Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा एक तासाचा भाग समहौ
आजचा एक तासाचा भाग समहौ बोरींग वाटला मलातरी.
रेश्माचे प्रॉब्लेम्स जास्तच
रेश्माचे प्रॉब्लेम्स जास्तच फुटेज खाऊ राहीलेत त्यामुळे असेल कदाचीत...
माझी ४ वर्षाची मुलगी म्हणते
माझी ४ वर्षाची मुलगी म्हणते "मला तो कैवल्य खुप आवडतो..."
हो टायटल सॉन्ग भारीये.
हो टायटल सॉन्ग भारीये. माझ्याही मुलीला फार आवडते. सिरीयल नाही पण निदान गाणे तरी पाहु दे अशी मागणी असते.
आसा, कैवल्यबद्दल काही बाही
आसा, कैवल्यबद्दल काही बाही बोलल्याबद्दल तुम्हाला सिक्षा का करण्यात येऊ नये?
कालचाही भाग मी मिसला. हाती आलेल्या अपडेत्स नुसार रेश्माचं कैवल्यशीच जमणार .
रीया, पण खरचं मला तो पोरेलाच
रीया,
पण खरचं मला तो पोरेलाच वाटतो. म्हणजे फारफार तर कॉलेजच्या पहिल्या दुसर्या वर्षाला असेल असा.
रडुबाई अन त्याची जोडी सुट नै होणार...
रडुबाई अन त्याची जोडी सुट नै
रडुबाई अन त्याची जोडी सुट नै होणार...>>>हो हो खरंच.
मला पण नै आवडायच बै रेश्मा आणि कैवु चं जमलेलं.
पण तसच होणारेय
पण तसच होणारेय
हो सारखा रेश्मा वर लक्ष ठेऊन
हो सारखा रेश्मा वर लक्ष ठेऊन असतो.
हो ना आणि काल म्हणे असे काही
हो ना आणि काल म्हणे असे काही डायलॉग्ज पण होते ना की ती इथे आली तिच्या निशाबात काही तरी चांगलं लिहिलंय म्हणूनच वगैरे वगैरे.
एकदा मालिकेने हे वळण घेतले की ती वायाच जाणार
कोण ती वाया जाणार?? रेश्मा
कोण ती वाया जाणार?? रेश्मा का?
पीजे पण हे प्रेम बीम नकोच.
पीजे
पण हे प्रेम बीम नकोच. त्या रेश्माचा रडवस पण आवरायला हवा आता. सारख ते बाबा आले बाबांचा फोन आला व्हायला नको.
नाही गं मालिका
नाही गं मालिका
थांबेल आता
थांबेल आता
एकदा मालिकेने हे वळण घेतले की
एकदा मालिकेने हे वळण घेतले की ती वायाच जाणार>> +१११
असं नकोच व्हायला. ते सर्वजण फक्त मैत्रीच्या नात्याने एकत्र हवेत. प्रेमाची लफडी नकोतच यात.
प्रेमाची लफडी नकोतच
प्रेमाची लफडी नकोतच यात.
>>>>>> हो ना यार! मुल मुली एकत्र आले कि प्रेमाची लफडीच दाखवायची का ? निखळ मैत्री दाखवा कि त्यांच्यातील...
अरे आपल्याला जे हवं तसं
अरे आपल्याला जे हवं तसं मलिकेत होत असतं तर.....
वाक्य पुर्ण करा
तर मालिकाच नसत्या
तर मालिकाच नसत्या
मालिकांवरचे धागे ओस पडले असते
मालिकांवरचे धागे ओस पडले असते
रेश्मा आणि कैवल्यच जमू नये
रेश्मा आणि कैवल्यच जमू नये म्हणून किती ते प्रयत्न !
मला पण एक तासाचा भाग बोअर झाला.
रेश्मात खूप बदल झालेला दाखवायचा असेल......सो आत्ता हळुबाई रडुबाई दाखवलीय.
तरीही सखी अजून कॅमेर्याला नवखी वाटते.....आणि अमेय एकदम तय्यार....
अमेयचं आधीचं काम पाहता तो
अमेयचं आधीचं काम पाहता तो तय्यारच आहे. प्रेम वगैर दाखवलं तरी थिल्लरपणा नको आणि चर्खमूपणा तर बिल्कुल नको.
स्वानंदी टिकेकर किती आईसारखी दिसते. मला फार आवडली. तिचं काम पण भारीये.
लेकीला आशू फार आवडलाय. खास करून तो त्या राकेशला लटकावून स्विच ऑन कराय्ला जात असतो तो सीन.
स्वानंदी टिकेकर किती आईसारखी
स्वानंदी टिकेकर किती आईसारखी दिसते. मला फार आवडली. तिचं काम पण भारीये. >>>> हो.. अगदी !
कालचा एक तासाचा भाग जरा बोर झाला पण.. मी जवळ जवळ अर्धा बघून सोडला मग.. आधीच्या भागांमध्ये अधलेमधले पंचेस भारी होते.. काल तेच मिसिंग वाटले..
मला त्या कैवल्यची अॅक्टींग फारशी आवडत नाहीये.. तो अत्यंत पुणेरी अॅक्सेंटमध्ये डायलॉग डीलिव्हरी करतो आणि ती तिथे सुट होत नाही असं वाटतं.. तो चँडलरची स्टाईल मारायला जातो फार असही वाटतं..
काल नक्की काय झालं? कैवल्य
काल नक्की काय झालं? कैवल्य आणि रेश्मा रडत का होते?
मस्त आहे ही सिरियल. पंचेस
मस्त आहे ही सिरियल. पंचेस फारच भारी असतात. मी उशीरा असते तरी बघायला लागले आहे
संवादलेखक अमोल पाथरे म्हणून दिसलं. (नाव चुकलं असेल कदाचित) पण मनःस्विनीचं नाव दिसलं नाही. संवाद हाच प्राण आहे याचा. तिन्ही मुलं मस्त करतात डिलिव्हर. रेश्मा आणि मिनू दोघी आपापल्या आयांच्या कॉप्या आहेत अगदीच!
All episodes since Monday
All episodes since Monday boring.
मीही तीन-चार भाग पाहिले. खरंच
मीही तीन-चार भाग पाहिले. खरंच मस्त वाटले. कालचा रडवण्याचा भाग आवडला मला.
ही जर फ्रेंडसवर बेतली असेल तर कथेत फारसं काही न घडता रोजच्याच रुटीनमधली काहीतरी गंमत असे स्वरुप राहील बर्याच एपिसोड्सचे. निदान कालचा रडवण्याचा भाग तसा वाटला.
झी मराठी आत्तापर्यंत युट्युबवर एपिसोड्स अपलोड करत होती. आता युट्युबवर न करता स्वतःच्या वेबसाईट्वर करत आहेत. स्टारप्रवाह पूर्वीपासूनच युट्युबवर झलक दाखवून संपूर्ण एपिसोड कायमच त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करते. ह्याबद्दल काहीच म्हणणे नाही उलट पाठिंबाच आहे.
पण प्रेक्षकांना किती पिळायचे त्याला काही मर्यादा !!! झीमराठीच्या ह्या एपिसोडला अक्षरशः दर मिनिटा-दोन मिनिटागणिक अॅड येते. हा काय मूर्खपणा आहे ? शिवाय व्हिडियो क्वालिटीही चांगली नाही.
त्यांच्या ऑफिशियल साईटवर बघण्याचा पर्याय असतानाही नाईलाजाने मी पायरेटेड एपिसोड्स शोधून पाहिले ह्या मालिकेचे.
जीव देणे प्रकार चांगला
जीव देणे प्रकार चांगला होता.
मोर पाऊस पडावा म्हणून नाचतो, नळाला पाणी यावं म्हणून नाही! >>
अायला, याच्या attitude चा पण कंटाळा आला राव >>
रेश्मा काल बोलतना सही शुभांगी
रेश्मा काल बोलतना सही शुभांगी गोखले वाटत होती. ते मराठी पिक्चरमध्ये तरण्यांना पांढरे विग लावून म्हातारी बनवतात किंवा एकमेकांच्या चेहर्याची काहीही संबंध नसलेले लोकं भूतकाळ-भविस्।यकाळ मध्ये दाखव तात. त्याऐवजी अस्लं एखादं सही कास्टिंग करायला हवंय. भन्नाट जमून येईल.
मोर पाऊस पडावा म्हणून नाचतो,
मोर पाऊस पडावा म्हणून नाचतो, नळाला पाणी यावं म्हणून नाही!
अायला, याच्या attitude चा पण कंटाळा आला राव >>
+११११११११११११११११११११
कालचा हलका फुलका भागही आवडला
रेश्मा माझी बहीण आहे.
त्यामुळे कलेक्शन मीच करणार
झीमराठीच्या ह्या एपिसोडला
झीमराठीच्या ह्या एपिसोडला अक्षरशः दर मिनिटा-दोन मिनिटागणिक अॅड येते. हा काय मूर्खपणा आहे ? शिवाय व्हिडियो क्वालिटीही चांगली नाही.>>> माझ्या फायरफॉक्स वर ad ब्लॉक बसवलेलं असल्याने एकही ad कधी पाहायला नाही लागली अगो.. video quality तर खुपच चांगली आहे..
Pages