दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घना पुन्हा टीव्हीवर येणार असं म्हटल्यावर भुवया उंचावल्या ना? पण थांबा. मराठीतला सुपरस्टार स्वप्नील जोशी लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झालाय हे खरंय. सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत काही एपिसोड्समध्ये स्वप्नील दिसला तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे यात तो टीव्हीवर स्वतः अभिनेता 'स्वप्नील जोशी' म्हणूनच दिसणार आहे.
--- इति मटा..

प्लीजच आवरा, स्वजो नको दिदोदु मधे Uhoh

उन्हाळा मला झेपला ना...बर्फ किसणे, फ्रीजमध्ये तोंड खुपसून बसणे, एसी रूम एकंदरीत मस्त होता उन्हाळी एपि.
प्रगल्भाला बरीचशी मृण्मयीची झाक आहे खरं. अ‍ॅक्टींग बरी करते.

कैवू? रिया ला कॉम्पीटिशन!! Wink

सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत काही एपिसोड्समध्ये स्वप्नील दिसला तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे यात तो टीव्हीवर स्वतः अभिनेता 'स्वप्नील जोशी' म्हणूनच दिसणार आहे.
--- इति मटा.. >> भयाण घाबरून सैरावैरा धावत सुटलेली बाहुली

>> भयाण घाबरून सैरावैरा धावत सुटलेली बाहुली >>> +१
नही!!! स्व.जो. नको.. रादर कुठलेच प्रमोशन नको. टाईमपास २ मुळे धडकी भरली आहे.

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
>>
हो हे भारी होतं Rofl

मला तर या मालिकेतले सगळेच छान गातात असं वाटतं. काहींना मुद्दाम खराब गावं लागतं Proud

आशूच्या पार्टीच्या एपिसोड मधे चक्क मिनलला बेक्कार गायला लावलेलं Proud

ड्रिमे, मी आता चिड चिड करणं सोडून दिलंय Proud
क्या करो अपनी तो चॉईसही ऐसी है.
मुली मागे तर लागणारच
(चर्चा तर होणारच च्या तालावर वाचा)

मी वर बोल्ड केलेल्या वाक्यात 'काही एपिसोड्स' म्हटलंय. म्हणजे एखाद्या सिनेमाचं प्रमोशन असेल असं वाटत नाही. कदाचित स्ट्रगलिंग अ‍ॅक्ट्रेस मिनल ला मदत करणारा सुपरस्टार वगैरे काहीतरी असायची शक्यता ('भिती' असं वाचा) वाटतीये.

कैवू? रिया ला कॉम्पीटिशन!! >> नाही गं. Happy

मोबाईल वरून "कैवल्य" एवढं टायपायचा कंटाळा आला होता. नुसत 'कै' म्हणणे म्हणजे भलताच अर्थ होतो. Wink
म्हणून कैवू म्हणाले. (केके म्हणाले असते तरी चाललं असतं अस आता वाटतय.) Happy

अंजली, अगं प्रगल्भा मैत्रिणीसोबत असते. आणि तीने याला हाय केल्यावर पण हा सरळ तिला इग्नोर करुन निघुन जातो... मैत्रिण चिडवते तिला म्हणून ती बेट लावते.

दोन एपिसोड मिसले मी. Uhoh त्यामुळे नंतरच माहित नाही मला.

+१

गेले २-३ दिवस हुकलेत त्यामुळे कॅच अप करतोय. साड्या हरवल्यानंतरचा एपिसोड आहे त्यात आशूचे काही संवाद धमाल आहेत - "कसला चोर तू, तुला साधा पोलिस ओळखता येत नाही", "हे घ्या (कपडे), आपले ओळखा आणि बक्षीस जिंका" ई. Happy

फारएन्ड +१
रच्याकने त्या राकेशला दुसरा शर्ट नाही का? घरात, ऑफिसला जातांना, बाहेर फिरतांना कायम तोच शर्ट. निशाचा पण ड्रेस मागे दाखवलेलाच होता.

पी.चन्द्रन' ह्या नावावरून तिला तो कोणी साऊथ चा फेमस मुवी डिरेक्टर वाटतो. पण तो असतो कोणी चन्द्रन पिच्कुडे. शिवाय हिला, आपण दोघे मुव्ही प्रोड्युस करु म्हणतो.

काल ते राकेशने मांडलेल्या इन्वेस्टमेंट स्किमविषयीचे भाग पाहिले. हा विषय जरा वरवर हाताळला गेला असं वाटलं. दहा हजाराचे ५ वर्षात एक लाख ही अतिशयोक्ती वाटली, हरकत नाही. लेखकांचा अभ्यास कमी पडला असेल. पण सुजयने मीनलला यात पैसे गुंतवण्याविषयी कन्विन्स करणं हे सुजयच्या व्यक्तीरेखेशी विसंगत वाटलं. स्किमच्या अटी वाचून झाल्यावर त्यांनी गुंतवणूक करणे कॅन्सल केले हे पाहिल्यावर पुन्हा लेखकांचा अभ्यास कमी पडला हे जाणवलं. म्हणजे हे इतर मालिकांमध्ये दाखवलं असतं तर एवढं जाणवलं नसतं, पण या मालिकेने अपेक्षा उंचावून ठेवल्या आहेत.
बाकी राकेशने रेश्माला 'कुठूनही दहा हजार उभे कर आणि यात गुंतवून तुझ्या भविष्याची तरतूद कर' हे सांगून तो खलनायक असल्याचं अधोरेखित केलं. आता त्याला कोणीतरी (मीनल किंवा कैवल्य) 'रेश्मा ही तुझी जबाबदारी आहे, तेव्हा तिच्या खर्चाचे पैसे तूच द्यायला हवेस' हे सुनवायला हवंय.
आशूने नेहमीप्रमाणे राकेशला गंडवलं, पण त्याच्या हुशार मित्रांनी त्याचा नेहमीप्रमाणेच पोपट केला.

सॉरी! मी काळाच्या मागे आहे त्यामुळे जुन्या भागांविषयी प्रतिसाद देतेय. पण ह्या गोष्टी नोंदवून ठेवाव्याश्या वाटल्या.

हिम्स त्या प्रगल्भाचा आवाजही नीट ऐकला तर कुंकू मध्ये मृण्मयीचा आवाज, बोलण्याची लकब याला बराचसा मॅच होतोय.

मीनल गोड दिसत होती साऊथ इंडियन गेट अपमध्ये! मीनलच्या आजारपणाचा आणि चॅलेंज गेम(याला वेगळं नाव आहे बहुदा) चा इपि मस्त!

कालचा भाग पण गोड होता....
कॉलेजमद्धे असताना रुम वर राहात होते माझ्या मैत्रिणींसोबत....तेव्हा आजारी पडल्यावर मलापण असंच वाटायचं सेम २ सेम....हा मालिकेचे बरेच भाग आपण आपल्या खर्या आयुष्याशी रीलेट करु शकतो म्हणुनच ही मालिका खुप जवळची वाटते असं माझं मत झालय आता..

आशु काल बुके म्हणुन जे काही घेउन येतो आणु त्यानंतरचे सुजय चे आणु त्याचे चेहेर्यावरील हावभाव मस्त Happy

फक्त कैवल्यला सेंटी डायलॉगबाजी देण्यासाठी रात्री कैवल्य जागा असतो तेव्हा त्याला फोन केल्यास उपयोग होईल हे मीनल त्या डेंजर स्थळकाळी विसरणे फारच गैरलागू आहे.

आशु काल बुके म्हणुन जे काही घेउन येतो आणि त्यानंतरचे सुजय आणि त्याच्या चेहेर्यावरील हावभाव मस्त >> +१

आशूने ते फुलांचे चक्र (त्याला काय म्हणतात? ) मीनलला दिलय आणि मीनल त्याला बडवतेय... असं इमॅजिनही केलं मी. Proud

कालचा भाग मिसला.. परवाचा भाग पाहून पडलेले काही प्रश्नः-
१. कैवल्य ह्या गँग मधला निशाचर प्राणी आहे, मग त्यालाच पहिला फोन का नाही केला ?
२. मुळात रात्री उशीरा सगळेच घरी असताना मीनल बाहेर जायला निघते, त्या वेळी कैवल्यचीच बाइक घेउन शूटला का नाही जात? जातानाचा येतानाचा प्रॉब्लेमच झाला नसता.
... असो, फारच मन लावून बघायला लागलो बहुतेक दिदोदु ! Happy

Pages