ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लुचाई वर चांगली हाताळणी केल्यास भन्नाट सीरियल बनु शकेल.रात्रि १० ला दाखवावी लागेल.
कोणाला आवहानात्मक कथा ट्राय करायची असल्यास नीडफुल थिंग्स वर मस्त बनेल.

लुचाई वर चांगली हाताळणी केल्यास भन्नाट सीरियल बनु शकेल.रात्रि १० ला दाखवावी लागेल.
कोणाला आवहानात्मक कथा ट्राय करायची असल्यास नीडफुल थिंग्स वर मस्त बनेल.

Submitted by mi_anu on 23 March, 2018 - 19:51>>>>>>>> चांगल्या कथेची वाट लावतील. धारपांच्या अनोळखी दिशा मधल्या स्टोरीज वर सिरीयल आलेली ती देखील काही खास नव्हती.. पूर्वी जुन्या अल्फा मराठी वर रत्नाकर मतकरीं च्या गोष्टीवर आधारित गहिरे पाणी प्रोग्रॅम व्हायचा खूप मस्त होता तो..

अरे काय धमाल पोस्ट्स एकेक Lol

गहिरे पाणी छान होती. मला रो ह असलेली स्टोरी जास्त आवडली आणि लक्षात राहिली, सुधा करमरकर पण होत्या बहुतेक रोलिंग चेअर मध्ये बसलेल्या असतात.

योग छान पोस्ट . पण झी मराठी च्या मालिकांचा पहिल्या पासून चा ट्रेंड विवाह बाह्य संबंध यावर आधारलेला आहे . सगळ्यात पहिली मालिका आभाळमाया/ अवंतिका / गुंतता हृदय हे ( आणखीन पण असतील ) या मालिका पूर्णपणे विवाहबाह्य संबंधावर आधारलेल्या होत्या . त्यात नायकाला पूर्ण पणे " रापचिक "पणा करण्याची मुभा दिली होती . कोणी आया नायकांवर अंकुश ठेवणाऱ्या नव्हत्या असं वाटत . आता मात्र अंकुश ठेवणाऱ्या आया दिसतात. बाकीच्या दोघांचं ठीक आहे त्यांना रापचिक पणा करू द्यावा किंवा करू द्यायला पाहिजे होता पण गुरु ? तो तर मोकाट आहेच Happy

लुचाई
? >>> धारपांच्या एका कथेचं नाव आहे. व्हँपायर स्टोरी आहे.

>>आभाळमाया/ अवंतिका / गुंतता हृदय हे ( आणखीन पण असतील ) या मालिका पूर्णपणे विवाहबाह्य संबंधावर आधारलेल्या होत्या . त्यात नायकाला पूर्ण पणे " रापचिक "पणा करण्याची मुभा दिली होती .
ओह! मी या पैकी कुठलीच पाहिलेली नाही...
असो.

गहिरे पाणी छान होती. मला रो ह असलेली स्टोरी जास्त आवडली आणि लक्षात राहिली, सुधा करमरकर पण होत्या बहुतेक रोलिंग चेअर मध्ये बसलेल्या असतात.

Submitted by अन्जू on 23 March, 2018 - 20:30
गहिरे पाणी मधला वारस आणि फाशी बखळ भाग पण मला अजून आठवतोय... एक काळ्या बाहुलीच्या स्टोरी पण होती ब्लॅक मॅजिक वर...
असो अवांतर झाले Proud पण लुचाई वर सिरीयल काढली तरी धारपांनि ज्या प्रकारे कथा लिहिली आहे त्याची सर नाही येणार.. Happy

५०० जरा जास्त होतायत. >> कोण बोललं हे? Uhoh
मानबा चा आजचा एपिसोड पाचशे दोनावा होता बरं का

योग तुझ्या पोस्ट्स धमाल आहेत, लय हासले Rofl

एक अजून थिअरी आहे, जी बायकोची आहे:
रमा अपघाताता मेल्यावर मेहता बिल्डर ने तो वाडा, नवर्‍याला फसवून काबीज केला. त्या धक्क्याने नवरा पण गेला..
म्हणून त्या जागी बांधली गेलेली नविन ईमारत पुन्हा मिळवण्यासाठी आता रमा ची मुलगी व मुलगा मिळून हे सर्व करत आहेत. ते अनेक वर्षे थांबले.. आणि जेव्हा नविन ईमारतीत राहणारी मंगल अपघातात मेली तेव्हाच त्यांनी सर्व माहिती काढून मग प्लॅन करून सर्व गोष्टि केल्या आहेत. रमा ची मुलगी म्हणजे आता रमाच दिसते हा एव्हडाच काय तो योगायोग. पण असे मुद्दामून घाबरवणारे प्रसंग घडवून आणणे वगैरे.. जेणे करून सर्व जण ती ईमारत भितीने सोडून जातील आणि त्या दोघांना ती ईमारत मिळेल.. थोडक्यात त्यांचा सूड पूर्ण होईल.
आणि हे सर्व शक्य असेल तर शक्य असेल तर मग तो जो नविन लाँड्री वाला दाखवलाय तो रमा चा मुलगा असावा जो आता त्याच्या बहिणीला मदत करतोय - ही माझी सप्लीमेंट थिअरी. Happy

कारण मंगल जर रमा च्या शरीरात आली असेल तर तीला रमा च्या नवर्‍याचे नाव, त्यांचा आधी वाडा होता वगैरे हे माहित असणे अशक्य आहे. आणि रमा जर मंगल च्या शरीरात गेली असेल तर मंगल आता रमा सारखी दिसणे अशक्य आहे. थोडक्यात भूत थिअरी अशक्य आहे... मुद्दामून प्रेक्षकांना पण गंडवायला म्हणून हे भूत भास निर्माण केले आहेत. थोडक्यात जे दिसते ते काही वेळापुरताचा खेळ आहे, सत्य आहे ते लपवण्यासाठी. आणि म्हणून नाव 'ग्रहण'... कारण तेही तात्पुरते असते, पण बघणार्‍याला असे वाटते खरेच चंद्र वा सूर्य गायब झाले आहेत. पण त्या अनुशंगाने परंपरागत चालत आलेले गैरसमज, अज्ञान, भिती ई. चा वापर करून कथा त्या भोवती फुलवली असावी.

भूत थिअरी खोटी असेल तर ही एकच दुसरी शक्यता वाटते..
काय?

भारी मस्त थियरी. रमाची मुलगी हे पटू शकतं. पण बदला घ्यायला मेहता बिल्डर्सकडे जायला हवं. हे राहायला आलेत त्यांचा काय दोष. केवळ जागा परत मिळवण्यासाठी त्यांचा बळी जाणार. ज्याने केलंय तो त्याच्या पुढच्या पिढ्या मस्त आरामात जगत असतील, मेहता बिल्डर्सच्या.

अजून एक थिअरी -
रमा आणि मंगल यांना एकाच वेळी दोन समांतर जगात अक्सिडेंत झाला. काळ आला असला तरी वेळ आली नसल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. पण ऐनवेळी त्यांची फाइल चूकीच्या टेबलवर गेल्याने त्या चुकीच्या जगात गेल्या. म्हणजे रमाच्या जागी मंगल आणि मंगलच्या जागी रमा.
अश्या मरणाच्या दारातून परत आलेल्या व्यक्तींना काही विशेष शक्ती प्राप्त होते म्हणतात. त्यामुळे पजो तशी वागतेय.
निरंजनच्या आईचा मंगलच्या ॲक्सिडेंट मध्ये हात असावा. त्यामुळे ती घाबरत असावी. (चोर की दाढी में तिनका)

मुलं आजिबात बघु देत नाहीत ही सिरीयल. जाम घाबरतात. काल प्रधान काकु ज्या काय घाबरल्या पजोला ड्रेसमधे बघुन माझा मुलगा त्याम्चं घाबरणं बघुन घाबरला. तिथेच चॅनेल चेंज केलं नवर्‍याने.
माझा नवरा म्हणे कशाला इंट्रेस्ट घेउन बघतेस त्या सिरीयली? काही एपि नंतर, जरा काही सेन्सलेस दाखवलं की तुला पटत नाही आणि शिव्याच घालतेस सगळ्या सिरीयलींना Happy

ती सिरियल पहाण्यापेक्षा इथे येऊन वाचणे मस्त वाटते.पजो,५०+ असली तरी तिला ४०च्या आत बाहेरची दाखवणे कंटाळवाणे होतंय.बिचारा निरंजन ! इकडे पजो तिकडे जाडू बाई जोरात मधली निर्मिती सावंत!

घ्या..बदल्ली एकदाची साडी..जरा म्हणून प्रेक्षकांऩा दम नाही..
पण ड्रेस बरा फिट बसला.... Uhoh Lol
__________
आता मंगलची गोष्ट सुरू..पजो चा घर शोधणे अजेंडा तुर्तास backfoot वर.

प्राची, मस्त.

नवऱ्याला फारसं आठवत नाहीये, मला तर वाटतं जिथे काय त्या उंच divider बसली होती आणि समांतर जगात आली, तिथेच परत बसून पहिल्या जगात जाईल. पण हे किती महिन्यांनी घडेल काय माहिती.

मला वाटतं इथे STY सुरू केलं तर मजा येईल! सुरू झालेलंच आहे खरंतर Proud
योग, तुमच्या पोस्ट्स भारी आहेत!!

पण समांतर जग 40 वर्षे पुढे कसे ??>>>> ४० वर्षे पुढे असा उल्लेख कधी होता? फक्त निरंजन म्हणतो की गेली ३७ वर्षे आम्ही इथे राहतोय. जे समांतर जगात शक्य आहे.

धमाल चालली आहे इथे Rofl Rofl Rofl

प्राची, मस्त. नवऱ्याला फारसं आठवत नाहीये, मला तर वाटतं जिथे काय त्या उंच divider बसली होती आणि समांतर जगात आली, तिथेच परत बसून पहिल्या जगात जाईल >>> + १२३

मी मालिका बघत नाही... बघणारही नाही (समांतर जग, एकाच्या शरीरात दुसर्‍याचा आत्मा, वगैरे फँटसी नॉट माय कप ऑफ टी)

पण इथल्या पोस्टी धमाल आहेत. त्या वाचणार Lol

रात्रीस खेळ चाले मध्ये शेवटच्या भागात इन्स्पेक्टर कसा गंडतो. एवढे दिवस शोध घेऊन त्याला समजतच नाय दोषी नक्की कोण आहे, सगळ्यांनाच फैलावर घेतो मग शेवटी आपल्या नीलिमा वहिनी कंटाळून बोलतात बाबा रे मीच दोषी आहे चल जेल मध्ये घेऊन मला. तसाच काहीसा शेवट होईल या मालिकेचा असं वाटतंय.

आता स्वप्नाली पाटीलची एन्ट्री असेल, फोटोत तीच दाखवलीय मंगल.

मालिका वेगवान हवी मात्र, पहीला भाग सोडला तर संथ वाटतेय.

>>अजून एक थिअरी -
>>रमा आणि मंगल यांना एकाच वेळी दोन समांतर जगात अक्सिडेंत झाला. .. म्हणजे रमाच्या जागी मंगल आणि मंगलच्या जागी रमा.

तसं असलं तरी मी वर लिहीलय तसं एकाच व्यक्तीला दोन्ही कडील डीटेल्स महित असणे अशक्य आहे. एक होवू शकते.. अर्धी मंगल, अर्धी रमा. हवे तेव्हा स्विच ऑन ऑफ! आता रमा निरंजन ला मंगल ची कहाणी विचारणार... आणि त्यातील काही मिसींग डीटेल्स वा शक्यता स्वतः त्याला सांगून बघणार... म्हणजे निरंजनला पण शंका येईल की रमाच आता मंगल बनून आली आहे? (त्याला) 'चालतय की'... Happy
असो.. लेखकाने STY ठरवले तर मालिका कुठल्याही वळणाने पुढे जाऊ शकते.. पण हा लेखक मानबा वाला आहे असे असेल तर फार विशेष अपेक्षा नाहीत..
अख्ख्या मालिकेत अजून तरी प्रधान बाईच जास्त भितीदायक वाटतात, हे मान्य आहे Happy काल तो चौथा कप कामी आला की... प्रधान बाईंना तोच देते रमा घरातून बाहेर जाताना. म्हणजे मी म्हणतो तसेच दिसते काहितरी.. ठरवून केलेले खेळ..

निरंजन कुठल्या कंपनीत कामाला आहे..? मजा आहे बुवा... कामावर जातच नाही... व्हेकंसीस आहेत का तिथे? Happy

>>मालिका वेगवान हवी मात्र, पहीला भाग सोडला तर संथ वाटतेय.
भूताकडून कपड्याला घड्या घालून घेताहेत... चहा बनवून घेताहेत... काय कप्पाळ वेगवान होणारे.

कंटाळवाणे होतंय.बिचारा निरंजन ! इकडे पजो तिकडे जाडू बाई जोरात मधली निर्मिती सावंत!>>>>> देवकी, तो निरंजन नाहीये . दोघे थोडे सारखेच दिसतात. जाडुबाई मध्ये जो आहे ( त्याचे नाव लक्षात नाही, पण तो चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे मध्ये आशालता देशमुखांचा मधला मुलगा दाखवलाय, तसेच तो माधवी सोमण यांच्या बरोबर कलर्सच्या एका ( पूर्वीची ई टिव्ही मराठी ) सिरीयलमध्ये होता.

पण साठे ज्योतिषी अगदीच फुसके दाखवलेत... त्या जागी जरा दुसरा कणखर व राकट घेतला असता तर पजो आणि साठे यांचे 'मै तेरी दुष्मन..' स्टाईल जुगलबंदी सीन्स मस्त रंगवता आले असते.. opportunity missed!

पजो साधे भूत आहे.नागभूत नव्हे.त्यामुळे तो ज्योतिश्याशी कम्प्लीट सिंक असू शकते.(यात ज्योतिष लोकांचे भूत हा सिनेरियो पण घ्यावा लागेल.)
"प्रत्येक अंगठा हे बोट असतो पण प्रत्येक बोट अंगठा नव्हे"
"प्रत्येक नागभूत हे भूत किंवा आत्मा बेस क्लास असते पण प्रत्येक आत्मा नागभूत नव्हे."

>>पजो साधे भूत आहे.नागभूत नव्हे.
'नागभूत'... हे महान आहे! new concept! Happy
'मै तेरी दुष्मन' हा संदर्भ दिला होता... म्हणून काय दर वेळी ईच्छाधारी नागिन च हवी का?
रच्याकने: पजो प्रधान बाईंवर जीभ काढून 'हिस्स....SSS' करते असे दृष्य डोळ्यासमोर आले.. Happy
मै तेरी दुष्मन च्या तालावर-
मी तुझी स्ट्रॉबेरी, तू माझा वॅनिला..
एका आईस्क्रीम ने घोळ केला...

Pages