दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि मालिका आता बाहेरच्या रूममध्ये चालू आहे, मला आतबसल्या सारे संवाद ऐकू येत आहेत.

कोण तरी मुलगा कोणत्यातरी मुलगीच्या बाजूला झोपल्याने काहीतरी लफडा झालाय असे काहीसे चालू आहे.

एकेक संवाद पाच-पाच मिनिटांने ऐकू येत आहेत.

नाही, आमचा टीव्ही लेटकरंट नाही तर प्रत्येक जण एकेक वाक्य पॊज घेत घेत बोलत आहे. उगाच ओढून ताणून आव आणल्यागत संभाषण.

एवढा रटाळ टेम्पो कसा सहन करताहेत आमच्या घरातले देव जाणे..

मज्जा आली मला, काल पहिल्यांदाच मी पुर्ण एपिसोड पाहिला. तो कैवल्य छान काम करतो. सगळेच खरंतर. फक्त ती रडूबाई जरा लिथार्जिक वाटते.

कालचा एपिसोड आवडला. बराच सवंग करत येऊ शकत होता, (किंवा बराच रडारड पण) यांनी चिक्कर संयतपणे केला आणि थोडक्यात आटोपला.. मुळात या एपिसोडसाठी घेतलेला विषय आवडला. इतर मराठी मालिकांशी तुलना करता हे फारच संस्कृतीबुडवं वगैरे प्रकरण होतं.

ते कैवल्य "मी अपवित्र झालो" कसलं सही म्हणत होता. मज्जा आली.

ऋन्मेऽऽष... ही ऐकायची नाही तर बघायची सिरियल आहे.
>>>>
बाहेर असतो तेव्हा बघायचाही योग येतो.. झेपत जराही नाही म्हणून आत पळतो..
किती ओढून ताणून अभिनय करतात.. सगळे कृत्रिम वाटते त्यात.. नैसर्गिक असे काहीच येत नाही... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खूपच प्रेडिक्टेबल.. आत जाताना पुढे काय घडणार ते आईला सांगून आत जातो.. Happy

रेश्मा रडकी दाखवायची ठीके पण सतत नाकातलं पाणी खाली गळू नये अशा प्रकारे चेहर्याचे स्नायू विशिष्ट प्रकारे आकुंचित असतात. चुकून सैलावले तर काय म्हणून माझाही श्वास रोखला जातो मग Lol

हो, मस्त होता 'अपवित्र' एपिसोड. मजा आली Happy
मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे अत्यंत लॉजिकल संवाद.

मला रेश्मा फारशी आवडलेली नाही. अगदी पहिल्या भागापासूनच..... रेश्मा म्हणजे ते पात्र नटी नव्हे.
नंदिनी+१
कैवल्य बाबत पण +१

संवादांबाबत लेखिका मनस्विनी आहे म्हनल्यावर perfect संवाद अपेक्षितच आहे.
मनस्विनी नसेल तर मात्र जो कोणी आहे त्याला आणखी संधी मिलायाला हवी

आशूबद्दल +१ .. मीनलपण जाम आवडलीये.. काय गप्प केले तिने रेश्माच्या नवर्‍याला. खोटया सूनेबरोबर खोटा संसार !! एक्स्प्रेशन सही होते तिचे.
एकंदर सुजय आणि रेश्माचे जुळणार का ? तिच्या बाबांना तो आवडलाय तर..

@अगो, मीही क्रोमवर आताच डाऊनलोड केलं अ‍ॅड ब्लॉक.

कंटिन्यु पाहता येतात आता एपिसोड नैतर अगोदर सफोल्याने वैताग आणलेला Lol

मलाही सिरियल आवडली दोनच भाग पाहिलेत. एकतर खरंच टेन्शन नाही, सगळं पाणीच असल्याने नितळ आहे. आणि मैत्रीची नाती खरंच सुरेख दाखवलीत. आज या अशी सिरियल (आत्तापर्यंतचे भाग हं, पुढचे माहिती नाही) मुलामुलीनी आणि पालकानी देखील बघायची गरज आहे.

फॉर ए चेंज!, कालचा एप्रिल फूलचा भाग जरा बरा होता, अर्धाच पाहिला, उरलेला आतल्या रूममधून ऐकला, कारण नेहमीसारखाच प्रेडीक्टेबल दिशेने प्रवास, पुढे काय घडतेय याची उत्सुकता जराही नसणे हे नडतेय.

Chai mi mi Lol
Sujal typical premi mode madhe gelay....
April fool cha end i missed.
Anna che mom dad nahich ale na?

परवाचा आशूचा मी काय तुझी स्टेनो आहे का पण भारी होता Proud
त्या रेश्माला किचनमधून बाहेर काढा रे. खाण्याचे किती प्रकार बनवते !! काल सूजय पोहे खातांना दिसला. बाकीचे इडली. वर तिने उपमा करणार म्हणून सांगितलेले. का माझ्या पहाण्यात गडबड झाली?

Pages