कला

चेतनची शोकांतिका

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 3 April, 2013 - 04:55

एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही. गांधींच्या लाखोंच्या संख्येने असणार्‍या भक्तांनासुद्धा गांधीजी कळलेच नाहीत (गांधींच्या शरीराचा खून नथूराम ने केला हे खरे असले तरी गांधींचा वैचारिक खून त्यांचे अनुयायी म्हणवणार्‍यांनीच केला, अन्यथा गांधींच्या तत्वाला हे तथाकथित अनुयायी जागले असते तर त्यांनी प्रतिक्रियेदाखल पुण्यात शेकडो ब्राह्मणांची घरे जाळलीच नसती).

शु बॉक्स पासून बनवलेला टॉय-बॉक्स

Submitted by प्राप्ती on 2 April, 2013 - 13:07

शु बॉक्स पासून बनवलेला खेळण्यांचा डब्बा..... अगदी शुन्य खर्चात घरातला पसारा डब्ब्यात घाला ....

मॅग्झीन चे पेपर्स अगदी पोरांना फाडायला लावा...दोन चमचे फेविकॉल वाटीभर पाण्यात कालवून या पाण्याने हे तुकडे बुटांच्या खोक्यावर एकावर एक चिकटवायचे .....सगळे कॉर्नर ब्राऊन टेप ने व्यवस्थित ..बोर्डर चांगली दिसेल या पद्धतीने पँक करून घेणे . मॅग्झीनच्याच दोन कागदाला लांब निट घडी करत नेउन हँडल बनवून घ्यायचे.....
आणि तयार डब्ब्याच्या झाकणावर सेलोटेप + फेविकॉल लावून मजबूत चिकटवून घेणे.....
काही तास वाळू दिले कि झाला टॉयबॉक्स तयार ..

विषय: 

तू लिही तू लिही

Submitted by रोहितगद्रे१ on 2 April, 2013 - 11:22

तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
खांद्या वरून डोकवून
नाहीतर तिरप्या नजरेतून
पण ठाव त्यांच्या शब्दांचा
लागल्यावरच लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
तसं येत नसेल तर असही चालेल
अरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...!
ते तिकडे काय पडलाय ते दाखव की
अरे हेच ते...हेच शोधत होतो मी...!
बाकी असू दे...नंतर वाचू
इथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू
चल येतो...चाल लावायची आहे
शब्दांना पांघरायला शाल विणायची आहे
गप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल
हिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल

माझा रांगोळीचा व्हिडीओ..

Submitted by अर्चना पुराणिक on 1 April, 2013 - 12:15

हि रांगोळी माझ्या एका मैत्रिणीच्या हळदीकुंकवाला मी काढली होती Happy

हा व्हिडीओ तुम्हांला आवडेल आशी अपेक्षा Happy

http://www.youtube.com/watch?v=YFLc1Gg8hRY

विषय: 

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

Submitted by पाषाणभेद on 31 March, 2013 - 12:05

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.

निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.

शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!

निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?

बुकमार्क वगैरे वगैरे

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 28 March, 2013 - 00:57

नवा दोरा, आवडतं डिझाईन आणि उपयोगी वस्तू Happy

हॉटपॅड
DSC02419-001.JPG

हॉटपॅड
DSC02416-001.JPG

बुकमार्क
7215_496897700370649_1302357509_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)

Submitted by लाजो on 27 March, 2013 - 20:11

दरवर्षीप्रमाणेच यंदाही लेक मागे लागली होती की इस्टर साठी काहितरी कर. मागची २ वर्षे खाऊ करुन दिला होता -
चॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक
आणि इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'

प्लास्टिक कॅन्वासच्या तुकड्याने बनवलेला हा दागिन्याचा छोटासा डबा..

Submitted by अर्चना पुराणिक on 27 March, 2013 - 08:24

SAM_4324.JPGSAM_4327.JPGSAM_4328.JPGSAM_4345.JPGSAM_4353.JPGSAM_4365.JPG

विषय: 

पुन्हा एकदा मोर......

Submitted by मधुरा मकरंद on 24 March, 2013 - 06:17

२००४-०५ मधे क्रोशाने विणले आहे. तेव्हा घरी एक टू-ईन-वन प्लेयर होता. पूर्ण विणून झाल्यावर टू-ईन-वन प्लेयरपेक्षा याची साईझ मोठी झाली. टेबलक्लॉथ म्हणून सुद्धा वापरता येत नव्हते. मग याची फ्रेम केली.

crochet more 2.JPG

हेच डिझाईन क्रोस स्टीच मधेही भरता येते.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला