आपल्या अनेकांच्या मनात इतिहास म्हटले की पंधरा ऑगस्टला वर जाणारा भारताचा तिरंगा आणि खाली उतरणारा युनिअन जॅक (वजा फाळणी) हाच शेवट डोळ्यासमोर येतो. याला कारण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात इतिहास इथेच संपतो. इथून पुढे सुरु होते ते नागरिकशास्त्र आणि ते जणू काही इतिहासाशी काहीच संबंध नसल्यासारखे शिकवले जाते. इंडिया आफ्टर गांधी ह्या ७५० पानी (अधिक १००-१५० पाने संदर्भसूची आणि तळटीपा) ग्रंथात रामचंद्र गुहांनी नेमक्या ह्याच काळाच्या (१५ ऑगस्टपासून पुढच्या) इतिहासाचा परामर्ष घेतला आहे.
बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतला मोठा दलित समाज ऊसतोडणीच्या कामाला लागला. या वर्गाला शिक्षणाचा गंध नव्हता. गाठीशी जमिनी नव्हत्या. असल्या तरी त्या बहुतेक निकस. पोट कसं भरायचं हा मोठाच प्रश्न उभा राहिला. अशातच सहकारी चळवळ उदयास आली. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपेढ्या भराभर स्थापन झाल्या. हे सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठी दारिद्र्यात खितपत असलेला, हाताला कामाची आणि पोटाला भाकरीची गरज आहे, अशा कामगाराची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे अनायासेच साखर कारखान्याच्या अगदी पायरीतल्या कामात, म्हणजे ऊसतोडीत हा साराच्या सारा समाज अलगद ओढला गेला.
लहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते.
ए४ आकाराचा कागद आपल्या सार्यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे.
हा आयाताकृती, उभट कागद २९७ x २१० मिलीमीटर आकाराचा असतो.
पण तसा तो का असतो? याचा आपण कधीच विचार करत नाही.
एवढ्या अडनेडी आकारास इतक्या विस्तृत प्रमाणात स्वीकृती कशी काय लाभलेली आहे?
त्याचा इंचातल्या जुन्या मापनपद्धतीशी काही अर्थाअर्थी संबंध आहे काय?
थोडक्यात म्हणजे या ए४ आकाराचा जन्म कसा झाला असावा?
हा प्रश्न भल्या भल्यांची उत्सुकता चाळवू शकतो.
मला कळलेल्या, ए४ आकाराच्या कागदाची कहाणी मी इथे सांगणार आहे.
राजेश पाटील हा खानदेशातील ताडे या अगदी लहान खेड्यातून आलेला तरुण. अतिशय हलाखीत जगणार्या कष्टकरी कुटुंबातून आलेला राजेश शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शाळा शिकला.