दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेंज एपिसोड भन्नाटच होता. त्याहीपेक्षा आजचा कैवल्यची शेरलॉकची ओव्हरएक्टिंग आणि आशूचा मठ्ठ वॉटसन आवडला.
एक मिनीट! ने घात केला Lol

आत्तापर्यंतचा मी पाहिलेला सर्वात भारी. ब्रेक नंतर चा आशूचा "कोणी सांगितलं किंजलला" परफेक्ट >> +१

टीव टीव मिक्स पण धम्माल Proud

>>>पांढरी पॅण्ट आणि त्यावर लाल बदाम हाहा
म्हणुन्च एपिसोडच्या सुरुवातीला कैवल्य आशूला म्हणतो ना ए बदाम राणी जरा सरक Biggrin

सुजय साठे.
रेंज आणि स्कॉलर अ‍ॅना भाग मस्त होते.
स्वानंदी काय भारी काम करते. स्टार आहे ती.

फ्रेन्ड्जशी तुलना होऊ शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे डेटिंग, बॉयफ्रेन्ड्ज्स वगैरे भाग जो सर्रास इंग्लिश सिरियल्समध्ये चालतो तो मराठीत नाही येऊ शकत. त्यामुळे प्रेम, प्रेमभंग, कन्फ्यूजन्स यातला टर उडवण्याचा भाग आधी कट होतो. मग उरतो प्रसंगनिष्ठ विनोद. सिरियलला गोष्ट अ‍ॅज सच नाहीये काही. त्यामुळे काही प्रसंग छान लिहिले जातात- रेन्जवाले. ते भाग मस्त होतात. पिझ्झा वगैरे लिहितानाच ओके ओके असतात, त्यामुळे तो भाग भारी होऊच शकत नाही.

कालचा भाग भारी होता. त्यांच्या वेबसाईटवर नांवे वेगळी लिहिली आहेत आणि आता मालिकेत वेगळंच काहीतरी म्हणताहेत.

http://www.zeemarathi.com/shows/dil-dosti-duniyadaari इथे पाहा
सुजय ठाकूर - मूळचा बंगाली
आशुतोष हळदणकर (शिवलकर नाही)
रेश्मा पाटील (शेवाळे नव्हे)
मीनल शेवाळे (हिचं पण परवाच्या भागात काहीतरी वेगळं आडनांव घेतलं होतं)
कैवल्य काटकर (कारखानीस नव्हे)

सनी डेज, कागदावर लिओन ठेवलं... भारी होतं.
रच्याकने... सिरियलच्या टायटल साँग चा शेवटचा भाग हा, मायकल जॅक्सन च्या 'ब्लॅक और व्हाईट' मधे शेवटी शेवटी एकावर दुसरा चेहरा ओव्हरलॅप होणे याच्याशी तंतोतंत जुळणारा घेण्याचा मोह आवरला नाहीये यांना.

मला पण तो रेंज वाला भाग आवडला. इतर टिपीकल मराठी मालिकांपेक्षा ही खुपच सरस आहे मालिका.

एकावर दुसरा चेहरा ओव्हरलॅप होणे याच्याशी तंतोतंत जुळणारा घेण्याचा मोह आवरला नाहीये यांना.
>>>
मला नाही आवडला तो प्रकार पण Uhoh

आज राकेश आशू बद्दल अन्वाधानाने काहीतरी बोलणार आणि रेश्माच धुणार बहूदा त्याला..

टायटल साँगमधे हा शब्द कोणी सांगेलं का ? -

जगण्याची रीत ही सारी (?) , दोस्तांना सावरणारी , जोडणारी , _डणारी

मला "तोडणारी, सोडणारी" ऐकू येतं.

ती रेश्मा काय धुणार राकेशला, उलट त्याचेच कपडे फार मळलेत म्हणून बाथरुममध्ये गाणे गात धूवुन देईल.:खोखो:

मला अ‍ॅनाची परीक्षा घेणारा एपिसोड आवडला. एक मिनीट!

तो पॉलिसी वाला एपिसोड कालच झाला ना?

मग आशुचा "सुजयला सांगतोय? मग रश्मी.. आता तू विंडो व्हायला तयार राहा", मीनलचा "काय यार.. आपण ज्या माणसाने आपल्या मैत्रीणीच्या आयुष्याची वाट लावली.. त्याच्याकडून पॉलिसी काढायची? जर कोणी त्या राकेश कडून पॉलिसी काढली ना.. तर आपली मैत्री संपली" हे संवाद कुठे गेले? Uhoh
(हे संवाद मी जाहिरतीत ऐकले/ पाहिले होते).

उद्याच्या भागात (म्हणजे आजच्या) म्हणून काहीतरी वेगळेच दाखवले काल.
मी काहीतरी मेजर मिसतेय का?

अ‍ॅनाचे ८ हजार मीनल जबरदस्ती घेऊन टाकते तर स्वतःचा चेक आल्यावरही अ‍ॅनाला तिच्याकडून पैसे का घ्यावे लागतात? त्यासाठी टॉस का करावा लागतो? ती सरळ माझे ८ हजार दे असं मागु शकत नाही का?

आशु आणि अ‍ॅनाला मीनलने तिला आलेल्या चेकमधले पैसे का द्यावेत?

:कन्फ्युज झालेली बाहुली:

ता.क. डोंट टेक मी राँग.. पण काल अ‍ॅना पैसे मोजत असतांना तिच्या हातातुन पैसे हिसकाऊन घेणारं मीनल हे कॅरॅक्टर मनातुन अगदीच उतरलं. अशी लोकं असतात.. मैत्रीत एवढं चालतं हे मलातरी पटणारं नाहीये.

Piyu u missed the dailogs.
Sagale dialogs zale kalachya bhagat

हो..सुजयची बहीणच असते ती. बाकी डिटेल्स एकाच भागात उघडण्याचं कालच्या भागात टाळलं. कालचा भाग मस्त जमला होता. समोसा-चहा वाला सीन आवडला.

कालचा भाग मस्त जमला होता.
>>
हो!
मला आधी वाटतं होतं नको बघुयात. ही एकच सिरिअल मी बघते कारण सतत सगळं सॅड सॅड नसतं त्यात पण कालचा भाग मला वाटलं असाच सॅड सॅड असणार पण त्यांनी ते करणं टाळलं.
सुजय आणि त्याच्या बहिणीचा प्रसंग सोडला तर सगळं पुन्हा नॉर्मल होतं हे बघुन छान वाटलं Happy

इथल्या चर्चा वाचुन बघायला सुरू केली मालिका. काही काही भाग खूपच मस्त. कैवल्यपेक्षा आशूच्या डायलॉग वर फिस्सकन हसू येतं बर्याचदा. Happy
आजचा भाग बोर झाला. लवकर झोपणे लवकर उठणे अतिच ताणले.

सुजय च्या बहिणीचा अभिनय आवडला. थरकाप होत होता तिची मानसिक अवस्था बघून. सुजय पण भारी अभिनय करतोय.

Pages