दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचे पंचेस छानच होते. मला मिनल फारच आवडली कालच्या भागात. खुप सुंदर दिसत होती.

रिकाम्या जागा कशाला दाखवतो... भरलेल्या दाखव ना! Biggrin

कालचे पंचेस छानच होते. मला मिनल फारच आवडली कालच्या भागात. खुप सुंदर दिसत होती.

रिकाम्या जागा कशाला दाखवतो... भरलेल्या दाखव ना!
>>
+१
Lol

फ्रेण्ड्स चा एकही भाग न पाहिल्याने कोर्‍या पाटीने ही सिरिअल पहातेय त्यामुळे जास्त मज्जा येतेय मला
बहुदा

फ्रेण्ड्स चा एकही भाग न पाहिल्याने कोर्‍या पाटीने ही सिरिअल पहातेय त्यामुळे जास्त मज्जा येतेय मला
बहुदा

+१

फारएंडा, तू एकदाचं स्वीकारूनच टाक की दिदोदु फ्रेंड्सचीच भ्रष्ट नक्कल आहे. सारखी सारखी दोन्हीतली साम्यस्थळं शोधण्याच्या नादात दिदोदुच्या शक्तीस्थळांकडे (बाकीच्या हिंदी-मराठी पांचट मालिकांच्या तुलनेत) तुझं दुर्लक्ष होतंय. >>

मंजूडी, उलटे आहे. ४-५ भाग पाहिल्यावर लक्षात आले की ही फ्रेण्ड्सची नक्कल नाही. फ्रेण्ड्स च्या कॅरेक्टर्सच्या सवयी जशाच्या तशा येणार नाहीत याची काळजी लेखकांनी घेतलेली आहे. त्या सिरीज चा इफेक्ट एवढा आहे की तसे करणे हे अवघड आहे. त्यामुळे जेथे थोडी झलक दिसते ती लगेच जाणवते. जसे तो सुजय सर्वांना त्या पार्टीला जाण्याकरता लौकर आवरून निघायची घाई करत असतो, त्या शॉट सारखा रॉस चा एक शॉट तेव्हा आठवला. पण तेवढाच. तो सीन अजिबात ढापलेला नाही.

मागच्या बोर्डचा कन्स्पेट फ्रेण्ड्सवरून घेतलेला असेल तर चांगलेच आहे. कारण त्यावर या सिरीज च्या संदर्भातील गोष्टी लिहून चांगली विनोदनिर्मीती होउ शकते (फ्रेण्सचे जे डूडल होते त्यावरच्या कॉमेण्ट्स हे त्यांचे 'इन जोक्स' होते. सिरीज मधल्या भागाशी त्याचा संबंध नव्हता). कालच्या एपिसोड मधे ते नियम व्यवस्थित दिसले:
१. आपल्याच घरात पादत्राणे घालून फिरू नये (त्यात "हमेशा" की काहीतरी नंतर अ‍ॅड केले आहे)
२. आपण घरभाडे मोबदला म्हणून देतो, उपकार म्हणून नव्हे.
३. दिवसा किमान सूर्यदेवतेचा आदर म्हणून दिवे लाउ नयेत.
४. वरचे नियम पुसण्याचा उद्दामपणा करू नये.

चुभूद्याघ्या.

त्यामुळे ही सिरीज मी स्वतंत्रपणेच पाहात आहे. मात्र तरूण लोक, फ्रेश लेखन यामुळे अपेक्षा सुरूवातीला प्रचंड वाढल्यावर नंतरचे अनेक भाग उगाच ताणलेले, बळंच विनोद वाले वाटले होते. हे मागचे एक दोन चांगले होते.

एवढे क्लोजप्स का मारतात ते मात्र कळत नाही. जरा सगळे एकदम दिसतील असे कॅमेरे का वापरत नाहीत. त्या मीनलच्या कपाटावर बहुधा तिचाच एक "बीफोर" फोटो आहे व "आफ्टर" च्या फोटोची जागा मोकळी आहे. हे असे काही जबरी कल्पना वापरलेले प्रॉप्स सेटवर असावेत असे दिसते. पण अचाट क्लोजप्स मुळे ते पोहोचत नाहीत सर्वांपर्यंत. आणि कलाकारांचे दात अनावश्यक जवळून दिसतात Happy

निधी, ते आपण नोटिस करावे म्हणूनच लावलेले आहेत. त्यांचेच कॅमेरे ते काम अवघड करत आहेत. मीनल काही तेथे खरी राहात असून तिचे खाजगी कपाट वगैरे नाही ते Happy

Tyanchya bhadyache paise thevnyachya dabbyavar "majha khau mala dya lihile ahe" aani sakharechya dabyavarahi asach chhan kahitari lihile ahe

फारएण्ड ते सर्व माहिती आहे मला. Happy
पण सिरियल बघताना माझं लक्ष फक्त जे काही ठळकपणे दाखवले जाते (चेहरा, एक्स्प्रेशन्स, संवाद वगैरे) त्याकडेच जास्त असते. यात काही राम नसेल तरच इतर गोष्टींकडे लक्ष जात.
त्यामुळेच अशा इतर गोष्टी नोटीस करणार्यांबद्दल कौतुक वाटते. काहीजण तर पायाच्या नेलपेंट पासून हेअरपिन पर्यंत सर्व अगदी बारकाईने बघतात / त्यांना दिसतात. माझं कधी दागिन्यांकडेही/ कधी कधी त्यांनी कपडे काय घातलेयत इकडेही लक्ष नसतं.
Happy

Tyanchya bhadyache paise thevnyachya dabbyavar "majha khau mala dya lihile ahe" aani sakharechya dabyavarahi asach chhan kahitari lihile ahe>>
हो सर्वच डब्यांवर आशूने लिहिले आहे.

निधी, मला वाटले की उगाच एवढे बारीक लक्ष कशाला या अर्थाने विचारत आहात Happy

पण सिरियल बघताना माझं लक्ष फक्त जे काही ठळकपणे दाखवले जाते (चेहरा, एक्स्प्रेशन्स, संवाद वगैरे) त्याकडेच जास्त असते. यात काही राम नसेल तरच इतर गोष्टींकडे लक्ष जात. >>> पण त्यांनीही थोडे वाईड अँगल कॅमेरे लावले तर हे लोकांच्या लक्षात येइल. पण इतर सिरीयलसारखेच क्लोज अप्स खूप मारतात येथे. स्क्रीन वर एका वेळेस एकाचा किंवा दोघांचाच चेहरा. मग तो काही धक्कादायक बोलला की उर्वरित लोकांचे एकेक करून रिअ‍ॅक्शन शॉट्स हा ठराविक पॅटर्न आहे वेळकाढूपणाचा. तो परवा सुद्धा कैवल्यबद्द्लच्या कोणत्यातरी शॉट साठी वापरला होता. हा बहुधा सवयीचा भाग असेल.

स्वयंपाकघरातल्या जिन्नसांवरही फार मजेशीर नावं लिहिलेली दाखवली आहेत. मीठाच्या डब्यावर 'नमक हराम', तिखटाच्या डब्यावर 'मिर्च मसाला', पोह्यांच्या डब्यावर 'सुदाम्याचे पोहे' इत्यादी... सही वाटलं ते.

कालचा भाग (पिझ्झे पुराण) काहीही हां वाटला (जान्हवी स्टाईल)
मजा नाही आला (सुरेश वाडकर स्टाईल)

ती सगळी नावे दाखवली होती एका एपिसोडमध्ये; म्हणजे ओझरती नाही, त्यावरच फोकस ठेवून.
रेश्मा रहायला आल्यावर पहिल्यांदा किचनमध्ये येते चहाचा मसाला घेऊन, तो एपिसोड. तेव्हा ती नावं बघते डब्यांवरची.
त्यानंतर सुजय सांगतो तिला त्या नावांबद्दल.
सगळी नाव मस्त आहेतच पण 'माझे पैसे मला दे' हे तर फारच भारी.

फारएण्ड>> असा हेतू नव्हता माझा. Happy

इतर सिरीयलसारखेच क्लोज अप्स खूप मारतात येथे. स्क्रीन वर एका वेळेस एकाचा किंवा दोघांचाच चेहरा. मग तो काही धक्कादायक बोलला की उर्वरित लोकांचे एकेक करून रिअ‍ॅक्शन शॉट्स हा ठराविक पॅटर्न आहे वेळकाढूपणाचा. >>

बरोबर आहे तुमचं. आधी फारतर दोघांचे क्लोज अप्स दाखवायचे... आता सगळ्यांचेच एक्स्प्रेशन्स वेगवेगळे दाखवू लागलेत...

रीया, रेश्मा घरात आल्यानंतर ती पहिल्यांदा किचनमध्ये जाते, त्या भागात ही सर्व नाव दाखवलीयत.

पिझ्झा पुराण - मला वाटलं ३० मिनिटं पूर्ण करून फुकट मिळवायचा प्रयत्न चाललेला असावा. शेवट पुढे जवळपास तसाच झाला..

पिझावाला येतो तो भाग सुरूवातीचा बराचसा आवडला. नंतर नंतर जरा त्या आशूने तो ताणला. आशू चा पेहराव वगैरे पाहून पिझा डिलीवरी वाल्याने 'सर' न समजणे, मॅनेजर ने त्यांची समजूत काढताना पुन्हा चुकीची वाक्ये बोलणे वगैरे आपल्याकडे सहज घडणार्‍या गोष्टींवरून केलेले विनोद आवडले.

फक्त एक करा म्हणावं. एखाद्या प्रसंगातील विनोद कधी संपलेला आहे, आता या कांडीतून रस येत नाही तेव्हा तीच पुन्हा पुन्हा फिरवायचे कधी थांबायचे ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे करा Happy

आजचा भाग धमाल :D. रेंज विकण्याबद्दलचा. आत्तापर्यंतचा मी पाहिलेला सर्वात भारी. ब्रेक नंतर चा आशूचा "कोणी सांगितलं किंजलला" परफेक्ट Happy

आत्तापर्यंतचा मी पाहिलेला सर्वात भारी+१
सरबत, रेंज, किंजलचा फोन आणि त्यावर आशुचं 'दिल चाहता है' मधल्या सैफ सारखं बोलणं सगळंच मस्त जमलं होतं Biggrin

ब्रेक नंतर चा आशूचा "कोणी सांगितलं किंजलला" परफेक्ट
>>
+११
Lol

आशूची पॅण्ट बघितली का? Lol
पांढरी पॅण्ट आणि त्यावर लाल बदाम Lol

कैवल्य भारी आहेच Proud

गेले दोन्ही भाग आवडले. अ‍ॅना म्हणजे कहर मठ्ठ दाखवलीय. काल दयाच आली तिची. मित्र म्हणवतात तर बिचारीला वेळीच आवरुन घरात न्यायला हवं होतं मात्र. Proud

शर्मिला, हो त्या सरबतवाल्याकडे जाते तेव्हा वाटले की आता जरा जास्त होत आहे, पण एकूण धमाल होता. ते 'टिवटिव मिक्स' नया है वह सारखे हिट होणार बहुधा.

रेंज विकत घेण्याची कल्पनाच इतकी भन्नाट होती की त्यापुढे बाकी सगळं माफ करुन टाकलं. शिवाय ती कल्पना अ‍ॅनाच्या गळी उतरवणंही Proud

Pages