ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

योगेश देशपांडे. याला आधी कुठेतरी पाहिलंय नक्कीच. पण कुठे ते जाम आठवत नाहीये.>>>> हो माझे पण तेच झालेय.

अभिजीत गुरू पटकथा लेखक आहे!! होत्या- नव्हत्या त्या सगळ्या अपेक्षा संपल्या..
नारायण धारप यांच्या 'ग्रहण' कादंबरी वरून प्रेरित अशी ओळ दाखवतात गाणं सुरू होताना..

मनबाच्याच निर्मात्याची आहे ना ? तेजेंद्र नेसवणकर . का नाही ?नक्की माहित नाही . कारण टायटल नंतर बघतेय . जर तोच असेल तर हुकमाचा संवाद लेखक घेतलाय. फक्त कांदबरी वर आधारित असेल तर पटकथा आणि संवाद लेखन पण सोपं जाईल .

त्या निरंजनच्या बायकोचा फोटो दाखवला का शेवटी शेवटी दुसऱ्या रूम मध्ये कॅमेरा नेऊन ? पण तो निरंजन किती मोठा दिसतो आणि तो पुढच्या भागातला तो छोटा मुलगा कोण आहे ?

तो पुढच्या भागातला तो छोटा मुलगा कोण आहे ? >> भाजी घेणार्या आगाऊ बायाकाम्पैकी एकीचा मुलगा आहे तो>>>

तोच कोण आहे? म्हणजे त्याचे खरे नाव काय? खूप गोड आहे तो! त्याने आत्तापर्यंत अस्मिता, तू माझा सांगाती आणखी कोणतीतरी एक मालिका (ज्यात ते दळवी डॉक्टर कुटुंब दाखवले होते) अशा अनेक मालिकांत छान काम केले आहे.

आज ट्रेनमध्ये हा धागा वाचत होते आणि अचानक पजोचा आवाज आला. क्षणभर दचकलेच. आता ट्रेनमध्ये मराठी मालिकांची जाहिरात करतात वाटतं.

मला बोअर झाला तिसरा भाग. अभिजीत गुरुचं नाव आज बघितलं आणि लगेच बोअर झाला Lol

मला तर वाटतं की ती तिथेच बसून असेल त्या divider वर आणि मग पुढचे मनाचे खेळ असतील तिचे, असं झालं तर फक्त सेलफोन पुढे येणार असं तिला कसं कळलं हाही एक प्रश्न आला मनात. शेवटच्या भागात भानावर येऊन परत रस्ता क्रॉस करेल, घरी येईल मग तिचा happy birthday करतील.

अर्थात इतकं सोपं नसेल, मला उगाच वाटतंय असं.

मला फार नाही आवडला निरंजन. हाईट चांगली आहे. ती आईपण नाही आवडली. आशा शेलार हव्या होत्या actually त्यांनी छान केलं असतं.

निरंजन चे पात्र स्टुपिड वाटतेय. अ‍ॅक्टर चा प्रॉब्लेम असावा तो. अति सावकाश मोनोटोनस बोलतो. पल्लवी जोशी सोडून बाकी कोणीच चांगले अ‍ॅक्टर्स घ्यायचे नाहीत असा काही प्लॅन असेल तर दॅट इज डेन्जरस. अख्खी सिरियल फ्लॉप होईल सगळे असलेच ठोकळे अ‍ॅक्टर्स घेतले तर.

हो ना. रुद्रमने काय एकसे एक घेतलेले. ह्यातले सगळे गूढ वाटावेत म्हणून घेतले असतील तर बोअर होतायेत ते.

अभिजित गुरु??? मरा! वाट लागणार याची पण आता... सारख काहितरी गुढ म्युझिक, पजो आणी निरजनची आइ एक्मेकाकडे खुनशी का बघतात? बोरिन्ग वाटतिये सुरवात..

कालचा एपि बोअर झाला.
पजो त्याच्या बेडरूम मधे जाऊन कपडे का घडी करायला लागली एकदम ते हि हसतमुखाने!!
-------
तिला सेलफोन म्हणजे काय माहित नाही,पण दुसर्या एपिमधे तो मोबाईल तिच्या हातात देतो नवर्याशी बोलायला तरी तिला प्रश्न पडत नाही,हि काय वस्तू आहे,ती कशी हाताळायची.
सराईतासारखी तर बोलली त्यावरून.

म्हातारी तीला घर सोडून जायला सांगते तर पजो बोलते कुठल्या तोंडाने घरी जाऊ. आणि तिच्याकडे चेहरा केल्यावर म्हातारी भूत पाहिल्यासारखी जोरात ओरडते >>>>>>>> ह्याचं काय झालं? माझी सुरवात गेली कालच्या एपिसोडची , सांगा ना कोणीतरी प्लिज Happy

"कबसे इस प्र्यासी जमिनपर बारीश की एक बूंद नही गिरी..." राज मधल्या बिपाशासारख काहीतरी बोलतेय पजो.

अभिजीत गुरूच असेल तर मलाही वाटतं पुढच्या वर्षी एखादा एपिसोड पहावा.

ह्याचं काय झालं? माझी सुरवात गेली कालच्या एपिसोडची , सांगा ना कोणीतरी प्लिज Happy
नवीन Submitted by धनुडी on 22 March, 2018 - 14:01 >>>>तिथे तिचा चेहराच Blank (no eyes, no nose, no mouth) दाखवलाय. आणि हे स्वप्न असते त्या निरु च्या आईचे.

तिचं अचानक निरंजन च्या जवळ जाणं, हसतमुखाने त्याच्या कपड्यांच्या घड्या घालणं हे विचित्रं वाटावं असं असलं तरिही ते तिच्या अस्थिर मनाचं चित्रं उभं करण्यासाठी मला योग्य वाटलं.

समांतर जगच असावे कारण प्रधान बाई दोन मालिकांमधे त्याच नावाने आहेत - इथे आणि ब्रेक अप मधे >>> जीव रंगला मध्ये ना . म्हणजे भावना पोचल्या.. तरीही >>> मी जीव रंगला बघत नाही. त्या प्रधान बाई त्यातपण आहेत का Uhoh

अभिजीत गुरू पटकथा लेखक आहे!! होत्या- नव्हत्या त्या सगळ्या अपेक्षा संपल्या.. >>> अरे बापरे. मग बघण बंदच करावं का Sad

तो निरंजन थोडा मिलिंद गुणाजी सारखा वाटला.>>> मला पण

>>तिचं अचानक निरंजन च्या जवळ जाणं,
अरेरे! किती अरसिक झालेत प्रेक्षक Wink

>>हसतमुखाने त्याच्या कपड्यांच्या घड्या घालणं
हे मात्र पटत नाही... आधीच भूत, त्यात घर हरवलेलं... आणि दुसर्‍यांच्या घरात कपड्याच्या घड्या घालते आहे. Happy पण नीरू शी थेट सलगी करण्या आगोदर थोडं वातवरण निर्मिती व्हावी म्हणून असेल.. भूत असलं तरी मध्यमवर्गीय सुशील गृहिणी दाखवली असल्याने अशी डायरेक्ट अंगसटी जायची नाही...
(आमच्याकडे पसरलेले कपडे आवरताना सौ. चा चेहेरा भूतापेक्षा भितीदायक वाटतो.)

तीन भागांपैकी पहिला चुकला, बाकी दोन पाहिले. अजून तरी ठीक ठाक वाटतीये मालिका. पजो असल्याने अपेक्षा जास्त आहेत.
पण... भूतोंसे डर नहीं लगता साहब, अभिजित गुरु से लगता है !! अशी परिस्थिती असल्याने, पाहुया पुढे काय होतं.
तो निरंजन थोडा मिलिंद गुणाजी सारखा वाटला. +१
बर्‍याच दिवसांनी अशोक पत्की - देवकी पंडित काँबिनेशनचं शीर्षक गीत ऐकून बरं वाटलं !

(आमच्याकडे पसरलेले कपडे आवरताना सौ. चा चेहेरा भूतापेक्षा भितीदायक वाटतो.) Biggrin

आमच्याकडे पसरलेले कपडे आवरताना सौ. चा चेहेरा भूतापेक्षा भितीदायक वाटतो >>>>>>>>> हा हा हा,....

टायटल सोन्ग :
क्षणमात्र घडली माया क्षणात विश्व बुडाले
ओंजळीत हि सुन्न रात्र अन एक गूढ कोडे

श्वासात गुंतली नाती पावले शोधती छाया
माझी मलाच का रे भासे अनोळखी काया

धुक्यात विरून गेला आठवांचा गाव मागे
जेथे पाहते तेथे आता ग्रहण लागे…

TV Serial: Grahan
Channel: Zee Marathi
Music: Ashok Patki
Lyrics:
Singers: Devaki Pandit

तिथे तिचा चेहराच Blank (no eyes, no nose, no mouth) दाखवलाय. >>> म्हणूनच पजो बोलली ना कि मी कुठल्या तोन्डाने परत घरी जाऊ . हल्ली भुते सुद्दा विनोद करायला लागलेत. हा हा हा

Pages