Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विराटने जी जिगर व जिवतोड
विराटने जी जिगर व जिवतोड मेहनत दाखवली त्याच्या निम्म्यानेही जर अजुन १-२ की फलंदाज व बोलर्सनी दाखवली असती तर आपण हा कप निश्चितच जिंकलो असतो >>
करेक्ट आपल्या पोस्ट क्रॉस झाल्या. मी लिहिलं आहे की आपण एकच बॅट्समन घेऊन खेळलो.
यॉकर सकट आपण आता चेंडू ओला
यॉकर सकट आपण आता चेंडू ओला करून सराव करायला हवा >> न्यूझीलंड असा सराव करत होते ड्यू फॅक्टर लक्षात घेउन.. आपण अश्या प्रो-अॅक्टिव्ह मेजर्स कधी घेणार काय माहिती
अहो मी इथे जॉब मधे अडकलोय
अहो मी इथे जॉब मधे अडकलोय नाही तर कधीच जाऊन माहीती दिली असती.
आयपीएल मधे "चेंडू गरम करणे" करता येईल. तिथे जरा नियम तोडता येतात.
इथे आवडण्याचा प्रश्नच नाही.
इथे आवडण्याचा प्रश्नच नाही. त्याच्याकडे विविधता नाही आहे. सगळेच शेन वॉट्सन अथवा जॅक कॅलिस बनु शकत नाही. विविधता आली तर नक्कीच बनेल >> मायबाप, तुम्ही सरळ दोन मुद्दे एकत्र जोडत आहात. तुम्हाला पांड्याच्या पेसबद्दल शंका आहे त्याचे उत्तर मी दिले होते. तुमचे मत बाय्स्ड असल्यामूळे तुम्ही जी गोष्ट समोर दिसतेय त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात. extra pace ने येणार्या बाउन्सने बॅट्समन ला बीट करणे हे नवीन नाही, धोनीला हा प्रकार विशेष करून आवडतो हे उघड आहे तेंव्हा पांड्यासारखा बॉलर हाताखली असल्यावर तो त्याचा वापर तशासाठी करूतशासाठीमला अशक्य वाटत नाही. हा डावपेच चालत नसेल तर काय करायला हवे वगैरे ह्या त्या पुढच्या गोष्टी झाल्या.
केदार! तुझ्या धोनिच्या
केदार! तुझ्या धोनिच्या कॉमेन्ट्शिवाय सगळ्या पोस्टला +१ !
प्र्त्येकवेळेस तोच तोच प्रश्न फिरुन फिरुन आला की कुणिही वैतागेल, उलट त्याने ज्या रितिने हॅन्डल केले ...आता तो प्र्शन तरी त्याला विचारताना पत्रकार विचार करतील.
. बॉलिंग मध्ये कुठहाली प्लान
. बॉलिंग मध्ये कुठहाली प्लान काल दिसत नव्हता. अगदी येथील लोकंही म्हणत होते की ही काय बॉलिंग चालू आहे. ड्यु आहे हे मान्य. >> हे विधान कमीत कमी तुझ्याकडून अपेक्षित नव्हते रे. प तुला खरच वाटते कि international level ला खेळणारी टीम अशा मोक्याच्या वेळी काहीही प्लॅन न बनवता 'ये रे तू ये, चल तू टाक बॉलिंग आता. बघ काय जमते का तुला, ए पांड्या ये तुला टाकायचीय का आता ओव्हर , बर ह्या जडेजाची झाली कि टाक.' अशा पद्धतीने बॉलिंग करत असेल ? 'त्यांचा प्लॅन जो काही होता तो चालला नाही नि त्यावेळी काहिही बॅक अप प्लॅन जमवता आला नाही' एव्हढे साधे सरळ स्पष्टीकरण पटायला एव्हढे कठीण आहे ?
मागच्या १-२ सामन्यांमधे एक गोष्ट जाणवली ती ही कि धोनी अश्विन नि जाडेजा वर जेव्हढा आधी विश्वास दाखवत असे तेव्हढा दाखवत नाही. म्हणजे अगदी आयपील मधे सुद्धा त्यांच्या ओव्हरस मधे भरपूर रन्स गेले तरी तो त्यांच्यावर जो चान्स घेत असे तेव्हढा मागच्या २-३ सामन्यांमधे घेतला नाही. हि बदलती विचारधारा आहे कि मी उगाच काही तरी नसलेले वाचतोय कोण जाणे.
जाडेजाला १९वी ओव्हर द्यायला
जाडेजाला १९वी ओव्हर द्यायला नको होती ती फक्त बुमराने टाकायला हवी होती. विकेट्स मिळावण्याच्या नादात धोनीने नेहरा आणि बुमराची ओवर्स संपवली. कारण चेंडू सतत ओला होत असल्याने स्पिनर्स चालत नव्हते त्यामुळे त्यांना नुसता मारच बसणार होता हे धोनीने लवकर ओळखले. आणि विकेट्स घेतल्याशिवाय धावगतीला ब्रेक लागणार नाही हे सुध्दा होते. म्हणून नविन ट्राय केले. तरी अश्विनची ओव्हर संपवायला हवी होती. जाडेजाला मार बसत होता तर रैनाला वापरून बघायला हवे होते. जाडेजाचे चेंडू वेगात येतात त्यामुळे सुध्दा मार बसला असेल. थोडा हळूवार चेंडू टाकला असता तर कदाचीत मिस होऊन टॉपएज लागून कॅच मिळाला असता पण..
हे तर जरतर झाले
मला वाटते की धोनी काल बॉलर
मला वाटते की धोनी काल बॉलर मॅनेज करताना चुकला. दव पडणार माहीत असताना पहिल्या १० ओव्हरमध्ये स्पिनर्सच्या फक्त ३ ओव्हर? वेस्ट इंडीज पहिली गोलंदाजी असून ६ स्पिन ओव्हर होत्या. स्ट्राईक बॉलर अश्विनने दोनच ओव्हर टाकल्या. वास्तविक गेल लवकर गेल्यावर फिरकी आणि कामचलाऊ संपवायला चांगली संधी मिळाली होती.
त्यांचा प्लॅन जो काही होता तो
त्यांचा प्लॅन जो काही होता तो चालला नाही नि त्यावेळी काहिही बॅक अप प्लॅन जमवता आला नाही' >>
तेच मी म्हणतोय. जर प्लान चालत नसेल तर ऑन द फ्लाय काहीही सुचले नाही. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये प्लान A.B,C असे असतात. एकच नसतो प्लान. इनोव्हेशन काहीच नव्हते. जडेजाला मारत असतानाही त्याला थांबवण्यापेक्षा परत त्यालाच बॉलिंग आणि त्याला फुल टाक म्हणाले तर तो हाफ वाली टाकणार. बरं त्याच्या बॉलिंगवर थर्डमॅन वगैरे लोकं सर्कल मध्ये असे काहीचे चालू होते म्हणून लिहिले प्लान टाईप काही नव्हते. ओव्हर्स भरायच्या आहेत तर भरा. आणि मग रैना देखील पार्ट टाईम आहे तर त्याने एखादी ओव्हर टाकायला हवी की. नाही तरी तो ऑलराउंडर म्हणून जास्त अन बॅटसमन म्हणून कमी आहे.
लाँग स्टोरी शॉर्ट - दे टुक अस ऑफगार्ड.
तेच सॅमी बघ. त्याला माहिती होते की २२० ची पीच आहे. म्हणून त्याने पटकन आपल्या स्पीन ओव्हर्स संपवून टाकल्या. त्यांचे फास्ट बॉलर्स स्लो बॉल टाकत होते आणि आपले लोकं दे मार फास्ट टाकायचा विचार करत होते.
एका २०-२० मॅच (टूर्नामेटंं)
एका २०-२० मॅच (टूर्नामेटंं) चे एवढे डीटेल मध्ये अॅनालिसिस करणे वेळेचा सदुपयोग आहे का असे मला राहून राहून वाटते. माझ्या मते हे म्हणजे अब्बास मस्तान चे सिनेमे अगदीच गुरूदत्त, वी शांताराम नाही तर यश चोप्रांच्या फिल्मस ना लावतो तसे निकष लावून अॅनालाईझ करण्यासाखे आहे. हे फक्त माझे मत कारण मुकुंद ने म्हंटल्याप्रमाणे ह्या सामन्यांच्या आउअटकम ची वोलॅटिलिटी एवढ्या अगणित फॅक्टर्स ने अॅफेक्ट होते की वॅल्यू बेस्ड अॅनालिसिस करणे अंमळ अशक्य आहे. पण म्हणून त्यांचा आस्वाद घेऊ नये असे मला आजिबातच म्हणायचे नाही. मी सगळ्या मॅचेस, थरार प्रचंड एन्जॉय केला.
पण एकंदर क्रिकेट आणि स्ट्रेटेजी ह्यावर मला जे वाटते ते लिहावेसे वाटले म्हणून.
धोणी एक ग्रेट कॅप्टन आहे ह्यात वाद नाही,पण त्याचे नेहमी रॉ टॅलेंट ( त्याच्या मते) विरुद्ध अनुभव ह्यात रॉ टॅलेंट ला झुकते माप देणे आपल्याला नेहमीच महागात पडत आली आहे. त्याचे कारण हे रॉ टॅलेंट प्रेशर सिच्युएशन मध्ये ब्रेक होते आणि नेमका अनुभव ह्यावेळी कामाला येतो.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध्च्या सेमी फायनल मध्ये मोहित शर्मा ची जी गत झाली होती तीच काल पंड्याची झाली आणि हे होत्च राहणार. ह्या ऊलट अनुभव (ज्याच्या टॅलेंटची धार थोडी कमी का झाली असेना) ह्या प्रेशर गेम्स मध्ये कामाला येतो हे झहीर, नेहरा, हरभजन, युवराज वगैरेंनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
कोहली ला बॉलिंग दिली तेव्हाच धोणी चा हा अॅप्रोच किती चुकीचा आहे ते ठळक पणे दिसून आले. दोन आजिबात अनुभव नसलेले नवोदित बॉलर्स, लिमिटेड टॅलंट पण ईंडियन पीचेसवर बर्यापैकी स्मार्ट असा अश्विन, नो स्पीन टॅलंट आणि जे मोजके आहे ते केवळ पीच वर अवलंबून असा जडेजा एवढे सगळे गँबल असतांना केवळ नेहरावर बॉलिंग अवलंबून होती. हरभजन ह्यातल्या कुणाही पेक्षा चांगली चॉइस होती आणि अजून पुढची दोन वर्षेही असेल (खेळाच्या कुठल्याही फॉर्मॅट मध्ये)
चला.. या क्रिकेट बीबी च्या
चला.. या क्रिकेट बीबी च्या निमीत्ताने हायझेनबर्ग, फारेंड,असामी,वैद्यबुवा,केदार या सगळ्या जुन्या मायबोलिकर मित्रांशी संवाद झाला.. हायझेनबर्ग.. गुड टु सी यु हिअर! :).. क्रिकेट बघण्याइतकीच मजा येते क्रिकेटचे असे तुमचे सगळ्यांचे मनापासुन केलेले अॅनालिसिस वाचुन.... आणी कालच्या सारखा हर्ट करणारा सामना पचनी पडायला सुद्धा मदत होते..:)
बेफिकीर कुठे आहेत? वर्ल्ड कप २०१५ च्या वेळी येत होते.
रारही गायब आहे.. फक्त प्राजक्ता व दीपांजली महिला वर्गाचे प्रतिनिधित्व करत आहेत..:)
लाँग स्टोरी शॉर्ट - दे टुक अस
लाँग स्टोरी शॉर्ट - दे टुक अस ऑफगार्ड. लाँग स्टोरी शॉर्ट - दे टुक अस ऑफगार्ड. >> That is different than saying 'They did not had a plan' केदार.
ह्या सामन्यांच्या आउअटकम ची
ह्या सामन्यांच्या आउअटकम ची वोलॅटिलिटी एवढ्या अगणित फॅक्टर्स ने अॅफेक्ट होते की वॅल्यू बेस्ड अॅनालिसिस करणे अंमळ अशक्य आहे. >> मला वाटते T-20 चे स्वरुप अजूनही भरपूर बदलते आहे. अजून format हवा तेव्हढा stable झाला नाहिये. अजून काही वर्षांनी पुरेसा data गोळा झाला कि करता येउ शकेल.
मुकुंद good to see you here. Missed you during play-offs ईमेल करावे का विचार करत होतो.
मुकुंद - सेम गोज हिअर.
मुकुंद - सेम गोज हिअर.
असामी.. नको रे जखमेवर मिठ
असामी.. नको रे जखमेवर मिठ चोळुस.. आम्ही तुमच्याकडुन हरणार हे फोरगॉन कन्क्लुजन होते माझे..चिफ्स प्लेऑफ्सच्या दुसर्या राउंडला पोहोचुन जमाना झाला होता.. ( जो माँटॅना.. १९९३ मला वाटते) मधल्या काळात तुला माहीत आहे ब्रेडीचा मी किती फॅन झालो आहे.. त्यामुळे त्या मॅच मधे लॉयल कोणाला राहायचे या संभ्रमात मी मॅचभर होतो... पण म्हणुन हरल्याचे दु:खही जरा कमी होते..)
हा आठवडा स्पोर्ट्स बाबतीत वाइटच गेला माझ्या साठी.. माझे अल्मा मॅटर.. युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्सस .. जेहॉक्स.... नंबर १ ओव्हऑल सीड.. इन कॉलेज बास्केट्बॉल.. रिजनल फायनल्स मधे विलानोव्हा कडुन हरले.. काल भारत हरला.. :(.
नको रे जखमेवर मिठ चोळुस.. >>
नको रे जखमेवर मिठ चोळुस.. >> छे छे अजिबात नाही मुकुंद, पीटन साठी याल तिथे असे वाटलेले.
प्लॅनिंग बाबत ह्या आधी पण
प्लॅनिंग बाबत ह्या आधी पण चर्चा झालीये. ह्यावर सगळ्यांचेच एक मत आहे जवळ जवळ की टि२० च्या अत्यंत फास्ट फॉरमॅट मध्ये प्लॅनिंग वगैरेचे काही खरे नाही. एन वेळी, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे "आरबाळून" न जाता आपली कोअर काँपिटन्सी/स्किल ह्याचा पुरेपूर वापर करता आला तर तेवढं पुष्कळ आहे. मग दोन्ही बाजूंच्या प्लेयरांमध्ये त्या घटकेला ज्याची स्किल वरचढ तो त्या मोमेंटला पुढे सरकतो.
बॅटिंग वाल्यांनी चोख कामगिरी बजावली काल, खासकरुन आधी जे फक्त एक दोन जणं खेळत होते तसं नाही झालं आजिबात. बॉलिंग मध्ये मात्र स्किल, प्रसंगावधान, धैर्य सगळच कमी पडलं.
>>सिमन्स ला जमलं, मग रहाणेला
>>सिमन्स ला जमलं, मग रहाणेला का नाही हा प्रश्न गैरलागू आहे.
फेफ, ती तुलना "रहाणेला कोणी काही बोलूच शकणार नाही कारण एक तर तुम्ही संपुर्ण स्पर्धेत खेळवला नाही आणि मग उतरवला ते डायरेक्ट सेमी फायनल सारख्या अतिशय दडपण असलेल्या सामन्यात" या कमेंटला उद्देशुन आलेली आहे
रिपोर्टर- भारत की हार के बारे
रिपोर्टर- भारत की हार के बारे मे आप क्या कहना चाहते हो केजरीवाल- देखिए हमारी दिल्ली के विराट कोहली ओर नेहरा ने तो अच्छा प्रदर्शन किया था। बाकी के खिलाड़ी तो केंद्र सरकार के अंडर मे आते है मोदी जी को इस्तीफा देना चाहिए...!!
स्वरूप - गॉट ईट. मायबापः
स्वरूप - गॉट ईट.
मायबापः
एका २०-२० मॅच (टूर्नामेटंं)
एका २०-२० मॅच (टूर्नामेटंं) चे एवढे डीटेल मध्ये अॅनालिसिस करणे वेळेचा सदुपयोग आहे का >> हायझेनबर्ग - ती वर्ल्ड कप सेमी फायनल होती, म्हणून रास्त आहे. २०-२० वर्ल्ड कप असला तरी यापुढे तो लोकप्रिय असणार हे नक्की.
मला कोहलीचा सचिन होण्याची भीती वाटते. एकच खेळाडू थकून शेवटी कसलीतरी पाठदुखी वगैरे सुरू होते आणि त्याचाही खेळ काही काळ तरी मंदावतो. १९९८ च्या भरगच्च सीझन नंतर सचिन चे झाले होते तसे.
फा, हि लूक्स वे फिट! अन तो
फा, हि लूक्स वे फिट! अन तो जिम रॅट आहेच त्यामुळे मला नाही वाटत त्याला काही प्रॉबलेम येइल. नेहमी जिम मध्ये जाण्याचा तो फायदा असतोच. बॉडीला येवढ्या धावपळीची एरवीच सवय असते त्यामुळे काहीच वाटत नाही गेम मध्ये. तो मुलाखतीत म्हणाला पण होता की धिस इज व्हाय वि डु दोज फिटनेस रेजीम्स. मी पुर्ण थकलेला असताना जेवढा जमेल तेवढी फास्ट स्प्रिंट मारायला बघतो असं म्हणाला तो क्लियरली.
फॉर्म एक वेगळी गोष्ट आहे, इट्स मोअर मेन्टल दॅन फिजिकल पण फिटनेस मध्ये मला नाही वाटत कोहली कमी पडेल. हि लूक्स प्रिटी डार्न सिरियस अबाऊट फिटनेस.
हो तो फिट आहेच. पण सचिनही
हो तो फिट आहेच. पण सचिनही (दोघांमधल्या 'फिजिक' चा फरक धरला तरी) खेळाडू म्हणून प्रचंड फिट होता. मी एक्झॉस्ट होणे जे म्हणतोय ते मॅच मधल्या प्रचंड इन्व्हॉल्व्हमेण्ट मुळे. त्या दिवशी ऑसीज विरूद्ध जिंकल्यावर कोहलीची प्रतिक्रिया लक्षात आहे का? ती प्रतिक्रिया प्रचंड मानसिक गुंतवणूक दाखवते. १९९९ ची चेन्नई टेस्ट सचिनच्या बाबतीत तशीच होती. किंवा १९९८ ची डेझर्ट स्टॉर्म वाली शतके. यातला शारिरिक आणि मानसिक दबाव परिणाम करतो. विशेषतः दुसरे कोणी फारसे काही करत नसतील तर.
तशी इन्व्हॉल्व्हमेण्ट
तशी इन्व्हॉल्व्हमेण्ट इतरांनीही वेळोवेळी दाखवली तर एकावरच सगळे प्रेशर येत नाही.
फारएण्ड, अरे मी ते खेळाचे
फारएण्ड, अरे मी ते खेळाचे अॅनालिसिस करणे म्हणाजे वेळेचा दुरूपयोग अश्या अर्थाने नव्हे तर अनेकानेक रँडम फॅक्टर्स ने अॅफेक्ट होणारे आऊटकम अॅनालिसिस (रिग्रेशन साठी काही तरी ईनपूट बेस असावा ना) करण्यात वेळ का घालवा अश्या अर्थाने म्हणालो.
माझ्या मते हे सामने जिंकणं स्किल पेक्षाही स्ट्रॅटेजी चा भाग होत आहे. वॉर्न आणि धोणीनेही ते आयपील मधे दाखवून देलेलं आहे. १००+ स्ट्राईक रेट ने पहिल्यापासून बॉल तडकावणे ह्यासाठी जे स्कील हवं ते प्रिरिक्विसिट फार मिनिमल लेवल ला आहे. कोहली,आमला, रूट, स्मिथ सारखे लोक अॅडाप्ट करून सगळीकडे यशस्वी होतील हा विश्वास फक्त त्यांच्या स्कील मुळेच वाटतो?
मलाही हे सगळ्या बोटींवर पाय ठेवल्यासारखं वाटतं, वरचे सोडुन्न बाकी सगळे लोक टेस्ट क्रिकेट मध्ये एवढे मिझरेबल वाटतात की 'ईनोसंस लॉस्ट' सारखं टी२० पॅड चढवला की कायमचा 'पेशन्स लॉस्ट' झाल्यासारखा वाटतो. धोणीला ग्रेट कॅप्टन म्हणणारे त्याने ऑस्ट्रेलियामध्ये सिरिजच्या मध्येच कॅप्टन्सी सोडून अतिशय लाजिरवाणी गोष्टं केली होती ते विसरून जातात. तुम्ही म्हणाल तो टेस्ट क्रिकेट चा वेगळा फॉर्मॅट आहे अरे पण खेळणारी लोकं आणि टीम्स तेच आहेत ना. जिथे जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी (थोडक्यात जुगाड) एवजी फक्त स्कील लागत असेल आणि तेव्हा तुम्ही वाईट फेल होत असाल तर मग कश्याला क्रिकेट म्हणावं स्कील ला की जुगाड ला?
फा आलं लक्षात. बरोबर आहे.
फा आलं लक्षात. बरोबर आहे. इन्टेन्सली आणि मुख्य म्हणजे प्रेशर खाली खेळून खुप ड्रेन व्हायला होतं. सारखं सारखं त्याच्या एकट्यावरच सगळं येऊन पडलं तर वन डे हि विल क्रॅक.
>>मला कोहलीचा सचिन होण्याची
>>मला कोहलीचा सचिन होण्याची भीती वाटते.
>>वन डे हि विल क्रॅक.
आता निदान धोनी तरी आहे बाकीचा लोड घ्यायला.... एकदा का कॅप्टन्सी विराट कडे आली की त्याच्यावर आणखीन दडपण असेल
धोनी च्या तुलनेत विराट जास्त emotinally involved वाटतो.... त्यामुळे त्याला सांभाळावे लागेल!
कदाचित साफ चूकीचं असेल माझं,
कदाचित साफ चूकीचं असेल माझं, पण मला वाटतं जस जसे अधिकाअधीक आंतरराष्ट्रीय सामने खेळाडू खेळत जातात, तस तसं सर्वच देशांचे संघ कमी अधिक प्रमाणात कसलेलेच असतात, हें त्यांच्या लक्षांत येतंच. त्याबरोबरच हरणं-जिंकणं याचं योग्य भानही येतंच. त्यामुळें त्यांच्यावर हरण्या-जिंकण्याच्या दडपणापेक्षां आपल्याकडून शर्थीची सर्वोत्तम कामगिरी होण्याचं दडपणच अधिक असावं. व तें हितावहही आहे.
<< सारखं सारखं त्याच्या एकट्यावरच सगळं येऊन पडलं तर वन डे हि विल क्रॅक >> ज्या तर्हेने नवनविन प्रतिभावान खेळाडू तयार होत आहेत त्यावरून तरी कोहलीवर अशी पाळी येईल असं मला तरी वाटत नाही. आणि, 'अंडर १९'पासून कर्णधारपदाचा अनुभव गांठीशी असलेल्या कोहलीबद्दल, कॅप्टन्सीच्या दडपणाची काळजी करण्याचंही फारसं कारण नसावं.
धोनी नंतर टीम प्रचंड बदलेल.
धोनी नंतर टीम प्रचंड बदलेल. बॅकिंग फक्त काही सामन्यापुरतीच मिळेल. परफॉर्मंस नाही तर बाहेर. जास्त करून ५ सामने सलग. त्यानंतर घरी बसने होईल.
कोहली हा ऑस्ट्रेलियन मानसिकतेचा जास्त वाटतो.
धोनी कर्णधारपदी असताना चेन्नई
धोनी कर्णधारपदी असताना चेन्नई सुपरकिंगच्या खेळाडूंना झुकते माप होते हे तर धडधडीत सत्य! निम्म्याच्या वर खेळाडू चेन्नई सुपरकिंगवाले!
अर्थात धोनीची चूक नाही ही पुर्वंपार प्रथा आहे..
मला आठवतयं एका इंग्लंड दौर्यात गावस्कर कर्णधार असताना गुलाम (का?) झुल्फीकार परकार, सुरु नायक आदी खेळाडूंसह ११ पैकी ९ मुंबईकर संघात होते!
सचिन कर्णधार असताना संघा बाहेर झालेला विनोद कांबळी परत संघात आलेला. ह्या गोष्टी होतातच!
पण आता हा ट्रेंड बदलावा ही अपेक्षा! केवळ परफॉर्मन्स हा निकष हवा! निव्वळ गुणवत्ता ही उपयोगी नाही!
Pages