Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दोन तीन वर्षांपूर्वीच ही
दोन तीन वर्षांपूर्वीच ही कादंबरी वाचलेली नारायण धारप लक्षात हे लक्षात होते पण कादंबरीचे नांव नव्हते आठवत ....
time travel च्या concept वर आधारीत होती .
जर कादंबरी हुकूम सिरीअल पुढे नेली तर इंटरेस्टिंग होईल ...
पण झी चा चांगल्या कथानकांचा चुथडा कसा करायचा याची हिस्टरी बघता फार अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या ......
सुरुवातीला अपेक्षा उंचवून ठेवतील, कारण विषय दमदार आहे आणि नंतर पाणी घालतील .
मी पाहिला कालचा भाग. पल्लवी
मी पाहिला कालचा भाग. पल्लवी ची हॅपी फॅमिली दाखवण्यासाठी आधीचे सीन्स भयाण कंटाळवाणे आणि ओढून ताणून केलेत असे वाटले. पल्लवीचं काम पण कृत्रिम वाटत होतं. सारखं काय पसारा आवरणं, मीच किती मरतेय वगैरे म्हणणं !
कॉलनीच्या गणपतीत करतात तसल्या नाटकाच्या लेव्हल चं वाटलं.
आता सुरुवात तर झालीय मुख्य विषयाला, तेव्हा यापुढे जरा तरी रंगत येईल ही अपेक्षा.
आजचा एपि बघितला .पजो बरी
आजचा एपि बघितला .पजो बरी वाटली ., त्या निरजनाच्या आईकडे रोखून बघते तो लुक मस्तय . हळूहळू पकड घेईल असे वाटते .
बायदवे तो निरंजनच काम करणारा कोण आहे ?
आजचा एपिसोड On and of पाहिला.
आजचा एपिसोड On and of पाहिला. पजोचा अपघात झालाय नक्कीच. एक मिनिट विचार करून पाहिला की आपलं घरच हरवलं तर काय होईल. एक मोठा आवंढाच गिळला विचाराने. पहिल्यापासून पकड घेईल अस वाटतय ही मालिका. पाणी घालून पातळ करू नये म्हणजे मिळवलं. कादंबरीत सेल (मोबाईल) चा वगैरे उल्लेख नक्कीच नसणार. पण आजच्या भागात होता. ०२२२ लावून land line नंबर लावू म्हणाले प्रधान हे पात्र म्हणजे बराच काळ पुढे गेली आहे पजो.
पजो नक्की भुत आहे का फक्त ऊडी
पजो नक्की भुत आहे का फक्त ऊडी मारून ४० वर्ष पुढे आलीये.काही घोळ कळत नाहीये.
सेलफोन माहित नसणे म्हणजे 'भविष्य' काळात आलीये असं वाटलं.
पण ऊद्याचा भाग पाहून भुत वाटतीये.
मी पहीला नेटवर आणि दुसरा
मी पहीला नेटवर आणि दुसरा टीव्हीवर बघितला. मला आवडलं पल्लवीचं काम, अगदी सहज केलंय. पहिल्या भागात मला सुनील आणि मुलगी आवडली, फार गोड आणि कामपण मस्त. मुलगा नाही आवडला.
पल्लवीसाठी बघावीशी वाटते. सर्वसामान्य गृहिणीचं पण आवडलं काम आणि भेदक नजर देते निरंजनच्या आईला तेपण आवडलं.
नवऱ्याने ग्रहण वाचलीय पण त्याला फार आठवत नाहीये, समांतर जग आहे काहीतरी असं म्हणाला. लिमिटेड एपिसोड्स हवेत मात्र म्हणजे वेगवान होईल असं म्हणाला.
नक्की भुत आहे का फक्त ऊडी
नक्की भुत आहे का फक्त ऊडी मारून ४० वर्ष पुढे आलीये.काही घोळ कळत नाहीये.>> नाही , ती 37 वर्षापुर्वीच्या खुणा सांगतेय.
पजो भुतच आहे बहुतेक.
पजो भुतच आहे बहुतेक.
मालिका बघणार नाही पण इथल्या
मालिका बघणार नाही पण इथल्या प्रतिक्रिया वाचायला मजा येईल. रच्याकने ग्रहणाचा काय संबंध/संदर्भ आहे?
पजोच्या वर्तमानाला ग्रहण
पजोच्या वर्तमानाला ग्रहण लागलय.
मी पहीला नेटवर आणि दुसरा
मला आवडलं पल्लवीचं काम, अगदी सहज केलंय. पहिल्या भागात मला सुनील आणि मुलगी आवडली, फार गोड आणि कामपण मस्त. मुलगा नाही आवडला.>>>>>>>>>>स ह म त.
लिमिटेडच असावि असे वाट्ते.
लिमिटेडच असावि असे वाट्ते.
लिमिटेडच असावि असे वाट्ते.>>>
लिमिटेडच असावि असे वाट्ते.>>>>>> हो, पात्रे पण लिमीटेड ठेवली तर बरे नाहीतर मानबा सारखी अनलिमीटेड होईल.
लिमिटेडच असावि असे वाट्ते.>>>
लिमिटेडच असावि असे वाट्ते.>>>>>> हो, पात्रे पण लिमीटेड ठेवली तर बरे नाहीतर मानबा सारखी अनलिमीटेड होईल.>>>>>>>हा ...हा.. हा ...
समांतर जगच असावे कारण प्रधान
समांतर जगच असावे कारण प्रधान बाई दोन मालिकांमधे त्याच नावाने आहेत - इथे आणि ब्रेक अप मधे
सध्यातरी छान वाटतिये. पजोची भेदक नजर पाहुन खरच काटा आला आंगावर.
पजोची भेदक नजर पाहुन खरच काटा
पजोची भेदक नजर पाहुन खरच काटा आला आंगावर. >>> +१ आणि शेवटच्या सीनमधे ती आरशात पहाते. आरशावरच कुंकू तिच्या चेहर्यावर पसरत तेव्हा तिच्या चेहर्यावरच हासू पाहून सुध्दा क्षणभर अस्वस्थ वाटल
अरे पुढच्या भागाची झलक दाखवली
अरे पुढच्या भागाची झलक दाखवली शेवटी ती पाहीली नाही वाटत कोणी. म्हातारीकडे पाठमोरी उभी असते पजो. म्हातारी तीला घर सोडून जायला सांगते तर पजो बोलते कुठल्या तोंडाने घरी जाऊ. आणि तिच्याकडे चेहरा केल्यावर म्हातारी भूत पाहिल्यासारखी जोरात ओरडते. आता हे म्हातारीला पडलेलं स्वप्न पण असू शकतं. झी चा काय भरोसा नाय.
पल्लवी ची हॅपी फॅमिली
पल्लवी ची हॅपी फॅमिली दाखवण्यासाठी आधीचे सीन्स भयाण कंटाळवाणे आणि ओढून ताणून केलेत असे वाटले. पल्लवीचं काम पण कृत्रिम वाटत होतं. सारखं काय पसारा आवरणं, मीच किती मरतेय वगैरे म्हणणं !
कॉलनीच्या गणपतीत करतात तसल्या नाटकाच्या लेव्हल चं वाटलं. >+१
जबरदस्त असू दे मालिका. आणि
जबरदस्त असू दे मालिका. आणि पल्लवी फाल्तू पाणि घालून वाढवलेल्या शिरेलित काम करणार नाही अशी आशा बाळगली आहे मी.
समांतर जगच असावे कारण प्रधान
समांतर जगच असावे कारण प्रधान बाई दोन मालिकांमधे त्याच नावाने आहेत - इथे आणि ब्रेक अप मधे >>>
पल्लवी फाल्तू पाणि घालून
पल्लवी फाल्तू पाणि घालून वाढवलेल्या शिरेलित काम करणार नाही अशी आशा बाळगली आहे मी... +१
दक्षिणा
दक्षिणा चैत्राली
फार जास्त अपेक्षा आहेत.
पाणी घालून वाढवण्यावरूनच असंभव मध्ये राजवाडेशी वाद झाला होता.
काय केलं होत त्या मालिकेच त्या संगीत कुलकर्णीने.
पण तरीही असंभव बेअरेबल होती
पण तरीही असंभव बेअरेबल होती.मुळात माल दाट असल्याने पाणी घालूनही फार फरक पडला नाही.
म्हातारी तीला घर सोडून जायला
म्हातारी तीला घर सोडून जायला सांगते तर पजो बोलते कुठल्या तोंडाने घरी जाऊ. आणि तिच्याकडे चेहरा केल्यावर म्हातारी भूत पाहिल्यासारखी जोरात ओरडते >>>> बसला आपटून बिघडला का ???
प्रधान बाई दोन मालिकांमधे
प्रधान बाई दोन मालिकांमधे त्याच नावाने आहेत - इथे आणि ब्रेक अप मधे >>
नक्की भुत आहे का फक्त ऊडी मारून ४० वर्ष पुढे आलीये.काही घोळ कळत नाहीये.>> भुतच आहे. हात न लावता फटाफट दरवाजे बंद करते ती
नाही , ती 37 वर्षापुर्वीच्या खुणा सांगतेय.>>>तो निरंजन तिथे ३७ वर्षांपासून राहतो आहे. ती मरून मग वाडापाडून इमारत व्हायला किती काळ गेलाय काय माहीत.
एक कप चहा बनवायला , निरंजन ने
एक कप चहा बनवायला , निरंजन ने दुधाचं पातेलचं तापत ठेवलं .
समांतर जगच असावे कारण प्रधान बाई दोन मालिकांमधे त्याच नावाने आहेत - इथे आणि ब्रेक अप मधे >>> जीव रंगला मध्ये ना . म्हणजे भावना पोचल्या.. तरीही
mi_anu
mi_anu
असंभव चा मुळं शेवट नीलम शिर्के , उमेश कामत कडे जन्माला येते असा होता. Grudge टाईप.
राखेचा तर अनिंस नी लिहील्यासारखीच होती.
बसला आपटून बिघडला का ???>>>
बसला आपटून बिघडला का ???>>>>आजच्या भागात समजेल. मलापण तसंच वाटतंय. बसला टक्कर लागून मेली. पण भूत बनून चाळीस वर्ष पुढे आली असेल तर मधले वर्ष काय करत होती ती? नाय म्हणजे काय आहे ना आमच्या कोकणात आज कोणी गेला तर दुसऱ्या दिवसापासून लोकांना तो दिसायला लागतो.
नक्कीच उत्कंठावर्धक आहे
नक्कीच उत्कंठावर्धक आहे मालिका. अर्थातच गूढ थिम असल्याने सगळेच एकाच एपिसोड मधे समोर यावे ही अपेक्षा चूकीची आहे!

अजून दोनच भाग झाले तर ईथे किती प्रश्ण ऊपस्थित केलेत.. जरा धीर धरला तर पडद्यावरच छान ऊलगडा होत जाईल की.. फारच 'ईंस्टंट' अपेक्षा आहेत
अजून पर्यंत तरी मस्त चाललय अजून पर्यंत.. कलाकारही सगळे छान आहेत. निरंजन चे काम करणारा कोण आहे? वाघ काका व आताचे साठे.. मस्त आहे
रच्याकने: मानबा मध्ये राधिका ला गुरू चे अफेयर कळायला अनेक महिने लागले.. ईथे तर भूत (?) वगैरे शक्यता आहेत मग वेळ लागणारच की. पण बस च्या धक्क्याने ती मेली नक्कीच... त्या नंतर आणि मधले ३७ वर्षे काय घडले हेच पुढील सर्व भागातून दाखवतील असे वाटते.. नेहेमीच्या फुटकळ थिम च्या मालिका पेक्षा ही वेगळी असल्याने ऊगाच अपेक्षा मात्र ऊंचावल्या आहेत.
निरंजन चे काम करणारा कोण आहे?
निरंजन चे काम करणारा कोण आहे? >>> योगेश देशपांडे. याला आधी कुठेतरी पाहिलंय नक्कीच. पण कुठे ते जाम आठवत नाहीये.
Pages