दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशूचा आजवरचा भारी "तिनं राकेशला कन्सिव केलं असेल" Lol

सुदैवानं या मालिकेमध्ये प्रत्येकाचे धडाधड एक्स्प्रेशन दाखवायचा सोस टाळलेला आहे.. पण तरी या संवादावर सुजय आणि मीनूचे एक्स्प्रेशन मस्त होते.

अ‍ॅनाच्या आईवडिलांना आणायचा प्लॅन आणि नंतर रद्द होणे वगैरे ड्रामा उग्गाच.

आशूचं चुकीचं इंग्लिश बोलणं बोरिंग वाटतय. मराठी सिरियल्स, सिनेमांमधे किती वेळा बघायचे तेच ते जुनाट चुकीच्या इंग्लिशचे जोक्स काय माहित.

सुजयचं रेश्माच्या बाबांशी फोनवरच्या गप्पांमधे रमणं आणि मग राकेश आल्यावर चेहरा पाडणं मस्त होतं.

वाढदिवसाचा भाग उगीच ओढूनताणून वाटला मलाही.

रच्याकने, आशू किंजलला प्रपोज करणार अशा भागाची जाहिरात दाखवत असताना एप्रिल फूलचा भाग दाखवला का ? म्हणजे अशी झलक दाखवणं हाही एप्रिल फूलचा भाग होता का ? की मी मिस केला तो भाग ?
रात्री उशीराची वेळ असल्याने मी ही सिरियल इंटरनेटवर बघते.

मालिका प्रेडिक्टेबल आहे. माझ्या नवर्‍याला पार्श्वसंगीत बालिश आणि टर्नऑफ करणारं वाटलं. मी अजून जुने एपिसोड्स पाहातेय. सुजयचं शेल्डनसारखं गीकी संदर्भ देणं, डोळे मिचकावून हसणं किंवा पार्टीतला डान्सदेखील कृत्रिम वाटला. कैवल्यचं डेलीसोपछाप संशय घेणं किंवा टोकाला जाणं पटत नाही. सर्वात् महत्वाचं म्हणजे, राकेशने मीनलशी फसवून लग्न केलंय आणि त्यानं तिला या त्रांगड्यात अडकवलंय. असं असताना तो किंवा निधा तिला ब्लॅकमेल करणं किंवा दोष देणं कसं काय करू धजतात हा प्रश्न बाकीच्या शहाण्यासुरत्यांना का पडला नाहीय?

परंतु, एकंदर अभिनय उत्तम जमलाय. धडाधड एक्स्प्रेशन्स नाहीत, नवीन जोक्स, तेच ते व्हॉटसअ‍ॅपवरचे नाहीत. अगदी रेश्माच्या रडण्यावर पैजा लावणं किंवा 'सुळका' येणं हे आजवरच्या मराठी मालिकांचा अनुभव पाहता नवं आणि वेगळं आहे. स्मॉल वंडर आणि आय ड्रीम ऑफ जीनीच्या भ्रष्ट आवृत्त्या पाहिल्यानंतर ही जरी फ्रेंडसची कॉपी असली तरी खूपच बरी आहे. मला मीनल भारी आवडलीय या मालिकेतली.

युट्युबवर आहेत का याचे भाग? कोणी मला लिंका देईल काय? लय उप्कार होतील बगा...

झीमर्ठीच्या साईटवरचे भाग मोबाईलावर दिसत नाहीत. अपग्रेडेड फ्लॅश प्लेअर नाही.

राकेशने मीनलशी फसवून लग्न केलंयरे>>>>>>>>> रेश्मा.

असं असताना तो किंवा निधा तिला ब्लॅकमेल करणं किंवा दोष देणं कसं काय करू धजतात हा प्रश्न बाकीच्या शहाण्यासुरत्यांना का पडला नाहीय?<<< तो ब्लॅकमेल करत नाहिये. दोषही देत नाही. तिला घरी सांगता येत नाहिये हा तिचा प्रॉब्लेम आहे, वडलांना हार्ट अ‍ॅटॅक येईल शिवाय धाकट्ञा बहिणीचं लग्न मोडेल ही भिती आहे (हे फारफेच्ड कारण नाहिये अशा घटना बर्‍याच ठिकाणी ऐकल्यास. "घटस्फोटित" बहिण असली की दुसर्‍या मुलीशी लोकं लग्न करत नाहीत)

सिरियल जास्त मॆच्युअर्ड करायला हवी तरंच मजा येईल. सुरुवातीला काही वेळा वाटून गेलंही, अगदी परवाही कैवल्य आणि रेश्माच्या शेजारी झोपण्याच्या प्रसंगाच्या हाताळणीवरुनही, की मालिका तशी डेव्हलप होत जाईल पण आता उगीच टिपिकल गोष्टींवर भर देणं चाललय.

सुजयचं (मला कधी कधी हे सुजल ऐकू येतं) गिकी एक्स्प्रेशन्स देणं ठिकेय पण त्यावेळी जो संवादात आधी पंच असायला हवा तो मिस होतोय त्यामुळे त्या एक्स्प्रेशनची मजा बहुतेकदा जातेय.

पण अजूनही इतर मालिकांच्या सध्याच्या लॉटच्या तुलनेत ही सुसह्य. बघणं कंटीन्यू.

सगळे कलाकार चांगले आहेत.
संवाद आणि पंचेस वर अजून काम करायला हवंय.....
पुढच्या ५-६ एपिसोड मधे सुधारणा दिसली नाही तर आणि उशीराच्या टाईम स्लॉट मुळे
प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता आहे.....

हो रेश्माशी.

मी पाहिलेल्या भागात तो 'आता मी सोल्यूशन दिलंय ना, मग घ्या की समजून सिच्युएशन' हे म्हणतो तेव्हा आणि त्याचवेळेस "मला लोकांना फसवायला आवडत नाहीत, मग मी तिच्या बाबांना कसा फसवू?" म्हणतो तेव्हा ही अडचण केवळ त्याच्यामुळे तयार झालीय हे साफ विसरतो. त्याला आपल्या चुकीची शिक्षा आपण कुणाला देतोय असेही वाटत नाही. अगदी सहजरित्या ' आता कर ना बुकिंग कॅन्सल'च्या अविर्भावात दे ना घटस्फोट म्हणतोय तो. ती निशा येऊन ,"का आमच्या मध्ये आलीयेस" असं विचारते. हे सगळे राकेशच्या भूमिकेच्या भ्याडपणामुळे झालेले घोळ आहेत हे कुणीच बोलत नाहीय.

<सुजय लेफ्टी आहे.... मला लेफ्टी लोकं फार आवडतात<> नंदे, मी लेफ्टी आहे. शप्पथ...

Goga reshma n kaivalya nhi jat kuthech.
Ashuch hataear potsujay la satat WFH milat as disatay
Minal struggler
Anna ch kai te kalat nhiye...

Aajcha episod bore zala

Anna ch kai te kalat nhiye...>>

अॅनाचं बुटीक आहे किंवा ती बुटीकमधे काम करते.

चैत्राली, फोटो एक नंबर!!
किंजल दाखवली का कालच्या भागात? मला वाटलं, तिला कधीच दाखवणार नाहीत..
ते कन्सिव वालं वाक्य आठवत नाही. तो भाग पहिला होता खरंतर..

Happy

कालच्या एपिसोड्मदध्ये ती आशूडी म्हणाली तेव्हा प्रचंड हसले!!!!! कैवल्यचं "वगाडतो" पण सही होतं.

एकंदरीत मालिका मध्येच एकदम पीजे टाईप होते, आणि मधेच काही क्लास जोक्स मारते. "तुला मुली आवडतात?" हा सही पंच होता. तरे एकंदरीत इतर मालिकांपेक्षा बघायला सुसह्य.

तरे एकंदरीत इतर मालिकांपेक्षा बघायला सुसह्य. >>>> +१

कैवल्यचं "वगाडतो" पण सही होतं. >>>> कैवल्य एकंदरीच फार त्रासलेला होता, मजा आली त्याला तसा पाहुन Lol

Asa Proud

Pages