कायद्या पुढे सर्व स(ल)मान
काल संध्याकाळी ऑफीस मधून घरी आलो. टी व्ही लावला. सलमान ला जामीन मिळाल्याची बातमी ऐकली आणि आधी देव पाण्यात ठेवले होते ते बाहेर काढले. सुटकेचा श्वास सोडला आम्ही तिघांनी...(सलमान, मी आणि आमचे देव.) हे हल्ली मीडिया एनजीओज वागरे फालतू लोकांच अती चाललय बरका. कायद्या पुढे म्हणे सर्व समान. अरे असतील तुमच्या कायदयापुढे सर्व समान... तुमच्या कायदयापुढे पण आमचा सलमान अ-समान. तुमचा सर्व सामन्यांचा कायदा काय माझ्या सलमान ला लागू पडतो की काय? सलमान म्हणजे वाटला कोण तुम्हाला? एकतर गेली तेरा वर्ष त्या बिचार्या (सलमानसारख्या) ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला तुम्ही हॅरस केलत खोट्यानाट्या कोर्ट केसेस मागे लावून. जी केस अदरवाइज़ खरतर एखाद्याने दीड-दोन तासात नुसत्या चहापाण्यावर सोडवली असती ती केस तेरा वर्ष लांबवली. केवढा मनस्ताप त्या आमच्या निरागस सलमान भाईला. मला एक समजत नाही, हीट-अँड-रन, हीट-अँड-रन म्हणून सगळी एवढा टाहो फोडत आहेत, प्रत्येक मूवी ‘हीट’ देणारा सलमानने खर्या आयुष्यात एखाद छोटस केल असेल 'हीट' तर काय एवढा मोठा पराचा कावळा करायची आहे गरज ? आता सलमान ने समजा थोडी प्यायली आणि चालवली गाडी आणि थोडा कंट्रोल गेला स्टेअरिंग वरचा रात्री बेरात्री दोन च्या सुमारास तर एवढी सगळी कडे बोंबाबोंब ? खर म्हणजे आमचे आणखी एक संतकवी आणि महात्मा-गायक श्रीयुत अभिजीत जी म्हणतात त्या प्रमाणे चूक त्या फुटपाथ वर थंडी पावसात झोपणार्यांचीच नव्हे काय? त्यांनी खरेतर तर सरळ त्या रात्री J.W. मेरीयोटच्या पार्टी मधे जाऊन सल्लूला म्हणायच…
"भाई अपुणको थोडा तुम्हारे बेडरूम का चावी देव...आपून हॉमलेस है, तुम बीयिंग ह्यूमन है बिं दास्स दारू पीनेका और गाडी चलानेका… बेडरूम का चावी देव”
आमच्या भाई ने “बीयिंग ह्यूमन” होत एका मिनिटात काढून दिली असती चावी गॅलक्सी अपार्टमेंटस ची. कशाला झोपायच कारण नसतानात फूटपाथ वर ? अहो साध अभिजीतला एक फोन करून जरी विचारल असत ना, त्यांचा झोपण्याचा प्रश्न सोडावला असता त्याने. अहो किती हळवे असतात हे बॉलीवुड वाले ! एका एका शॉट ला आठ आठ दहा मिनिट रडतात डोळ्यात ग्लिसरीन घालून. हे नकराश्रू अश्या वेळी नसते का उपयोगी पडले ? हे सगळे 'सलमानायण' घडले च नसते आणि पुज्य सलमानयाना भोगवा लागलेला बारा वर्षे वनवास आणि एक वर्षाचा अद्न्यात वास भोगवा लागालाच नसता. आपल्या देशात कला आणि कलाकार यांच्या भावनांना काही किंमत नाही हेच खर. जो कायदा सगळ्यांना म्हणे तोच सलमान ला. अरे वा...जरा टी. आर. पी. वाढु लागल्यावर लाडातच आलात की.
मला आणखी एक गोष्ट नाही समजत. जसे आपल्या सौन्सदेत कोणताही नवा कायदा पास झाला की त्याला 'हा कायदा काश्मीर' सोडून भारताच्या सर्व गणराज्यांत लागू आहे अस नमूद केल जात तस 'जम्मू काश्मीर एवम बॉलिवुड' असा किरकोळ बदल करायला काय हरकत आहे ? सगळा प्रश्नच चुटकी सरशी सुटून जाईल. सलमान ने काळवीटे मारली की हा कायदा पुढे करायचा. सलमानने विवेक ओबेरॉय ला धम्कावल आणि त्याच बिचार बाप सुरेश ओबेरॉय कावल, की हा कलाम पुढे करायचा, ऐश्वर्या ने सलमान विरोधात तिच्या लोखंडवाला मधील फ्लॅट च्या बाहेर रात्र भर धिंगाणा घातल्याचा आरोप केला की हे कलाम पुढे करायच. कित्ति कित्ति सोप झाला असत या हर हुन्नरी कला कराच आयुष्य. आपल्या इथे कलेला आणि कलाकाराला काही किंमत नाही हेच खर. त्याने (सलमान ने) जर कोर्ट कॅचेरीच्या कागद पात्रांमधे खर्च केलेला वेळ जिम मधे खर्च केला असता तर, एव्हाना सिक्स, एटच काय ‘बे’ चा आक्खा पाढा संपेस्तॉवर पॅक्स बनवले असते.
हे सगळ आजु बाजू ला पाहील की मन खट्टू होत. भारतीय न्याय व्यवस्थेने ‘सलमान’ चा वेळ खर्च केल्या बद्दल कुणीच काही बोलत नाही. चीड येते. सगळ्यांना पडली आहे ती त्या प्राण गेलेल्या माणसाची. पण त्या चार माणसांच्या चुकीच्या ठिकाणी झोपण्याने सलमान च्या लँडक्रूझरला झालेल्या नुकसाना बद्दल कुणालाच काही पडलेली नाही. सलमान ला या अपघाता नंतर ‘उतरलेली’, पुन्हा घ्यावी लागली असेल त्याबद्दल या लोकांना काहीच कस वाटत नाही? सलमान च्या गाडीत बसलेल्या कमाल खान सारख्या, ज्याने स्वता: एक ब्रिटीश नागरिक असूनही 'ओ-ओ जाने-जाना' सारखी अनेक देशभक्ती पर गीते म्हणली, अशा प्राणप्रिय मित्राला देश सोडून पळून जाव लागला या बद्दल कुणाला काहीही क्षिती नाही.
झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आता निदान इठेऊन पुढे तरी ऋषितुल्य सलमान ला झालेल्या मनस्तापा विषयी प्रशासन दीलगिरी व्यक्त करेल आणि त्याला लवकरच त्याला सेंट्रल गवर्नमेंटची पेन्षन मंजूर होईल अशी आशा करूया…
चारूदत्त रामतीर्थकर
पुणे
best very nice...
best very nice...
Bhai roxx.. लेख आवडला.
Bhai roxx..
लेख आवडला.
:D
आवडला लेख !
आवडला लेख !
मस्त लेख.
मस्त लेख.