ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ही लक्ष्मी आणि मोनू एकाच शाळेत आहेत? >>>>> नाही लक्ष्मी बहुदा municipal school मधे असावि uniform same आहे. त्यान्चि शाळा जवळ्पास असावि.

युनिफॉर्म प्रायमरी/सेकंडरी चे वेगवेगळे असतात काही शाळात.
शिवाय कधीकधी प्लेग्रुप्+नर्सरी/ज्युनियर्+सिनीयर असे पूर्ण वेगळ्या रंगाचे पण असतात.फक्त शाळेचा लोगो हेच कॉमन.

संथ निरंजन बाबा (जादुचे प्रयोग) आज पाण्यावर चालुन दाखवणार आहेत. >>>> स्वतःला अक्षय कुमार समजत असावेत हे संथ निरंजन बाबा.

>>संथ निरंजन बाबा (जादुचे प्रयोग) आज पाण्यावर चालुन दाखवणार आहेत.
असू देत.. प्रेमात पडल्यावर हवेत देखील तरंगतात माणसे हा तरी पाण्यावरच आहे... निरू बाबा चा अभिनय आता बरा वाटू लागला आहे. म्हणजे प्रधान बाई, डॉक्टर्,व ईतर मंडळींपेक्षा तरी नक्कीच.
बाकी पटकथे मधिल अ.अ. चालूच आहे:
रमा बाई व मुलांची डबा मिटींग शाळेत कुणालाच दिसत नाही? कमाल आहे..
परवा तर कहर केला की... रमा ला रस्त्यावरून बेशुध्द अवस्थेत घरी आणल्यावर मस्त पैकी खोलीत बेड वर सोडून दिले झोप काढायला? मला वाटले किमान पाणी मारेल तोंडावर, किंवा डॉक्टर ला फोन, किंवा थोडी पळापळ? छे..!
आणि त्या लक्ष्मी च्या अप्पा चा मोडलेल्या हाता चा एक्स्रे पण त्याच डॉक्टर ने बघितला.. multispeciality hospital माहित होते, ईथे मल्टीस्पेशलिटी डॉक्टर आहे.
बाकी अजून अंश्र वाल्यांना पण फार ईंटरेस्ट दिसत नाहीये मालिकेत.. अन्यथा आक्षेप घ्यायला मटेरीयल आहे. Happy

'काऊ' नेमकी कोण आहे हे मात्र अजून गूढच आहे.

पुढील भागात तर त्या गोखले बाईंना डोळे सताड उघडे ठेऊन गपगार तोंडाचा आ वासुन पडलेले दाखवलेय, ढगात गेल्या की काय त्या?

संथ निरंजन बाबा Lol

आणी हो, तो चिनप्पाचा मित्र त्या बाहुलीला पुरतांना दही भाताचा नैवैद्य ठेवतो जवळ, तर या रमा बै त्या मुलांना दही भातच भरवतांना ( तो पण एकाच चमच्याने दोघांना भरवत असतात, शी !! अजागळ कुठली ) दाखवल्यात.

हे एकाच चमच्याने भरवायचे हा प्रकार सुपर डान्सर मधे पाहिला. शिल्पा शेट्टी काहीतरी स्वतःच्या प्रॉडक्टची जाहिरात करत होती. तिने तिथेच एक पदार्थ बनवला आणि सेटवरच्या ६-७ जणांना त्या एकाच चमच्याने भरवले. एक्दम कसेतरीच झाले

आणि रमाला बरंय एकाच गल्लित नवरा, पोरगा आणि पोरगी घाऊक मध्ये सापडले.
अरे पण जर रमा म्हणजे मंगल असेल तर घोळ आहे. कारण मन्गल तर फक्त प्रेग्नंट होती, मग चौकोनी कुटुंब वगैरे का बोलतेय रमा (जर ती मन्गल असेल तर? :अओ:)
ड्युएल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झालाय का काय या भुतिणीला? Uhoh

ड्युएल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झालाय का काय या भुतिणीला?>> तसंच वाटतंय..
अन तो पपईचा प्रकार पण काही कळला नाही....प्रेग्नंट स्त्री ने कच्ची पपई खाऊ नये की पिकलेली, का कोणतीच नाही?

पिकलेली खाऊ नये म्हणतात अजब. ऐन वेळेला पिकलेली नसेल मिळाली म्हणून प्रतीकात्मकता जपण्यासाठी कच्ची का होईना दाखवली Proud

कच्ची पपई-पक्की पपई
कच्ची पपई-पक्की पपई
कच्ची पपई-पक्की पपई

सलग २०० वेळा एका दमात न चुकता म्हणणार्याला भुतणी कानात येऊन पुढील स्टोरी सांगणार आहे म्हणे.

पिकलेली खाऊ नये म्हणतात अजब. ऐन वेळेला पिकलेली नसेल मिळाली म्हणून प्रतीकात्मकता जपण्यासाठी कच्ची का होईना दाखवली>>> Lol तरीच माझे बायको पण कन्फ्यूझ झाली..आधी तर कोणतं फळ आहे तेच कळेना..मला तर नारळ वाटला Proud बायको म्हणली पपई असेल Uhoh
<<सलग २०० वेळा एका दमात न चुकता म्हणणार्याला भुतणी कानात येऊन पुढील स्टोरी सांगणार आहे म्हणे.>>
पाफा, आम्हाला नको, पण त्या अभिजीत गुरुनाथला तरी सांगो त्या हडळीनं...त्याची तरी कन्सेप्ट किल्लर होईल काय लिव्ह्यायचंय त्याची.. Wink

शेवटी झी ने पाणी ओतायला सुरवात केली ... आता हि मालिका पण रसातळाला जाणार ....

तो कोण आहे प्राणी निरंजन नावाचा त्याचा बहुदा पाठांतराचा प्रॉब्लेम असावा ... एक वाक्य न थांबता बोलला तर शपथ ... अश्याने शेवटी भूत पण कंटाळून सोडून जाईल त्याला ....

मला पण ते शहाळं वाटलं त्या कफ्तानी बाईच्या हातात. पण ते टेबलवर दाखवलेले काय होते दोन वाट्या? पांढरे

मला कोहळा वाटला
अरे काय चाललय काय नक्की? काहिच कळत नाही

सिरीअलने मूळ स्टोरीलाईन कधीच सोडली आहे. संबंध असल्यास तो योगायोग ठरावा इतकी. मूळ स्टोरी खूपच वेगळी व छान आहे. ती पडद्यावर व्यक्त करण्यासाठी फार जास्त प्रतिभा लागेल. म्हणून पब्लीकला खिळवून ठेवायला सद्ध्याचं काम स्वस्तातलं आहे.

निर्‍याची आई मंगल ला हेट करते म्हणून तिची नेबर (कफ्तानवाली) तिला अ‍ॅडव्हाईज देते की तिला पपई खाऊ घाल म्हणजे तिचं बाळ अ‍ॅबॉर्ट होइल, म्हणून रिव्हेंज घेण्यासाठी कच्ची का होइना म्हणून पपाया पूट केला होता तिच्या डोअर समोर. Proud (मन्गल ने किंवा रमा ने)

मला असं वाटतं की,
रमा त्या रात्री अ‍ॅक्सिडंट मधे गेली वर. त्याच वेळी ह्या समांतर विश्वात मंगलचा अ‍ॅक्सिडंट झाला नी ती ही गेली वर.
मानवप्राणी ओरीजनल विश्वातला असो की समांतर वर जाण्याचा एकच मार्ग असल्याने त्या दोघींची वाटेत भेट झाली.
दोघींनी एकमेकींना आपापली कर्मकहाणी सांगितली.
मग आपण है ना अदलाबदल करुया म्हणुन रमा मंगल होउन सासुबैचा सुड घ्यायला इथे आली.
तसंच पोतदार वाड्यात मंगल रमा बनुन गेली असावी.
(असं तरी दाखवा म्हणावं म्हणजे काहीतरी थोडंतरी लॉजिकल होईल सिरीयल मधे.)

नाहीच भुत.
पण मुळ कथेचा काय संबंध इथे??? Lol

द्क्षिणा म्हणतेय ते माझ्या रात्रीच डोक्यात आले होते. ड्युएल पर्सनॅलिटी. आमी मोंजुलीका... आजच्या भागात तर निरुच्या आईला मंगल दिसणारे.

काल तर निरोबा आम्च्या ठाण्याच्या तलावात 'डुबूक' होताना दाखवला... आणि म्हणे मी व रमा चौपाटीवर होतो ४ तास...!
किमान मग चौपाटी तरी दाखवायची ना.. Sad किती 'लो बजेट '..
या मालिकेतून शिकण्या सारखे बरेच काही आहे मात्रः
१. लहान मुलांनी अनोळखी बाई, मावशी ई. च्या मागे जाऊ नये.. अगदी क्रिकेट बॉल चा प्रश्ण असला तरिही.
२. शाळेतून घरी न्यायला पालक आले नाहीत तर लहान मुलांनी दुसर्‍या कुणाही बरोबर घरी जाऊ नये.
३. मुलाच्या 'प्रकरणांमध्ये' आईने ढवळा ढवळ करू नये... तो बिचारा आधीच ढवळून निघालेलाच असतो!
४. बायकांनी स्वभावातील भोचकपणा थोडा कमी केला तर तर सगळे सुखाने नांदू शकतात.

मात्र काही प्रश्ण ऊरतातः
१. खरेच प्रौढ, वृध्द व्यक्ती जेव्हा हरवतात, आणि त्यांना फार काही आठवतही नसेल किंवा काहि कारणाने संवाद साधण्याच्या परिस्थितीत (शारिरीक वा मानसिक) नसतील, अशा लोकांची तात्पुरती सोय करणार्‍या संस्था आहेत का?
२. 'काऊ' या विश्वाला त्या विश्वाशी जोडणारा आहे हा समज आहे की अनुभव की अजुन काही?- यावर मात्र वेगळा बाफ काढा. ईथले विनोदी वातावरण ऊगाच बिघडेल.

४. बायकांनी स्वभावातील भोचकपणा थोडा कमी केला तर तर सगळे सुखाने नांदू शकतात. >>> तिव्र निषेध ह्या वाक्याचा, मलातर वाटते की पुरुष पण काही कमी भोचक अन भांडखोर नसतात, उगाच आपले स्त्रियांना का बदनाम करायचे

Pages