ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कालचा भाग आवडला मला , तो निरु महामंद वाटला मला
थोडी स्लो आहे शिरेल पण , चालतयं की
फक्त बाकिच्यां सारखे पाणी जास्त नको व्हायला

मी पक्की धरुन ठेवलीय. Proud माझी मुलगी हे नको बघु असे म्हणले तरी बघते, मग काय पदरी पडलं.
नवीन Submitted by रश्मी.. on 4 April, 2018 - 09:42 >>>>>>>>>>> that's the spirit.
index_1.jpeg

फक्त बाकिच्यां सारखे पाणी जास्त नको व्हायला
Submitted by VB on 4 April, 2018 - 11:22 >>>>>>> अजुन प्रमाण नाही कळत आहे, एकदा कळल कि मग बघा पाण्याचा नळ कसा सुरु होतो ते......

निरू खरंच बोरे Sad
सर्व प्रसंगात त्याच्या चेहर्‍यावरचे भाव अगदी सेम असतात. बोलतो पण स्लो Sad ते बोलणे गुढ वाटावे अशी अपेक्षा असेल तर शिरेल वाल्यांचे कास्टिंग चुकलेय. त्याचे बोलणे मंद वाटते. सतत तो अर्धोन्मिलित अवस्थेत वाटतो. मला तर कित्येकदा त्याला बघितलं की जाऊन दोन्ही खांदे पकडून त्याला गदागदा हलवून पुर्ण जागे करावे वाटते.

सर्व प्रसंगात त्याच्या चेहर्‍यावरचे भाव अगदी सेम असतात. बोलतो पण स्लो Sad ते बोलणे गुढ वाटावे अशी अपेक्षा असेल तर शिरेल वाल्यांचे कास्टिंग चुकलेय. त्याचे बोलणे मंद वाटते. सतत तो अर्धोन्मिलित अवस्थेत वाटतो. मला तर कित्येकदा त्याला बघितलं की जाऊन दोन्ही खांदे पकडून त्याला गदागदा हलवून पुर्ण जागे करावे वाटते. >>> + ११११

कालतर त्या स्मशानात सुद्धा तसाच , मख्खासारखा ऊभा

स्मशान म्हणजे ग्रेव्हयार्ड,

कोणी गेले नाही

पल्लवी घेवुन जाते याला, ये गुपचुप माझ्या मागे बोलुन

आणी हा जातो, अन तिथे धडपडतो

बादवे, तो डबा घरी ठेवून जातो ना? >> हो ना .. त्या नंतर त्याची आई शेजारी गप्पा मारताना दाखवली कि ..पण डबा विसरलाय हे तिच्या लक्षात आलय / नाही आलंय ते काय दाखवल नाही

ती रमा निरोबाला तिथेHalloween RIPबोलावते असे तो म्हणतो, पण तो मागचा वेडा त्याच्या मागे लागल्यावर तो ( निरु )Scared and sweatingपळत बाहेर येतो.

इकडे चिन्नप्पाची मुलगी पण मोनुने काढलेलेच चित्र काढते आणी तिच्या अप्पाला दाखवते, मग अप्पा घाबरुन या गप्पा बास म्हणतो.

त्या ग्रेव्हयार्डात काय असते देव जाणे, की निरोबाला काम दिलेय रमाने? आणी पोलीस स्टेशन मध्ये जातांना दोघे मोटरसायकल वर जातात, आणी मग ती गेली कुठे? कारण घरी जातांना रिक्षातुन जातात. मग बाईक वर कोण बसले?

आणी पोलीस स्टेशन मध्ये जातांना दोघे मोटरसायकल वर जातात, आणी मग ती गेली कुठे? कारण घरी जातांना रिक्षातुन जातात. मग बाईक वर कोण बसले?>>> सही पकडे है ! मोटारसायकल भेळ वाल्याला दिली वाटतंय

रश्मी बरोब्बर. आणि पोलिस स्टेशनला साधारण दिवसा जातात आणि परत येताना रात्र? Uhoh
दुसरी गोष्ट म्हणजे तो त्या ग्रेव्हयार्ड मध्ये कसा पोहोचतो ते त्याला कळत नाही. ते (ग्रेव्हयार्ड) खोटं होतं ते कसलं कळत होतं Proud

तो त्या ग्रेव्हयार्ड मध्ये कसा पोहोचतो ते त्याला कळत नाही. >>>> हा असा प्रकार होतो हे प्रत्यक्ष पाहिलयं मी. ती ज्या प्रकारे त्याला सांगते की माझ्या मागे ये. मागे वळून बघु नकोस, तस एखाद्याची भूल पडते आणि त्या व्यक्तीच्या मागे मागेच माणुस जात रहातो. जोपर्यंत त्याची तंद्री तुटत नाही तोपर्यंत मागे जाणार्‍याला हे कळतच नाही की तो कुठे जातोय.

चकवा लागतो की भूल पडल्यासारखा जातो माहीत नाही.

झी वर सगळ्या पाचकळच सिरीयल असल्याने ( कलर्स मराठी पण स्पर्धेत आहेत पाचकळपणाच्या ) मी रात्री ८ ते १०. ३० म्हणजे ही ग्रहण येता जाता बघत असते. मात्र संभांजी महाराजांची सिरीयल बघवत नाही कारण शिवाजी महाराज व संभाजी दोघांनाही जे सोसावे लागले ते पाहुनच हृदयाला पीळ पडल्यासारखे होते. त्यामुळे पाचकळपणा परवडला पण दु:ख नको असे वाटते.

आँ!!! कमाल आहे निरुची.

अगं माझी सुरुवात गेली आणी जागो मोहन प्यारेला तरी मी चिकटुन बसते, पण ही सिरीयल डोक्यावरुन गेल्याने मधूनच बघते.

दोन एपिसोडची सिरीयल शंभर दोनशे एपिसोड करायचं, आठवडाभर चालणारी कथा वर्षभर करायचं पोटेन्शियल आहे झी मराठीत.

Thank u VB

हो कालचा भाग चांगला होता.
<<आणी पोलीस स्टेशन मध्ये जातांना दोघे मोटरसायकल वर जातात, आणी मग ती गेली कुठे? कारण घरी जातांना रिक्षातुन जातात. मग बाईक वर कोण बसले?>> जबरी ऑब्जर्वेशन.

निरन्जन त्या रमाचा हात पकडतो तर त्याला वाटते की तो वहावत गेला. मला तर पाच मिनीटे कळलच नाही हा वहावत गेला म्हणजे काय केले याने. हात धरला तर वहावत गेला म्हणे. येडच आहे Happy त्याच्या कडुन या पेक्षा जास्त काही होइल असे वाटत पण नाही. बर्याच दिवसानी काल बघीतली तर हा पान्चट पणा....

मी सुद्धा काल लावली एका आठवड्याने पण तीन मिन्टात बंद केला टीवी. निरु बाथरूमतून बाहेर येतो आणि त्याला मंगल दिसते भर सकाळी. छ्या... वैताग.

ती राखेचा बरीच बरे होती सुरुवातीला नक्कीच ह्याच्याओएक्षा. मी पांडू साठी पाहिली तरी मग सोडोनच दिली. पण हि चार भागातच नकोशी झाली.

Btw ते मोनुने काढलेले म्हणून जे चित्र दाखवतात ते एडवर्ड मंच या आर्टिस्टने काढलेले the scream नावाचे प्रसिद्ध चित्र आहे Happy

काल रमा ने त्या दाढीधारी भिकार्‍याला अक्षरशः लटकवला.
नक्की काय सुरू आहे कळत नाही. गणितासारखं सुरू आहे. म्हणजे सगळं अध्याहृत.
समजा रमा ही मंगल आहे, निरू हा सुनिल बर्वे आहे, मोनू हा मुलगा, तर निरूची आई कोण..
आमचं गणित इतकं चांगलं असतं तर कशाला Uhoh

Pages