नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे?
मी लहान असतानाचा किस्सा, मे बी २००३-०४ च्या दरम्यानचा. दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी हि आम्ही गावाला गेलो होतो, गाव म्हटलं कि एक वेगळंच वेड लागायचं मला तरी.. त्यात खास करून मी आईच्या गावी म्हणजेच माझ्या आजोळी जास्त रामायचो. त्याला कारणं हि तशीच होती. गावावरून परत मुंबईला आल्यावर एकदम डांबरासारखा काळाकुट्ट झालेला असायचो. दिवसभर उंडगत, उनाडक्या करत फिरायचो. घरात कमी आणि बाहेरच जास्त, अक्षरक्ष:. घरातले शोधात यायचे मला. जाम धम्माल असायची. त्यात पोहण्याची एवढी हौस कि बस्स...बाहेर न फिरण्याची ताकीद आणि त्यात उन्हाळा त्यामुळे तासंतास विहिरीत पडीक. एक दिवस असाच दुपारी पोहून आलो, पोहल्या नंतर खूप भूक लागते. सकाळ पासून पोहल्यामुळे मला जास्तच भूक लागली होती. मी घरी आलो, घरात मस्त म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्या गप्पा रंगलेल्या. माझ्या आईला म्हटले "आई, भूक लागलीय खूप, काही असेल तर दे ना...!!! " त्या दिवशी मस्त "बेसनाच्या वड्या" केल्या होत्या, सोबत चिटुक-मिटुक होतंच तोंडी लावायला. मी जेवणावर एकदमच तुटून पडलो. माझं जेवण झालं. जेवल्या नंतर माझ्या आई ने एक ताट माझ्यासमोर ठेवलं, आणि त्यावर आणखीन एक ताट झाकलं होतं. त्यात काही तरी होतं. काहीतरी खास पदार्थ नक्कीच असावा, कारण शेलके पदार्थच असे झाकुन पाकुन ठेवले जायचे. बऱ्याच दिवसांनी काहीतरी शेलकं खावयास मिळणार होतं, आता उत्सुकता पार शिगेला पोहोचली होती. ना ना प्रकारच्या जिन्नसांचे आकलन करून तोंडाला पाणी सुटले होते. आई ला विचारलं " काय आहे गं यांत?" आईने झाकलेले ताट बाजुला केले. आंत पाहीले तर....रसाळ, लुसलुशीत खरवस. आता तर भलताच खुश होतो मी. पण एक भाबडा प्रश्न होता, मी आईला विचारले, " आपल्याकडची एक बी म्हस ईली(यायली) नाय.. मग हा खरवव्हस..?" आई गप्पांमध्ये एवढी रंगली होती की गप्पांच्या ओघातच ती पटकन् बोलुन गेली. "आरं, बाजूच्या आज्जीचा आहे, तिनंच दिलाय तुला आवडतो म्हणुन..." ...........आता बोंबला
मी प्रश्नार्थक नजरेने आधी आईकडे मग त्या खरवसाकडे बघु लागलो.......थोड्यावेळाने जेव्हा सगळ्यांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा आख्खं घर हाश्याने दुमदुमून गेलं.........
किस्से आणि निरीक्षणं (भाग ५)....खरवस.
Submitted by बग्स बनी on 9 March, 2017 - 17:42
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण एक भाबडा प्रश्न होता, मी
पण एक भाबडा प्रश्न होता, मी आईला विचारले, " आपल्याकडची एक बी म्हस ईली(यायली) नाय.. मग हा खरवव्हस..?" आई गप्पांमध्ये एवढी रंगली होती की गप्पांच्या ओघातच ती पटकन् बोलुन गेली. "आरं, बाजूच्या आज्जीचा आहे, तिनंच दिलाय तुला आवडतो म्हणुन..." ...........आता बोंबला>>>>
मस्त किस्से आहेत तुमचे....
धन्यवाद...!!! कावेरिजी
धन्यवाद...!!! कावेरिजी
परत तेच. स्वतःचे वर्णन जास्तं
परत तेच. स्वतःचे वर्णन जास्तं आहे. आजुबाजुच्या लोकांचे, परिसराचे वर्णन जास्तं आले तर किस्साही वाढेल आणि वाचायलाही छान वाटेल.
मस्त किस्सा ...आजीचा खरवस
मस्त किस्सा ...आजीचा खरवस
Ha ha haखूप मस्त
Ha ha haखूप मस्त
ताटातला खरवस
ताटातला खरवस
आणि संभ्रमात निरागस
छान लेखन पुलेशु
धन्यवाद..!! प्रिया, च्रप्य,
धन्यवाद..!! प्रिया, च्रप्स, अंबज्ञ जी...
रायाजी, जरा घाईतच लिहल्यामुळे
रायाजी, जरा घाईतच लिहल्यामुळे किस्सा जरा बसका झालाय, पुढच्या लेखनात नक्की सुधारण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या मार्गदर्शनासाठी खुप-खुप धन्यवाद...असंच मार्गदर्शन करत रहा....