ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सब जाएगा, तू जाएगा असे किंचाळत ओरडणारा वेडा स्वतःच लटकला. निरोबाची पण कमाल आहे. निरोबा त्या लटकणार्‍या वेड्याला नखशिखांत न्याहळत होता. अरे काय हे! कोणीतरी माणुस/ मुलगा आजच्या भागात निरोबाला सांगणार आहे की तो वेडा मंगल वगैरे काहीतरी पुटपुटत होता. निरोबा दचकलेला दाखवला त्या वेळी.

Btw ते मोनुने काढलेले म्हणून जे चित्र दाखवतात ते एडवर्ड मंच या आर्टिस्टने काढलेले the scream नावाचे प्रसिद्ध चित्र आहे Happy>>>>> तरीच, मला ते कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते, धन्यवाद मॅगी.

कोणीतरी माणुस/ मुलगा आजच्या भागात निरोबाला सांगणार आहे की तो वेडा मंगल वगैरे काहीतरी पुटपुटत होता. निरोबा दचकलेला दाखवला त्या वेळी.>>> हे कालच्याच भागात सांगीतलं ना त्या निरोबाच्या ऑफिसबॉय ने? तेव्हाही तो दचकलाच होता. Uhoh

बाकी रमा गचाळ आहे, पहिल्याच एपि मध्ये ते पोहे हात न धुता वाढते आणि कालच्या एपि मध्येपण निरोबाला जेवण वाढते तेव्हा नखात चिखल.

निरोबा तो चिखल (रमा च्या हातचा) बघुन घटना रीलेट करतो (वेड्याची आत्महत्या) आणि जेवत नाहि.

बापरे , किती ति वाळवी

पण त्या मंगलच्या फोटो भोवतीची वाळवी किती मस्त झाड वाढल्यासारखी दिसतेय

मला कालचा भाग पण आवडला

तो मोनु, त्याने ती लिपलॉक ची अ‍ॅक्टींग किती मस्त केली

सिरियल गुढ दाखविण्यासाठी केवळ आणि केवळ background ला गुढ music चा जबरी मारा, काळे-सावळे (नविन चेहरे) सहाय्यक कलाकार, वेगवेगळे अन्गल्स, वाळवि etc. etc. दाखवले गेले आहे.

तो मोनु, त्याने ती लिपलॉक ची अ‍ॅक्टींग किती मस्त केली >>>> क्काय, लिपलॉक ? हे देवा, आता सिरियलमध्ये आणखी काय काय बघाव लागणार? हा हा हा हा हा

लिपलॉक ? हे देवा, आता सिरियलमध्ये आणखी काय काय बघाव लागणार? हा हा हा हा हा >>> सॉरी सॉरी शब्द चुकला

लॉक नाही सील म्हणायचे होते मला

गोखले बाई सोडुन सगळ्याना (त्या चौकडीला )रमा खुपतेय. आणि आता निरोबा रमाला महिला आश्रमात ठेवणार हे समजल्यावर आईच्या चेहर्यावर विजयी हास्य होते. बहुदा property साठी काहीतरी game दिसतोय.

माझा एखादा भाग मिस झालाय का? मला काहीच टोटल लागत नाहिये Uhoh
का मला ग्रहण लागलं? Proud

अचानक निरू ने तिला आश्रमात पाठवण्याचा निर्णय कधी घेतला? आणि का?

आणि रमाबाई निरूचा तो मठ्ठ डॉक्टर भाऊ आहे त्याच्या गाडिच्या मागच्या शिटावर बसून कुठं गेल्या?
तिथं काहीतरी भानगड करताना मंगळसुत्र गहाळ होणार बहुधा त्यांचं.

पुढचा नंबर त्याचा की काय ढगात जायचा?>>>> बहुतेक हो. कारण आजच्या भागाच्या झलक मध्ये दाखवले की निरोबा जात असतांना त्यांना मोठा घोळका दिसतो, कुतुहलाने ते पुढे बघायला जातात. पण तिथेच कट केले आहे, दाखवले नाही. बहुतेक डॉ गेला, आणी त्याची व्हिलेवाट लावतांना रमाबैंचे मंगळसूत्र राहिले तिथे. पण रमा डॉक च्या गाडीत बसते तेव्हा मी खरच घाबरले कारण ती फार भीतीदायक दिसत होती. असं कुणी अचानक आपल्या मागे येऊन बसले तर खरच दचकायला होईल.

आणि रमाबाई निरूचा तो मठ्ठ डॉक्टर भाऊ आहे त्याच्या गाडिच्या मागच्या शिटावर बसून कुठं गेल्या?
तिथं काहीतरी भानगड करताना मंगळसुत्र गहाळ होणार बहुधा त्यांचं.
Submitted by दक्षिणा on 9 April, 2018 - 15:29 >>>>>> चौकडी वाळवि discuss करत असते, गोखले काकु उपाय सान्गतात. meeting सम्पल्यावर घरी परतताना गोखले काकु ला निरु भेटतो तेव्हा त्या रमा बद्द्ल त्याला विचारतात निरु, रमाचि व्यवस्था महिला आश्रमात doctor भावाच्या मद्तिने करणार आहे असे सन्गतो, आणि निघुन जातो. हे सर्व रमा ऐकते (गोखले काकु रमाला घाबरतात-त्या नेहमी तिची बाजु घेतात).
आता त्या वेड्याला जसे मारले तसेच doctor पण जातोय बहुदा.

गोखले काकू म्हणजे मोनिका आणि मानसीच्या आजोबांची शेजारीण का? आतापर्यंत त्यांचाच अभिनय बरा आहे.
(पल्लवी जोशीचा असला तर नवल नाही)

ते ज्योतिषाचार्य फारच घाबरट दाखवलेत. ज्योतिष्यांबद्दलचं लोकांचं इम्प्रेशन खराब करतील.
निरंजन पार हडकुळा वाटतोय.

बरं तो डागदर, (पुन्हा गायनॅक- मॅटर्निटी हास्पिटल चालवणारा- पुन्हा विक्रांत) आहे तर टेबलावर लॅपटॉप ठेवून काय करतो? आणि ऑफिस एक्झिक्युटिव्ह सारखी शोल्डर बॅग कशाला घेतो?

एकवेळ या लेखकू लोकांना कॉर्पोएट ऑफिसं कशी चालतात, हे माहीत नाही असं समजून घेता येईल. पण डॉक्टरही पाहिलेले नसतील, तर कठीण आहे.

मी ही मालिका विनोदी म्हणून बघतोय.

पण रमा डॉक च्या गाडीत बसते तेव्हा मी खरच घाबरले कारण ती फार भीतीदायक दिसत होती>>> असहमत रश्मीतै !
या आणि अश्या अनेक सीन्स साठी मान्नीय राम गोपाल वर्मा साहेबांकडून या लोकांनी काही तरी शिकायची गरज आहे. धक्कातंत्र वगैरे प्रकार हॉरर सिनेमा/मालिकांमधे फार गरजेचे असतात. रमा चटकन गायब होते, लगेच पुढच्या सीन मधे, डॉक्टर साहेब हॉस्पीटल मधून बाहेर पडतानाच लाईट पकपकतात (तिथेच मुरलेल्या प्रेक्षकांना समजतं की काहीतरी वंगाळ होणार आता !). मग वेगवेगळ्या कोनातून डॉक्टर साहेब अंधारातून गाडीकडे येताना दिसतात. मग त्यांची गाडी निरनिराळ्या कोनांमधून अंतर्बाह्य दिसते. मग कॅमेरा डॉक्टरवरुन ह्ळू हळू मागे सरकतो, तो पर्यंत रमा मागे बसली असणार याची १००% खात्री झालेली असते ! तुमचा सेटटॉप बॉक्स एचडी नसेल, तर अनेक कमर्शियल ब्रेक्स पण या दरम्यान येऊन जातात. या सगळ्यात प्रेक्षकांना विचार करायला वेळ मिळालेला असतो .
एकंदर अतिप्रचंड स्लो, आणि अंधारात (स्क्रीन वर पण अंधार आणि सिरीयलच्या भवितव्याबद्दल पण अंधार) चालू आहे सिरीयल.. Happy

प्रोब्लेम हा आहे की एकही कॅरेक्टर लाइकेबल नाही. सगळेच एकजात इरिटेटिंग. कुणाबद्दल सहानुभूती पण वाटत नाही. जे चाललंय त्यात काही इन्वॉल्व्हमेन्ट च वाटत नाही. मी कालचा भाग पाहिला. १ आठवड्यात काहीही मिस झालेय असे वाटले नाही. तेच ते तेच ते गोल गोल चालू आहे. निरंजन ला कानफटवावेसे वाटते.

मित, लाईट जेव्हा फ्लक्चुएट झाले तेव्हा मला खात्री होती की रमाबै जवळ असतील. पण गाडीत ती एकदम भुताबाई दिसत होती, त्याचे ( डॉक _) काय होणार याच विचाराने मी घाबरले.

निरंजन पार हडकुळा वाटतोय.>>>>> बायको व होणारे बाळ अचानक गेल्याने निरंजन मध्ये बदल घडलेला दिसतोय. तो नेहेमीच केविलवाणा, खचलेला, आत्मविश्वास गमावलेला, हताश, बायको व आई या दोन्ही नात्यांच्या कात्रीत सापडलेला असा आहे. बरं आता ही रमा हिचे प्रश्न घेऊन आलीय, ते सोडवावेत म्हणले तर ती कोणालाच नॉर्मल वाटत नाही, उगीच विचीत्र चाळे करते. त्यामुळे निरुची पंचाईत झालीय.

पुढचा नंबर त्याचा की काय ढगात जायचा?>>>> बहुतेक हो. >>> बहुतेक त्या डॉक चा मन्गल आणि तिच्या बाळाच्या खुनात सहभाग असेल म्हणून मारल असेल त्याला रमाने.

ग्रहण मध्ये सगळे मिळून अ‍ॅज अ टिम कथा सादर करतायत असं वाटत नाही. सर्वांची स्टेशनं वेगवेगळी लागली आहेत. त्यातल्या त्यात पल्लवी बाई प्रत्येक स्टेशनवर आपली गाडी थांबवून कथेत सामावण्याचा प्रयत्न करतायत. उदा. मोनू आणि लक्ष्मी चे छोटे स्टेशन. निरू नामक जंक्श असले तरी ओसाड उजाड वैराण Sad
बाकी स्टेशनांवर लांबून बा$$$$रिक लक्ष (गॅलरितून) Proud

गंतव्य अजून स्पष्ट नाही हा भाग अलहिदा..
झी आहे म्ह्टल्यावर कुठे ना कुठे तरी पोहोचतीलच.

Pages