव होण्यात काही अंशी मलेरिया हा आजार कारणीभूत होता.
पुंजभौतिकी मध्ये तरंगकण द्विधावस्था (Wave–particle duality) अशी एक संकल्पना आहे. प्रकाशाच्या मुलभूत अवस्थेचे स्वरूप शोधताना असे लक्षात आले कि तो तरंग आणि कण या दोन्ही अवस्थेत आहे असे मानले तरच प्रकाशासंबंधी आढळून आलेल्या परस्परविरोधी गुणधर्मांची गणिती पडताळणी करता येते. त्यातूनच तरंगकण द्विधावस्था हि कल्पना पुढे आली.
इंजिनिअरिंगला असणारा १९ वर्षांचा सुयश इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित माहितीचा चांगला जाणकार समजला जातो.त्यातला किडाच म्हणा ना! ५ वर्षांचा असल्यापासून साध्या ड्रायसेलवर LED बल्ब लावण्यापासून सुरु झालेला प्रवास आता हाय एंड सेरीजच्या बिघडलेल्या म्युझिक सिस्टीम्स लीलया दुरुस्त करण्यापर्यंत येऊन ठेपला आहे.
या वर्षीच्या (२०१८) "संवाद" या दिवाळी अंकात छापून आलेली माझी विज्ञान कथा !!
दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत -
"डॉक्टर कोहेन, खरं तर मी वेळ ही गोष्ट लांबी, रुंदी आणि उंची याप्रमाणे एक मिती आहे हे मानत नाही. वेळ ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. घडलेल्या घटना क्रमाने स्मरणात ठेवण्यासाठी. पण काळ, अंतर आणि वेग यांच्यातल्या गुणोत्तराचा वापर मात्र मी वेगवान प्रवासासाठी करून घेणार आहे!', शास्त्रज्ञ डॉ. रमण म्हणाले.