Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< मला आठवतयं एका इंग्लंड
<< मला आठवतयं एका इंग्लंड दौर्यात गावस्कर कर्णधार असताना ..... ११ पैकी ९ मुंबईकर संघात होते! >> तेंव्हां मूंबईच्या क्रिकेटची पातळीच निर्विवाद खूपच वरच्या दर्जाची होती; आतां क्रिकेटचा दर्जा सर्वत्रच मुंबईच्या पातळीवर आलाय, म्हणून ' ११ पैकी ९ मुंबईकर' , हें आतां विचित्र वाटतंय. त्यांत झुकतें माप देण्याचा भाग फारसा नसावा [अजिबातच नव्हता म्हणणं अर्थात धार्ष्ट्याचं होईल !]
<< केवळ परफॉर्मन्स हा निकष हवा! निव्वळ गुणवत्ता ही उपयोगी नाही!>> सर्वसाधारणपणे हें खरं असलं तरीही याबाबतींत थोडंसं लवचिक धोरण असामान्य गुणवत्तेबाबत अंगिकारणं हितावहच असतं. अर्थात, अशी गुणवत्ता हेरणारेही हिरेपारखी व विश्वासार्ह असावे लागतात. श्रीलंकेच्या अट्टापट्टूचं उदाहरण आठवतं. सतत अयशस्वी होत असूनही निवडसमितीने त्याला संधी दिली व मग त्याने ती सार्थही ठरवली !
कोहली हा फलंदाज म्हणूनच नाही तर खेळाडू व माणूस म्हणूनही परिपक्व होतोय, हें प्रकर्षाने जाणवतय.[ सचिनला केलेलं अभिवादन, युवी मोक्याच्या वेळीं जखमी झालेला असूनही त्याच्यावर न वैतागणे व नंतर त्याच्या झुंजार वॄत्तीचं कौतुक करणं इ.इ. ].आधीं खूपच आत्मकेंद्री व कांहींसा उर्मट वाटणारा कोहली आतां सहकार्यांशी खूपच आत्मियतेने वागताना पाहून कर्णधार म्हणूनही तो यशस्वी होईल असा विश्वास वाटतो.
तेंव्हां मूंबईच्या क्रिकेटची
तेंव्हां मूंबईच्या क्रिकेटची पातळीच निर्विवाद खूपच वरच्या दर्जाची होती; आतां क्रिकेटचा दर्जा सर्वत्रच मुंबईच्या पातळीवर आलाय, म्हणून ' ११ पैकी ९ मुंबईकर' , हें आतां विचित्र वाटतंय. त्यांत झुकतें माप देण्याचा भाग फारसा नसावा>>>>>
फारसा नसला तरी तेंव्हा गुलाम परकार किंवा सुरु नायक पेक्षा थोडेफार चांगले खेळाडू राष्ट्रीय पातळीवर होते!
धीं खूपच आत्मकेंद्री व
धीं खूपच आत्मकेंद्री व कांहींसा उर्मट वाटणारा कोहली आतां सहकार्यांशी खूपच आत्मियतेने वागताना पाहून कर्णधार म्हणूनही तो यशस्वी होईल असा विश्वास वाटतो.>>>
कोहली परिपक्व होतोय! आणि कर्णधारपादाचे काही गुण त्याचे कसोटी मालिके दरम्यान जाणवलेत!
चांगल्या दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूची उणिव मात्र प्रचंड जाणवते! कपिल देव नंतर त्या तोडीचा नाही तरी जवळपास पोहोचणारा एकही अष्टपैलू खेळाडू तयार झाला नाही!
लोकसत्ताने नेहमीप्रमाणे कुजकट
लोकसत्ताने नेहमीप्रमाणे कुजकट लिहीताना उगाचच सचिन ला मधे आणले आहे. त्यावरून लेखकाचे क्रिकेट चे ज्ञान कच्चे आहेच, पण आकडेवारीही कच्ची आहे हे सहज दिसते. त्यात या स्पर्धेतील कामगिरीचेही इतके कुजकट वर्णन कधी वाचले नव्हते ("....भारताला जेमतेम उपांत्य फेरी गाठता आली").
http://www.loksatta.com/aghralekh-news/indian-team-loses-t20-semi-final-...
म्हणे महानायक ठरवला गेलेला खेळाडू मोठा होत राहतो - बाकीच्यांना खेळायला बंदी केली होती काय स्पर्धेत.
सर्वात विनोदी वाक्यः
सचिनच्या फलंदाजीने भारताला जिंकून दिल्याची उदाहरणे मोजकीच आहेत.
पहिले म्हणजे या वाक्याचा या स्पर्धेशी काय संबंध. दुसरे म्हणजे 'मोजकी' म्हणजे किती? अनेकांना नुकतीच संपलेली स्पर्धा हे एकच स्टॅटिस्टिक्स लक्षात असते
आणि मुख्य म्हणजे लोकांची या स्पर्धेबद्दल, पराभवाबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे ही यांना समजलेले नाही. हरल्याबद्दल वाईट वाटणे, पण विंडीज चांगले खेळले हे लक्षात येउन बहुसंख्य भारतीयांनी त्यांना दिलेली दाद व हरल्याची बोच दुसर्या दिवशी अजिबात न जाणवणे, आपल्या संघातील लोकांवर अनावश्यक टीका न होणे- हा योग्य पॅटर्न यावेळेस दिसलेला आहे. तो या लेखातून अजिबात दिसत नाही.
कृष्णा - कोटा सिस्टीम बद्दल
कृष्णा - कोटा सिस्टीम बद्दल इन जनरल सहमत आहे. पण विनोद कांबळी सचिन च्या नेतृत्वाखाली खूप खेळलेला नाही. कसोटीत तर एकदाही नव्हता. वन डे मधे तो मुळातच साधारण १९९७ पर्यंत सलग टीम मधे होताच - १९९३ मधे आला तेव्हापासून. सचिन ने त्याला नव्याने आणला नाही. उलट गांगुलीनेच त्याला तो चांगला खेळत नसतानाही २००० मधे बराच वेळ चान्स दिला होता. सचिन वर टीका व्हायची ती बरोबर उलटी - त्याला हव्या असलेल्या खेळाडूंबद्दल तो आग्रही नसे.
सचिन च्या कप्तानपदाच्या दोन वेळांपैकी एकदा गुंडाप्पा विश्वनाथ सिलेक्टर होता - तेव्हा कर्नाटक चे ५-६ खेळाडू संघात होते. सुजीत सोमसुंदर, डेव्हिड जॉन्सन, सुनील जोशी, तो भारद्वाज (पहिले नाव लक्षात नाही) ई. श्रीनाथ, कुंबळे व प्रसाद व्यतिरिक्त. हे बहुतांश सचिनच्या कप्तानपदाच्या काळात.
मुंबईच्या खेळाडूंचा भरणा कधी कधी जास्त झाला असेल आणि त्यामुळे इतर लोक डावलले गेले असतील हे खरे आहे. पण एक काळ असा होता की स्थानिक स्पर्धांमधे मुंबईची मक्तेदारी होती. पहिल्या ३५ की ४० रणजी स्पर्धांमधे २९-३० वेळा तो करंडक मुंबईनेच जिंकला होता. दुलीप व इराणीमधे सुद्धा मुंबईची/पश्चिम विभागाची कामगिरी चांगली असे. निवड त्यातूनच होत असल्याने त्यामुळे मुंबईचे जास्त लोक असणे रास्त होते.
फारएण्डजी, सचिनचं मोठेपण व
फारएण्डजी, सचिनचं मोठेपण व लोकप्रियता सहन न होणारे बरेच महाभाग आहेत या देशात. 'भुंकने ने दो उनको !' म्हणायचं आणि सोडून द्यायचं!!
<<फारसा नसला तरी तेंव्हा गुलाम परकार किंवा सुरु नायक पेक्षा थोडेफार चांगले खेळाडू राष्ट्रीय पातळीवर होते!>> मान्य. म्हणूनच मीं << त्यांत झुकतें माप देण्याचा भाग फारसा नसावा [अजिबातच नव्हता म्हणणं अर्थात धार्ष्ट्याचं होईल !]>> म्हटलंय.
<< चांगल्या दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूची उणिव मात्र प्रचंड जाणवते! >> ती उणीव असली तरी घातक नाहीं; पण चांगल्या खेळपट्टीवर गोलंदाजी अगदींच निष्प्रभ असणं हें मात्र नक्कीच आहे. फलंदाजी व.क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं असूनही गोलंदाजी ही सातत्याने आपली लंगडी बाजूच ठरते आहे व खरी काळजीची बाब तीच आहे.
<< बहुसंख्य भारतीयांनी त्यांना दिलेली दाद व हरल्याची बोच दुसर्या दिवशी अजिबात न जाणवणे, >>फारएण्डजी, क्रिकेटप्रेमी या बाबतीत आतां खूप 'मॅच्यूअर' झालेत हें खरंच जाणवतं.
तो भारद्वाज (पहिले नाव लक्षात
तो भारद्वाज (पहिले नाव लक्षात नाही) >> विजय. सचिन च्या कप्तानपदाच्या वेळेस सचिनने फारशी पार्शालिटी केल्याचे आठवत नाही खरच. बहुतुले वगैरेला तर गंगुलीने संधी दिली.
बहुतुले बेस्ट लेगस्पिनर होता
बहुतुले बेस्ट लेगस्पिनर होता पण कुंबळेच्या सावलीत त्याचा बळी गेला . जसे हिरवाणीचा गेला. शेन वॉर्नच्या सावलीत स्टुअर्ट मॅक्गिल चा गेला.
होते लिस्ट निकलेगी तो बहूत लंबी जायेगी
पण विनोद कांबळी सचिन च्या
पण विनोद कांबळी सचिन च्या नेतृत्वाखाली खूप खेळलेला नाही. >> फारएण्ड, मान्य तसे कांबळी घेण्याविषयी माझे फारसे म्हणणे नाही त्याच्या योग्यते विषयी देखील शंका नाही अत्यंत आकर्षक डावखोरा फलंदाजी होती त्याची पण पायाच्या दुखण्याने बाहेर फेकल्या गेलेल्या कांबळीला पुनरागमाची संधी मिळालेली...
भाऊ - "जी" मत कहो मुझे .
भाऊ - "जी" मत कहो मुझे :). क्रिकेट स्टॅटिस्टिशियन्स ना म्हणतात तसे म्हणत असाल तर एकवेळ चालेल (पण नकोच) :). अर्थात आमचे स्टॅट क्रिकइन्फो च्या कृपेने आहे. पण पूर्वी मी ती क्रिकेट स्टॅटवाल्यांच्या मुंबईतील असोसिएशन ने प्रकाशित केलेली (बहुधा 'हिंदू' तर्फे करत) पुस्तके घेत असे. त्यात असंख्य स्टॅट्स असत, विशेषतः त्या वर्षीच्या गेम्स ची. अंधेरी का कोठेतरी जाउन मोहनदास मेनन यांनाही भेटलेलो आहे. ते स्पोर्टस्टार व क्रिकइन्फो/रीडिफ मधे statistical highlights देत असत मॅचचे. अजून लिहीतात का माहीत नाही. अशी आर्टिकल्स असतात ती:
http://www.thehindu.com/sport/cricket/world-cup/world-twenty20-champions...
असामी - 'विजय' बरोबर. माझ्या डोक्यात सारखे 'विशाल' च येत होते
कृष्णा - कांबळीने २००० नंतर काय केले मलाही आठवत नाही. रणजीत वगैरे खेळत असावा. पण नंतर संधी मिळाली नाही त्याला. कदाचित द्रविड, लक्ष्मण व गांगुली मधल्या फळीत असल्याने इतर अनेक जण बाहेरच राहिले. सेहवाग ही सलामीला आल्याने येउ शकला. नाहीतर २००२ पर्यंत तो ही मधल्या फळीतच होता.
सचिनचं मोठेपण व लोकप्रियता
सचिनचं मोठेपण व लोकप्रियता सहन न होणारे बरेच महाभाग आहेत या देशात. 'भुंकने ने दो उनको !' म्हणायचं आणि सोडून द्यायचं!! >>
अगदी . इथे मायबोलीवरही बरेच आहेत. मी ही प्रत्येकवेळी 'भुंकने ने दो उनको !' म्हणून सोडून देतो.
तो कांबळी येडा होता. त्याच्या स्वतःच्या मूर्खपणामुळे त्याचे करियर बर्बाद झाले.
आणि त्याचे करियर तो "कांबळी" असल्यामुळे बर्बाद झाले अन सचिन "तेंडुलकर" असल्यामुळे त्याचे करियर झाले असे म्हणणारे लोकंही खूप आहेत. काय बोलणार त्यांच्यापुढे?
फारएण्ड, कुबेर कायच्याकाय
फारएण्ड, कुबेर कायच्याकाय लिहीतात. त्यांच्या लिखाणाला काहीही क्रेडिबिलीटी राहिलेली नाही. भारताने आशिया कप जिंकला होता वगैरे काहीही बॅकग्राऊंड नाही. ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, ह्यांच्या खेळपट्ट्या काय रवी शास्त्रीने बनवल्या होत्या काय? न्यूझीलंडच्या संघभावनेचे सर्व कौतुक करतात, ते दिमाखात सेमीजमध्येही गेले. पण तिथे हरलेच ना?!
सचिनची डीबेट इथे चालू करत नाही, विपूमध्ये बोलतो.
<< होते लिस्ट निकलेगी तो बहूत
<< होते लिस्ट निकलेगी तो बहूत लंबी जायेगी >> हें खरं असलं तरीही बेदीमुळे आमच्या गुणी शिवलकरचा बळी गेला ह्याचा उल्लेख केल्याशिवाय नाही राहवत !
<< तो कांबळी येडा होता. त्याच्या स्वतःच्या मूर्खपणामुळे त्याचे करियर बर्बाद झाले.>> " साला मला 'बीट' करतो काय, देतो याला बांऊडरीच्या बाहेर फेंकून", हा अॅटीट्यूड, ही मस्ती आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोलंदाजांपुढे नाहीं चालत, ही साधी गोष्ट न समजल्याने कांबळीची करीअर अकाली संपली असावी; नाही तर तो मैदान गाजवण्याची कुवत असलेलाच फलंदाज होता व शैलीदारही !
फारएण्ड, मला क्रिकेटच्या 'स्टॅटीस्टीक्स'मधे तसा फारसा रस नाहीच. शिवाय, " धवन ३०च्या आंत आऊट होतो तेंव्हां ७०% मॅचेस भारत जिंकतो इ.इ" असली तर्कशून्य आंकडेवारी हल्लीं भोगले देतो, तें ऐकून तर मला किळसच येते. अप्रतिम खेळी माझ्या कायम लक्षांत रहातात, आंकडेवारी अजिबात नाही. माझा तो 'विक पाँईट'ही असेल !
आजच्या 'सामना' मधला कणेकरांचा
आजच्या 'सामना' मधला कणेकरांचा टी-२० बद्दल लेख..( मी 'सामना' फक्त कणेकरांच्या 'टिवल्याबावल्या' साठीच वाचतो )
http://www.saamana.com/utsav/tivlya-bavlya-ekshe-vis-chendunchi-dangal
टी-२०चे 'प्लस पॉईंटस'
टी-२०चे 'प्लस पॉईंटस' कणेकरानी छान मांडलेत. फक्त, हा प्रकार फलंदाजांचीच मक्तेदारी होत्येय हें तितकंसं नाहीं पटत. टी-२०साठी जसे फलंदाजानी कल्पक फटके शोधून काढले , तसेच गोलंदाजानीही कांहीं जुनी व कांहीं नविन तंत्र कमालीची विकसित केलीं आहेत व करतही आहेत; उदा. १] हुकमी 'यॉर्कर'; स्पीनर्सही आतां याचा खुबीने वापर करताहेत ! २] चेंडूचा वेग एकाच अॅक्शनने सफाईने बदलणे ३] 'वाईड'च्या सीमारेषेवर सतत नेमका मारा करत रहाणे ४] 'वाईड', 'नो-बॉल' न होतां आंखूड टप्प्याचे चेंडू टाकणे ५] फलंदाजाचा कल बघून 'फुल-टॉस' चेंडू टाकणे इ.इ.
टी-२० वर्ल्डचँपियनशिप : वे.
टी-२० वर्ल्डचँपियनशिप : वे. इंडीज - "लेडीज फर्स्ट !! "
काय स्टाईलमधे जिंकला वे. इंडीजचा महिला संघ !! अभिनंदन !!
कसला बॉल होता तो. रॉय गेला.
कसला बॉल होता तो. रॉय गेला.
३ विकेट्स इन लेस दॅन ५ ओवर्स!
३ विकेट्स इन लेस दॅन ५ ओवर्स! विंडीजचे चान्सेस चांगले दिसतायत .
मेबी टू सून टु से ...
स्टँड्स मधे दादा ला बघून अचानक महागुरु आणि फार पूर्वीच्या २००३ की २००७ (?) वर्ल्ड कप मधले इथे त्याचे फोटो-कॅप्शन्स ची आठवण आली.धम्माल यायची तेव्हा !! मगु सध्या गायब आहेत का ?
३ गेले मी पहिल्यांदा मॅच
३ गेले
मी पहिल्यांदा मॅच चालू असताना इथे लिहितोय . टेंशन नाही. विशिष्ट गाणी ऐकायची नाही गुणगुणत बसायचे नाही, विशिष्ट जागेवर बसायचे नाही, हाताची घडी घालून बसायचे नाही, शर्ट सुध्दा बदलून टाकला,
कोणी ही जिंकू द्या. आपल्या बा चं काय जातयं
मुळे आणि खानसामा इंग्लंडला
मुळे आणि खानसामा इंग्लंडला तारत आहेत असे वाटत असतानाच खानसामा माघारी..
..
..
१७० ची खेळपट्टी वाटत आहे पण
१७० ची खेळपट्टी वाटत आहे पण ईंग्लंड ११३-७ .. १४.३ ओवर्स .. विंडीज जिंकली तरी हरकत नाही पण वन साईड फायनल नकोय.. १५५-१६० पर्यंत तरी न्या स्कोअर
कॅप्टन सामी सलग १०व्यांदा टॉस
कॅप्टन सामी सलग १०व्यांदा टॉस जिंकतो म्हणजे दैव झुकले आहे
यंदा अंडर १९ चा वर्ल्डकप, महिला क्रिकेट २०टीचा वर्ल्डकप दोन्ही कप वेस्ट इंडीज कडे आहे.
आता हा ही मिळेल अशी आशा आहे
पहिल्या ६षटकांत ३ महत्वाच्या
पहिल्या ६षटकांत ३ महत्वाच्या विकेटस जावूनही, इंग्लंड 'स्पीरिटेड' खेळ खेळताहेत. मानलं !
वेस्ट ईंडिज अशी टीम आहे की ते
वेस्ट ईंडिज अशी टीम आहे की ते या खेळपट्टीवर १८० देखील सहज चेस करतील तर विकेट घालवून १५० ला देखील मुश्कील करून ठेवतील.
आणि ईंग्लंडने १५० ची फिगर पार केली आहे.
सामना रंगायला हरकत नाही
इतक्या विकेट्स जात राहिल्या
इतक्या विकेट्स जात राहिल्या तरी १५५ इज प्रिटी गुड !! चुका न करता विकेट टिकवून खेळायला हवं. गो विंडीज!!
मुळे आणि खानसामा >>>
मुळे आणि खानसामा >>>
आज तरी वे.इंडिजची गोलंदाजी,
आज तरी वे.इंडिजची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण नेटकं होतं. झेल तर अप्रतिम घेतले. फलंदाजी जर अशीच केली तर जिंकण कठीण नाहीं. पण, इंग्लंडने गोलंदाजीतही फलंदाजीसारखीच जिगर व जिद्द दाखवली- व दाखवतीलच - तर वे.इंडीजला आपलं सर्वस्व पणाला लावूनच व व डोकं शांत ठेवूनच खेळावं लागणार. आतांपर्तंतच्या टी-२० विश्वचषक फायनल्समधला उच्चतम स्कोअर आहे १५७- ५ [भारत] , हें लक्षात घेतां सामना एकतर्फी होण्याची शक्यता कमीच !!
रुट विरुद्ध विंडिज लगान सारखे
रुट विरुद्ध विंडिज लगान सारखे खेळले. ह्याला ठोकायलाच हवे असे आणि दोन विकेट घालवून बसले.
पण रूटला त्यावेळी गोलंदाजी
पण रूटला त्यावेळी गोलंदाजी देणं हा मोठाच जुगार होता; ती हिंमत इंग्लंडने दाखवली हेंही आहेच ! सामना नक्कीच रंगणार असं वाटतंय.
Pages