२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सबब निश्चित नाहीं पण -
१] इतक्या विकेटस हातांत असताना धोनीने रैनाला आपल्याआधीं खेळायला पाठवायला हवं होतं; कितीही अपयशी ठरला असला तरीही रैना हा धडाकेबाज फलंदाज आहे, डावरा आहे व एवितेवी त्याला संघांत घेतला होताच ना !!!
२] पांड्या काल निर्विवाद महागांत पडला व तो 'नो-बॉल' तर अक्षम्यच होता; पांड्याला आंखूड टप्प्याचे चेंडू सतत टाकण्यापासून धोनी रोखूं शकला असता पण तसं धोनी किंवा नेहरा त्याला सांगताना दिसले नाहीत.
३] शेवटची ओव्हर 'पार्ट-टाईम' गोलंदाजाला टाकावी लागणार नाही, याची खबरदारी घेणं आवश्यक होतं.
४] रोहित बाद होईपर्यंत रहाणेचा रोल आदर्शवत होता. पण रोहित बाद झाल्यावर त्याने धांवगती वाढवणं निश्चितच अपेक्षित होतं.
५] आडव्या-तिडव्या फटकेबाजीचीही टी-२०मधें महत्वाची भूमिका असते, याचंही प्रत्येक फलंदाजाने भान ठेवायला हवं. आपण अप्रतिम ,शैलीदार व आक्रमक फलंदाजी करतों पण टी-२०मधे त्याला आडव्या-तिडव्या फटकेबाजीचीही जोड देणं आपल्या जमत नसावं किंवा कमीपणाचं वाटत असावं.

हमे तो लुट लिया, मिल के नो बॉलों ने..
लंबे लंबे छक्कों ने, शॉर्ट पीच बॉलों ने..

वेल प्लेड इंडीज Happy

>>धोनी का करारा जबाब
पहील्यांदा बघितला तो व्हिडीओ तेंव्हा भारी वाटला पण नंतर विचार करता जाणवले की dhoni has crossed the limits
त्या पत्रकाराच्या प्रश्नाचा रोख चुकीचा नव्हता..... डिवचणाराही नव्हता..... धोनीकडून हे अपेक्षित नव्हते.... जरी lets have some fun म्हणून केले असले तरी!
मुळात तो प्रश्न धोनीच्या फीटनेसबद्दल नव्हताच.... धोनी फीटनेसवर का घसरला कुणास ठाउक?
असल्या प्रश्नांना तो वैतागला असणार नक्कीच आणि इथे त्याचे फ्रस्टेशन बाहेर पडले ... काही लोकांना त्याचे हे वागणे कुल वाटू शकते पण मला तरी ते तसे वाटले नाही..... असो!

Unlike the dhoni, whom I like!

>>रहाणेला कोणी काही बोलूच शकणार नाही कारण एक तर तुम्ही संपुर्ण स्पर्धेत खेळवला नाही आणि मग उतरवला ते डायरेक्ट सेमी फायनल सारख्या अतिशय दडपण असलेल्या सामन्यात

अरे मित्रा, सिमन्स पण तसाच उतरलेला डायरेक्ट सेमीजला.... आंतरराष्ट्रीय खेळाडूने असल्या सबबी द्यायच्या नसतात!
आख्खा पॉवरप्ले खेळून जर तुमचा स्ट्राइकरेट १२० च्या आत घुटमळत असेल तर हे काही बरोबर नाही!

>>३] शेवटची ओव्हर 'पार्ट-टाईम' गोलंदाजाला टाकावी लागणार नाही, याची खबरदारी घेणं आवश्यक होतं.

आधी जोगिंदर शर्मा, मग पंड्या.... वाढला ना कॉंफिडंस धोनीचा.... त्याला वाटले असेल काढुन देइल मॅच कदाचित कोहली!

पार्टटाइमरचे म्हणाल तर आपल्याकडे निम्मे पार्टटायमरच आहेत.... जडेजा आणि पंड्याला फुल टायमर म्हणायचे म्हणजे अवघडच आहे !
आणि काही म्हणा.... पहिली ओव्हर कोहली ने फुल टायमरपेक्षा पण भारी टाकली होती!

बुमराह आणि नेहराच्या ओव्हर आधी काढल्या नसत्या तर मॅच कदाचित लास्ट ओव्हरपर्यंत गेलीच नसती!

सिमन्स पण तसाच उतरलेला डायरेक्ट सेमीजला.... आंतरराष्ट्रीय खेळाडूने असल्या सबबी द्यायच्या नसतात! >>
सिमन्स आणि रहाणेची तुलना होऊ शकते का? रहाणेचा स्ट्राईकरेट १८०-२५० कुठल्या टी-२० मधे बघितला. ?
त्याला हाणामारीसाठी नाही तर स्थैर्यासाठी घेतले होते. त्याच्या कडून हाणामारी झाली नाही हे मान्य परंतू मागिल सगळ्या सामन्यात सलामीचे स्थैर्य मिळत नव्हते म्हणून आपण १५० धावा करायला सुध्दा हाफत होतो. रहाणे काही गेल , रॉय सारखा तडाखेबाज फलंदाज नाही. त्याला धोनीने जा पहिल्या ६ षटकात बिन्धास्त हाणामारी कर असे लायसेन्स देऊन पाठवले नसणार. ते काम रोहीत शर्माचे , शिखर धवन चे होते. जे त्यांनी अजिबात केले नाही म्हणून हाणामारी सोडून धोनी स्थैर्याकडे वळला.
सिमन्स हा मुंबई इंडीयन्स कडून खेळनारा आहे त्याला मुंबईची खेळपट्टी अतिशय उत्तमरित्या ठावूक आहे. आणि आपले महान पांड्या आणि जाडेजा साहेबांनी त्यांना शॉर्टपिच बॉलची थाळी सजवून दिली होती.
सिमन्सचे रन्स जर बुमरा, नेहरा यांच्या गोलंदाजीवर काढलेले वेगळे करून बघा तुम्हाला कल्पना येईल उलट वेस्ट इंडीजचे ब्रेथलॉस, इ. नी अचूक यॉकर टाकले होते.

सिमन्सची तुलना यासाठी की तो देखील डायरेक्ट सेमीजला येउन खेळला.... रहाणे किमान संघाबरोबर तरी होता पण सिमन्स तर आयत्या वेळी संघात दाखल झाला होता
सिमन्स मुंबई इंडियन कडून खेळत असेल तर रहाणे तर खेळायला लागल्यापासून आपल्या मुंबईचाच होता की!

सांगायचा मुद्दा काय तर ३५-४० बॉल (म्हणजे पूर्ण इनिंगच्या जवळजवळ १/३) आणि तेही पॉवरप्ले मधले, जर एखादा खेळाडू १२० च्या स्ट्राईक रेटने खेळत असेल तर बाकीच्यांचे काम किती वाढते
अगदी १८०-२५० जाउदे पण किमान १५० चा स्टाइक रेट तरी ठेवायला हवा! ..... किमान पाटा विकेटवर आणि खाली विकेट्स शिल्लक असताना!

समोर पांड्या आणि जाडेजासारखा बॉलर हलव्यासारखी बॉलिंग टाकली असती तर नक्कीच मारले असते.
धोनी गळा फाडून जाडेजाला सतत सांगत होता की "इससे दुर डाल" तरी त्याला बॅटी खाली चेंडू टाकत होता. दुर डाल म्हणजे गुडलेंथ वर टाक पण जाडेजाने दुर चा अर्थ वाईड घेऊन ऑफस्टंप च्या बाहेर सतत चेंडू टाकले जे सहज फोर सिक्स जात होते

सिमन्सची तुलना यासाठी की तो देखील डायरेक्ट सेमीजला येउन खेळला.>>> हो अगदी, सकाळी उतरला पठ्या विमानातुन आणी सन्ध्याकाळी अशी इन्निग खेळला...
पॉवरप्ले मधे अजुन धावा कुटत्या आल्या असत्या, मधे मधे जे १-२ पळुन चालल होत तिथे ४-६ रन पाहिजे होत... आपली बॉलिन्ग अशक्य बेकार आहे... ३ नो बॉल जाणे अति महागात पडले.

अरे हो! ते चुकुन लिहल,

भारता कडे चांगला बॉलर नाही
,
,
याच मुख्य कारण हे आहे कि
,
,
,
,
,
,
,
,
भारता मधे.....
लहाणपनापासुनच
बँटिंग झाल्यावर
घरी पळून जायची
सवय आहे

भाऊ पहिला सोडून सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन.

१] इतक्या विकेटस हातांत असताना धोनीने रैनाला आपल्याआधीं खेळायला पाठवायला हवं होतं; कितीही अपयशी ठरला असला तरीही रैना हा धडाकेबाज फलंदाज आहे, डावरा आहे व एवितेवी त्याला संघांत घेतला होताच ना !!!
>> रैना नि धोनीचा फॉर्म बघता त्याने हा निर्णय घेतला असावा.

२] पांड्या काल निर्विवाद महागांत पडला व तो 'नो-बॉल' तर अक्षम्यच होता; पांड्याला आंखूड टप्प्याचे चेंडू सतत टाकण्यापासून धोनी रोखूं शकला असता पण तसं धोनी किंवा नेहरा त्याला सांगताना दिसले नाहीत.
>>हा आखूड टप्प्यंचे बॉल हा डावपेचाचा भाग होता असे सारखे वाटले पण त्यामागे काहीच प्लॅन ब नव्हता असे वाटले पंड्या extra pace generate करतो असे असल्यामूळे असेल पण मुंबईच्या पिचवर हे बॉल मस्त पट्ट्यात आले.

३] शेवटची ओव्हर 'पार्ट-टाईम' गोलंदाजाला टाकावी लागणार नाही, याची खबरदारी घेणं आवश्यक होतं.
>> dew factor मूळे एकही स्पिनर चालत नाही असे लक्षात आल्यामूळे झालेला नाईलाज असावा.

४] रोहित बाद होईपर्यंत रहाणेचा रोल आदर्शवत होता. पण रोहित बाद झाल्यावर त्याने धांवगती वाढवणं निश्चितच अपेक्षित होतं.
>> मान्य आहे. फक्त राहणेला वाकडे तिकडॅ शॉट्स मारता येत नाहीत त्यामूळे हे शक्यच नव्हते. स्फोटक सुरूवात एव्हढेच लक्ष असेल तर राहाणे नि रोहित दोघेही त्या प्लॅणमधे बसू शकत नाही. धवनच्याही limitations आहेत पण त्यातल्या त्यात तो आडवे तिडवे फिरवतो जे लागतात . जर बदल करायला सुरू करायचे असेल तर योग्य वेळ आहे.

५] आडव्या-तिडव्या फटकेबाजीचीही टी-२०मधें महत्वाची भूमिका असते, याचंही प्रत्येक फलंदाजाने भान ठेवायला हवं. आपण अप्रतिम ,शैलीदार व आक्रमक फलंदाजी करतों पण टी-२०मधे त्याला आडव्या-तिडव्या फटकेबाजीचीही जोड देणं आपल्या जमत नसावं किंवा कमीपणाचं वाटत असावं.
>> ४-५- क्रमांकांच्या बॅट्समनकडून हि तयारी करायला सुरूवात व्हावी.

पंड्या extra pace generate करतो असे असल्यामूळे असेल <<< पांड्या चा वेगापेक्षा जलद तर कुंबळे गोलंदजी करत असेल Wink

तुम्ही जो एक्स्ट्रा पेस म्हणतात ना तो बुमरा जनरेट करतो त्यामुळे गेल ला त्या चेंडुच्या वेगाचा अंदाज आला नाही. बुमरा यॉकर करणार हे माहीत होते त्यानुसार त्याने फ्लिक मारण्याचा प्रयत्न केला पण अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने चेंडू आल्यामुळे स्टंम्प्स उडाले.
बहुदा गेल लवकर गेल्यामुळे आपण गाफिल राहिलो. ( मी तर आनंदाने नाचनेच बाकी ठेवलेले Sad )

मी आधी लिहिलय वर, अक्षरशः लहान मुलं बॉलिंग करत आहेत इतके साधे बॉल येत होते. आता ह्यात पिच चा दोष किती आणि बॉलरचा किती ते माहित नाही. अश्विनला आजिबात टर्न मिळत नसताना तो ऑफ स्टंप बाहेर का टाकत होता? बहुतेक मोठे शॉट मारता येऊ नये म्हणून असावा पण ऑफलाही प्रचंड धुतला त्याला. बुमराहनी ज्या स्विंग वर गेल ला आउट केलं तसले बॉलच काही करु शकले असते काल आणि खेदानी पंड्याला ते जमले नाही.
त्यात हे प्लेयर अतिशय पावरफुल आहेत आणि त्यावर वानखेडेच्या बाऊंडर्‍या जवळ आहेत.
स्कोअर चांगला होता आपला आणि मी तर म्हणतो आपण बॅटिंग जास्त चांगली केली कारण इंडीज बॉलिंग करत असताना बॉल थोडातरी वळत होता आणि त्यावर त्यांनी चांगली बॉलिंग सुद्धा केली. आपला बॉलिंग अटॅक अगदीच फिक्का पडला.
युवराजची कमी जाणवली काल. रहाणे अन कोहलीला मोठे फटके जमत नाहीत. वि अ‍ॅब्सोल्युटली नीड कोहली पण युवराज, रैना, रोहित ह्या करताच हवे असतात. पंड्यानी पण चांगले फटके मारले होते आधीच्या मॅच मध्ये.

आपण कालचा सामना हरलो व कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणुन अस म्हणत नाही.. पण काल जसा आपण सामना हरलो म्हणुनच मला टी २० क्रिकेट एवढे भावत नाही.. पण सध्या आय पी एल व टी २० ला फारच लोकप्रियता मिळाली असल्यामुळे माझ्या ओपिनियन ला कोणी ढुंकुनही बघणार नाही किंवा किंमत देणार नाही तरी पण मला असे वाटते टी २० क्रिकेट्ची मॅच खेळणे हे म्हणजे जुगारात क्रॅप शुट खेळण्यासारखे आहे... ऑन एनि गिव्हन डे कोणताही संघ जिंकु शकतो.. म्हणुन मग भारत बांगलाबरोबर कसा बसा जिंकतो काय किंवा काल विंडीज बरोबर असा हरतो काय किंवा अफगाणीस्तान त्याच विंडीजला हरवतो काय... काय अन काय काय.. असे विनोदी रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात.

फक्त एवढेच वाईट वाटले की विराट सारख्या जिगरबाज व टॅलंटेड क्रिकेटपटुने संपुर्ण स्पर्धेत एवढे चांगले, प्रॉपर व जिव तोडुन क्रिकेट खेळुनही त्यालाही पाकिस्तान व बांगला देशच्या क्रिकेट पटुंसारखे वर्ल्ड कप शिवाय हात हलवुन घरी परतावे लागले. त्याने एकट्याने सिंगल हँडेडली हा कप आपल्याला जवळपास आणुनच दिला होता.. रिअली स्पेअर अ थॉट फॉर हिम.. टेक अ बाव कोहली.. तुला मानाचा मुजरा.. बिचारा कोहली..:(

Ravish Kumar NDTV
5 hrs ·
उन आख़िरी पलों में जब भारत हार रहा था !!
रात के दस बज रहे थे । दिल्ली के निज़ामुद्दीन ब्रिज वाले रास्ते पर कारें अपने आप चली जा रही हैं । कोई कार किसी से आगे नहीं निकलना चाहती है । न कोई दायें से निकल रही है न बायें से । सब एक दूसरे के पीछे होती लग रही हैं । दौड़ने की जगह डगर रही हैं । आमतौर पर इस वक्त निज़ामुद्दीन ब्रिज पर कारें भागती हैं। आज उन्हें कहीं पहुंचने का मन नहीं कर रहा। मैं अगल बगल की कारों में ताकझांक करने लगा। चालकों के चेहरे उड़े हुए हैं ।
भारत की स्थिति ख़राब होने लगी है । सिमन्स का हर शाट धड़कनों को डरा दे रहा था । कारों के भीतर रेडियों पर आ रही कमेंट्री ने सबको खामोश कर दिया । सामने की कार में मैडम की पतली सी हथेली अपने पति या दोस्त के हेड-रेस्ट पर थपथपाने लगी । उंगलियों की थाप से पता चल रहा था कि कोई लय नहीं है। बेचैन हैं उनकी उंगलियां। 20 गेंदों में चालीस रन बनाने हैं। कमेंटेटर के इस एलान ने कारों की रफ्तार और धीमी कर दी।
सड़क पर सन्नाटा पसरने लगा। कारों से भरी सड़क पर ऐसा सन्नाटा पहली बार महसूस कर रहा था। कोई किसी से आगे निकलने के लिए ज़ोर ज़ोर से हार्न नहीं बजा रहा था। ऐसा लग रहा था कि ड्राईविंग सीट पर कोई है ही नहीं। कारें किसी पहाड़ी की ढलान से अपने आप धीरे धीरे उतर रही हैं ।
तभी गाज़ीपुर लाल बत्ती पर कारें रूक गईं। अचानक कमेंटेटर ने कहा कि सिमन्स का कैच बाउंड्री पर पकड़ा गया है। विराट कोहली ने कैच लिया है। स्टेडियम से आने वाली ज़ोरदार आवाज़ से कारों के भीतर का उत्साह बदल गया। बायीं तरफ लगी इनोवा के ड्राईवर के दांत दिखने लगे। दायीं तरफ मर्सिडिज़ में बैठी मोहतरमा ने बालों को जूड़े से आज़ाद कर दिया। बगल में बैठे उनके शौहर या दोस्त ने मुस्कुरा दिया। लाल बत्ती हरी हो गई। कमेंटेटर ने बताया कि सिमन्स आउट नहीं हुए हैं। कारों की रफ्तार फिर धीमे हो गई।
घर पहुंचते ही गेट पर दरवानों के चेहरे उड़े हुए थे। दफ्तर से घर आते वक्त मोहल्ले के मोहल्ले से गुज़रता रहा। मुर्दा शांति छाई हुई थी। बगल की सोसायटी से अंतिम ओवर के स्कोर की आवाज़ आ रही थी। लोग बाहर बड़ा सा पर्दा लगाकर मैच देख रहे थे । जब तक लिफ्ट से ऊपर आता वो आवाज़ भी शांत पड़ चुकी थी। बालकोनी से देखा तो लगा कि लोग आज जल्दी तो नहीं सो गए । आमतौर पर भारत के जीतने पर इन्हीं घरों और खिड़कियों से ज़ोर की आवाज़ आती हैं । सड़कों पर लोग ज़ोर ज़ोर से हार्न बजाने लगते हैं । सड़क का हाल देखकर लगा कि सब नींद में चल रहे हैं ।
दुख हुआ । क्रिकेट हम सबको कितना धड़का देता है। कितना खुश कर देता है। कितना हंसा देता है। कितना रूला देता है। मोहल्ले की चुप्पी से पता चल गया कि भारत हार गया है। मैंने अंतिम स्कोर पता भी नहीं किया और यह अंतिम लाइन लिख दी।
मैं क्रिकेट का प्रेमी नहीं हूं। कभी कभार ही देखता हूं लेकिन रात के इस सन्नाटे को अपने भीतर महसूस कर रहा हूं। काश अब भी किसी सोसायटी से जीतने की हुंकार की आवाज़ आ जाती। कहीं ऐसा तो नहीं कि मुझे सुनाई नहीं दे रही है। अरे भाई उठिये, बाहर निकलिये और ज़ोर से कहिये, हार गए तो क्या हुआ, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। विराट कोहली ज़िंदाबाद। धोनी ज़िंदाबाद। प्यार करते हैं तो हार में भी प्यार कीजिए। वही सच्चा प्यार होता है। खेल से प्यार है तो कह दीजिये वेस्ट इंडीज़ ज़िंदाबाद !

-----

याच्या शब्दात ताकद आहे यार.

मुकुंद कोह्लीबद्दल अचूक बोललात.

मायबाप, तुम्हाला पांड्या आवडत नाही हे माहित असूनही एव्हढेच सांगेन, पुढच्या वेळी पंड्याने बॉल टाकल्यानंतर टी.व्ही.वर खाली जी रन्स वगैरे ची स्ट्रिप येते त्यात स्पीड दिलेला असतो त्यावर नजर ठेवा. १३९ च्या आसपास मधेच एखादा बॉल टाकला जातो हे लक्षात येईल. आता तुमचे असे म्हणणे असेल कि सर्व भारतीञ बॉलर त्या रेंजमधे असतात तर बहुधा आपण वेगळ्या प्रकारे स्पीड मोजतो असे म्हणयाचे नि गप्पा बसायचे. Wink

बुवा dew factor पण लक्षात घ्या, बॉल वर नीट ग्रिप नसेल तर एखादा से.मी. फरक पाडू शकतो. अशा मह्त्वाच्या सामन्यांमधे टॉस जिंकणे मह्त्वाचे ठरावे लागते हा अतिशय वाईट प्लॅनींगचा प्रकार आहे. ही सबब नाही पण हे असे बरेचदा घडलेले आहे. विशेषतः भारतीय उपखंडांमधे हे जास्ती होते.

इथे आवडण्याचा प्रश्नच नाही. त्याच्याकडे विविधता नाही आहे. सगळेच शेन वॉट्सन अथवा जॅक कॅलिस बनु शकत नाही. विविधता आली तर नक्कीच बनेल. मॅच एनॅलिसिस मधे त्याने चेंडू कुठे टाकले हे दाखवले. जे चेंडू त्याने पुढे गुडलेंथ वर टाकले त्यावर फलंदाज वेळोवेळी मिस झालेला. असे असताना परत शॉर्ट करत राहणे हा त्याचा दोष की धोनीचा? त्याला स्वतःला समजले नाही का की त्या ठिकाणी टाकल्यावर आपल्याला स्विंग सुध्दा मिळत आहे आणि समोरचा मिस सुध्दा करत आहे. ?

सेम तसेच जाडेजाच्या बाबतीत झाले आहे.

ड्यु बद्दल टोटली अग्रीड असामी. काल शेवटी फडकं मागावलं होतं बॉल नीट पुसायला.
पण अशी परिस्थिती म्हणजे बॉलिंग साईड गॅरंटीड हारणार अशी असते का? इथेच बॉलरचा, कॅप्टनचा अनुभव पणास लागतो. नेहरानी कसली बॉलिंग केली! बुम्राह नी पण चांगली केली.

आपण जर इतकं मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतो, तर आपले गोलंदाज [ बुमराह सोडून] 'यॉर्कर' टाकण्याचा सराव कां करत नाहीत ?

मला वाटतं रहाणे ने त्याच्या भुमिकेला न्याय दिला. खाली एव्हढी फायरपॉवर असताना, त्याने १२ व्या ओव्हर पर्यंत अँकर ची भुमिका बजावली आणी मोठा फटका मारताना आऊट झाला. सिमन्स ला जमलं, मग रहाणेला का नाही हा प्रश्न गैरलागू आहे. प्रत्येकाची खेळण्याची एक पद्धत असते. उगाच एखाद्या शास्त्रीय संगीत गाणार्या गायकाला मैफीलीला बोलावून मधेच आता यमन कल्याणात तुम तो ठहरे परदेसी म्हणून दाखवा म्हणण्यात काय अर्थ आहे? पॉवर हिटींग हा वेस्ट ईंडियन क्रिकेट चा आत्माच आहे. त्याची तुलना नजाकतभरी, टायमिंग बेस्ड बॅटींग करणार्या भारतीय बॅटींग शी कधीच नाही होऊ शकत. माझ्या आठवणीत तरी एखादा अतुल बेदाडे, किंवा युसुफ पठाण, आणी सुरुवातीचा धोनी वगैरे वगळता, केवळ रॉ पॉवर वर शॉट्स मारणारे भारतीय बॅट्समन फारसे नाहीत.

स्वरूप, धोनी च्या त्या व्हिडीओ बद्दल अनुमोदन. पहिल्यांदा पहाताना मजा वाटली, पण नंतर जाणवलं की जे घडलं ते त्या पत्रकारा च्या बाबतीत अनफेअर होतं. प्रश्न विचारणं हा त्याच्या कामाचा भाग होता. तो प्रश्न धोनी च्या क्रिकेट शी संबंधित होता (वैय्यक्तिक नव्हता). मुळात ह्या अशा पत्रकार परिषदा संघाचे मिडीया मॅनेजर्स कंट्रोल करतात. (फेसबूकवर भारतीय क्रिएक्ट संघाचं एक पान आहे, ज्यात पत्रकार परिषदेचे पूर्ण व्हिडीओज आहेत) त्यामुळे किती प्रश्न घेणार, कुठल्या प्रश्नांना उत्तरं देणार वगैरे आधी ठरलेलं असतं. त्यातून धोनीने, तु भारतीय पत्रकार असतास, तर मी असं असं बोललो असतो असं म्हणून मनातली सगळी मळमळ ओकुन घेतली. त्या माणसाला पुढे बोलावताना धोनी ला तो भारतीय नाहीये हे 'दिसलं' नव्हतं?

समजा त्या माणसानं धोनी ला प्रत्त्युत्तर दिलं असतं की बाबा रे, तुझ्या एखाद्या धाकट्या भावाला वगैरे पत्रकार का नाही बनवत म्हणजे तो तुला हवे तसे प्रश्न विचारेल तर तो मिडीया मॅनेजर थयथया नाचला असता. उगाच कैच्या कै.

मायबाप... प्रॉपर हिंदी वाचल किंवा ऐकल की खरच चांगल वाटत.. लिहीलेही चांगल आहे. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

असामी, मायबाप्, वैद्यबुवा, केदार आणी इतर..तुम्ही कितीही पराभवाची किंवा विजयाची कारणभिमांसा केलीत तरी एक बाब मान्य केली पाहीजे की विराटने जी जिगर व जिवतोड मेहनत दाखवली त्याच्या निम्म्यानेही जर अजुन १-२ की फलंदाज व बोलर्सनी दाखवली असती तर आपण हा कप निश्चितच जिंकलो असतो.

विराटही फलंदाजीला अनुकुल नसलेल्या खेळपट्टीवर अप्रतिम खेळ्या खेळला होता (कलकत्ता, मोहली वगैरे) जिथे बाकीचे फलंदाज तक्रार करत होते..या पिचवर चेंडु खुप वळत आहे.. त्या पिचवर चेंडु कसा बॅटवर येत नव्हता वगैरे... .मुंबई सामन्यातल्या "ड्यु" फॅक्टरचा " ड्युली" विचार करुन सुद्धा वैद्यबुवा वर म्हणाला त्याप्रमाणे आपले बोलर्स (नेहरा सोडुन ) अक्षरशः मुर्खासारखे गोलंदाजी करत होते.. अफकोर्स.. कोहलीसारखा क्रिकेट जिनिअस आय क्यु सगळ्यांकडुन अपेक्षित करणे चुकीचेच आहे.. ही इज वन ऑफ अ काइंड.. हिरा!

यॉकर सकट आपण आता चेंडू ओला करून सराव करायला हवा. म्हणजे ड्युफॅक्टर वर मात करता येईल. ग्रीप करायला त्रास होतो चेंडूचा पुसला तरी धाग्यामधे जे पाणी जमा असते ते बोटांनी दाबल्यावर बाहेर पडते आणि चेंडू सोडताना बोटांमधून सटकतो.

मी काय म्हणतो मिक्सरसारखे एक पोर्टेबल उपकरण अंपायरजवळ ठेवले तर. म्हणजे त्यात चेंडू टाकून गरम करायचा म्हणजे त्यातून "ड्युफॅक्टर" निघून जाईल Wink नाहीतर बाँड्रीलाईनच्या बाहेर उपकरण घेऊन आपली माणस उभी करून त्यांच्याकडे लगेच चेंडू फेकायचा आणि कोरडा करुन घ्यायचा

या उपकरणाचा शोध लावला पाहिजे.

बाकी काही माहित नाही. पण इंडियन बॅटिंग लिव्हड इन अ फँटसी !

अगदी पहिल्या मॅच पासून माझ्यासारख्या अननोन क्वाँटिटीला जाणवत होते.

१. हा मारू शकत नाही, तो मारू शकत नाही ही कारणेच पटण्यासारखी नाहीत. मग नका खेळू WT20 इथे स्फोटक सुरूवात हवी आणि सगळेच ती गेले कित्येक वर्ष करत आहेत. जर त्यातूनही शिकता येत नसेल तर कुठेतरी कमी पडणारच. आपण दोन मॅच ऑलमोस्ट हारत हारता जिंकलो आहोत. त्यामुळे आपण ह्या चॅलेंजेसना प्रिपेअर्ड नव्हतो.

२. एकेक धावा घेऊन स्ट्राईक रोटेट करणे हे उच्च आहे पण त्यावरच भर देणे नडते. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये आपण असेच खेळतो. इथे जिंकायला १, २ धावा नाही तर सिक्स लागतात. त्यात देशाच्या बॉलिंगवर इतर अनेक बॅट्समननी खूप जास्त सिक्स आणि ४ मारले आहेत.

३. पूर्ण टुर्नामेंट मध्ये १ च मुख्य बॅट्समन घेऊन खेळलो. ते जास्तच नडले. इतर टीम मध्ये तीन चार लोकं एकत्र फायर होत होते.

४. बॉलिंग मध्ये कुठहाली प्लान काल दिसत नव्हता. अगदी येथील लोकंही म्हणत होते की ही काय बॉलिंग चालू आहे. ड्यु आहे हे मान्य. पण ड्यु असणार होते हे आधीपासूनच माहिती होते. त्यामुळे त्यातही नविन काहीच नाही.

-

जाताजाता - धोणी त्याचा कुलनेस घालवून बसत आहे. त्या दोन्ही पत्रकारांना त्याने जसे उत्तर दिले ते लोकांना आवडले कदाचित, पण मलाही नाही आवडले. हसत हसत चिडकी खेळी वाटली.

Pages