अविनाश धर्माधिकारी; किरण बेदी ए चंद्रशेखर आणि अलीकडेचेच ऊदाहरण घ्यायाचे झाले तर दुर्गाशक्ती नागपाल. या सगळ्या लोकांची नाव एकत्रित घ्यायच काय कारण असेल बर !!!! खर सांगायचे म्हणजे या सर्वात एक समान धागा आहे तो म्हणजे हे सगळे लोक सनदी अधिकारी आहेत. या पदापर्यत पोचण्यासाठी परीक्षा द्यावी लागते . ही परीक्षा घेण्यार्या संस्थेच नाव आहे संघ लोकसेवा आयोग ...
राज्यांच्या विकासात सध्या गुजरात मॉडेल आणि बिहार मॉडेल असे परवलीचे दोन शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. यात महाराष्ट्र किंवा इतर राज्यांचं स्थान काय ? ही मॉडेल्स नेमकी काय आहेत ? वस्तुस्थिती किती, प्रचाराचा भाग किती याचं हितगुज इथं करूयात.
(सांख्यिकी काथ्याकुटीला पर्याय नाही हे उघड आहे. जाणकारांनी सोप्या भाषेत सांगावं ही विनंती ).
नमस्कार,
नेमेची येतो मग पावसाळा याप्रमाणे नेहमी पावसाळ्याच्या सुमारास रस्त्यांची बोंब होते. लोक सगळीकडचे खड्ड्यांचे फोटो प्रसिद्ध करतात. मग थोडीशी डागडुजी होते परत सगळे थंड होते आणि पुढच्या वर्षी परत तेच.
आणि हे कुठल्या पक्षाशी संबंधित मुळीच नाही. सगळे सारखेच. एक लेख आला होता त्यात विविध पक्षांच्या हाती असलेल्या नगरपालिकांची यादी आली होती त्यात भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांचे वर्चस्व असलेल्या जागी तेच दिसले. सामान्य नागरिक नुसता तळतळाट करत बसतो.
पण हे कोणाला कळत नाही आहे का कळतेय पण स्वार्थ आड येतोय?
मला पडलेले काही प्रश्नः
वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती
निदान तीन एक महिन्यांपासून वाहिन्यांवर दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्या युवकांची धाडसी कृत्ये दाखविली जात होती. दिल्ली पोलिस हे कसे काय खपवून घेतात असे प्रश्नही उद्भवत होते. अशा तरुणांची खरी जागा एक कमांडो शिबिरात वा बंदीगृहात असायला हवी असेही पहाणार्यांच्या मनात येणे स्वाभाविक!
अशा वेळी दोन दिवसांपूर्वी अचानक
" दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्या युवकांना काबूत आणण्यासाठी केलेल्या गोळीबारत एक युवक ठार आणी दुसरा जखमी."
हे वृत्त !
"अहो अॅडमिन जागे व्हा...."
हे वाक्य वाचलं, की अश्याच अर्थाचे अनेक वाक्य आठवतात. लहानपणी आई बरेचदा मला "लष्कराच्या भाकर्या कशाला भाजतोस" असं म्हणायची, पण ते नेमकं काय असतं त्यावेळी कळत नव्हतं, ते कळायला लागलं ते मी अॅडमीन झालो तेंव्हा.
इंटरनेट आलं तसं एकमेकांशी टायपिंग करुन संवाद साधण्याचं एक नवं दालन सुरु झालं. आधी इमेल्स आणि मग चॅटींग... पुढे याहू-ग्रूप्स अशी ओळख होत गेली. त्यावेळी एक सदस्य म्हणुन मी बरेचदा मित्रमैत्रिणी (की मराठी मित्रमैत्रिणी) अश्या एका ग्रूपवर लिहित गेलो. नवनविन मित्र-मैत्रीणींची ओळख झाली. पण ....
मागील काही दिवसांच्या न्यायालयांच्या निवाड्याचा आढावा घेतला तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सरकारने (विशेषतः केंद्रसरकार) केलेल्या चौकशीतील लुडबुडी किंवा नियम धाब्यावर बसवुन दिलेले लायसन्स, इ. यामध्ये न्यायायलाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सिबिआयला स्वायत्तता देण्याबद्दल जवळजवळ आदेश दिला आहे, तर काही बाबतीत चौकशी स्वत:च्या अखत्यारीत चालु केली.
आजच लोकप्रतिनिधी जर गुन्हेगार साबीत झाला आणि किमान २ वर्षांची सजा झाली, तर त्याला त्याचे पद सोडावे लागेल आणि शिक्षा भोगावीच लागेल असा निकाल आज न्यायालयाने दिला. तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना आता निवडणुक लढवताच येणार नाही.
अकाली म्हातारं झालेलं गांव
पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध.
आजच्या सकाळमधील कोथरुडच्या सर्व्हे क्रमांक ४४ चे उद्यानाचे आरक्षण विकास आराखडा मंजूर करून घेताना नगरसेवकांनी कसे हातोहात बदलून ते ''व्यापारी'' केले याचे