Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना तो काल विचारतो पण ना
हो ना तो काल विचारतो पण ना मला का नाही फोन केला म्हणून?
मीनल आजारी असते तो भाग काल
मीनल आजारी असते तो भाग काल पाहिला. हा मात्र एंगेजिंग वाटला नाही.
दुसरे म्हणजे ते "रीथ" (Wreath) तो आणतो ते फक्त फ्युनरल करताच वापरतात असे नाही, ख्रिसमस ई. च्या डेकोरेशन करता ही वापरतात. भारतात ख्रिश्चन लोक ते फक्त फ्युनरल करता वापरत असतील तर कल्पना नाही.
भारतात 'रीथ' कोणी बडी
भारतात 'रीथ' कोणी बडी व्यक्ती( राजकारणी/ लष्करातली) गेली तर सुद्धा वापरतात, ती व्यक्ती हिंदु असली तरी. टिव्हीवर बघून बघून ते डोक्यात फिट बसलंय. म्हणून तस दाखवल असावं.
फक्त कैवल्यला सेंटी डायलॉगबाजी देण्यासाठी रात्री कैवल्य जागा असतो तेव्हा त्याला फोन केल्यास उपयोग होईल हे मीनल त्या डेंजर स्थळकाळी विसरणे फारच गैरलागू आहे. >>> आशूडी +१
मीनल रात्री ३ लासुद्धा एकदम टवटवीत दिसत होती.
तापात आणि तापत आणि तापट
तापात आणि तापत आणि तापट असतानाही.
कसली बावळट्ट पात्र घेतलीय ती
कसली बावळट्ट पात्र घेतलीय ती अनुष्का..
हम्म अतिशय डोक्यात गेलंय ते
हम्म अतिशय डोक्यात गेलंय ते पात्र. :रागः
एलतिगो मधे छान काम केलं होतं
एलतिगो मधे छान काम केलं होतं तीने. मला फार आवडली होती.
आता कलाकारांची ओळख झालीच असेल
आता कलाकारांची ओळख झालीच असेल तर त्यांची 'चला हवा...' मधली ओळख....
http://www.tvforumonline.com/8db0fb6d-918d-4e8f-ada5-49124b143990.aspx?d...
येवरीबडी ऑन द डान्स फ्लोअर,
येवरीबडी ऑन द डान्स फ्लोअर, काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेली भिती खरी ठरतीये.
काल प्रोमोज मधे दाखवलं- मीनलला स्वजो ची हिरोईन होण्याची ऑफर आलीये
हो पाहिला प्रोमो. मला नाही
हो पाहिला प्रोमो. मला नाही आवडला. स्वजोबरोबर गडबडलेली मीनल पहायला मजा नाही वाटली.
अवतरला एकदाची स्व.जो.. मिनलला
अवतरला एकदाची स्व.जो..
मिनलला रिक्वेस्ट करून त्याच्याबरोबर फोटो काढून घेता येणार नाही का? अशी चुपके चुपके का काढ्तिये..?
मित, स्वजो टाईमपास साठी
मित, स्वजो टाईमपास साठी आहे.
प्रमोशन करून जाणार.
Director मिनलला हकलून देणार
ती नाराज डिप्रेस्ड वगैरे होणार
स्वजो उपदेशाचे डोस वगैरे पाजणार आणि ती पुन्हा उभारी घेणार अस् काहीसं
चै, अगं स्वजोला पण कळतंय तिला फोटो हवाय ते पण तो मुद्दाम खेचतोय तिची टांग.
आणि स्वजोला सांगुन फोटो न काढून घेण्याचं कारण कालच्या भागात मिनल ॲनाला सांगते की मी त्याची heroin असताना मी त्याला फोटो आणि ऑटोग्राफ मागणं शोभतं का मला? आपला पण काही क्लास आहे की नाही?
पण हे इतकं बोलली तरी मिनल इतर सर्वसामान्य मुलींसारखीच आहे. त्यामुळे स्वजो बद्दल तिला पण attraction आहेच आणि त्यामुळे ती स्वताला हे सगळं करण्यापासून थांबवू शकत नाहीये etc etc.
मला मिनल हे पात्र आणि स्वानंदीची ॲक्टींग नेहमीच आवडते.
या मालिकेची पात्र निवड भन्नाट आहे. स्वानंदीची ॲना किंवा रेश्मा इतकी मस्त नसती वाटली बहुदा.
kaal Punches कमी होते पण जिथे स्वजो तिथे boreness by default असतोच
ओके रिया
ओके रिया
काल मीनलला जसं वाटत होतं ना
काल मीनलला जसं वाटत होतं ना मलाही लहानपणी तसंच वाटायचं हिरो हिरॉईन्सना आपल्यासारखंच सग्ळं होतं का?
स्वप्निल जोशी आहे असं प्रोमोत
स्वप्निल जोशी आहे असं प्रोमोत कळलं त्यामुळे गेले दोन्ही भाग पाहिलेले नाहीत.
शर्मिला +१, सेलेब्रिटी
शर्मिला +१, सेलेब्रिटी आल्यावर नेहमीपेक्षा टीआरपी खालावण्याचे हे पहिलेच उदाहरण असेल.
स्वप्निलबरोबरचा आणि कालचा
स्वप्निलबरोबरचा आणि कालचा भागही पाहिजे तितका रंगला नाही असं मला वाटलं. ते भाग फुल्ल वेडे, हिलेरियस असे व्हायला हवे होते. पण सो-सो झाले.
हो पूनम. बोअर झाले दोन्ही
हो पूनम. बोअर झाले दोन्ही भाग. त्यापेक्षा फ्रेण्ड्स सारखे त्याला स्वतः म्हणून न आणता त्याच्या इमेजच्या विरूद्ध कसल्यातरी भूमिकेत आणले असते तर मजा आली असती. तो कन्सेप्ट वापरायला हरकत नव्हती. येथे स्वजो आला पण सीन्स मधे, संवादांमधे काहीच दम नव्हता.
फा +१. स्वजो बोर झाला. संवाद
फा +१. स्वजो बोर झाला. संवाद पण बावळट होते. खरंतर मीनल असल्याने काहीतरी गमतीशीर, खटकेबाज सीन्स घेता आले असते.
त्यापेक्षा फ्रेण्ड्स सारखे
त्यापेक्षा फ्रेण्ड्स सारखे त्याला स्वतः म्हणून न आणता त्याच्या इमेजच्या विरूद्ध कसल्यातरी भूमिकेत आणले असते तर मजा आली असती>> +१. फ्रेण्ड्सच्या स्टार अॅपिअरन्समधला ब्रॅड पिट आणि ब्रूस विलिसचा भाग माझे पर्सनल फेवरेट आहेत.
आता मालिका मध्येच फार बोअर करतेय.
नवख्या अभिनेत्रीला चॅलेंजिंग
नवख्या अभिनेत्रीला चॅलेंजिंग सीन बरोबर काढला होता शोधून त्यांनी. एकदम प्रॉमिसिंग एपिसोड वाटला होता तेव्हा, पण पुढे फुसका बार निघाला. नवीन काम करणार्या मुलीला जर चित्रपटाच्या हीरो वर क्रश असेल तर त्याच्याकडे संशयाने पाहण्याचा सीन बरोबर करण्याआधी अनेक रीटेक्स लागतील हे सहज पटण्यासारखे वाटते - सुरूवातीला तिने त्याच्या कॅरेक्टर कडे संशयाने पाहायचे आहे हे विसरून स्वजो कडेच हरखून पाहणे, दिग्दर्शक त्यावर चिडणे वगैरे मस्त होते. पुढची स्क्रिप्ट जरा मेहनत घेऊन लिहायला हवी होती.
विषय संपले ... रडु येतं की
विषय संपले ... रडु येतं की नाही? यावर एपिसोड.. आता शिरेल होणार की काय?
कालचा भाग बरा होता.
कालचा भाग बरा होता. रडण्याबद्दलची सुजयची वाक्य छान होती. एकदम पटणेबल.
रडण्याबद्दलची सुजयची वाक्य
रडण्याबद्दलची सुजयची वाक्य छान होती. एकदम पटणेबल. +१
तरीही कैच्या आयुष्यातही असे हळवे कोपरे आहेत जे त्याला रडवतात ते दाखवायला हवे होते.
भिमुअण्णांची भैरवी ऐकुन डोळ्यात अश्रु येतात त्याला "रडणे" नक्कीच म्हणत नाहीत.
मला खूप आवडते हि मालिका. छान
मला खूप आवडते हि मालिका. छान आहे. इतर सगळ्या मालिका तुच्छ वाटतात या मालिकेपुढे. सगळी पात्र खूप जवळची वाटतात. म्हणजे चुका काढताच येणार नाहीत असं नाही. तरीही कुठेतरी सच्चेपणा, साधेपणा वाटतो अभिनयात. हिंदीतल्या 'तारक मेहेता का उल्टा चष्मा' सारखी वाटते. एका ओळीची कथा एका एपिसोडमध्ये फुलवतात आणि ती तितपतच मर्यादित ठेवतात. हा त्यांचा प्लस point आहे.
हा एपिसोड मात्र The one where
हा एपिसोड मात्र The one where Chandler can't cry या फ्रेण्ड्स मधल्या एपिसोड वर बेतलेला वाटला. इतरांचे रडणे व कैवल्यचे सरकॅस्टिक नेचर जरा जास्तच वाटले
तरीही कैच्या आयुष्यातही असे
तरीही कैच्या आयुष्यातही असे हळवे कोपरे आहेत जे त्याला रडवतात ते दाखवायला हवे होते.
भिमुअण्णांची भैरवी ऐकुन डोळ्यात अश्रु येतात त्याला "रडणे" नक्कीच म्हणत नाहीत.
>>>
+1
हिंदीतल्या 'तारक मेहेता का उल्टा चष्मा' सारखी वाटते.
>>
तरीही कैच्या आयुष्यातही असे
तरीही कैच्या आयुष्यातही असे हळवे कोपरे आहेत जे त्याला रडवतात ते दाखवायला हवे होते.
भिमुअण्णांची भैरवी ऐकुन डोळ्यात अश्रु येतात त्याला "रडणे" नक्कीच म्हणत नाहीत.
>>>
+1
हिंदीतल्या 'तारक मेहेता का उल्टा चष्मा' सारखी वाटते.
>>
कालचा अक्कलदाढेचा भाग बघताना
कालचा अक्कलदाढेचा भाग बघताना मजा आली. मीनल वॉज रॉकिंग.
मस्तच. :) दुनियादारी rocks
मस्तच. दुनियादारी rocks
Pages