दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिरियल जास्त मॆच्युअर्ड करायला हवी तरंच मजा येईल. सुरुवातीला काही वेळा वाटून गेलंही, अगदी परवाही कैवल्य आणि रेश्माच्या शेजारी झोपण्याच्या प्रसंगाच्या हाताळणीवरुनही, की मालिका तशी डेव्हलप होत जाईल पण आता उगीच टिपिकल गोष्टींवर भर देणं चाललय. >> शर्मिला, सहमत. मी हाच एपिसोड पाहिला, पहिलाच या सिरीजचा मी पाहिलेला. सीन ड्रॅग करतात जरा. काही काही संवाद, सटल एक्स्प्रेशन्स मस्त आहेत आणि त्याबाबतीत नेहमीच्या मराठी सिरीयल्स पेक्षा नक्कीच वेगळी आहे.

आणि विनोद होतायत ते आम्हाला समजते, मागे ट्यॉव, टुई म्युझिक मारायची गरज नाही. इतर विनोदी कार्यक्रमांच्या मानाने यात फारसे मारत नाही तसे, पण टाळायला पाहिजे.

पहिलाच पाहिलेला एपिसोड २०-२५ मिनीटांनंतर एपिसोड ड्रॅग होतोय असे मला वाटले. जरा अजून क्रिस्प करायला हवा.

फ्रेण्डस चा प्रभाव खूप जाणवतो. सीन च्या सुरूवातीला ते राहतात ती इमारत दाखवणे, इथपासून.

'वगाड' सीन पाहिला आज. मजेदार आहे Happy

टीव्हीवरच्या व सिनेमातील तमाम अशा सीन्स लिहीणार्‍यांना उत्तर म्हणून यातील एक संवाद जो लिहीलेला आहे तो आपल्याला जबरी आवडलाय :). ती रेश्मा कैवल्यला 'मला तुला काहीतरी सांगायचंय' म्हणून दुसरीकडे बोलावते. तेथे आल्यावर पुन्हा हाच डॉयलॉग मारते तेव्हा कैवल्य 'ते तिकडे सांगून झाले, आता पुढे बोल' म्हणतो :). इतकी वर्षे सिरीयलवाल्यांना हे का नाही समजले? Happy

सगळे एपिसोड पाहता आशूचं कॅरॅक्टरच जाम नैसर्गिक आणि भावखाऊ आहे.... बाकी प्रत्येकाने किमान एकदातरी ओढून्ताणून अभिनय किंवा काही सीन कृत्रिम झालेत....

आशू मात्र..... एक नंबर.

ए मीनल.....
आय कॅन विन.... आय कॅन ईट ऑल्सो
आशू यू आर द फनी....
लाईक कमेंट शेअर.... ब्लॉक Lol

एकंदर धमाल येतेय...... !!!!

मला भयंकर भयंकर आणि भयंकर आवडलेय सूजय "एक मिनिट"म्हणतो ते....

बाकी सरसकट सर्वच सिरियल्स मधे "एक मिनिटं / एक मिन्टं" वगैरे उच्चार ऐकून वात याय्चा काय करावं यांच्या मराठीचं म्हणून :स्मितः

हो शर्मिला, तो (या वरच्या एपिसोडच्या) नंतर असेल तर मिळेल. कारण येथे काही रिसेण्ट एपिसोड्स असतात झी वर चे. आधीचा असेल तर शोधतो कोठे मिळतो का.

मला सगळ्यात जास्त आवडलेला डायलॉग:
आशु झोपेत म्हणतो, "किंजल, यू आर द माईन"
आणि..
झोपेतच सुजय त्याला करेक्ट करतो.. "यू आर माईन"

सुजयला दाखवतपण नाहीत.. फक्त आवाजवरुन आपण ओळखतो.. खुप सही दिग्दर्शन आहे हे!!

बाकी मला सुजय फार आवडतो, एक कॅरेक्टर म्हणून..

आशु झोपेत म्हणतो, "किंजल, यू आर द माईन"
आणि..
झोपेतच सुजय त्याला करेक्ट करतो.. "यू आर माईन"

सुजयला दाखवतपण नाहीत.. फक्त आवाजवरुन आपण ओळखतो.. खुप सही दिग्दर्शन आहे हे!! >>+१००००

मी आत्ताच हा भाग पाहिला. कसलं जबरी वाटलं ते.

टीआरपी वर परीणाम झाला म्हणून अचानक ट्रॅक बदलला की काय ? इतके दिवस जानीच्या बाबांना सुचलं नाही जावयाला भेटावं ??

आता आ आ जानीच्या आईला शिक्षा करणार - अशी लाईन फिरत होती......

किंजलवाला एपिसोड धमाल होता. आज राकेशच्या खोट्या फोनवरून रेश्माचं चिडणं मस्त असेल.
आशू एकदम गोजिरवाणा बावळट आहे राव Lol

प्राजक्ता, गल्ली चुकलात Light 1 Wink

आशू एकदम गोजिरवाणा बावळट आहे राव <<<< आणि किंजल त्याला आशुडी म्हणते ते भारी आहे Wink

हल्ली सुजय तिच्या गर्लफ्रेंडशी बोलताना दाखवत नाहीत.

भज्याच्या पीठाच्या निमित्ताने रेश्माचे केस बाजूला करायला सूजय चिमटा, सांडशी समोर धरतो ते पण भारी होतं.

अजून एक या सिरीयलमध्ये आवडलं ते म्हणजे सगळ्यांचा लिमिटेड वार्डरोब दाखवलाय. घरात घालायचे कपडे आलटून पालटून तेच असतात आणि मुख्य म्हणजे घरात घालायचेच वाटतात. बाकी सिरीयल्ससारखं इस्त्री केलेल्या साडया/ ड्रेस घालून कोणी झोपत/फिरत नाही.

अजून एक या सिरीयलमध्ये आवडलं ते म्हणजे सगळ्यांचा लिमिटेड वार्डरोब दाखवलाय. घरात घालायचे कपडे आलटून पालटून तेच असतात आणि मुख्य म्हणजे घरात घालायचेच वाटतात. बाकी सिरीयल्ससारखं इस्त्री केलेल्या साडया/ ड्रेस घालून कोणी झोपत/फिरत नाही.>>+१

रेश्माकाकु नाष्ट्यासाठी वेगवेगळ्या डीशेस बनवुन ह्या बॅचलर लोकांच बजेट बोंबलवणार आहे. Happy

चैत्रगंधा, कपड्यासाठी +१

आबासाहेब, किंजल कुणालाही काहीही बोलते हे आपण पाहिलं आहेच! Proud
कपडे धुण्याचा एपिसोड पण आवडला होता मला. रेश्मा बहुतेक त्यांची स्वयंपाकीणबाई होऊन पुढच्या महिन्याच्या भाड्याच्या पैशांचा बंदोबस्त करेल. तसाही सुजय लट्टू आहेच.

Pages