विहंग प्रकाशन - प्रशस्तीपत्र
सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मायबोली.कॉमशी व्यावसायिक संबंध जुळले आणि त्यानुसार आमच्या विहंग प्रकाशन संस्थेची पुस्तकं या वेबसाईटवरून उपलब्ध झाली. मराठी पुस्तकांची सर्वप्रथम ऑनलाईन विक्री करण्याचं श्रेय बहुधा याच वेबसाईटकडे जातं.
तथापि अशातर्हेच्या आधुनिक माध्यमातून कितपत व्यवसाय होईल याविषयी आम्ही थोडे साशंक होतो. कारण मराठी वाचकाला अजूनही पारंपरिक पद्धतीनं पुस्तकं खरेदी करणं आवडतं. परदेशातला भारतीय माणूस या वेबसाईटवरून पुस्तकं खरेदी करेल ही गोष्ट तर अशक्यप्राय वाटत होती. आम्ही प्रकाशीत केलेल्या 'गितांबरी' या भगवत गीतेवरील राजेन्द्र खेर लिखीत कादंबरीचा इंग्रजी अनुवाद the song of salvation यापूर्वीच अमॅझॉनसह अनेक वेबसाईटसवरून उपलब्ध होता - आजही आहे. परंतु, ऑनलाईन विक्री म्हणावी तशी होत नाही असा कटू अनुभव! त्यात आमच्या प्रकाशनाची पुस्तकं ही अभिजात साहित्य प्रकारातली! टाईमपाससाठी किंवा दोन क्षण विरंगुळा देण्यासाठी आम्ही पुस्तकं प्रकाशीत करत नाही. प्रवासवर्णन, कवितासंग्रह हे साहित्यप्रकारही आम्ही प्रकाशीत करत नाही. त्यामुळे हलकं फुलकं वाचणारा बहुतांश वाचक आमच्या पुस्तकांकडे ऑनलाईन खरेदीसाठी वळेल ही अशक्यप्राय गोष्ट होती.
परंतु, मायबोली.कॉम या वेबसाईटवर आमची पुस्तकं उपलब्ध झाल्यानंतर काही महिन्यांमधेच आम्हाला थोडा थोडा प्रतिसाद मिळू लागला. आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि गेल्या वर्षापासून तर अमच्या पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. 'काया बनी चंदन' ('देह झाला चंदनाचा' या पुस्तकाचा गुजराती अनुवाद) आणि The Silent Reformer ('देह झाला चंदनाचा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद) या पुस्तकांना तर अमराठी वाचकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. आमची ही पुस्तकं बेस्ट सेलर ठरली! वेबसाईटवर नोंदल्या गेलेल्या प्रती मायबोली.कॉमच्या पुणे ऑफिसकडून रितसर रोखीनं खरेदी केल्या जातात आणि त्वरीत पाठवल्या जातात. बहुधा अमेरिका आणि इंग्लंडमधून या पुस्तकांना चांगली मागणी असते. तिथल्या ग्राहकांना प्रती वेळेवर मिळतात की नाही याचाही पाठपुरावा मायबोलीकडून केला जातो. कित्येक वेळा संतुष्ट ग्राहकांचे इमेल्स आम्हालाही येतात. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये मायबोली.कॉमचा पसारा आणखी जोमाने वाढत जाईल आणि भारताबरोबरच परदेशातील ग्राहकही मायबोली.कॉमशी अधिकाधिक जोडले जातील याविषयी मुळीच शंका वाटत नाही.
सौ. सीमंतिनी खेर
संचालक
विहंग प्रकाशन
www.vihangpublications.com
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!
अरे वा!
अभिनंदन!
अरे वा! आनंद झाला हे वाचून!
अरे वा! आनंद झाला हे वाचून!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!!..
अभिनंदन!!..:)
अभिनंदन!!! असेच कार्य
अभिनंदन!!! असेच कार्य मायबोलीकडून घडत राहू दे!!
अभिनंदन!!..
अभिनंदन!!..
छान वाटले, आनंद झाला
छान वाटले, आनंद झाला वाचून.
सीमंतिनी यांना आणि मायबोलीला शुभेच्छा.
मायबोली तसेच विहंग प्रकाशन
मायबोली तसेच विहंग प्रकाशन धन्यवाद.
वॉव! अभिनंदन! परवा राजेंद्र
वॉव! अभिनंदन!
परवा राजेंद्र खेर आमच्या सोसायटीतल्या हस्तलिखित प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आले होते. त्यांनी विहंग प्रकाशन बद्दल माहिती ही सांगितली होती. पण विहंग आणि मायबोलीचा असा जिव्हाळा असेल हे तेव्हा माहितच नव्हतं!
अरे वा मस्तच.. अभिनंदन...असेच
अरे वा मस्तच.. अभिनंदन...असेच उत्तमोत्तम उपक्रम मायबोलीद्वारे राबविले जावेत...
अभिनंदन
अभिनंदन
मस्तच.. अभिनंदन...
मस्तच.. अभिनंदन...
अभिनंदन!
अभिनंदन!
वा! अभिनंदन!!
वा! अभिनंदन!!
अभिनंदन ....
अभिनंदन ....
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन. एक ग्राहक म्हणून
अभिनंदन.
एक ग्राहक म्हणून 'मायबोली खरेदी'च्या वक्तशीर आणि खात्रीलायक सेवेचा मलाही फार चांगला अनुभव प्रत्येक वेळी आला आहे.
अभिनंदन. स्वातीला अनुमोदन. एक
अभिनंदन.
स्वातीला अनुमोदन. एक ग्राहक म्हणून 'मायबोली खरेदी'चा अनुभव खरेच चांगला आहे.
अभिनंदन!!
अभिनंदन!!
मलाही फारच छान अनुभव आलेला
मलाही फारच छान अनुभव आलेला आहे.
अरे वा! अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!
येत्या काही वर्षांमध्ये
येत्या काही वर्षांमध्ये मायबोली.कॉमचा पसारा आणखी जोमाने वाढत जाईल >>>
==================
शुभमस्तु ...
अभिनंदन , माबो संचालक टीमचं
अभिनंदन , माबो संचालक टीमचं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अभिनंदन मायबोली. अत्यंत तत्पर
अभिनंदन मायबोली.
अत्यंत तत्पर आणि दर्जेदार सेवा.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन टीम.
अभिनंदन टीम.
मायबोलीशी व्यावसायिक संबंध
मायबोलीशी व्यावसायिक संबंध जुळवलेल्या निर्मात्यांची/प्रकाशकांची/व्यावसायिकांची यादी (सध्या १७) आता इथे उपलब्ध आहे. लवकरच डाटाबेसमधले Cross Linking चे काम पूर्ण झाले की एका विशिष्ट व्यावसायिकाच्या/प्रकाशकाच्या मायबोलीवर विक्रीला असलेल्या वस्तू पहाणे सोपे होईल.
http://kharedi.maayboli.com/shop/manufacturers.php
Pages