अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
मायबोलीवर त्यांचा अनुल्लेख
मायबोलीवर त्यांचा अनुल्लेख झाला असता. >>
*मायबोलीवर >> भारी !
*मायबोलीवर >> भारी !
अरे बापरे केवढी टोपणनावं.
अरे बापरे केवढी टोपणनावं.
आंतरजालपूर्व काळात विपुल
आंतरजालपूर्व काळात विपुल लेखन करणाऱ्या काही लेखकांना अशा बऱ्याच टोपणनावांची गरज भासलेली दिसते. अजून एक उदाहरण म्हणजे नामवंत संपादक अनंत अंतरकर. त्यांनी ‘मौज, प्रभात, सत्यकथा’ इत्यादींमधून लिहिताना 14 टोपणनावे घेतलेली होती.
बेफि
बेफि
>>>>एकूण 21 टोपणनावांनी लेखन>
>>>>एकूण 21 टोपणनावांनी लेखन>>>हे भारी वाटले.
>>रमाकांत वालावलकर>>> या नावाचे एक पुस्तक आहे का?
होय, “माझं नाव रमाकांत
होय,
“माझं नाव रमाकांत वालावलकर” हे विज्ञान काल्पनिकांचे पुस्तक खांबेटे यांनी लिहिलेले आहे.
https://maitri2012.wordpress.com/2021/12/04/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%...
बेफिकीर सत्य आहे.
बेफिकीर सत्य आहे.
बेफिकीर
बेफिकीर
आता असं मनात आलं की तुकारामांच्या गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुडविणारे पण
रशियाच्या नैऋत्य टोकाला
रशियाच्या नैऋत्य टोकाला कालमिकीया प्रजासत्ताक हा छोटा देश आहे. त्या देशाची ओळखच बुद्धिबळाचा देश अशी करून देता येईल. त्या देशाच्या घटनेच्या 129 व्या कलमात बुद्धिबळाच्या विकासास सरकार कटिबद्ध असेल असे नमूद केले आहे.
1995 मध्ये देशाचे राष्ट्राध्यक्ष असलेले Kirsan Ilyumzhinov हे स्वतः बुद्धिबळवेडे आणि जागतिक बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मते जागतिक शांतता निर्मितीसाठी बुद्धिबळ खेळणे हा उत्तम मार्ग आहे. तसेच बुद्धिबळ निर्मिती एकतर परमेश्वराने केली असावी किंवा तो खेळ परग्रहावरून पृथ्वीवर आणला असावा असेही त्यांचे भन्नाट मत होते ! त्यांनी देशातील प्राथमिक शाळांमध्ये बुद्धिबळ विषय सक्तीचा केला होता. त्या अध्यक्षांची राजकीय कारकीर्द मात्र वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलेली होती.
एलिस्टा ही त्या देशाची राजधानी असून तिला बुद्धिबळाचे शहर म्हटले जाते
चित्रपटाची आदर्श लांबी किती
चित्रपटाची आदर्श लांबी किती असावी याबद्दल विविध दिग्दर्शकांची आपापली मते आहेत.
Alfred Hitchcock यांचे मत काहीसे रोचक आहे. आदर्श लांबी ठरवताना प्रेक्षकांच्या लघवी रोखून धरण्याच्या सरासरी क्षमतेचा विचार केला जावा, असे ते म्हणतात !
"The length of a film should be directly proportional to the endurance of the human's bladder”.
Hitchcock शब्दाची
Hitchcock शब्दाची व्युत्पत्तीच जणू!
डॉक्टर साहेब, हा धागा फार भारी आहे. राजकुमार या नटाबद्दल वर लिहिले गेले आहे की नाही हे बघितले नाही, पण तो म्हणे घरी आलेल्या पाहुण्यांना कवटीतून चहा सर्व्ह करायचा! (हेच किशोरबद्दल पण वाचले होते एके ठिकाणी फार पूर्वी)
आता राजकुमार काही प्रतिभावंत नाही म्हणता येणार, पण किशोर कुमार दिगग्ज प्रतिभावंत!
बेफी
बेफी
धन्स !
* कवटीतून चहा >>> बाप रे ! भारी . . .
..
बेफी,
एक अवांतर विचारतो. तुमच्या अन्यत्र असलेल्या एका प्रतिसादात प्रत्येक मुद्द्याच्या आधी चौकोनी 'बुलेट' काढलेली पाहिली.
तिचे इथे टंकन कसे करतात ते सांगाल का ?
( मी गुगल डॉक्समध्ये बुलेटसकट एखादा मजकूर लिहिला आणि तो इकडे कॉपी-पेस्ट केला तर त्या बुलेट इथे उमटत नाहीत).
प्रतिसाद जिथे टंकता त्या
(No subject)
साधना , धन्यवाद !
<आलेल्या पाहुण्यांना कवटीतून
<आलेल्या पाहुण्यांना कवटीतून चहा सर्व्ह करायचा! (हेच किशोरबद्दल पण वाचले होते एके ठिकाणी फार पूर्वी)> भन्नाट आहे हे.
वरती द पां खांबेटे यांचा
वरती द पां खांबेटे यांचा उल्लेख आलेला आहे. यांच्या संदर्भातील अजून दोन प्रसंग उल्लेखनीय आहेत.
१.
ते काही वर्षे मार्मिक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगून ठेवले होते,
“ माझ्या लेखनात कधी जास्त शिवराळपणा आला तर एखाददुसरी शिवी गाळायला हरकत नाही. तो निर्णय तुम्ही परस्पर घ्यायचा आहे”.
. . . . . . . . .
२.
आयुष्याच्या एका टप्प्यावर खांबेटेंची दृष्टी गेली. त्यानंतर ते पत्नीकडून वाचन करून घ्यायचे परंतु लेखन मात्र पूर्ण थांबले. तेव्हा त्यांच्या एका संपादकांनी त्यांना विचारले,
“ तुम्ही लेखनिक ठेवून लेखन का करीत नाही?”
त्यावर खांबेटे म्हणाले,
“स्वतंत्र लेखनाला लागणारी प्रेरणा आपण आपल्या डोळ्यांनी जग पाहत असताना मिळत राहते, तशी या दृष्टीहीन अंधारात मिळत नाही. मला माणसं दिसल्याशिवाय एक्सप्रेशनच सापडत नाही. मी काय करू?”
(आनंद अंतरकर यांच्या लेखातून साभार)
वरती राजकुमारचा उल्लेख आहे.
वरती राजकुमारचा उल्लेख आहे. त्याचा एक किस्सा, बहुतेक कणेकरांनी सांगितलेला आहे.
राजकुमार एकदा भर दुपारी जेवणाच्या वेळेस काहीही पूर्वकल्पना न देता साधनाच्या घरी टपकला. तिने त्याचे आगत स्वागत केले आणि जेवणाचीच वेळ असल्यामुळे आपल्याबरोबर जेवण करण्याची विनंती केली.
तर हे महाशय उद्गगारले, 'जानी ये सच है के दोपहरका वक्त है और हमे भूख लगी है. लेकिन इसका मतलब ये नही के हम किसीकेभी साथ कुछभी खा सकते है!'
साधना बिचारी तोंडावर मार बसल्यासारखी गप्प बसली
>>> साधना बिचारी तोंडावर मार
>>> साधना बिचारी तोंडावर मार बसल्यासारखी गप्प बसली
साधनाच्या 'रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग'!
+१ . अगदी
+१ . अगदी
राजकुमार हे एक मोठे प्रकरण आहे !
साधनाच्या 'रोजच्या जीवनात
साधनाच्या 'रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग'!
जेवण नाही केलं, विक्षिप्त
जेवण नाही केलं, विक्षिप्त बोलला तरी काणाडोळा करा.
एका मायबोलीकराकडे एक सुपरस्टार घरी आला हा माबोकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
मायबोलीवर खाते उघडून द्यायचे होते ना... हुक्की !
शिवराज गोर्ले त्यांच्या ऐन
शिवराज गोर्ले त्यांच्या ऐन तिशीतच पूर्णवेळ लेखक बनले. त्यांनी हा धाडसी निर्णय कसा घेतला हे जाणून घेणे रोचक आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते औद्योगिक क्षेत्रात चांगल्या पदावर उत्तम पगाराची नोकरी करत होते. परंतु त्यांच्यातील बंडखोर प्रवृत्तीमुळे ते मनातून कुठेतरी अस्वस्थ होते. नोकरी सोडून कुठला व्यवसाय चालू करावा का, या द्विधा मनस्थितीत ते असतानाच त्यांच्या एका मित्राने त्यांना आयर्न रँड लिखित ‘दि फाउंटनहेड’ ही कादंबरी वाचण्यासाठी दिली. त्यांनी ती लागोपाठ दोनदा वाचून काढली आणि त्याच क्षणी अचानक नोकरीचा राजीनामा दिला.
या पुस्तकाच्या वाचनाने त्यांनी स्वतःचे आयुष्य बदलून टाकणारा धाडसी निर्णय घेतला हे विलक्षण आहे. त्या पुस्तकामुळे ते अक्षरशः नव्याने आयुष्याच्या प्रेमात पडले. ‘आनंदाने जगण्याचा हक्क’ ही त्या लेखिकेकडून त्यांना मिळालेली मोलाची ठेव होती असे ते म्हणतात. आयुष्यातील अनेक प्रकारची आव्हाने समर्थपणे पेलून जग घडवणारी माणसे हे त्या लेखिकेचे नायक होते, हा मुद्दा त्यांना सर्वाधिक भावला.
. . .
गोर्ले पुढील आयुष्यात एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक लेखक ठरले. त्यांच्या यशाचे वर्णन करताना ‘राजहंस’चे माजगावकर म्हणाले होते,
“पूर्णवेळ मराठी लेखकाला आयकर नियोजन करावं लागतंय ही किती आनंदाची बाब आहे !”
( ‘मी (पूर्णवेळ) लेखक कसा झालो? ‘ या त्यांच्याच लेखातून साभार)
>>>>>>>“पूर्णवेळ मराठी
>>>>>>>“पूर्णवेळ मराठी लेखकाला आयकर नियोजन करावं लागतंय ही किती आनंदाची बाब आहे !”
हाहाहा
शिवराज गोर्ले यांचा फॅ क्ल
शिवराज गोर्ले यांचा फॅ क्ल निघाला तर पहिली सदस्य मीच. त्यांचं ' मजेत जगावं कसं ' हे पुस्तक म्हणजे माझी भगवदगीता आहे.
उरलेली पुस्तके वाचणे झाले नाही मात्र.
*मजेत जगावं कसं ' हे पुस्तक >
*मजेत जगावं कसं ' हे पुस्तक >>>
अरे वा !
मग जरूर लिहा त्यावर. . .
जपानी व इंग्रजी !
जपानी व इंग्रजी !
Grand Prix हा John Frankenheimer-दिग्दर्शित एक जुना इंग्रजी चित्रपट. युरोपातील मोटार शर्यतींच्या जगाचे थरारक चित्रण त्यात केलेले आहे. केवळ शर्यतीचे विश्वच नाही तर बाकी जगाचे आणि जीवनाचेही चित्रण त्यात जबरदस्त तांत्रिक करामतीनी सादर केले आहे.
चित्रपटात शर्यतींच्या मोटारींचा कारखानदार यामुरा हे जपानी पात्र आहे. तो शर्यतीच्या मैदानावर येतो तो जपानी दुभाषा घेऊन. मग पत्रकार त्याच्याभोवती गर्दी करतात. त्यांचा यामुराशी संवाद दुभाषाद्वारे होतो. पुढे चित्रपटाचा नायक यामुराला घरी आमंत्रण देतो तेव्हा तो एकटाच जातो ( अर्थातच दुभाषा न घेता). तेव्हा यामुरा नायकाशी एकदम फाडफाड इंग्रजी बोलू लागतो !
त्यावर नायक आश्चर्याने विचारतो,
“तुम्हाला इंग्रजी येते ?”
तत्काळ यामुरा म्हणतो,
“येस, बट नॉट फॉर द प्रेस ! पत्रकारांसाठी माझे इंग्रजी नाही, ते फक्त व्यवहारासाठी आहे !”
या छोट्या प्रसंगात दाखवलेला जपानी माणसाचा पिंड अप्रतिम उतरला आहे. सार्वजनिक ठिकाणी तो आपल्या मातृभाषेचाच अभिमान बाळगतो. अशा छोट्या प्रसंगातूनही असे चित्रपट ग्यानबाची मेख मारून जातात.
( विजय तेंडुलकर यांच्या लेखातून साभार)
वाह कुमारजी , किती सुंदर
वाह कुमारजी , किती सुंदर किस्सा .
दक्षिणा धन्यवाद !
दक्षिणा धन्यवाद !
'जी' नको हो ! आपण सगळे सहकारी आहोत
>>>>>>>>>ग्यानबाची मेख
>>>>>>>>>ग्यानबाची मेख
क्या बात है! हा शब्द जवळ्जवळ ३० वर्षांनी ऐकला. विस्मरणातच गेलेला.
किस्साही छान कुमार सर.
Pages