टेस्ला च्या कार विकण्यासंबंधी एक लेख नुकताच वाचला. मी पूर्वी टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") मधे काही वर्षे काम केलेले असल्याने एकूणच ऑटो इण्डस्ट्री तील बातम्यांबद्दल अजूनही कायम कुतूहल असते. तेव्हा मी टेल्को च्या सॉफ्टवेअर डिव्हिजन मधे सप्लाय चेन एरिया मधे - वाहने बनवायला लागणारा माल सप्लायर्स कडून कंपनीत येण्याबद्दलची प्रक्रिया- काम करत होतो. पुण्यातील प्लॅण्ट्स मधे उत्पादनावर जास्त फोकस होता.
सारा देश उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या निकालाच्या चिकित्सेत मग्न असताना अर्थविधेयक २०१७ (Finance Bill 2017) लोकसभेत पारित झाले आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी अशा विधेयकांद्वारे सामान्यपणे केली जाते. त्या अनुषंगाने हे विधेयक मात्र थोडेसे अनोखे आहे. वित्तविषयक नसलेल्याही जवळपास २५ दुरुस्त्या (Amendments) ह्या विधेयकाद्वारे मंजूर करून घेण्यात आलेल्या आहेत. विधेयकातील एकूण दुरुस्त्यांची संख्या ४० आहे, त्यामुळे हे प्रमाण निश्चितच दुर्लक्षिण्याजोगे नाही.[१] भारतीय संविधानानुसार विधेयक वित्तविषयक (Money Bill) असेल, तर राज्यसभेत त्यावर मतदान होत नाही.
नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे?
भारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.
नमस्कार!
"सक्षम एंटरप्रायजेस" या नावाने आयात-निर्यात परवाना प्राप्त करुन, अपेडा ची नोंदणी करुन आता व्यवसाय सुरु करण्यास सज्ज झालो आहे!
पहिला प्रयत्न हा फळे व भाजीपाला निर्यातीचा आहे. आखाती देश - प्रामुख्याने दुबई ला ताज्या फळांची (डाळींब व द्राक्ष) निर्यात करण्याचे ठरवले आहे.
मायबोलीकरांकडुन, विशेषतः दुबई व आखाती देशात राहणार्यांकडुन तेथील मार्केट चे ट्रेंड, बाजारभाव (होलसेल व रिटेल ),व मार्केट मधील ठळक व्यावसायीक यांची महिती, संपर्क मिळविण्या च्या दृष्टीने मदतीची अपेक्षा आहे.
सक्षम एंटरप्राएजेस,
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने.. !
हा धागा नोटाबंदीच्या निर्णयाच्या परिणामाबद्द्ल चर्चा करण्यासाठी .
माझा या निर्णयाला Instinctively पाठींबा होता अन अजूनही आहे . पण त्याच वेळी तो फसला असही वाटतय . कितीतरी पाऊले पाणी पुलाखालून गेल्यावर उचलली गेली . नोटाबंदी झाली म्हणजे काळा पैसावाले लगेच हार मानतील हे समजणे "नेव" होते . हे म्हणजे बुद्धीबळ खेळायला बसताना समोरचा काही चाली खेळेल याचा न विचार करण्यासारख आहे अस मला वाटल . नेहमीच्या ओळखीतल्या लोकाशी बोलतानाही सूर असाच दिसला . म्हणजे हेतू चांगला पण अंमलबजावणी चुकीची . किंवा "घोटाळा" नव्हे पण "घोडचूक" .
लाच
घेताही येत नाही
देताही येत नाही
तरी देखील लाच
बंद का होत नाही
कुठे ना कुठे रोज-रोज
हि समाजात भेटते आहे
विकासाच्या प्रगतीचा
लाच गळा घोटते आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सरकारी तिजोरी
नोटाबंदी केल्यामुळे
कॅश टंचाई आली आहे
व्यवहार कॅशलेस करताना
जनता त्रस्त झाली आहे
विरोधकांकडून वारंवार
जबर कानपिळी आहे
सरकारची तिजोरी मात्र
माला-माल झाली आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३