दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं ए...... मी नाहीये हा लाईन मध्ये.
तुच कर कंटीन्यू.... मी तुझ्या पाठीशी आहे. Wink

माझं माझ्या नव-यावर फारफार प्रेम आहे. Happy

गेल्या आठवड्यातला शेवटचा भाग पाहिला. संवादलेखक कोण आहे?
३३० पकड.
मनात?
३३० नंबरच्या बसमध्ये चढ, तिकीत काढ.....

काखेत लिंबं घेऊन फिरणारी पोरं......

पण डोक्याला पट्टी बांधलेल्या मुलीच्या (होणार्‍या?) नवर्‍याचा अभिनय कमी पडला. हाटेलात आपल्यासमोर बसलेली मुलगी स्फुंदून स्फुंदून रडतेय आणि सगळे लोक आपल्याकडे पाहताहेत यामुळे येणारे अवघडलेपण चेहर्‍यावरून, देहबोलीतून अजिबात दिसले नाही.

चुकीचे इंग्रजी शब्द वापरणार्‍यावरून हंसाची आठवण आली.

गेल्या आठवड्यातला शेवटचा भाग पाहिला. संवादलेखक कोण आहे?
३३० पकड.
मनात?>>>>>>>>>> हो हो हे मलाही आवडलं.

री,
अगं मलाही आवडला तो कैवल्य. छान मुल्गा आहे. अभिनय ही मस्तच. वर कुणीतरी बहुतेक नीधपने म्हणल्याप्रमाणे कसलेला आहे अभिनयात.
एकुण सगळेच आवडले. संवाद लेखकही.

अगदीच अवांतर---

भुंग, कम्बॅक?? होतास कुठे?? मला वाटलं रोमात असशील. Happy बरं कॉहा आहे की विकलस??

स्मिते, कॉहाला ओएलएक्स वर पण कोणी घेईन झालंय त्यामुळे आपल्याकडेच आहे अडगळीत Proud

प्लिजच्या स्टोरीत लव्ह ट्रँगल नको यायला. मला सुजल, कैवल्य आणि रेश्माचा त्रिकोण दिसतोय भविष्यातला Uhoh
स्मिते, अभिनयात सगळेच मस्त आहेत.
एकदम उनाड/बेफिकीर तरीही सेंटी मिनल,ड्रामॅटिक अ‍ॅना,रडूबाई रेश्मा,बावळट आशू,साजूक तुपातला - वरणभात असा सुजल आणि आगाव पण भारी कैवल्य
प्रत्येक पात्र प्रत्येकाने बेस्ट निभवलंय Happy
तरीही टेस्टी पदार्थ भरलेल्या ताटातला एकच पदार्थ ओव्हर टेस्टी असतो ना तसा कैवल्य आहे या सिरिअलीत Happy

कालची फ्रीजची मजा? Lol आणि 'या घरात कुणी कुणाला साधी किंमत देत नाही तू चक्क चहा देतीयेस!' हे मस्त होतं.
तरूणाईला आकर्षित करून खिळवून ठेवायचं तर असे चुरचुरीत वन लायनर्स सतत पुरवण्याची मोठीच कामगिरी लेखिकेवर आहे.
ती निशा किती मद्दड वाटली. तिच्यामुळे बाकीच्या मुलींचा सहज वाटणारा अभिनय किती चांगला आहे ते दिसलं. पण मोडलेलं असलं तरी सापु ची अंगठी अशी दरवाज्यात परत करतात का? बिचारी रेश्मा.

. अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर अशी नव्या दमाची कलाकार मंडळी या मालिकेत बघायला मिळणार आहे. मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन आणि छायांकन करणारे संजय जाधव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. तर ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेचे दिग्दर्शन करणारे विनोद लव्हेकर यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. संजय जाधव आणि आशिष पाथरे यांची कथा आहे तर आशिषच्या सोबतीने मनस्विनी लता रविंद्र यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत>> इति इतर अवांतर माहिती.

येस रिया, अपडेटेड. मनस्विनी लता रवींद्र! व्वा.
आणि त्या आज्जी कसल्या भारी. साहिरच्या ओळी आठवायच्या म्हणे. वा वा. आपल्याला नाही तर आपल्या मुलांना तरी अशा आज्या मिळू दे रे देवा.
रीया, त्रिकोण काय लगेच? की अटिट्यूडवाल्या मुलांनाही साध्या मुलीच आवडतात असं एकवीसशे चौर्याण्णव्व्यांदा तुला सुचवायचंय? Proud

नातवंडांना मिळेलच, साहिर काय समीरच्याही ओळी ऐकवेल आज्जी. ज्याबद्दल खात्री आहे त्यासाठी देवाला कशाला साकडं? Wink

३३० पकड.
मनात?>>>> हे मिसलं.. Sad

असो.. आजच कोणीतरी सांगितलं कि या मालिकेची वेळ लवकरच रोज रात्री ८ वाजता होणार आहे.
सुनेचा पत्ता कट.. Happy

अटिट्यूडवाल्या मुलांनाही साध्या मुलीच आवडतात असं एकवीसशे चौर्याण्णव्व्यांदा तुला सुचवायचंय?
>>> Lol
बघच तू! मला जाम भयंकर इंट्युशन्स येतायेत Proud

हां, opposites attract प्रमाणे जोड्या अशा लागतील. कैवल्य - रेश्मा (रीड: रीया), सुजल-अना,आशू-मीनल. बरोब्बर हरवले ते गवसले टाईप. Proud

कैवल्य - रेश्मा (रीड: रीया)
>>
आशुडी, टडोपा झालं गं अगदी मला Blush
आज तुल जे हवं ते खायला मिळो!

असो.. आजच कोणीतरी सांगितलं कि या मालिकेची वेळ लवकरच रोज रात्री ८ वाजता होणार आहे.
सुनेचा पत्ता कट..
>>>>>> हजारो मोदक तुम्हाला अस झालं तर.

भुंग, कम्बॅक?? होतास कुठे?? मला वाटलं रोमात असशील. स्मित बरं कॉहा आहे की विकलस??
कॉहाला ओएलएक्स वर पण कोणी घेईन झालंय त्यामुळे आपल्याकडेच आहे अडगळीत फिदीफिदी

>>>>>>>>>>>>>>>>>>>>

एकाने दिला होता चेक..... पण बाऊंस झाला Wink ..... मधे एकदा येऊन शोधलेले कॉहा पान तर सापडलं नाही..... मला खरंच वाटलेलं की प्रशासकांनी मोडीत काढलं असेल....

रीया...... सुजलची सध्यातरी बाहेर कोणीतरी आहे.... पहिल्या एपिसोडपासून तो फोनवर लव यू बेबी करतोय...

कैवल्य आजच्या भागात रेश्माचे पैसे भरणारे एक्स्ट्राचे... सो तिथे शक्यता आहे.... जा सिमरन जीले अपनी जिंदगी टाईप्स डायलॉग्ज प्लॅटफॉर्मवरचा टीसी बरोबरचा प्रसंगही झालेत.....

सहा जणात किमान एक जोडी जमणार.... बाकीचे विजोड आहेत पण.

जोडी जमवण्यावर फोकस न करता युथफूल ठेवली तर जास्त छान....

उगाच ते लव्ह बिव्ह फालतूगिरी Wink

स्वानंदी ब्येस्टेस्ट एकदम .... (पण रीया शेवटी कुहू ती कुहूच बरं का)

बाकी स्वानंदी इतकी सेम टू सेम दिसते आईसारखी की ती दात ओठ खात अंगावर धावून जाते एखद्याच्या तेंव्हा आरतीताईच तानपुरा बाजुला ठेवून ऊठल्यात की काय असेच वाटतं :स्मितः

Bhunga +1

Piyu, itakyat kuthe Wink abhi abhi to shuruwat hai Wink

Bhungya ek jodi jamanar he correct sujal ana ani minal aashu id too yuck jodi :'(

A manasi kuchh bhi Proud

Pages