ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नविन थियरी: डॉक्टर रमा ला ओळखत असावेत? त्याच हॉस्पिटल मध्ये रमा अपघाता च्या वेळी आणली गेली असावी.. आणि मंगल देखिल तीथेच आणली गेली असावी..असो.>>>>>>>>>>>>>>>>>>

३७ वर्षे पुढे आलीय ती काळा च्या तिचा अपघात झाला तेव्हा तो डॉक्टर जन्माला देखील आला नसेल ...:D Lol Lol

ती एवढी भूत बनून वेगळ्या टाईम झोन मधून आलीय.नीट हळूहळू बोलायला नको का?
आम्ही आमच्या कॉल वर किती हळू सावकाश बोलत असतो. Happy

काल रात्री ग्रहण बघितल. पण मला एक कळत नाही, जर पजो भूत असेल तर मंगल तिच्यात कशी काय शिरली? एका भूताच्या शरीरात दुसरे भूत कसे काय शिरु शकते?

रमा , स्वतःला मंगल समजू लागली आहे का ? >>> अगदी अगदी. ति निरंजनला म्हणते, " तुम्हाला माझी ओळख पटली हेच खूप झाल." म्हणजे निरंजनला रमाच मंगल आहे हे कळले की काय?

एका भूताच्या शरीरात दुसरे भूत कसे काय शिरु शकते?

ऑस्मोसिस
कमी पी एच असलेले विरल (म्हणजे भूतशीप मध्ये कमी काळ व्यतीत केलेले ट्रेनी भूत) जास्त पी एच वाल्या संहत (मुरब्बी जुन्या) भूताच्या अंगात शिरु शकेल.

शनिवारी काय दाखवलं? Uhoh
मी शेवटचा एपिसोड पाहिला त्यात पजो हॉस्पिटल मध्ये पाय ठेवते आणि लाईट चालू बंद व्हायला लागतात.

निरु म्हणतो , मी इथे गेली ३७ वर्शे रहतोय . म्हणजे त्याचे वय निदान ३७-३८ असावे. म्हणजे मंगल जाउन ६-७ वर्श झाली म्हणायला हरकत नाही .>>>>>>>>

आधी पण कोणीतरी लिहिलेय की ३७ वर्षापुर्वीचे कपडे वगैरे कसे ठेवलेत.

अरे त्याचे लग्न होऊन थोडी ३७ वर्ष झालीयेत? . Lol तो लहानपणीपासुन राहात असेल त्या जागी. ३० व्या वर्षी लग्न झालं असेल आणि
त्याची बायको २ वर्षापूर्वी गेलीये हे परवाच्या एपि मधे समजले. तर असू शकतात कपडे ठेवलेले. माझ्या बाबांचे पण कपडे ठेवले होते १ वर्ष एका संस्थेला दान करायच्या आधी.

गेटजवळ दिवा लावायला गेले नस्ते तर पजोने कसे घाबरवले असते मग Wink

प्रचंड बोअर होतेय ही मालिका. त्या निरंजन चा रोल सुनील बर्वेला तरी द्यायचा होता. नाहीतर दोघी एकमेकांच्या घरी दाखवा, मंगल सुनील बर्वे कडे गेलीय चुकून. तिथले सीन बघायला सुसह्य तरी वाटतील. इथले फार बोअर होतायेत. रुद्रम वाल्याना तरी द्यायची, कलाकार अभिनयात तरी उत्तम शोधून घेतले असते. मानबा वाल्यानी पार वाट लावलीय. एकट्या पल्लवीसाठी किती बघायची, तिच्यात पण तोचतोच पणा यायला लागलाय. ग्रहण बघू नये हेच खरं Wink .

दक्षि फार विशेष नव्हतं शनिवारी, त्या डॉक वझे कडे एक बाई येते डिलिव्हरीसाठी, त्यावर जास्त चर्चा होती. ती गेली बहुतेक आणि बाळ वाचलंय. तो हॉस्पिटल सीन तू बघितलासच. चहा निरंजनची आई ओतून देते सिंकमध्ये तरी ती चहा आणून देते आणि तुमचा चहा तसाच आहे सांगते, ते पण शनिवारी चं होतं वाटतं.

बाळांच्या वॉर्डात सिक्युरिटी नसते का? कारण, काल डॉ एका मुख्य नर्सला विचारतात की तुमच्या कडे ज्या बाई चेक अप ला पाठवल्या होत्या, त्यांचे रिपोर्ट्स आले का? तर नर्सबई म्हणतात की त्यांच्याकडे कुणीच आले नाही. मग निरंजन , त्या नर्स बाई सगळी कडे रमाला शोधत बसतात. बाळांच्या वॉर्डावरुन जातांना अचानक निरंजनची नजर आत जाते तर रमाबाई एका बाळाला मांडीवर घेऊन मस्त अंगाई गात असतात, बाळ खुशीत हसत झोपते.
रमा बाळाविषयी बोलते आणी म्हणते की बाळ जर नसेल तर आई कशी राहील? निरु ( आता आपण याला निरु म्हणू, जाम कंटाळा आलाय टायपायचा) दचकतो.

पुढचं लिहा कोणीतरी.

चांगल्या रहस्य कथेला अचाट रहस्य कथा बनवण्यात झीचा हात धरु शकणार नाही कोणीच.
काय दाखवायचं आहे त्यात झीचा गोंधळच असतो सग्ळ्या सिरीयलींत.
उत्तम उदाहरण राखेचा होती. त्यात भूतं, करणी, भानामती, भास आभास, अन्नात अचानक किडे, शेवंता, सुशल्या दाखवुन शेवटी उंदीर बाहेर काढला होता.
इथेही रमाला भूत दाखवायचंय, की समांतर विश्वात आलेली दाखवायचंय, की मंगलचं भूत दाखवायचं आहे तेच कळत नाहीये.
ह्याचाही गोलगोलगुंता करुन, उगीच दचकवणारे भितीदायक सीन दाखवुन एपिचे एपि घालवतील. आणि शेवटी रमेला स्वप्न पडलं असं दाखवतील. असं मला हे सात एपि पाहुनच वाटु लागलंय. मधेच मंगल होते, मधेच गुढ हसते, घर जागेवर नाहीये, आपला नवरा मुलं नाहीयेत, त्यांच्यासाठी आपण आइसक्रीम आणायला आलो होतो ते राहिलं कुठेच. Angry

इथेही रमाला भूत दाखवायचंय, की समांतर विश्वात आलेली दाखवायचंय, की मंगलचं भूत दाखवायचं आहे तेच कळत नाहीये...+१
कादंबरी वर आधारीत आहे म्हण्तायत तर त्यात तर असं 'भुत' टाईप काही नाही.

आता आपण याला निरु म्हणू, जाम कंटाळा आलाय टायपायचा)... Lol

रमा म्हणते मला'तू' म्हण की हा लगेच 'तू' म्हणायला सुरूवात करतो.... Lol

कालचा बाळाचा एपि पाहुन तर मला ही सिरीयल १७६० ठिगळं लावलेली गोधडीच होणार असं वाटतंय.
असं काही असेल तर ते सुरवातीचं ना धां च्या कथेवर आधारीत लिहिलंय ते काढुन टाका म्हणावं झी ला.
आणि रमा त्या निरुला काय खेटायला जाते सारखीच. त्याला तर कशाने काहीही फरक पडत नाहीये असं दिसतंय. संथ अलख निरंजन.

रमी म्हणे सगळ्या टेस्ट करुन माझ्या हरवलेल्या घराचा शोध कसा लागणार>>>>>> अग बाई रस्त्यावर चालतेयेस तर आजुबाजुला ओळखीच्या खुणा दिसताहेत का ते बघ. नवर्‍याच्या ऑफिसबद्दल मुलांच्या शाळेबद्दल चओकशी कर. ते राहिलं कुठेच आणि ही म्हणे माझं घर हरवल्यापासुन मला सगळं खोटं वाटतंय, माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे आणि ते अगम्य हसु. अरे आवरा रे. काय दाखवायचंय ते प्लीजच नक्की करा. नैतर ही सुद्धा सिरीयल भरकटायला वेळ लागणार नाहीये. काही चांगलं बघायला मिळेल ह्या आशेने काही फॉलो करावं तर प्रेक्षकांना काय चालतंय की असा विचार करुन सिरीयली लिहितात याचा, खरं लेखन वाचलेल्या, उत्तम साहित्य वाचलेल्या, चांगल्या कलाकृतीची जाण असलेल्या, आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या प्रसंगी कुठलाही सामन्या माणुस कसा वागेल हे पुरेपुर ठाउक असलेल्या सेन्सिबल प्रेक्षकाला हे काहीही भरकटलेलं अवास्तव पाहुन खरंच त्रास होतो. #जागो झी जागो.#

सुद्धा सिरीयल भरकटायला वेळ लागणार नाहीये. >> भरकटलीये की अगोदरच.
६ एपिसोड झाले अजून आपल्याला थांगपत्ता लागत नाहिये की नक्की सुरू काय आहे. Uhoh

तेच मला पण नाही कळलं ; एखादी असती तर भडाभडा नवर्याच्या ऑफिस चा पत्ता / मुलांच्या शाळेचा पत्ता सांगितला असता /मुलांच्या शाळेत जाऊन आली असती ...
तुझं घर हरवलं, पण शाळा पण हरवली का ? नवऱ्याचं ऑफिस पण हरवलं का ? बाकी अनेक खुणा असतात ओळखीच्या मैत्रिणी /लोक त्यांची घरं हॉटेल्स etc

किंवा आपल्याला हे सगळं कळण्याची खूप घाई झालीये त्यामानाने इनपुट फारच slow आहे Wink

इनपुट फारच slow आहे> >>>>> खरंतर असं नाही म्हणू शकत. नवर्याच्या ऑफिस चा पत्ता / मुलांच्या शाळेचा पत्ता सांगितला असता /मुलांच्या शाळेत जाऊन आली असती ...>>>>> हे अगदी लग्गेचच व्हायला पाहिजे खरंतर. पण इथे भलतंच काही सुरु झालंय. स्लो नाहीये कंफ्युझिंग आहे.
आणि तिच्या पर्समधे टेलिफोन डायरी आहे ना? मग इअतर कुणाचे नंबर लावुन बघायला नकोत का?
आणि आयुष्यात काय नवरा मुलं, वाघ काका आणि शंकर लॉन्ड्रीवालाच असतात काय? इतर कुणी नाहीच.
श्या!!! मी पुन्हा इरीटेट होणार ह्या झी मुळे.

आणि तिच्या पर्समधे टेलिफोन डायरी आहे ना? मग इअतर कुणाचे नंबर लावुन बघायला नकोत का?>> तेच कि नवरा/घर शोधायची धडपड जरा तरी अजून दाखवायला हरकत नव्हती .. आधीच हिच्या करामती झाल्या पण सुरु?!!

ते सर्व जाऊ द्या, अजुन कॅलेंडर नाही बघीतला ?????????????

असे कसे

तो निरंजन अति मंद अन अनहायजेनिक वाटतो, अश्यावर कशी लाईन मारते पजो

अजुन कॅलेंडर नाही बघीतला ?>>>>>>>>> हो ना. आणि ३७-३८ वर्षात टेकनॉलॉजीचे कितीतरी बदल दिसतील तिला. घरातही आणि बाहेरही.
सेल माहित नव्हता. तर तेही "सेल काय असतं ?" एवढंच. अग बाई त्या अलख निरंजनवरुन लक्ष काढुन जरा डोळे उघडुन आजुबाजुला बघ.
खरंतर आपली डोकी चालतात तर तेवढीच ह्यांचीही चालत असणारच. पण काय प्रेक्षकांना चालतंय की.

तो निरंजन अति मंद अन अनहायजेनिक वाटतो, अश्यावर कशी लाईन मारते पजो >>> तिचं सांगू नकोस गं , ती स्वत: कचर्याच्या हाताने पोह्याच्या प्लेटस भरते Biggrin

ती दाढी , सुस्तपणा वगैरे, स्वच्छ नाही वाटला मला

निट नाही सांगता येणार पण मला तो कसातरीच वाटला , अशी माणसे नुसती दिसली तरी मी थोडे लांबुनच जाणे पसंद करते

३७-३८ वर्षात टेकनॉलॉजीचे कितीतरी बदल दिसतील तिला. घरातही आणि बाहेरही. >>>> हो ना
नुसती टेक्नोलॉजीच नाही तर बाकीही बरेच बदल घडतात

आयुष्य , क्रुष्णधवल वरुन रंगीत होते, तरी काहीच फरक जाणविला नाही

ईथे आपल्याला ईतके प्रश्न पडतायेत, तर जरा विचार करा
एका घर, मुले, नवरे हरविलेल्या बाईला किती प्रश्न पडायला हवेत

व्ही बी,
तुम्हाला बहुधा दाढी आणी ऑईली फेस आणि चुरगळलेले गबाळे कपडे यामुळे येणारा 'आंघोळ केली नाही' वाला पारोसा लुक म्हणायचेय.

तुम्हाला बहुधा दाढी आणी ऑईली फेस आणि चुरगळलेले गबाळे कपडे यामुळे येणारा 'आंघोळ केली नाही' वाला पारोसा लुक म्हणायचेय. >>> अगदी अगदी हेच म्हणायचेय मला.

अन प्लिज मला तुम्हाला नका बोलु , तु म्हणा

तो निरन्जन कधीही बोलताबोलता झोपेल असे वाटते. >>> हो, हे पण एक कारण आहे

त्या निरंजनला पण एक लाल टीशर्ट मधेच दाखवतात सारखा. त्यामुळे वाटतेय आंघोळ करतो की नाही. तसाही आंघोळ केली तर फारसा काही बदलणार नाही तो Lol

Pages