ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रमा पाठलागचं गाणं गाते सतत. >>> सतत नाही म्हनता येणार ... त्यादिवशि आगावु मोन्या हरवला ना तेव्हा घरातिल केर-वारे करताना म्यॉडमने radio वर ते गाणे लावले होते. हे बघुन माझि हेतल म्हणते मेलोडि, ती बघ भिन्तिला, शेल्फ वर हात लावते म्हणजे ती भुत नाहि आहे.

ती भूत नाहीचे. ती बहुतेक मनाने ( की शरीराने? ) काळाच्या पुढे गेलीय. जसे डोरेमॉन सिरीयल मध्ये नोबिता जातो डोरेमॉन सोबत. फक्त इथे गुढ वातावरण, यांच्या मंद हालचाली, बधीर चेहेरे, तुला आत्ता भॉक्क करु की मग करु असे अविर्भाव! याने सिरीयल संथच चाललीय.

आता ती टाईम ट्रॅव्हल च्या कन्सेप्ट मध्ये कशी जाते हे नाही मी सांगु शकत. किंवा प्रत्यक्षात असे असत का ते पण मला नाही माहीत. पण नवर्‍याने डोरेमॉन ची आठवण करुन दिल्याने हे लक्षात आले. कारण माझी मुलगी आधी नोबिता ढोबिता सारखी बघायची, आता तारक मेहेता बघुन वात आणते.

तो मोनु आईला जसे चेहेरे करुन घाबरवतो ना, तसे आमच्या शेजारचे सव्वा वर्षाचे बाळ नेहेमी ऑ करुन बघायचे, त्याच्यामुळे माझ्या मुलीला फार दांडगा उत्साह आला. ती ही सिरीयल बघते, पण नशीब माझं जास्त प्रश्न विचारत बसत नाही.Grahan baal.jpg

हे वरचे तसे दिसणारे बाळ. वरील फोटो नेटवरुन साभार.

ही गोष्ट भूताटकीची नाही तर मनोरूग्णांची वाटते.
पजो , निरू , त्याची आई आणि भरीस भर म्हणून तो रस्त्यावरचा भिकारी ..

बर कोणी निरुबाचि बाईकवरुन उतरताना हेल्मेट काढतेवेळी केस मागे झट्कायचि अदा पाहिली का?? हाय SSSS जणुकाहि राहुल रॉय.... >>>>> Rofl हो बरेच भाग मिस केल्यानंतर नेमका मी तो एपिसोड पाहिला अन हा हायलाइटच होता त्यात. भयंकर हसले!
बाकी टाइम ट्रॅवल, पॅरलल युनिवर्स वगैरे असले काही दाखवयाचे असेल तर सध्या जे चाललेय त्याला काही लॉजिकच नाहीये. आपोआप दारे लागणे, प्रिन्टाउट्स येणे काय, गुंगी येणे, त्या छोट्या मुलाने बहकणे , काहीच्या काही.

Rofl हो बरेच भाग मिस केल्यानंतर नेमका मी तो एपिसोड पाहिला अन हा हायलाइटच होता त्यात. भयंकर हसले!
नवीन Submitted by maitreyee on 2 April, 2018 - 19:0७

>>>>>>>>>>>> preview.jpg

नोबिता ढोबिता Rofl

बाकी ते बाळ किती क्यूट् दिसतेय नै!!!

खरय सध्या ग्रहनाला ग्रहन लागलय
थोबाद पुस्तकावार अहे का यन्च पेज?
जौन उनिदुनि काह्द्दून येउया का? Proud

थोबाद पुस्तकावार अहे का यन्च पेज?>>>>>>हायला , दक्षिणा आहे होय.मला पोस्ट वाचून आपले ते हे आहेत की काय वाटून गेले.
काल रविवारी टि.व्ही. गळत होता तेव्हा योगाच्या कॉमेंट्स आठवून हसूच येत होते.

खरय सध्या ग्रहनाला ग्रहन लागलय
थोबाद पुस्तकावार अहे का यन्च पेज?
जौन उनिदुनि काह्द्दून येउया का?>>>>
दक्षिणा ताई तुझ्या किबोर्ड ला काय होतं मध्ये मध्ये??
रच्याकने पजोला आजच्या भागात तिची मुलगी पण दिसते असं दाखवतात जाहीरातीत. नेमकी काय वाट लावतायत मालिकेची कळत नाहीए.

निरुच्या बायकोला निरुआ (त्याचि आई) आपल्या घरात जराही खपवुन घेत नाहि असतात अश्या आया ज्या सहसा सुनाना घरदार लवकर नाहि सोपवत, पण त्या उशाचे काय ति नणद पण नाहिये मग का त्या निरुआला म्हणते जोपर्यत तुम्हि हिला घराबाहेर काढत नाहि तोपर्यत मी या घरात पाउल हि टाकणार नाही.

कालचा भाग पण बोअर होता Sad कांदेपोहे काय, लिंबू काय, राजपूत्र काय, Uhoh
मला वाटलं की पल्लवी जोशी चं सर्व कुटुंब आता जिवंत नाही, पण ती भटकतेय (आत्मा) आणि त्या सर्वांना शोधतेय. नवरा तर मिळाला, (निरू) मुलगा पण.. ( मोनु) आता मुलगी मिळेल आज (लक्ष्मी) पण घरात एक बया आहे (निरूची आई) तिची काय टोटल रमाला लागत नाहिये. (ही तर आपल्या कॅरेक्टर लिस्ट मध्ये नव्हती Proud ) त्यामुळे रमा निरूच्या आईला अधून मधून असा लूक देत असावी. Proud

कथेचा काही थांगपत्ताच लागत नाहिये.

ग्रहण कादंबरी कुणी वाचली असेल तर प्लिज जरा हिंट द्या की.

ही तर आपल्या कॅरेक्टर लिस्ट मध्ये नव्हती Lol

ग्रहण कादंबरी कुणी वाचली असेल तर प्लिज जरा हिंट द्या की... कादंबरी पेक्षा वेगळच काही चालू आहे इथे. सुरुवातीचं 'ना.धा. यांच्या कथेवर आधारीत' हे डिक्लेरेशन तरी काढुन टाका मग.

कालच्या भागात रमाबैना त्यांची मुलगी पण सापडली. अगदी गुढ हसून त्यांनी त्याच्यावर शिक्का मोर्तब केले. माझी सुरुवात गेली. तो मोनु रमाबैंच्या हातुन डबा खातांना म्हणतो की निरु अंकल हे राजा आहेत, तर रमाबै राणी. पण त्या राजकन्येला शोधतायत. तर त्या जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात तेव्हा एका कामगाराची ( चिनप्पा ) मुलगी त्यांना राजकन्या असल्याचा भास होतो, त्या तिच्या कडे टक लावुन बघतात, मग शेवटी आपल्याकडे पाहुन गुढ हसतात.

मोनुची आई, ई टिव्हीच्या असावा सुंदर स्वप्नांचा बंगला मध्ये अंकिताची आई झाली होती. नंतर तिचा प्रवेश जय मल्हार मध्ये काली माता म्हणून झाला.

ओह थोडाफार मेकप शिल्लक राहिलाय वाटतं >> सस्मित Lol

तिचे ते कफ्तानी ड्रेस अजिबात सुट नाही होत तिला. ग्रहण मालिका अजिबात म्हणजे अजिबातच पुढे जात नाहिये Sad

काहिही चालू आहे ग्रहण मध्ये... ठीक आहे अगदीच शेवटच्या एपिसोड मध्येच भांडाफोड करयाचे असेल तर निदान सर्व भाग एका ठोस दिशेने तरी लिहीलेले हवेत ना..
साठे म्हणतात, "ब्लड रिलेशन मध्ये नसून पत्रिका एकदम भारी जुळतात (म्हणजे ग्रह जागा, योग वगैरे. ) मोनू व निरंजन च्या! " आता हे नविनच.. म्हणजे काय? फक्त ब्लड रिलेशन मध्येच पत्रिका सारख्या असतात का?
एकूणात मालिकेत काऊ पेक्षा निरू च भिरभिरलाय.. जरा बाईंचा पारा हॉट झाला की हा विरघळतो.. Happy
पण झी वाले नुसतीच हूल देतात, त्या दोघांच्यात तसले काहिही होणार नैये... एव्हाना निरू च्या बुलेट ला पण बाईंचा ईशारा कळून चुकलाय तरी हा मात्र तिच्या हरवलेल्या घराचा शोध घेतोय.. बुळचट कुठला.. LIC Agents can never thing outside the box..!

फक्त ब्लड रिलेशन मध्येच पत्रिका सारख्या असतात का?>> तेच कि कै च्या कै च वाटलं मला पण ते
एकूणात मालिकेत काऊ पेक्षा निरू च भिरभिरलाय.. Lol संथ निरंजन बाबाला रमा ने वश करून घेतलंय म्हणून एवढा मागे लागला असावा तिच्या .. तू मला सोडून जाऊ नको शेवटपर्यंत मी तुझी साथ देईन यंव नि त्यंव ... अरे काय चाललंय काय ?? (डोळे फिरवून uhh करणारी बाहुली )

आणि निरू च्या भावाच्या हॉस्पिटल मधून ते बाळ चोरीला गेलंय ते फक्त योगायोग म्हणून दाखवलय कि त्याच झाल पुढे काही?
इतका प्रेम होत निरू च बायकोवर तर एकदातरी तिचा फोटो उतरवून वाळवी साफ कर म्हणावं

निरूचा तो भाऊ... किती बोर मारतो... एक वाक्य मराठीत बोलला तर लगेच त्याचे ईंग्लिश ट्रान्स्लेशन पण करून दाखवतो Happy

काल वाटलं मोनू बाळ हवेतून लिंबू काढतो का काय? बादवे, तो डबा घरी ठेवून जातो ना?

मी बोर झाले आणि सोडली हि.>>>>> नाही, मी पक्की धरुन ठेवलीय. Proud माझी मुलगी हे नको बघु असे म्हणले तरी बघते, मग काय पदरी पडलं.

Pages