अर्थसंकल्पापूर्वी
१) अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला अर्थमंत्र्याचा संसदभवनाच्या पायऱ्यांवर ब्रिफकेस हातात घेतलेला फोटो. याशिवाय अर्थसंकल्प सादर होणार नाही असे घटनेतच निर्बंध असावेत.
२) क्र. एकच्या मुद्यातल्या फोटोला अर्थमंत्र्यांच्या 'पोतडीत काय दडलंय ?' किंवा तत्सम विलक्षण सस्पेन्स निर्माण करणाऱ्या कॅप्शन्स
३) वर्तमानपत्रात प्रश्नार्थक मथळे असलेल्या बातम्यांमधून वाढीव सस्पेन्स. उदा. '१.२५ कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी ?', 'सेवाकरात २ टक्क्यांची वाढ ?', 'सामान्यांना दिलासा मिळणार ?'
४) 'अर्थसंकल्पाकडून सामान्यांच्या अपेक्षा' या मथळ्याखाली एक गृहिणी, एक विद्यार्थी, एक नोकरदार आणि एक भाजीवाला/रिक्षावाला यांच्या मागण्या.
५) जसे क्रिकेट कॉमेंट्रीत 'This is very 'crucial' phase/period/session/partnership of this match हे वाक्य एकदातरी यायलाच हवे तद्वतच 'यावर्षीचा अर्थसंकल्प विशेष महत्वाचा आहे' अशी एक पिंक बातमीत टाकणे अत्यावश्यक.
अर्थसंकल्पानंतर
१) हुजूरपक्ष : "विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प" (हे वाक्य नसल्यास त्या पक्षाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागते) (उत्तेजनार्थ बक्षीस : "देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प", "सर्वांना सोबत घेऊन जाणारा अर्थसंकल्प" इ. नेहमीचे यशस्वी कलाकार)
विशेष उल्लेख - पंतप्रधानांकडून अर्थमंत्र्यांचे कौतुक. (हे मला कधीच कळलेले नाहीये. पंतप्रधानांची शिकवणी न लावता आख्खा पेपर अर्थमंत्र्यानी एकट्याच्या टॅलेंटवर लिहिलेला असतो की काय ?)
२) खजूरपक्ष : "गरिबाला अधिक गरीब आणि श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा अर्थसंकल्प" (यांचे सगळेच काम उत्तेजनार्थ गटात मोडत असल्यामुळे वेगळी बक्षिसे नाहीत)
विशेष उल्लेख : बाळासाहेब ठाकरेंसारखा शब्दांचे खेळ करणारा कुणी असेल तर "अर्थसंकल्प कसला, हा तर अनर्थसंकल्प" अशी एका वाक्यात वासलात. म्हणजे यांना कितपत कळलंय हे गुलदस्त्यातच !
३) पेपरमध्ये 'रुपया असा येणार' आणि 'रुपया असा जाणार' याचा शक्य तितके आधुनिक ग्राफिक्स वापरून बनवलेला 'Pie चार्ट'
४) रेल्वे बजेट असल्यास दुसऱ्या दिवशी -
अ) 'अर्थसंकल्पात मुंबईकरांना ठेंगा' अशी तक्रारवजा-आरोपवजा बातमी व 'इतका महसूल मिळवून देत असूनही' होणाऱ्या मुंबईकरांच्या हालांबद्दलचे दुःख
ब) इंजिनावर रेल्वेमंत्र्यांचा चेहरा किंवा गार्डच्या डब्यात बावटा/कंदील दाखवणारे आख्खे रेल्वेमंत्री असणाऱ्या एखाद्या झुकझुकगाडीचे खेळकर कार्टून
५) आणि या सगळ्यात 'निवडणुकांवर डोळा ठेऊन मांडलेला अर्थसंकल्प' अशी मखलाशी करायला पत्रकार/वर्तमानपत्रे/'एक्स्पर्ट' विसरत नाहीत.
एकुणात काय तर, एवढ्या ब्रह्मघोटाळ्यातून अर्थशास्त्रातले शष्पदेखील न कळणाऱ्यांना (म्हणजे माझ्यासारख्यांना !) शेवटपर्यंत अर्थसंकल्प चांगला की वाईट हे कळत नाही.
ता.क. : अजून काही सुचल्यास/सुचवल्यास मुद्दयांमध्ये भरच पडेल !
ओळ नं ओळ पटली.
ओळ नं ओळ पटली.
मस्तच! शेतकर्यांना जाहीर
मस्तच! शेतकर्यांना जाहीर होणारे पॅकेज, ग्रामीण भागासाठी योजना, इ. अॅड करता येतील.
भन्नाट लिहिले आहे गेल्या २५
भन्नाट लिहिले आहे गेल्या २५ वर्षात वर्षानूवर्ष तेच तेच आहे.
मस्त लिहिलंय !
मस्त लिहिलंय !
.. पुर्वी नानी पालखीवाला मस्त प्रवचन झोडायचे.. ब्रेबॉर्न स्टेडीयम वर कार्यक्रम असायचा तो. अमाप गर्दी व्हायची. ( आमच्या अभ्यासाचा भाग होता तो ! )
एकुणात काय तर, एवढ्या
एकुणात काय तर, एवढ्या ब्रह्मघोटाळ्यातून अर्थशस्त्रातले शष्पदेखील न कळणाऱ्यांना (म्हणजे माझ्यासारख्यांना !) शेवटपर्यंत अर्थसंकल्प चांगला की वाईट हे कळत नाही.>>>>>>>>> +१
अगदी अगदी
मस्तं!
मस्तं!
मस्तच लिहिले आहे
मस्तच लिहिले आहे
एकुणात काय तर, एवढ्या ब्रह्मघोटाळ्यातून अर्थशस्त्रातले शष्पदेखील न कळणाऱ्यांना (म्हणजे माझ्यासारख्यांना !) शेवटपर्यंत अर्थसंकल्प चांगला की वाईट हे कळत नाही.>>>>>>>>> +१
आवडले लिखाण....मस्त....
आवडले लिखाण....मस्त....
मस्त!!
मस्त!!
मस्त!
मस्त!
(No subject)
छान लिहिलय.
छान लिहिलय.
हे स्वस्त हे महाग
हे स्वस्त हे महाग
तोंडाला पाने पुसली
लाडका विषय इन्कम टअॅक्स... सवलती वगैरे...
मस्त लिखाण.
मस्त लिखाण.
अर्थसंकल्प सादर करताना शेरो शायरी अनिवार्य असते का?
मस्त लिहलयं!
मस्त लिहलयं!
शेतकर्यांना निराश करणारा व व्यापार्यांना खूश करणारा अर्थ संकल्प!
सही लिहिलंय!
सही लिहिलंय!
भारी लिहिलंय!
भारी लिहिलंय!
एकदम अचूक निरिक्षणं!
एकदम अचूक निरिक्षणं!
देशाला नविन अर्थिक दिशा
देशाला नविन अर्थिक दिशा देणारा अर्थ संकल्प!
सेन्सेक्स गडगडला
सेन्सेक्स गडगडला
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
एकुणात काय तर, एवढ्या ब्रह्मघोटाळ्यातून अर्थशास्त्रातले शष्पदेखील न कळणाऱ्यांना (म्हणजे माझ्यासारख्यांना !) शेवटपर्यंत अर्थसंकल्प चांगला की वाईट हे कळत नाही. >>>>>>>>>>+१
मस्तच!
मस्तच!
खरय :ड :ड
खरय
बजेटची पूर्वतयारी म्हणून हलवा
बजेटची पूर्वतयारी म्हणून हलवा परततानाचा अर्थमंत्र्यांचा फोटोही दिसतो.
बजेट भाषणात अर्थमंत्र्यांनी कोणत्या कवीच्या कोणत्या ओळी वाचल्या.
सर्व समावेशक अर्थसंकल्प......
सर्व समावेशक अर्थसंकल्प...........
चपखल !
चपखल !
भारी लिहिलयं
भारी लिहिलयं
अर्थशास्त्रातले शष्पदेखील न
अर्थशास्त्रातले शष्पदेखील न कळणाऱ्यांना
>>
शष्प म्हणजे काय? हा नवीनच शब्द दिसतो.
मस्त लेख ! मला तर कधी कुठल्या
मस्त लेख ! मला तर कधी कुठल्या बजेट मधून काही अर्थबोध झाल्याचं आठवत नाही .
काही न कळले तरी सामान्य लोक ठराविक गोष्टींवर हमखास कमेन्ट मारतात. सिगरेट / दारू च्या वाढलेल्या किमती. इन्कम टॅक्स वाढलेला असेल तर उत्तमच. तेवढीच त्यावर टीका करता करता इतरांसमोर आपलं उत्पन्न अप्रत्यक्षपणे जाहीर करण्याची संधी
छान!!! आवडलं!!!
छान!!! आवडलं!!!
Pages