Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निरंजनला 'चालतय की'..>>
निरंजनला 'चालतय की'..>>
>>समांतर जग म्हणजे नक्की काय?
>>समांतर जग म्हणजे नक्की काय?
जेव्हा आपली बायको खरीखुरी भूत बनून दुसर्याच्या घरात कपड्याच्या घड्या घालते. !
मी कादंबरी वाचलेली नाही, पण
मी कादंबरी वाचलेली नाही, पण पल्लवी भूत आहे असं का म्हणतायत सगळे इथे? >>> +११
आज रमाबेन त्या मंगलचा चुडीदार
आज रमाबेन त्या मंगलचा चुडीदार घालुन सजल्यात ते पाहुन निरंजनच्या मातोश्री हबकतात. तर तिकडे ते ज्योतिष्यी महाराज म्हणतात, मंगल बाप्पाकडे गेली तेव्हा पौर्णिमा होती, आणी ही बाई आली तेव्हा ती रात्र पौर्णिमेचीच होती.
तेव्हा मंगलच दंगल करायला आली असावी असे गृहीत धरुन पुढे आपण गप्पा मारु.
हो मंगल रमाच्या अंगात शिरलेय
हो मंगल रमाच्या अंगात शिरलेय किव्वा मंगलच्या भुताने/ आत्म्याने रमा चा कब्जा घेतलाय . पण तस जर का असेल तर रमाचा खरा नवरा तिला शोधत का नाहीये ?
>>आज रमाबेन त्या मंगलचा
>>आज रमाबेन त्या मंगलचा चुडीदार घालुन सजल्यात ते पाहुन निरंजनच्या मातोश्री हबकतात.
right.. just preparing myself forr another query tonghit (by my beloved wife): but how come Mangals' chudidar fits Rama and that too after 37 yrs? i am hoping she will be satisfied with the same answer: पण निरंजन ला 'चालतय की'..
असो. मला मात्र टेक्निकल शंका होती: काल सकाळचा चहा बनवताना चार कप बनवते... कुणि नोटिस नाही केले का? घरात तीघेच आहेत..
>>पण पल्लवी भूत आहे असं का म्हणतायत सगळे इथे?
प्रसंग तसे दाखवलेत... क्षणात गायब होते.. हात न लावता नजरेने दरवाजा ऊघड बंद करते..
पण ती मंगला मरून किती इयर्स
पण ती मंगला मरून किती इयर्स झालेत ??तिच्या मरणानंतर तिचे कपडे कशाला ठेवलेत बाळगून?
मी पण नाही वाचलीये मूळ कादंबरी ..बघूया पुढे काय काय दाखवतायत
आणि काल मंगला च्या फोटोला वाळवी लागलीये अस दाखवलं का? आणि का ? पजो आणि रमाबेन च काहीतरी connection असणारे नक्कीच
असो. मला मात्र टेक्निकल शंका
असो. मला मात्र टेक्निकल शंका होती: काल सकाळचा चहा बनवताना चार कप बनवते... कुणि नोटिस नाही केले का? घरात तीघेच आहेत..>> कोणालातरी २ कप चहा लागत असेल
मला तर वाटते कि आता हळूहळू ती
मला तर वाटते कि आता हळूहळू ती सगळ्यांना त्या इमारतीमधून बाहेर काढणार. तिचे घर होते ना तिथे त्यामुळे कोणालाच तिथे राहू देणार नाही.
वाडापाडून इमारत होईपर्यंत कुठे भटकत होती काय माहित?
काय हे
काय हे
बिचारी भूत झालीय आणि तुम्ही 3 ऐवजी 4 कप चा टाकला म्हणून जजिंग करताय.
डायरेक्ट साखर टाकून रक्ताचं आधण ठेवलं असतं म्हणजे ? ☺️☺️☺️
(No subject)
अनु
अनु
"डायरेक्ट साखर टाकून रक्ताचं आधण ठेवलं असतं म्हणजे??"
ती पुढल्या एपिसोडच्या प्रोमो मधे भसाड्या आवाजात म्हणेल " जरा मधुमेही रक्त मिळेलं का?"
गुगु
गुगु
(आमची पण कमालै)
योग मी नोटिस केलं ४ कप चहा बनवलं ते.
मला अजूनही नीट उमगत नाहिये की पल्लवी जिवंत असून कुठेतरी निराळ्या ठिकाणी (अनेक वर्ष पुढे) पोहोचली आहे, की भूत आहे. असो ४ एपिसोड मध्ये कळावं अशी अपेक्षा पण नाही.
त्या होसुमियाघ मध्ये ती जानु १५ महिने प्रेग्नंट होती, पोटार म्हैस आहे की काय असा प्रश्न पडला नाही मात्र इथे पल्लवी भूत आहे का माणूस हे आम्हाला ४ एपिसोडात कळायला हवंय
पजो आणि रमाबेन च काहीतरी
पजो आणि रमाबेन च काहीतरी connection असणारे नक्कीच >>> पजोच रमाबेन आहे!
मी कादंबरी वाचलेली नाही, पण
मी कादंबरी वाचलेली नाही, पण पल्लवी भूत आहे असं का म्हणतायत सगळे इथे? >> ती त्याच वयाची आहे पण ती बिल्डिंग तिथे ४० वर्षे आहे म्हटल्यावर एक तर ती भूत आहे ( पण कुणालाही केव्हाही दिसते आणि फोटोत पण येते वगैरे त्यामुळे एक्झॅक्टली भूत नाही वाटत , किंवा निदान टिव्ही छाप ट्रॅडिशनल इन्व्हिजिबल ,ट्रान्स्परन्ट वगैरे भूत नसावे) किंवा मग पॅरलल युनिचर्स, टाइम ट्रॅवल असलेच काहीतरी. दुसरे काही लॉजिकल तर्क नाहीत बॉ सुचत.
अरे सर्वांनो अभयला पेपर
अरे सर्वांनो अभयला पेपर वाचताना दोन कप चहा हवा असायचा, हेच ती निरंजनसाठी गृहीत धरुन दोन कप चहा त्यासाठी करते आणि त्यालाही दोन कप लागतो चहा पेपर वाचताना.
चाळीस वर्ष गेली आहेत तर तिचा
चाळीस वर्ष गेली आहेत तर तिचा मुलगा, आत्ताच्या निरंजनएवढा किंवा मोठाच असेल तर तिने मुलासारखं बघायला हवं ना त्याच्याकडे अर्थात ती मधला पिरेड गृहीत धरत नसेल आणि फॅमिलीला शोधत असेल तरी निरंजनकडे परपुरुष म्हणून बघायला हवं.
असं काहितरी घडलं असावं ?
असं काहितरी घडलं असावं ?
निरंजन च्या कुजकट आईला काही करून हटवावे लागेल.. आणि बाकी ऊर्वरीत पात्रांनी फक्त घाबरे घुबरे होवून रमा भूतच आहे हे वारंवार आपल्यावर ठासवले की झाले. थोडक्यात निरंजन सोडून ईतर सर्वांना ती भूत वाटणार.. पण निरंजनला 'चालतय की'... तेव्हा आपण कशाला आक्षेप घ्या?
आणि मग पुन्हा नव्याने सर्व डाव मांडा.. प्रेक्षक आनंदाने बघतील... सवय झालीये आम्हाला बिन्डोक मालिका बघायची व त्यावर हजारो ने पोस्टी टाकायची! [मुझे सबके घर मे रोटी चाहिये] 
बस च्या धक्क्याने ती मेली... 'वर' गेली. पण जीव घरात व नवरा आणि मुलांत गुंतला असल्याने परवानगी घेऊन पुन्हा आली... (असतात काही बायका चिवट!) तोवर पृथ्वीवर ३७ वर्षे ऊलटून गेली होती. (तिकडचे काही क्षण म्हणजे ईकडची काही वर्षे असे असल्याने!) पण तिची स्मृती आधीचीच असल्याने ती आता घर व नवरा शोधत फिरते आहे.
दरम्यानः बायको मेली म्हणून नवर्र्याने तो वाडा विकला.. मुलासकट शहर सोडले व कायमचे सर्व दूर निघून गेले. आता जी मेली तिला काय शोधायची? तेव्हा अर्थातच रमा ला शोधायला कुणिच येणार नाहीये (सध्या तरी).
राहिला प्रश्ण निरंजन व मंगला चा. तर मंगला कशी गेली हे कळले तर रमा व मंगला ची 'वर' काही डील झाली असेल तर माहित नाही. ते कदाचित पुढील भागात येईल.. पण मंगला ची मुले वगैरे नाहीत.. त्यामूळे आता मालिका पुढे न्यायची तर निरंजन व रमा चे 'सीन्स' 'शिजवावे' लागतील..
कहानी मे ट्विस्ट क्र. १ म्हणून काही भागांनंतर म्हणजे जेव्हा निरू व रमा चे सुत जुळलेले असेल तेव्हा अचानक रमा च्या आधीच्या नवर्याने त्या नविन जागी परत यावे...
ट्विस्ट क्र. २: आता म्हणजे ३७ वर्षांंच्या कालावधीत रमा च्या नवर्याने दुसरे लग्न केले आहे... आणि त्याची बायको मंगला आहे, म्हणजे तशी दिसणारी.
ट्विस्ट क्र ३: आपल्याकडे बिलडींग्स वगैरे अनेक बांधतात पण रस्ते बांधणी वगैरे याबाबत ऊदासीनता आहे. तेव्हा तो मधला हायवे तसाच आहे. (जो ओलांडताना रमा चा अपघात होतो? कमाल आहे बुवा. पण एक आईसक्रीम आणायला तीला चक्क हायवे क्रॉस करावा लागला होता.. ) यावेळी निरंजन व रमा चा नवरा अभय पुन्हा अपघातात मरण पावतात (ज्याने रमा ला आधी ऊडवले तोच ड्रायव्हर असावा! पुरेसे साक्षीदार नहीत म्हणून तेव्हा सुटला. )
अजून कुणाला काही सुचत असल्यास लिहा अन्यथा ऊर्वरीत काम लेखकावर सोडून देऊयात.
ही मालिका एकूणात प्रेक्षकांना ग्रहण लावणार असे दिसते.
[एकंदरीत गूढ मालिकांचा झी चा इतीहास पाहता 100 days, राखेचा.. आधी गूढ, रहस्य, गुंता या साठी अनेक भाग खर्ची घालतात आणि मग शेवटी दोन तीन भागातच सगळं आटोपतात!]
. आणि बाकी ऊर्वरीत पात्रांनी
. आणि बाकी ऊर्वरीत पात्रांनी फक्त घाबरे घुबरे होवून रमा भूतच आहे हे वारंवार आपल्यावर ठासवले की झाले. >>>>>
[एकंदरीत गूढ मालिकांचा झी चा इतीहास पाहता 100 days, राखेचा.. आधी गूढ, रहस्य, गुंता या साठी अनेक भाग खर्ची घालतात आणि मग शेवटी दोन तीन भागातच सगळं आटोपतात!]>>>>>> नुसते आटोपत नाहीत, तर जाम वाट लावतात. काहीही रहस्य उलगडत नाही. नुसता शेवट आटोपायची घाई, तोपर्यंत प्रेक्षकांचा जीव टांगणीला, नेल बाईटिंग वगैरे..
रात्रीचे फिरताना केस मोकळे
रात्रीचे फिरताना केस मोकळे सोडणे हे मस्ट आहे का
फॉर अ चेंज, प्लेन पांढर्या साडिऐवजी प्रिंटेड 
रच्याकने: बायको वा कुठल्याही
रच्याकने: बायको वा कुठल्याही स्त्री वरून आईने आपल्या मुलाच्या आयुष्यात लुडबूड करणे हे कधी थांबणार? ईतक्या मालिका झाल्या... तरी सुधरत नाहीत लोक.. ! आता एव्हड्या मोठ्या, कळत्या, मुलाने थोडा 'रापचिक' पणा केला तर बिघडले कुठे? पण निरंजन च्या आईला चालत नाही. बिचार्या गुरूनाथ ला पण सर्वांनी नामोहरम केले.. 100 days मध्ये पण अजय ठाकूर ला राणी शी शेवट्पर्यंत मिळू दिले नाही... तमाम मालिका फक्त आणि फक्त स्त्रीयांचे हक्क, वगैरे वगैरे च्या बाजूने लिहीतात व दाखवतात राव! This is not fair...!
पण काहितरी नविन द्या आता..
मराठी मध्ये मिड्ल क्लास कन्फ्युज्ड अॅटिट्यूड सोडून 'रापचिक' मालिका कधी बनतील? अगदी रा. ११ नंतर प्रक्षेपित केल्या तरी चालतील की..
अहो योग, ती पजो जराशी
अहो योग, ती पजो जराशी निरंजनच्या जवळ गेली तरी आपल्याला सहन होत नाहीये इथे आणि तुम्ही काय रापचिकची अपेक्षा करताय राव!
>>आपल्याला सहन होत नाहीये
>>आपल्याला सहन होत नाहीये
'तुम्हाला' सहन होत नाहीये असे म्हणायचे आहे का? निरंजन ला चालतय.. मलाही चालतय...
by the way, technically that scene was appropriate, looking at NIranjan's personality, it makes sense for Pajo to make the first move! फक्त त्याची कॉलर चुरळण्यापेक्षा जरा वरच्या बटणांच्या गॅप मधून बोटे फिरवलेली दाखवले असते तर सीन ऊठावदार झाला असता. असो. माझी पोस्ट 'बेफिकिरी' कडे झुकते आहे... तेव्हा ईथेच थांबतो.
नाही नाही, मी इथल्या
>>रमा लगेच लिव्हइन मधे रहायला
>>रमा लगेच लिव्हइन मधे रहायला लागले तरी चालणारे
तेच तर... लिव्ह ईन वरच मग एखादी मालिका काढा ना... होवून जाऊ देत!
धड ना ईथले धड ना तिथले असे दाखवून ऊगाच दिशाभूल करतात लोकांची. अशाने मुलांच्या मनावर चुकीचे संस्कार होतात.
लिव्ह ईन वरच मग एखादी मालिका
लिव्ह ईन वरच मग एखादी मालिका काढा ना... होवून जाऊ देत! >>> हे बरीक अवघड आहे. एकूण मालिकांचा ट्रेंड पाहता जरतारी सून आणि तिच्याकडून असलेल्या घरच्यांच्या अपेक्षा किंवा मानबा सारखा बायकोने नवर्याला 'परत' आणण्याचा अट्टाहास असल्या गोष्टींचीच चलती दिसतेय. या फालतूपणात 'रूद्रम' काय ती दिलासा होती. नात्याबित्यांची भानगडच नाही.
नियर डेथ एक्सपीरियंस आलेल्या
नियर डेथ एक्सपीरियंस आलेल्या माणसांची जडण घड़ण बदलते.त्याना एखादी अमानवी सिद्धि किंवा दृष्टि प्राप्त होते.किंवा ते एका वेगळ्या जगात जाऊन येतात(आपला मैट्रिक्स, त्याचा पुढचा पार्ट एच एस सी किंवा प्री डिग्री येईल काय?) किंवा टाईम मशीन प्रमाणे परिणाम होतो.
धारपांची देवादन्या (अशुद्धलेखन माफी) या विषयावर आहे.त्यात इतका गोंधळ आहे की कोण नियरडेथ, कोण मेलेलं, कोण इव्हिल ऋषि, कोण एंजल ऋषि याबाबत एखादा जटिल सिक्वेंस डायग्राम बनु शकेल.
या सीरियल वाल्यानी देवादन्या घ्यायला हवी होती सीरियल ला.५०० भागांची सोय झाली असती.
या सीरियल वाल्यानी देवादन्या
या सीरियल वाल्यानी देवादन्या घ्यायला हवी होती सीरियल ला.५०० भागांची सोय झाली असती >>> ५०० जरा जास्त होतायत. ३ महिन्यात संपणार्या मालिका हव्यात. क्रिस्प राहतात. देवाज्ञा मस्त आहे. स्वाहा सुद्धा.
बाकी धारपांच्या कुठल्याही पुस्तकावर मालिका चालेल मला. आवडतात मला त्यांच्या कथाकादंबर्या. मागे महेश कोठारेने 'अनोळखी दिशा' मधे धारपांच्या काही कथा आणल्या होत्या. पण मग ६-७ एपिसोड्स नंतर धारपांच्या कथा बंद होऊन वेगळ्याच कोणाकोणाच्या कथा येऊ लागल्या आणि सिरीयल कंटाळवाणी झाली. मला तर संशय आहे की नंतरनंतर तर कोठारे स्वतःच लिहीत होता स्टोरीज त्यासाठी
>>मानबा सारखा बायकोने नवर्
>>मानबा सारखा बायकोने नवर्याला 'परत' आणण्याचा अट्टाहास
त्यावर ठाम ऊत्तर नसल्याने
अगदी!
Mom... why is that Radhika tolerating that Guru?
But if Shania and Guru like each other then whats Radhika's problem?
-ईती आमची १० वर्षाची कन्या! आता ती अर्धवट वयात आहे असे म्हणून दुर्लक्ष केले तरी प्रश्ण योग्यच आहेत
" अगं आता आपल्या बाबांना दुसरी कुणि आई आवडली तर? चालेल? " असा प्रश्ण सौ. ने तिला करून मूळ मुद्द्याला बगल दिली! त्यावर तीने "अज्जीबात नाही हा बाबा.. you can't leave your wife..!" असे पटकन ऊत्तर दिले. लहान मुलांचे बरे असते. लॉजिक सिंपल असते. पटले तर घ्या...
[बाबांना तेव्हडी आजादी नाहिये हे बिचार्या कन्येला माहित नाही... पण बोलण्यात हा मुद्दा अगदी नेहेमी हुकुमाचा एक्का ठरतो सौ. साठी. ]
>>कोठारे स्वतःच लिहीत होता स्टोरीज त्यासाठी Wink
डॅम ईट!
योग
योग
Pages