अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
एकतानता
एकतानता
>>> या शब्दाचा उल्लेख ह ना आपटे यांच्या वज्राघात कादंबरीत असल्याचे शब्दकोश म्हणतोय
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE%...
हो असू शकेल. तुमचा त्या
हो असू शकेल. तुमचा त्या शब्दाचा वापर फार समर्पक आहे
तो शब्द नादमधुर आहे खरा
तो शब्द नादमधुर आहे खरा
किस्से छान.
किस्से छान.
>> अनंत अमेंबल >>> हा खासच !
छान धागा. संगीताचे सगळे
छान धागा. संगीताचे सगळे किस्से आवडले.
एकतानता यावरची चर्चा आवडली.
एकतानता
यावरची चर्चा आवडली.
चटर्जी नव्हे, काकोडकर !
चटर्जी नव्हे, काकोडकर !
पूर्वी ‘अलका’ दिवाळी अंकात शरच्चंद्र चटर्जी यांची ‘सुचिता’ नावाची (अनुवादित) कादंबरी प्रसिद्ध झाली होती. त्याचे अनुवादक होते चंद्रकांत काकोडकर. कालांतराने सुचिता पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. पुढे त्याची दुसरी आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनाने काढली. मात्र त्यावर लेखक म्हणून चंद्रकांत काकोडकरांचे नाव होते; चटर्जी यांचा उल्लेख देखील नाही !
हा सगळा प्रकार एका वाचकाने साहित्य सहकार मासिकात पत्र लिहून उघडकीस आणला. त्यामुळे सुचिताचे प्रकाशक केशवराव कोठावळे अस्वस्थ झाले. त्यांनी काकोडकरांना विचारलं. तेव्हा काकोडकर शांतपणे म्हणाले,
“इथे दुसऱ्याच्या साहित्यावर डल्ला मारून स्वतःच्या नावावर खपवणारे लेखक आहेत. मग मी पण स्टंट केला. फरक एवढाच, मी माझी कादंबरी प्रथम चटर्जी यांच्या नावावर खपवली होती. पण आता दुसऱ्या आवृत्तीत हे रहस्य उलगडून टाकले !”
( रविप्रकाश कुलकर्णी यांच्या स्फुटलेखनातून साभार)
चंद्रकांत काकोडकरांची प्रतिभा
चंद्रकांत काकोडकरांची प्रतिभा जरा निराळ्या प्रकारची होती. त्यांच्या कादंबरीत नायिकेचे गाल क्षणार्धात आरक्त होत असत.
आरक्त >>> +1
आरक्त >>> +1
चंद्रकांत काकोडकर यांनी १९६२ साली लिहिलेल्या ‘श्यामा’ या शिक्षकाच्या जीवनावरच्या कादंबरीवर तर पुढे अश्लीलतेचा खटला भरला गेला होता. ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांनी काकोडकरांना पाठिंबा दर्शवला होता.
अखेर सर्वोच्च्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
महाराष्ट्राच्या साहित्यिक जीवनात गाजलेला हा खटला आहे .
मस्त किस्से आहेत इथे.जयपूर
मस्त किस्से आहेत इथे.जयपूर फूट वाल्या डॉ चं कौतुक वाटलं.
काकोडकर+फडके असं व्यक्तिचित्र आणि थोडा काल्पनिक भाग असं मिसळून कॅलिडोस्कोप कादंबरी आहे एकनाथ पांडुरंग रहाळकर नावाच्या काल्पनिक लेखकाच्या आयुष्यावर.मला ती खूप आवडते.मूळ बाबांच्या संग्रहात होती ती आणलीय, त्यामुळे आता त्या पुस्तकाच्या अक्षरशः चिंध्या झाल्या आहेत कागदाच्या.
एखाद्या मराठी नाटकाचे नाव
धन्यवाद !
******"""
एखाद्या मराठी नाटकाचे नाव किती लांबलचक असावे?
…
….
आधी तुमच्या माहितीतले एखादे आठवून बघा… आणि मग खालचे नाव बघा !
…
…
..
“सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत”
लेखक : सुरेंद्र वर्मा
(प्रथम) दिग्दर्शक : अमोल पालेकर
मूळ हिंदी आहे.
मूळ हिंदी आहे.
बरोबर. परंतु ते नाटक हिंदी
बरोबर. परंतु ते नाटक हिंदी रंगमंचावर येण्याआधी त्याचा मराठी अनुवाद पालेकरांनी सादर केला. त्यानंतर हिंदीवाले खडबडून जागे झाले आणि त्यांनी त्याचे हिंदी प्रयोग केले . पालेकर यांनी ही माहिती मुलाखतीत दिली आहे (https://www.youtube.com/watch?v=CqdWQaSOj6M)
राज कपूर जेव्हा त्यांच्या
राज कपूर जेव्हा त्यांच्या सिनेमातील वाद्यवृंदाला भेट द्यायचे तेव्हा ते व्हायोलिन या वाद्याचा उल्लेख ‘व्हिलन असा करायचे ! त्याचे कारण म्हणजे तिथे जवळपास 40 व्हायोलिन वादक असायचे आणि त्यामुळे त्यांच्या बिदागीचा निर्मात्याचा खर्च बराच व्हायचा
>>> याचं जरा नवल वाटतं. कारण आर के च्या सिम्बॉलमध्ये आर के स्वतः व्हायलिन घेऊन उभा आहे. प्रचंड पॅशनेट व ग्लॅमरस लोगो लाटायचा तो त्यावेळी. बाकीचे फार कॉमन वाटायचे त्यापुढे. शिवाय आरकेचे लाडके शंकर-जयकिशन यांच्या व्हायलिनच्या सुरावटी अप्रतिम असायच्या. कदाचित मजेत म्हणत असेल. बाय द वे वेव्ह्ज ऑफ डान्यूब ऐका आणि काही आठवतंय का पहा.
काही आठवतंय का पहा
काही आठवतंय का पहा
>> Waves of the Danube is a waltz composed by Iosif Ivanovici in 1880, and is one of the most famous Romanian tunes in the world.
That should explain who stole whose composition. I rest my case.
प्यारेलाल यांचे किस्से मस्त.
प्यारेलाल यांचे किस्से मस्त. मध्ये कुठल्यातरी प्रोग्रामचा एपिसोड युट्यूबवर पाहिला. प्यारेलाल यांनी एक प्यार का नग्मा है वाजवलं व्हायलिनवर. वयानुसार एखाद ठिकाणी ऑफ की झालंय. पण एक शब्दही न बोलता आपलं टॅलेंट कसं बोलतं ते पाहण्यासारखं आहे.
जेफ्री आर्चरची बरीच पुस्तकं आवडतात. क्लिफ्टन क्रॉनिकल्स सिरीज ही शेवटची वाचलेली पुस्तकं. विल्यम वॉरिक सिरीज वाचायची आहे. सर्वात आवडतं पुस्तक गिर्यारोहक जॉर्ज मेलरीवर लिहीलेलं ‘पाथस् ऑफ ग्लोरी’.
*पाथस् ऑफ ग्लोरी’. >>> रोचक
*पाथस् ऑफ ग्लोरी’. >>> रोचक माहिती
जॉर्ज मेलरी >>> एव्हरेस्टच्या मार्गावर त्यांचा कॅमेरा सापडला आहे आणि त्यातील रोलवरून लोक काही अंदाज बांधत आहेत या आशयाचा एक लेख पूर्वी एका रविवार पुरवणीत वाचला होता.
हो. ती सुरावट उचलली असली तरी
हो. ती सुरावट उचलली असली तरी त्यावर केलेलं पुढचं कामही तेवढंच अप्रतिम आहे. शिवाय सिंफनीज बहुतेक कॉपीराईट फ्री असाव्यात कारण ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ ही मोझार्टची सिंफनीच आहे. आणि संगीतकार असलेली माणसं या गोष्टींनी प्रभावित होणार नाहीत हेही अशक्यच. फक्त मूळ संगीतकाराला क्रेडीट द्या एवढीच अपेक्षा.
कॅमेरा त्यांच्या कलीगकडे होता
कॅमेरा त्यांच्या कलीगकडे होता व त्याचा मृतदेह नाही सापडलाय अजून. मध्यंतरी जॉर्ज मेलरी यांचा मृतदेह सापडला. आणि त्यावरून ते पहिले एव्हरेस्टवीर नव्हते असं कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न झाला. पण या पुस्तकातलं गृहितक काही वेगळंच सांगतं. त्यासाठी जरूर वाचा.
ता. क. मी जेफ्री आर्चरची मराठी एजंट नाही.
मा़झे मन
मा़झे मन
पहिल्यांदा प्यारेलाल यांना हे गाणं वाजवताना ऐकलं होतं तेव्हां भरून आलं होतं. व्हायोलिनची सुरावट रडकी वाटते.
त्यानंतर मग अनेकदा ऐकलं..
इंडीयन आयडॉल मधे स्पर्धक मुलगी लोअर पीच मधे गात असल्याने गाणे फिके वाटतेय. यातले फारसे समजत नसल्याने पुन्हा ओरिजिनल ऐकले.
लताबाईंनी +१ पीच मधेच गायले आहे (इथे ओरिजिनल). अशी गाणी मेंदूत अशी काही कोरलेली असतात कि टेंपो बदलला किंवा पीच कमी जास्त झाला तरी शास्त्रीय संगीत समजत असो वा नसो, ऐकायला खटकतं.
( प्रत्येकाची रेंज वेगवेगळी असते हे कबूल)
* सुरावट उचलली
* सुरावट उचलली
>>> गाणे उचलणे / चोरणे / अन्य गाण्यावरून प्रेरणा घेणे यासंबंधी एक चिकित्सक लेख इथे आहे :
https://www.cinemasangeet.com/miscellaneous/the-mukul-mehfil/inspiration...
. . . " The genius of S-J is evident in the fact that they only used a single line from this Waltz composition and made it into an interlude for the song!" . . .
रंतु ते नाटक हिंदी रंगमंचावर
रंतु ते नाटक हिंदी रंगमंचावर येण्याआधी त्याचा मराठी अनुवाद पालेकरांनी सादर केला>>>>
पालेकरांनी त्याचा हिंदी चित्रपट केला तो मात्र पुर्ण फसला. चुकीचे अभिनेते निवडुन सत्यानाश लावला.
*हिंदी चित्रपट केला तो मात्र
*हिंदी चित्रपट केला तो मात्र पुर्ण फसला. >>> काय नाव त्याचे ?
हो. एस जे किंवा इतर
हो. एस जे किंवा इतर प्रतिभावंतांनी सुरावटी उचलल्या पण त्यावर त्यांनी इतके काम केलंय की कधी कधी मूळ गाणे फिक्के वाटते. त्यांनी माशी टू माशी कॉपी नाही केली.
र आ >>> विपु पहा.
अनाहत. सोनाली फक्त
अनाहत. सोनाली फक्त दिसायलाच सुंदर आहे, अभिनय तिचा प्रांत नाही हे याच्यात ठळकपणे दिसते.
सॉरी, अनाहत मराठी चित्रपट आहे, हिंदी नाही. पण पाहताना सतत हिंदी पाहतोय हा भास होतो.
सोनाली फक्त दिसायलाच सुंदर
सोनाली फक्त दिसायलाच सुंदर आहे, >>> आभार.
अभिनय तिचा प्रांत नाही >>> घ्या चालवून. सगळंच टॅलंट एका ठिकाणी असायला ती काय मोदीजी आहे का ?
चालवुन घेतले नाही तरी तिला
चालवुन घेतले नाही तरी तिला कोण डच्चु देणार?? मोदींच्या डोक्यावर दर ५ वर्षांनी टांगती तलवार लटकते. आता तर युतीचे सरकार.. म्हणजे रोजच.
दिवा राहिला होता द्यायचा
दिवा राहिला होता द्यायचा
अनाहत
अनाहत
अरे हो ! हा पाहिला आहे. त्याच्यावर इथे भरपूर चर्चाही झाली होती
https://www.maayboli.com/node/81403?page=6
या नाटकावर आधारित आहे हे माहित नव्हते.
किस्से मस्त. छान धागा.
किस्से मस्त. छान धागा.
Pages