२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२० बाउन्डी आणि ११ सिक्सेस ! आपण जरा ब्लास्टिंग मध्ये कमीच पडत होतो. बेस्ट लक विंडिज. आता इंग्लंडला हारवा आता.

वेल प्लेड विंडीज. नक्कीच डिझर्व केले आज. आपल्यापेक्षा खूप चांगले खेळले. त्यांची बोलिंग खूप चांगली होती. त्याने व नंतरच्या दवाने फरक पडला. त्यात वानखेडे लहान असल्याने बसला की सिक्स! आपल्याला स्लो बोलिंग करून त्यांनी असली धुलाई करण्याचा चान्स दिला नाही. डेथ मधे कोहली आणि धोनी सुद्धा खूप मारू शकले नाहीत त्यावरून लक्षात येते.

४ ओव्हर मधे ४५ रन्स देऊन हार्दिक पांड्या man of the match

ज्याची भिती आधीपासून होती ती नेमकी सेमी मधे खरी ठरली

फा +१.

तीनदां हरत आलो होतो त्या मॅचेस खेचून आणल्या व आज जिंकायची मॅच हरून बसलो !! Sad
पण वे.इंडिजला फुल क्रेडीट !! गेल लवकर जावूनही त्यानी लक्ष्य सुंदर 'चेस' केलं. कोणतीही सबब न सांगतां आजची हार स्विकारणं उचित. त्याना फायनलसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Whats app::
The world's biggest airlift operation just completed by WEST INDIES. Millions of Indians back on Earth from the MOON

पांड्या कधीतरी महाग पडणार आहे हे भकित खर ठरले
सतत शोर्टपिच करत रहाणे चुकीचे आहे इतकी अक्कल असायला हवी सम्युअल नंतर आपण विकेट घेण्याचा प्रयत्न केला नाही सिमन्सला रोखायला हवे होते

<< त्या लिस्ट मधे सध्याची विंडीज बरीच वर आहे. >> खरंय. सॅमीने वे.इंडिज संघाला एक 'फायटींग युनिट' बनवलं आहे, हें निश्चित !

"पण ज्यांच्या कडून हरलो तर राग येत नाही/कमी येतो त्या लिस्ट मधे सध्याची विंडीज बरीच वर आहे" - सहमत. दुसरे ते न्यूझिलंड.

व्हॉट्सअ‍ॅप वर आलेले काही मेसेजेसः

अश्विन आणी पंड्या ला झी २४ तास मधे नोकरीची ऑफरः झी २४ तास - रहा एक पाऊल पुढे.

अच्छा हूआ आज ही हार गये. ईंग्लैंड से हारते तो तीन गुना लगान देना पडता.

जिंकलेली हरलो असं झालं नाही अ‍ॅक्चुअली आज. १९२ केल्यामुळे आपण जिंकू असे खरं उगीच वाटले होते. पण मान्य करायला हवं, त्यांची इनिंग्ज सुरु झाल्यापासून १-२ विकेट गेल्या तरी 'आता जिंकत आलो' अशी आपली परिस्थिती नव्हती कधी. त्यांनी निसटू दिलीच नाही मॅच.

आयसीसी रँकिंग मध्ये विंडीज नंबर दोनला आहेत.. भारताच्या नंतर.. आणि फायनल जिंकल्यावर एक नंबरवर जातील बहुतेक..

एकंदरीत छान झाली मॅच!
काल नो बॉल आणि रोप स्पर्श ह्यामुळे ३ वेळा सिमन्स वाचला आणि सामना जिंकुन दिला त्यानेच शेवटी!

पण विंडीज ने झटपट ३ बाद होऊनही जिद्द सोडली नाही! ग्रेट !!!

पराभव झाला...हरकत नाही. त्यातही शान आहे. आपले अकरा आणि त्यांचे अकरा असाच हा मुकाबला झाला. शेवटच्या षटकापर्यंत तराजू वरखाली होत असल्यामुळे खेळातील रोमहर्षकता किंचितही कमी झाली नाही.

एरव्ही पराभवामुळे सर्वत्र खिन्नता पसरते पण या वेळी तसे न व्हायचे कारण म्हणजे प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्याकडील फलंदाज क्रमांक अव्वल दुसर्‍याच षटकात तंबूत परतल्याचे पाहूनही स्थितीपुढे दबून न जाता आपल्या खेळगुणांचे योग्य असे प्रदर्शन करून जवळपास दोनशे धावांचा पल्ला गाठला, त्याचे कौतुक होणे गरजेचे आहे.

अभिनंदन....दोन्ही संघांचे.

हार्दिक पांड्या च्या त्या नो बॉल ने "लगान" चित्रपटातील नो बॉल ची आठवण करून दिली. त्यात सुध्दा नो बॉल नंतर षटकार मारतो. यात सुध्दा तेच घडले.

सेमीफायनल व्हायला पाहिजे तशीच अटीतटीची झाली. सॅमीची वेस्ट इंडिज टीम जिंकून फायनल ला पोचली. गेल्या २-३ वर्षांत त्याने ज्या पद्दतीने टीमला बांधलं आहे, त्याचं हे फळ म्हणता येईल. गेल ला लवकर बाद करुनही ( बुमराचा तो बॉल बुमरा स्वत : आयुष्यभर विसरणार नाही !) टीम वर्क ने जिंकले. मजा आली काल.
प्रेस कॉनफर्न्स मधे निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी ने ज्या पद्धतीने त्या पत्रकाराला आपल्या स्ट्राँग रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने स्टंप केले.. लाजवाब Happy
एक गोष्ट खटकली, ज्याचा इथे आवर्जुन उल्लेख करावासा वाटला. रहाणे ने ६८ बॉल मधे ४० च धावा केल्या, या २०-३० धावा कुठेतरी कमी पडल्या हा त्याचा सूर अजिबातच पटला नाही. या सिरीज मधे ओपनर म्हणून धवन ने जितक्या धावा सगळ्या मॅचेस मधे मिळून केल्या, तितक्या च साधारण रहाणे ने एकाच मॅच मधे केल्या. त्याची जबाबदारी होती की पडझड न होता, छान सुरुवात करुन देणे, ते त्याने केलं. रोहित आणि कोहली बरोबर उत्तम भागिदारी केल्या. कोहली सुरुवातीला चाचपडत होता, आउट होता होता वाचला, तेव्हा जपून खेळणंच गरजेचं होतं. कोहलीची विकेट पडली असती त्या वेळी तर फारच स्वस्तात हरलो असतो. मग धावा कमी पडण्याचा दोष रहाणेचाच का. स्वतः धोनी ने २४ बॉल मधे १५ च धावा केल्या, मान्य आहे तो शेवटी शेवटी आला खेळायला. मुळात धवनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता ( महत्वाच्या मॅच मधे हमखास खेळणे), त्याला काल ड्रॉप करुन रहाणे ला घेणे हाच एक जुगार होता.रहाणे टेस्ट , वनडे आणि टी-२० मधे पण संघाच्या गरजेनुसार हवं तसं, हवं त्या जागी खेळू शकतो, आणि तरी त्याच्याबद्दल असं काहीतरी ऐकावं लागलं की फार वाईट वाटतं. पुलंच्या भाषेत त्याच्याशी असा रडीचा डाव नका खेळू असं म्हणावंसं वाटतं. आपल्या बॉलर्सची कामगिरी पण काल चांगली नव्हती. ३ कॅचेस सुटले मोक्याच्या क्षणी (त्यातले २ नो बॉल्स !) मग धावा कमी पडणे हा दोष फक्त जिंक्सचाच का !!!!

रहाणेला कोणी काही बोलूच शकणार नाही कारण एक तर तुम्ही संपुर्ण स्पर्धेत खेळवला नाही आणि मग उतरवला ते डायरेक्ट सेमी फायनल सारख्या अतिशय दडपण असलेल्या सामन्यात ते ही चांगली ओपनिंग पार्टनर्शिप हवी हा एक अतिरिक्त दबाव देऊनच. अश्या परिस्थितीत रहाणेनी जी खेळी खेळली त्यास तोड नाही

६८ मिन्टे आणि २४ मिन्टे ... बघण्यात चूक झाली बहुधा. Happy २०-२० मध्ये कुठले हो कोणाला ६८ बॉल खेळायला मिळणार!

Pages