दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग निधी तू कार्टुन नेटवर्क वर ओगी अ‍ॅन्ड द कॉक्रोचेस ही सिरीयल बघ. त्या सिरीयल मधल्या सर्व पात्राना सिनेनटान्चे आवाज दिलेत ( नकली ) ओगी या मान्जराला शाहरुखचा आवाज दिलाय.:फिदी:

आणी तो पर्फेक्ट आहे.

असं होय....... बघितलय मी एक-दोनदा. Happy
पण कळलं नव्हतं.

मला वाटलं कैवल्यलाच ऑगी म्हणताय की काय... Happy

अतीच अवांतरः- ओगीचा शाहरुख, जॅकभैया चा सनी पाजी, बॉब चा ढाकि-टीकी शक्ती कपूर.. सगळेच भारी आहेत. मुळात हे कार्टून लहान मुलांनी न पाहता, मोठ्यांनी पहावं असंच आहे Happy

Lol खरय मित. त्याच कारणाने मी आणी माझी मुलगी, दोघीजणी ओगीला फुल मार्क्स देतो. बाकी ढपलु, टपलु, मपलु ( परेश रावळ, अर्शद वार्सी, अक्षय ) आणी उरलेल्यान्मध्ये दादा कोन्डके ( पोलीस), डॉक्टर ( ओमप्रकाश ), अमीर खान, कादर खान, असरानी सगळे लाईनीत असतात.:फिदी:

भुंग्या चुप जळक्या Proud
__________________________________

दिल दोस्ती दुनियादारीचं एक भन्नाट चित्र थोपुवर पाहिला मिळालं.
चित्रकार माहीत नाही पण जो कोणी आहे लै भारी आहेस बुवा तू Happy

11264013_365733663627124_4047657162633962307_n.jpg

मस्त कार्टून!

मिनलच्या चेहेर्‍यावरचे भाव अगदी नेमके आहेत. >>> टोटली. त्यामुळेच तिला वाक्य दिलेले नाही तरी काही बिघडले नाही. रेश्मा व आशू चे भावही जमले आहेत मस्त. अ‍ॅना चे वाक्य नीट वाचता येत नाही - काय आहे ते? शेवटी कळते वगैरे भाग वाचता आला फक्त.

ओह ते 'मला सर्वात' आहे! तेच कळत नव्हते. थॅन्क्स निधी. बाकी अ‍ॅनाचे बोलणे मला समजले नाही, म्हणजे माझी लेव्हल काय झाली आता? Happy

रेश्मा काही वेळेस ओव्हर अ‍ॅक्टिन्ग करते असे वाटते. >>>>>> रेश्मा मला नेहमीच नाटकी वाटते.
तिचा अभिनय (?) अगदीच कृत्रिम.

किती गोड चित्र आहे! Happy

कालचा भाग ओके. काही पंचेस, सुजयचे एक्स्प्रेशन्स झकास!
नवीन मित्र आणलाय तो कायमस्वरूपी नसेल ना? Uhoh

नवीन मित्र आणलाय तो कायमस्वरूपी नसेल ना? >>> नसावा, अशी अपेक्षा. ६ जण आहेत ते तेव्हडेच राहुदेत.

नवीन मित्र आणलाय तो कायमस्वरूपी नसेल ना?
>>
मलाही ती शंका आलेली पण नसावा बहुदा!

काल सुजय द बेस्ट होता.

सारखं सारखं ते

एक मिनिट.... मला जरा प्लॅनिंग करू द्या Lol

Pages