सलमान
सलमान आणि काळवीट!
खरंतर, चॅनेल्सवरचा या बातमीवरचा भडीमार ऐकून मी आपले मायबोलीकर आतापर्यंत मैदानात उतरले असतील, या अपेक्षेने वाचायला आले होते. पण मायबोलीकरांचा शाहरुख जास्त आवडता असल्यामुळे सलमानसाठी वेळ मिळाला नसावा बहुतेक. मग आपणच काढावा म्हंटल धागा.
येऊद्या तुमची मते इथे..... सलमान, काळवीट आणि इतर.
बॉलीवूडला धक्का ! काळवीट प्रकरणात सलमानला पाच वर्षांची शिक्षा !
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची (सैफ अलीखान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सलमानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड शिक्षा झाली आहे..
सलमान खरेच गजाआड जाणार का? आणि किती काळासाठी?
सलमानचा वर्षाला एक चित्रपट यायचा जो ३०० ते ४०० करोड कमवायचा. एकूण उलाढाल यापेक्षा जास्तच..
त्याचे असे ऐन उमेदीच्या काळात जेलमध्ये जाणे बॉलीवूडला मोठा फटकाच आहे.
निकालही लागला आहे तो तब्बल वीस वर्षांनी !!
अल्पावधीत बॉडी कशी बनवावी?
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप सुलतान बघायला जातोय. बहुतांश जणांचा चित्रपट एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी दुनियादारीच्या वेळी आणि नुकतेच सैराटबाबत केले होते. यण्दा हा मान चक्क सुलतानने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी झिंगाट किंवा झिंदगी सारखी गाणी सुलतानमध्ये नाहीत. म्हणून मग सलमान एखादी फाईट जिंकला रे जिंकला, की टीशर्ट काढून दादा गांगूलीच्या आवेशात फिरवायचा प्लान बनला आहे. मात्र शर्ट काढला तर आतले बनियान दिसणार, त्यामुळे नवी ब्रांडेड बनियान घेणे आले.
सुलतान प्लस मायनस सलमान
कायद्या पुढे सर्व स(ल)मान
