दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता कैवल्य आणि मीनूने डोकं चालवून रेश्माच्या राहण्याचे, खर्चाचे पैसे त्या अकाऊंट मधून वळते करून घ्यावेत. मुंबईत कसं निभेल नाहीतर रेश्माचं? लॉजिकल कनेक्शन असावं काहीतरी या प्रकरणाचं.

>>हे लोक मधे मधे कुठल्या कामावर जात नसावेत.. सगळे घरीच असतात. भाड्याचे पैसे कुठून देतात कोण जाणे>><<

+१

मला फ्रेंडस चा च प्रभाव वाटतो. पण उगीच मराठी देसी भेसळ घातलीय. सर्व जण सतत घरातच असतात का?

एक दोन भाग बघितले तेव्हा बोर झाले.

काल मी पाहिला तो 'राकेश चा फोन आला होता' वाला एपिसोड. उगाचच २ ओळींचा कंटेण्ट एपिसोडभर ताणला. इतर सिरीयलस सारखे करू नका म्हणावं. एका घरातच राहतात ना सगळे? मग प्रत्येकाला स्वतंत्रपणे नव्याने "राकेश चा फोन आलाय, तो भेटायला बोलावतोय, मी काय करू?", मग "तू जाउ नको" आणि "गेलीस तर मी..." हे लूप ४-५ वेळा झाले तेच तेच. शेवटचा ट्विस्ट सोडला तर बाकी १ मिनीटात उरकता आले असते.

त्या रेश्माने तो मैने प्यार किया मधल्या भाग्यश्रीसारखा भीगी बिल्ली लूक बदलायला हवा. २-३ एपिसोड्स मधेच तो जास्त झाला आता.

भीगी बिल्ली लूक>> +१
काही भागांनंतर जंगली शेरनी लूक देण्यासाठी मुद्दामच या लूकचा ओवरडोस तर केला नसेल ना Wink

फारएण्डा, मीनलचा 'डॅशिंग/ बॅशिंग' लूक बदलायला हवा किंवा अ‍ॅनाचा 'स्वीटली डम्ब' लूक बदलायला हवा असे का नाही वाटत बरं? Happy
रेश्मा, अकोल्याहून मुंबईला आलेली आहे, आणि पुरेशी ओळख नसलेल्या नवर्‍याने तिला फसवलेलं आहे. घरी परत जावं तर बहिणीच्या लग्नाचे वांधे होतील म्हणून ती नाईलाजाने इथे राहत आहे. कसा लूक हवा तिचा?

मंजूडी, पॉइंट आहे नक्कीच. पण बघताना डोक्यात जाते ना! Happy मोहब्बते मधल्या त्या अमरिश पुरीच्या सुनेसारखी डायरेक्ट नाचायला नको जाउ दे, पण मे बी जरा आता वेगळे एक्स्प्रेशन द्या तिला किमान Happy

.

मोहब्बते मधल्या त्या अमरिश पुरीच्या सुनेसारखी डायरेक्ट नाचायला नको जाउ दे>>> नाचली होती ती Happy तिला वाटलं होतं की ती दारू प्यायलीये, पण ती फक्त सॉफ्टड्रिंकच प्यायली होती.

रेश्मा छान आहे की. अ‍ॅक्टर पण, कॅरेक्टर पण.
(आणि डोळे किती स्वप्नमाळू आहेत तिचे. Proud सारखे पाण्याने भरतात आणि. म्हणून सारखी सर्दी.)

स्वप्नमाळू म्हणे Lol वाफरूपी स्वप्नं ढगरूपी डोळ्यात मावेनाशी झाली की पाऊसरूपी अश्रू होऊन बरसतात काय?

छे! जर्रा म्हणून एखाद्याला चांगलं म्हणलेलं सहन होत नाही कुणाला. बरं स्वप्नमाळू जावदे, कनवाळु तरी आहे का नाही.?

त्यापेक्षा उच्चकोटीची उपमा सांगू का? "रेश्माचे डोळे गायीसारखे आहेत." कारूण्य, वात्सल्य,.दयामाया, उपेक्षा, उसासे, अधमुरी स्वप्नं.. सर्वांनी युक्त! Proud

अहो ते बाकीचं कुठेही सापडतं. अगदी गायीच्या डोळ्यांतही. डोळ्यांनी स्वप्नं सुद्धा कुणीही बघतं. कधीकधी गायसुद्धा बघते. पण स्वप्नं दाखवणारे डोळे दाखवणं कितींना जमतं? Proud डोळे कसे स्वप्नं माळणारे पाहिजेत!

साजिरा, _डी Happy

दुसरे म्हणजे तिला सोनाली कुलकर्णी (सोकुल वाली) चा व्हॉइस ओव्हर आहे का? ते वाटल्यापासून कायम तिचे संवाद सुरू झाले की हे सोनाली कुलकर्णीच बोलत आहे असे वाटते. नसेल तर आवाजात खूप साम्य आहे.

माझे सुरूवातीचे एपिसोड्स मिस झालेत - हे सगळे शिकत आहेत की नोकर्‍या करतात?

त्यापेक्षा उच्चकोटीची उपमा सांगू का? "रेश्माचे डोळे गायीसारखे आहेत." कारूण्य, वात्सल्य,.दयामाया, उपेक्षा, उसासे, अधमुरी स्वप्नं.. सर्वांनी युक्त! >>> लोल. आणि तिचा प्रत्येक सीन सुरू झाला की ती वैचारिक रवंथ करत आहे असेच वाट्ते.

हे सगळे शिकत आहेत की नोकर्‍या करतात? >> शिकून झालयं त्यांच. Happy
अॅना आणि आशू नोकरी करतात. मिनल अॅक्टर आहे (स्ट्रगलर). कैवल्य म्युजिशीयन (स्ट्रगलर) आहे. सुजय वर्क फ्राॅम होम करतो. रेश्मा नवीन असल्याने घर सांभाळतेय.

ते वाटल्यापासून कायम तिचे संवाद सुरू झाले की हे सोनाली कुलकर्णीच बोलत आहे असे वाटते. नसेल तर आवाजात खूप साम्य आहे.>>> फा!!! तुला तिच्यात आणि शुभांगी गोखलेमध्ये काहीच साम्य वाटलं नाही का? कित्येक मॅनरीझम सेम तिच्यासारखे आहेत. संवादसुद्ध तसेच म्हणते. Happy

थॅन्क्स निधी! नंदिनी - आत्तपर्यंत आपोआप जाणवले नव्हते, पण आता नक्की जाणवेल. शुभांगी गोखले म्हणजे आधीची संगवई ना? अगं बाई अरेच्चा मधली ती बॉस? अजून कोणता मेजर रोल लक्षात नाही तिचा.

गंगाधर टिपरे मालिका बघितली नाहीस का? त्यातली श्यामल म्हण्जे ही रेश्मा. काही फरक नाही.

मला सुरवातीचे कैवल्यचा अ‍ॅटीट्युडवाले एपिसोडस अतिशय डोक्यात गेले. पण ते मागे पडल्यावर आता जरा बरी वाटतीय सिरिअल.
अ‍ॅना म्हणजे फीबी दिसतेय. फीबीसारखाच डायलॉगही आहे तिला. मला सगळ्या बातम्या उशीराने कळतात. पण एकाच एपिसोड ३-३दा तेच वाक्य म्हणजे जरा Uhoh असे झाले..

एक घोळ सापडला मला. मीनल आणि रेश्मा राकेशच्या घरी जातात तेव्हा निशा सरळ अगं मीनल करून बोलते. तिला कधी नाव कळले हीचे? Proud

Pages