दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sagalech bhari acting karatat pan ka tya reshma n kaivalyala itake close hotana dakhavatayet :raag: :raag:

रीया बघ हा. आज रेश्मा आणी कैवल्य दोघेही बाईकवरुन जीवाची मुम्बई करायला गेले होते.:फिदी::दिवा:

रेश्माचा अभिनय बरा आहे, पण पात्र (अजूनतरी) नीट लिहिलेलं वाटत नाही. पुढे ते ठळकपणे समोर येईलही कदाचित..
याउलट कैवल्य हे पात्र छान लिहिलेलं आहे, पण अमेय वाघचा इथला अभिनय समहाऊ या पात्राला नीटपणे आपल्यासमोर आणत नाहीये. सुदर्शनवर काम केलेला हा कलाकार गुणी आहे, मात्र सिरियलचं अख्खं ओझं आपणच वाहत असल्याचं त्याला वाटत असल्याचं जाणवत राहतं, तो अभिनय करत असतानाही.

फारेंडाला अनुमोदन. इतर सिरियलींसारखे ते टाईट क्लोजप्स बंद केले पाहिजेत. त्यामुळे क्वचित ठिकाणी ही पात्रं सहजतेचा ट्रॅक सोडत आहेत, आणि शिवाय आजूबाजूच्या वातावरणाशी आणि त्या पात्रांशी एकमेकांशीही रंगत असलेल्या केमिस्ट्रीचा त्यामुळे बेरंग होतो आहे.

आमच्या घरी अ‍ॅना, रेश्मा, आशू ही पात्रं हिट आहेत. रेश्मा सर्वात जास्त. Proud

Nidhii Proud

Rashmi, bagh ki Sad
Ani aajchya bhagachya promot pan kase gulu gulu bolatana dakhavalet Sad :raag: :raag:

रात्रीच्या जागरणाचा एपिसोड छान झाला. आवडला. संवादही चांगले होते.

मलाही अमेय वाघ त्याच्या कैवल्य रोलला अजून चाचपडतो आहे असं वाटतं. विशेषतः कालच्या एपिसोडमधे काही मोमेन्ट्स सुटले त्याच्या कडून असं वाटलं.

उगीच क्लोज अप्स बद्दल फारएन्डला अनुमोदन. पात्रांना जबरदस्ती अभिनय करायला लागतो असं वाटत रहातं मग. सहजता जाते.

मला रेश्मा सुरुवातीला आवडली. पण आता ती खूपच शुभांगी गोखलेच्या सावलीतली वाटते. मुलगीच असल्याने आवाज, दिसणं यातलं साम्य ठीक आहे पण बोलण्याची स्टाईल, हालचाली, हसणं यात जरा तरी काही तरी वेगळेपणा दिसायला हवा. अगदिच बोनझाय वाटायला लागलीय ती शुभांगी गोखलेंची. (अगदीच मीन कमेन्ट करायची तर आई इतकी रेखीवही नाहीये ती.)

पण आता ती खूपच शुभांगी गोखलेच्या सावलीतली वाटते. मुलगीच असल्याने आवाज, दिसणं यातलं साम्य ठीक आहे पण बोलण्याची स्टाईल, हालचाली, हसणं यात जरा तरी काही तरी वेगळेपणा दिसायला हवा.. +१

रात्र किती बळ देऊन जाते सांगणारे सगळेच संवाद आवडले. अमेय वाघ तुकड्या तुकड्यात एकदम चमकून जातो. कालच रेश्मा जेव्हा त्याच्याजवळ जाते तेव्हा अचानक अवघडलेपण मस्त दाखवलं त्यानं आणि ते सावरून घेताना लगेच "परस्त्रीचा स्पर्श" वगैरे एकदम उत्स्फूर्त वाटेल इतकं सहज केलं. किंवा आशू भुताची गोष्ट सांगताना त्यानं चटाचट चेहर्यावरचे हावभाव बदलताना कमाल केली. पण हेच त्याला सलग पाहणं जड जातं उदा. जिन्यातला संवाद कधी संपतो असं झालं. आधीच त्याचं पात्रं आढ्यताखोर आणि वरून त्यात अमेय वाघचा स्वत:चा अटिट्यूड असं एकूण कॉम्बि फार हेवी होतं असं वाटतंय.
रेश्माला घरकाम करायला इतकं आवडतं का की तिला आपण पुढे काय करायचं याचा क्षणभरही विचार करावासा वाटत नाही? Happy

रेश्माला घरकाम करायला इतकं आवडतं का की तिला आपण पुढे काय करायचं याचा क्षणभरही विचार करावासा वाटत नाही? स्मित >>

आतापर्यंतच्या भागांमध्ये तरी तिला याशिवाय काही करताना दाखवलं नाहीये.. तिच्या करिअरचा विचार पुढे दाखवला तर तेही जेवण किंवा तत्सम खाण्याचे पदार्थ बनवणे याच्याशी निगडीत असेल असं वाटतयं.

जिन्यातला संवाद कधी संपतो असं झालं. आधीच त्याचं पात्रं आढ्यताखोर आणि वरून त्यात अमेय वाघचा स्वत:चा अटिट्यूड असं एकूण कॉम्बि फार हेवी होतं असं वाटतंय.
>>आशु अनुमोदन. ते फार मोठा प्रॉब्लेम झाला आता तु मला ओळखलंस वगैरे अतीच झालं जरा.

अगं करीयर जाऊदे (जायचं तर )चुलीत. आपल्या डिव्होर्सचं काय, घरी कसं सांगायचं, बहीणीचं लग्न, डिव्होर्सनंतर आपण परत घरी जायचं की मुंबईत राहायचं.. या विचारांनी मला तशीही रात्र रात्र झोप लागली नसती आणि ही जागं राहायच्या पैजा लावतेय! Proud

या विचारांनी मला तशीही रात्र रात्र झोप लागली नसती आणि ही जागं राहायच्या पैजा लावतेय!
>>>
नै तर काय!
ते पण कैवल्य सोबत बसून Angry

मलापण तो भाग बोअर झाला.

मी सध्या ६-७ एप्रिलच्या भागांवर आहे Proud

पण, <<आपल्या डिव्होर्सचं काय, घरी कसं सांगायचं, बहीणीचं लग्न, डिव्होर्सनंतर आपण परत घरी जायचं की मुंबईत राहायचं..>> याला मात्र + १००. त्या राकेशच्या वडिलांनाही ह्या दोघांच्या लग्नाची काही चिंता नाहीये का? ते एकाच भागात फक्त दाखवले.

अरे पण रेश्माचे वडील ख्याली खुशाली विचारायला कॉलतात तसं त्यांनी नको कॉलायला?
सुनेला दे फोन नको म्हणायला? Uhoh
घरी नको यायला? Uhoh

अगं हो हो! Happy
बरोबर आहे तुझं!

आणि तुझा त्रागा कळतोय आम्हाला.... रेश्माने एकदाचं घरातुन निघुन जावं म्हणजे मग शांतपणे कैवल्यला बघता येईल. Proud

अरे पण त्यांना कुठे माहितीय हे दोघं वेगळे होतायत ते?>> 'निशाशी लग्न कलाच्चं' असं म्हणून हट्ट करणारं आपलं बाळ एकाएकी रेश्माशी लग्न करून मोकळं झालं, बायकोला माहेरी ठेवून मुंबईला गेलं, आपल्या सुनेच्या बहिणीच्या लग्नाच्या बैठकीला आपण गेलो, त्यानंतर आपली सून एकदाची मुंबईला आपल्या दिवट्याकडे गेली आणि आपण इकडे 'सुटलो बुवा!' असं म्हणून निश्चिंत झालो.

ते येऊ देत किंवा न येऊ देत; रेश्माला दोन दिवस घरी जावंसं वाटत नाही कि तिची आई तिला बोलवत नाही. बहिणीच्या लग्नाचं शॉपिंग पण कारण नसावं का? किंवा तिला हे सारं राकेशच्या घरच्यांनाही कळवावंसं वाटत नाही? ते ही जाऊद्या, खर्चायचे, राहायचे पैसे कुठून आणायचे एवढं तरी निदान? असं होऊच शकत नाही.. जागे व्हा लेखकमंडळी.

Lol रेश्मा बद्दलच्या पोस्ट्स साठी सगळ्याजणींना +१

ते कै रे चे लवकर उठणे जागणे वाले डायलॉग कसले लांबडलेले आणि कंटाळ्वाणे होते. बॉर.

खर्चायचे, राहायचे पैसे कुठून आणायचे एवढं तरी निदान?>> ते पाचपाचशे रुपयांच्या पैजा लावतात ना Happy

रेश्माला दोन दिवस घरी जावंसं वाटत नाही कि तिची आई तिला बोलवत नाही. बहिणीच्या लग्नाचं शॉपिंग पण कारण नसावं का?>> तिला ढीग वाटतं गं... पण त्याहीपेक्षा तिला वडिलांची काळजी जास्त आहे. ती गेली माहेरी आणि राकेशच हे लफडं कळल्यामुळे तिच्या बहिणीच्या लग्नात विघ्न आलं तर? आणि त्यामुळे वडिलांची तब्येत ढासळली तर? या काळजीपायी ती घरी जात नसावी.
हेही स्वीकारार्ह आहे. पण सोयीने, पात्र उपलब्ध असतील त्यावेळी तसे तसे भाग लिहिणं किंवा कथानक पुढे न सरकणं, लूज एंड्स प्रेक्षकांनाही जाणवणं असं होऊ नये या मालिकेच्या बाबतीते अशी इच्छा आहे.
आता मी जवळ जवळ एक महिन्यापूर्वीचे भाग बघतेय, तिथपासून अजूनही राकेश आघाडीवर काही ठोस निर्णय नाही त्यामुळे चिंता वाटतेय. मध्यंतरी काहीतरी बँक अकाऊंटवरून हालचाल घडली असं इथल्या पोस्टवरून जाणवलं. रेश्माचा खर्च मित्रमंडळी राकेशकडून वसूल करत असतील तर चांगलंच आहे, पण प्रेक्षकांना आडाखे बांधायला लावू नका म्हणावं.

ते ही जाऊद्या, खर्चायचे, राहायचे पैसे कुठून आणायचे एवढं तरी निदान?
>>
हे माझ्याही लक्षात आलंय पण मी वेट अ‍ॅन्ड वॉच मोड मधे आहे कारण या महिन्याचं घर भाडं देऊन झालंय.
पुढच्य अमहिन्याचं कुठुन आणतेय ते बघायचंय आता.

निधी, असं काही नाही गं Happy
रेश्मा हे पात्रच मंद आहे म्हणून चिड चिड (उगाचच)

'निशाशी लग्न कलाच्चं' असं म्हणून हट्ट करणारं आपलं बाळ एकाएकी रेश्माशी लग्न करून मोकळं झालं>>

निशाबद्दल राकेशच्या बाबांना माहितेय? कधी दाखवलं असं? मी मिसतेय का काही?
पैसे पाठवण्यासाठी रेश्मा-राकेशचं जाॅइंट बॅक अकाउंट उघडायला सांगतात कारण त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही हे दाखवलेलं आठवतंय पण त्याचही पुढे काहीच दाखवल नाहीये..

रेश्माला घरकाम करायला इतकं आवडतं का की तिला आपण पुढे काय करायचं याचा क्षणभरही विचार करावासा वाटत नाही?>>>>> हे सन्जय जाधव, आशिष पाथरे वगैरे मन्डळी माबो तर वाचत नाहीत ना?:फिदी: कारण आजचा भाग मुलानी स्वयम्पाक करण्याचा आहे, रेश्मा खाणे बनवणार नाही असे मीनल ठामपणे सान्गते.:फिदी:

पोर बनवतायत काहीतरी, बघुया.

Pages