सुलतान प्लस मायनस सलमान

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2016 - 17:43

खून मे तेरे मिट्टी
मिट्टी मे तेरा खून
उपर अल्लाह निचे धरती
बिच मे तेरा जुनून..
रे सुलतान.. एक नंबर सुलतान .. एक नंबर

अपेक्षाफाड निघाला पिक्चर
सलमानचा पिक्चर नाहीयेच हा.. सलमानपट म्हणजे सौथेंडियन, उथळ, वरवर, मेलोड्रामा, स्टाईलगिरी, आयटम नंबर, भाई आले, भाई नाचले, भाईंनी फाईट केली, भाई भाई करत ३०० करोडचा चुना लावून गेले. पण जर बाहुबलीसारखा एखादा पिक्चर ईथे करोडो कमावत असेल आणि वर राष्ट्रीय पुरस्कारही मिळवत असेल तर सुलतानचा हक्क आहे चार ५०० करोड कमवायचा. या देशात आजवर फायटींगवर एवढा आकर्षक चित्रपट बनला नसावा. त्या नाच बलियेमध्ये महागुरू जसे नृत्यातले बारकावे टिपून सांगायचे तसे फायटींगमधील बारकावे टिपत ते पब्लिकला ईंटरेस्टींग वाटावे अश्या पद्धतीने सादर केले आहेत. एकूण एक फाईट सीन ईंटरेस्टींग आहेत.

सलमान खान - सलमानने हि भुमिका पेललीय. एखाद्या भुमिकेसाठी तो मेहनत घेईल अशी अपेक्षाही केली नव्हती. पण त्याने अपेक्षेच्या फार पलीकडे जात आश्चर्याचा धक्का दिलाय. सुरुवातीला तो जरासा मेंगळटासारखा वागताना म्हातारपणीचा धर्मेंद बघतोय असे वाटत होते. पण लगेच त्याने स्वताला सावरले आणि हळूहळू सलमान स्पेशल एक्स फॅक्टर हा त्या कॅरेक्टरशी छेडछाड न करता दिसू लागला.
एक मात्र नक्की, हा सलमानच्या कारकिर्दीतला लक्षात राहणारा रोल ठरेल. सचिनने जसे वयाची पस्तिशी उलटल्यावर आता हा निवृत्त होईल काही वर्षात या चर्चा झडू लागण्याच्या वयात पोहोचल्यावर एकदिवसीयमध्ये २०० धावा मारल्या होत्या, तसेच काहीसे सलमानने त्याच्या लेव्हलला केले आहे.

अनुष्का शर्मा - पुन्हा एकदा ईम्प्रेस केले. ती सुद्धा चित्रपटात सलमानसारखीच पहिलवान दाखवली आहे. पण भुमिकेची गरज म्हणून बॉडी शॉडी कमवायच्या नादात आपल्या सौण्दर्याशी खेळ न करता अभिनय आणि बॉडी लॅगवेजच्या जिवावर तिने आपले कॅरेक्टर विश्वसनीय केले आहे.

आर आश्विन - मला याचे नाव माहीत नाही पण हा थोडाफार भारतीय क्रिकेटपटू आश्विनसारखा वाटतो. हा तोच जो सुलतानच्या सेकंड इनिंगमध्ये त्याला आपल्यातर्फे रिंगणात उतरवतो. याचे कॅरेक्टर फार छान जमलेय आणि अभिनय फार संयत झाला आहे.

ईतर कॅरेक्टर - सुलतानचा मित्र, सासरा (उस्ताद), कोच वगैरे आपापल्या जागी परफेक्ट. अन्यथा ओवरएक्टींग माझ्या फार डोक्यात जाते.

संगीत - एकदोन गाणी मूड बनवतात, पण एक दोन फिल्मी प्रेमगीते पुढे ढकलायला हातात रिमोट असता तर बरे अशी वाटतात. पण पिक्चर मोठा असल्याने बाथरूमला जायची सोय म्हणून त्याकडे बघू शकतो. अन्यथा ईतर चित्रपट बोर व्हायची संधी देत नाही ईतक्या वेगात सरकतो.
लेखाच्या सुरुवातीचे टायटल साँग मात्र चित्रपटाचा आत्मा आहे. जसजसे आपण चित्रपटात गुंतू लागतो तसे हे गाणे आल्यावर आपल्याही अंगात वीरश्री संचारू लागते. जे योगदान सैराटच्या यशात त्याच्या गाण्यांचे आणि बॅकग्राऊण्ड म्युजिकचे आहे तेच ईथे सुलतानच्या यशात या गाण्याचे असेल.

एक्शन - मजा आणते. या चित्रपटाचा खरा हिरो यातील एक्शन आहे. त्या रोहीत शेट्टीला कोणीतरी सांगा की गाड्या उडवण्यापेक्षा अशी माणसे उडवून दाखव. जास्त मजा येते. सुलतान स्पेशल धोबीपछाड तर ईतका कमाल जमलाय की त्या जिवावर सुलतान कोणालाही पछाडू शकतो हा विश्वास आपल्याला वाटू लागतो. रेसलिंग कॉम्पिटीशनच्या पहिल्याच राऊण्डला तो जगाला याची झलक दाखवत जेव्हा जिंकतो, त्यानंतरचा माहौल जसा पडद्यावर बनतो तसाच तो चित्रपटगृहातही अनुभवला. लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात, ज्यात एखादा माझ्यासारखा शाहरूखचा फ्यानही असतो.

ओवरऑल - सुलतानमधून सलमानला प्लस करा किंवा मायनस करा, सुलतान हा सुलतान आहे आणि त्यासाठी म्हणून चित्रपट एकदा तरी बघायलाच हवा.
दुसऱ्यांदा बघायचा की नाही हे ज्याची त्याची आवड.
पण जर २०० रुपयांपर्यंत तिकिट मिळत असेल तर या सुलतानला थिएटरातच अनुभवा. पैसा वसूल आहे. हेच सांगायला एवढ्या रात्री हा लिखाणप्रपंच. उद्या फ्रेश मूड मध्ये आणखी भर टाकेन Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असल्या कारणाकरता एवढे उशिरा पर्यंत जागण्यापेक्षा तासभर जास्त झोप झाली असती तर कांकणभर तब्येत पण सुधारली असती.:दिवा:

अहो रश्मी तसेही झोपायच्या आधी गर्लफ्रेण्डला व्हॉटसपवर मेसेज करून पिक्चर कसा होता हे सांगणे गरजेचे होते. तीच पोस्ट जरा सविस्तर केली ईतकेच.. बाकी झोपणे म्हणजे आयुष्य वेस्ट घालवणे अशी साधारण मेण्टेलिटी आहे माझी Happy

मला रश्मी ताई/ मावशी म्हणले तरी चालेल.:फिदी: रात्री १२ नंतर विनाकारण जागणे हे तब्येतीला अत्यंत घातक असते. जे रात्रपाळीच नाईलाजाने करतात उदाहरणार्थ शिफ्टचे कामगार, विमाने, रेल्वेचे कामगार ईत्यादी. त्यांचा तो रोजगारच असतो, पण ज्यांना रात्री ११ वाजता झोपायला मिळु शकते त्यांनी जागरण टाळावेच हा माझा फुकटचा पण महत्वाचा सल्ला.

तुझी गफ्रे सकाळी ६ वाजता उठुन धावत पळत सुलतान बघायला जाणार होती का? तुमच्या मुंबईत सकाळी ७ वाजल्यापासुन शो असतात का? नाही ना की हो? जर नाही तर मग सकाळी उठुन मेसेज करु शकला असतास. यापुढे गफ्रेला तसे सांगुन ठेव. उगाच तिची झोपमोड केलीस.

रश्मी, त्याने वॉटसॅपवर मेसेज केला नसता तर उलट सूनबाई (आमची) रात्रभर जागत राहिली असती याच्या ऑनलाईन दिसण्याची वाट बघत.
त्यापेक्षा तीन साडेतीनला का होईना, झोपली असेल सुलतानचा रिव्यू वाचून सूनबाई!

साती Proud

बाकी तिचा सकाळी मेसेज आला, मारधाड सोडून आणखी काही चांगले आहे का यात? कप्पाळ! तू पोगो बघ म्हटलं.
तर ईथेही ज्यांना कुस्ती आणि रेसलिंग हे मारधाड वाटत असेल त्यांनी कृपया जाऊ नका.

जाई माहितीबद्दल धन्यवाद,
सध्या तांत्रिक कारणांमुळे टू जी नेटवर्कवाला मोबाईलच उपलब्ध आहे. त्यामुळे जास्त गूगलशोध घेतला नाही. अन्यथा कोंबडा आरवला असता.

रोहीत शेट्टीला कोणीतरी सांगा की गाड्या उडवण्यापेक्षा अशी माणसे उडवून दाखव. जास्त मजा येते>>>> अगदी..

खुप दिवसांनी तुझा लेख आवडला!

खरंच सुलतान तर सुलतानच आहे पैसा वसूल चित्रपट. कोणी काहीही म्हणो पण सलमान अक्षरशः ही भुमिका जगलाय असेच वाटते.

ईतर कॅरेक्टर - सुलतानचा मित्र, सासरा (उस्ताद), कोच वगैरे आपापल्या जागी परफेक्ट. अन्यथा ओवरएक्टींग माझ्या फार डोक्यात जाते.

हे शारुखच्या बाबत म्हणत आहेस ना !

अन्यथा ओवरएक्टींग माझ्या फार डोक्यात जाते.>>> तरीच शाहरुख तुझ्या डोक्यात फिट बसला आहे.

सुलतान! मस्त मस्त मस्त मुवी.
भाई बद्दल क्या कहना? बोले तो झक्कास. शिट्याच शिट्या. एकदम चटाई.
अनुश्का मस्तच. एकदम कडक. स्ट्राँग!
सिनेमा लांबीला मोठा आहे पण कुठेही कंटाळा आला नाही.
एअरलिफ्ट मधला सरकारी अधिकारी होता, त्याने आरफाच्या वडीलांचं काम केलंय. सहज सुंदर अभिनय.
आकाश, गोविंद चा अभिनय पण छान.
गाणी पण मस्त जमली आहेत. जग घुमिया तेरे जैसा ना कोइ मस्त.

अय्यो! रणदिप हुडा बद्दल राहिलंच Happy
लिहिण्यासरखं काहीच नाही. जसा नेहमी आवडतो तसाच ह्यातही आवडला. एकदम टॉप.

आरफाचं बाळासाठी चॅम्पियनशिप सोडणं आजिबात खटकलं नाही.

सुरुवातीला तो जरासा मेंगळटासारखा वागताना म्हातारपणीचा धर्मेंद बघतोय असे वाटत होते.>>>>>>> अरे एsssss
कधी भेटलास तर फटके देइन.

सस्मित, म्हातारपणीचा धर्मेंद्र आवडीचा का Wink

बाकी तरुणपणीच्या हॅन्डसम धरमपाजींचा फ्यान कलब आमच्या घरात देवानंद एवढाच.. पण म्हातारपणी का काम करायचा अनाकलनीय.. सुरुवातीची सलमानची डायलॉग डिलीव्हरी मला खरेच त्या कॅटेगरीतील वाटली.

ग्रेट न्यूज !
(माझ्यासाठी)

कॉलेज ग्रूप ऑफ फ्रेंडसबरोबर हा सिनेमा येत्या विकांताला पुन्हा बघायला जात आहे. आमच्यातल्या बरेच जणांचा हा पाहून झालाय पण एकत्र एंजॉय करायला पुन्हा बघणार आहोत. या आधी असा प्रकार आम्ही फार फार वर्षांपूर्वी दुनियादारी आणि नुकतेच सैराटबाबत केलेला. आता सुलतानने तो मान मिळवला. स्ट्रेंज !
पण या गेट टू गेदर साठी सर्व एक्सायटेड आहोत. तुर्तास दंगा घालायच्या जागा आठवतोय, एखादे झिंगाट वा झिंदगी सारखे गाणे मात्र मिस करणार..

गाणं राहू देत, तुम्ही कुस्त्यांच्या सिनला एकमेकांसोबत मारामारी करा हाकानाका

मारामारी नाही, पण तुर्तास टीशर्ट काढून फिरवायचा प्लान ठरलाय .. फक्त त्याआधी एखादी ब्रांडेड बनियान घेणे गरजेचे Happy

गाणं राहू देत, तुम्ही कुस्त्यांच्या सिनला एकमेकांसोबत मारामारी करा हाकानाका Rofl