दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक दोन एपिसोड पाहिले या मालिकेचे . आवडले . कैवल्य आणि माबोकर भुंगा कुंभ के मेले मै बिछडे हुए आहेत काय असे वाटले Light 1 Proud

आरती अंकलीकरांची मुलगी मस्त दिसते. आणि तो स्कॉलर पण मस्त .

मी एक दोन एपिसोड पाहिले या मालिकेचे . आवडले . कैवल्य आणि माबोकर भुंगा कुंभ के मेले मै बिछडे हुए आहेत काय असे वाटले Light 1 Proud

आरती अंकलीकरांची मुलगी मस्त दिसते. आणि तो स्कॉलर पण मस्त .

मला या मालिकेची एक गोष्ट-एक एपिसोड (फारतर दोन) हा फॉरमॅट आवडला होता.

हे अग्निशचा ब'डे.. मग कैवल्यचं गाणं.. शेवटी बाबांचं आगमन.. इमोशनल ड्रामा.. आता उद्याच्या भागात मीनल नी अ‍ॅनाने त्यांना जाऊन भेटणं.. समहाउ लईच लांबण लागल्यासारखं वाटतंय..

अरे पण सतत काय नवीन दाखवणार? एकतर ते सगळे स्ट्रगलर्स. प्रत्येकाची कौटुंबिक कहाणी किंवा करीयरची कथा दाखवत बसले तर ती इतर सिरीयलपेक्षा वेगळी काय दाखवणार? त्यापेक्षा सगळ्यांची सामायिक एखादी स्टोरी कंटिन्यू करणंच बरोबर नाही का? स्ट्रगलर्सच्या रोजच्या आयुष्यात उधारी, भंकस, एखादा क्रश, आशानिराशेचे खेळ यापेक्षा वेगळं काय असणार. रोज त्यात पंच असायलाच पाहिजे असा काही तो चला हवा येऊ द्या कार्यक्रम नाही. सुरवातीला प्रेक्षक खेचण्याकरता त्यांनी त्याचा डोस जास्त दिलाही असेल पण आता मालिकेने स्लो अँड स्टेडी जायला हवं नाहीतर ज्या वेगात ती सुरू झाली त्याच वेगात विसरलीही जाईल.

स्लो असायला हरकत नाही पण मालिकेची वेळ, तरुण ऑडियन्स लक्षात घेता अगदीच प्रेडिक्टेबल जोक्स आणि ट्रॅक टाळून आऊट ऑफ द बॉक्स करायला हरकत नाहीये. यात पोटेन्शियल आहे आणि तसा प्रयत्नही झाला अनेक भागांमधे. आता कौटुंबिक मालिकांच्या प्रेक्षकवर्गाला खूश करणारं कथानक रेटण्याचा प्रयत्न समहाऊ काही वेळा जाणवायला लागलाय. मला तरी ते कैवल्यचं ऐनवेळी येणं, नंतर वडिलांनी हिणवणं टिपिकल वाटलं. का रे दुरावा मधे काय वेगळं आहे यापेक्षा असं.

सारखे पंचेस असावेत असे मला अजिबात वाटत नाही (त्यात एकाचा "पंच" हा दुसर्‍याचा "डंब जोक" असू शकतो Happy ) पण प्रेक्षकांना एंगेज करणारे मटेरियल असावे. समोर उगाच ताणत आहेत किंवा कदाचित इतर विनोद सुचले नाहीत म्हणून फार्सिकल कॉमेडी करण्याचा प्रयत्न चालू आहे असे वाटले एक दोन दा - त्या वाढदिवसाच्या पार्टी वाल्या एपिसोड्स मधे.

निदान नवीन मालिकेच्या सुरूवातीच्या एपिसोड्स मधे जॅम पॅक्ड मटेरियल पाहिजे. मग दोन तीन जोरदार सीझन झाले की मग लेखक लोकांची कल्पनाशक्ती क्षीण होत चालली की तोपर्यंत लोकप्रिय झालेली मालिका अजून खेचायला सीन ताणले जातात, तसे इतक्या सुरूवातीला होउ नये.

ट्रगलर्सच्या रोजच्या आयुष्यात उधारी, भंकस, एखादा क्रश, आशानिराशेचे खेळ यापेक्षा वेगळं काय असणार. >>> _डी, उलट हेच असायला हवे. त्यात जितक्या शक्यता असतात तरूणांना आवडणार्‍या विनोदाच्या तितक्या इतर विषयांत क्वचित असतील.

तो कैवल्य इतका गर्वाने/उर्मटपणे का वागत होता त्याचा काहीच खुलासा झाला नाही. त्याचे वडील येणार आहेत तेथे हे त्याला माहीत होते व म्हणून ते तो टाळत होता का? मग बाकीच्यांची एवढी हेटाई कशाला त्याकरता? मुख्य म्हणजे हे कोणी विचारलेले दिसले नाही त्याला नंतर. माझे हुकले का?

> _डी, उलट हेच असायला हवे. त्यात जितक्या शक्यता असतात तरूणांना आवडणार्‍या विनोदाच्या तितक्या इतर विषयांत क्वचित असतील >> मग तेच तर दाखवतायत की. आता तो बर्थडेपार्टीचा इव्हेंट जरा बोअर झाला खरा पण त्यातूनच हे कैवल्यशी इतरांनी जीव तोडून भांडणं, कैवल्यचं मित्रांसाठी स्वतःचा ताठा बाजूला ठेवणं, वडलांची आणि त्याची तेढ वाढणं, मित्रांनी त्याला समजावणं हे सगळं आलं की. मित्रामित्रांत तर हे नेहमीचंच असतं. तेच दाखवतायत.
नाही तुझं हुकले नाही, पण गाणं झाल्यावर तो म्हणतो की आशूला, तुझी फजिती मी घरात कितीही आणि केव्हाही करूच शकतो पण म्हणून जगासमोर तुझी फजिती होऊ देणार नाही. आधी तो तयार नसतो कारण त्याचं गाणं चिल्लर पार्टीत गाण्याइतकं स्वस्त नाही, पण मित्रांच्या फजितीपेक्षा ते महागही नाही एवढंच. Happy

काल पुन्हा एकदा शेजारच्या आजी रॉकिंग! पण त्यांना काकू म्हणायला पाहिजे बै. Proud
मीनल आणि सुजयची पण मस्त केमिस्ट्री. रक्ताच्या नात्यात मित्रांनी पडू नये. आपण काय करावं? अव्हेलेबल असावं. वा. (वपु का आठवले सुजयकडे बघताना? )
मीनल टिपीकली कन्फ्यूज्ड छान दाखवलीये, कैवल्यच्या बिझनेलसमन बाबांनी दुसरी बाजू अलगद गळी उतरवल्यावर.

तो कैवल्य इतका गर्वाने/उर्मटपणे का वागत होता त्याचा काहीच खुलासा झाला नाही. त्याचे वडील येणार आहेत तेथे हे त्याला माहीत होते व म्हणून ते तो टाळत होता का? मग बाकीच्यांची एवढी हेटाई कशाला त्याकरता? मुख्य म्हणजे हे कोणी विचारलेले दिसले नाही त्याला नंतर. माझे हुकले का?>>> हो, तुझा एक भाग हुकला असावा. ज्यात रेश्मा आत्महत्त्या करण्याचा विचार मनात आणते, तो विचार प्रत्यक्षात आणणे किती भयंकर अवघड आहे हे तिला कैवल्य, आशू आणि सुजय पटवून देतात तो भाग अतिशय उच्च होता. त्यात कैवल्यचे त्याच्या वडिलांबरोबरचे संबंध का कटू झाले याविषयीचा प्रसंग दाखवला होता.
लेटेस्ट भाग माझे बघून होत नाहीयेत. वेळ मिळेल तेव्हा मी जुनेच भाग बघते आहे. तुम्ही चर्चा करताय तो बर्थडे पार्टी भागही मी अजून पाहिलेला नाही. पण इथल्या चर्चेवरून साधारण लक्षात येतंय.

ज्यात रेश्मा आत्महत्त्या करण्याचा विचार मनात आणते, तो विचार प्रत्यक्षात आणणे किती भयंकर अवघड आहे हे तिला कैवल्य, आशू आणि सुजय पटवून देतात तो भाग अतिशय उच्च होता. त्यात कैवल्यचे त्याच्या वडिलांबरोबरचे संबंध का कटू झाले याविषयीचा प्रसंग दाखवला होता.

>>>>>>>>>>>>>>>> मी सगळे जुने एपिसोड्स पाहीले आहेत ऑनलाइन. मला नाही आठवत असा कुठला भाग. अजुन काही घडलेल का त्या भागात म्हणजे पुन्हा एकदा पाहता येइल.

ती निशा घरी येऊन रेश्माला 'तू का आहेस या जगात?' असं म्हणून जाते त्यानंतरचा भाग.
लिंक घरून देऊ शकेन.

सुजय आशू आणि कैवल्य तिघेही जण मुद्दाम ठरवून रेश्माला आत्महत्त्येचे विविध उपाय सुचवतात. त्यातलं गांभीर्य अतिशय हलक्याफुलक्या पण परीणामकारक पद्धतीने तिच्यावर ठसवायचा प्रयत्न करतात आणि शेवटी तिच्याकडून 'मला नाही मरायचं' हे वदवून घेतात.
तेव्हाच कैवल्य तिला समजावतो की कसा त्यानेही आयुष्य संपवायचा विचार केला होता आणि तो कसा त्यापासून परावृत्त झाला.

ती निशा घरी येऊन रेश्माला 'तू का आहेस या जगात?' असं म्हणून जाते त्यानंतरचा भाग.
लिंक घरून देऊ शकेन.

>>>>>>>> धन्यवाद Happy

कालचाही भाग बोअर झाला. तो कैवल्य जिंगल सुचावी म्हणून जरा शांतता शोधत असतो तो. एंगेज नाही करू शकला. रेश्माने भीगी बिल्ली लुक सोडला हे चांगले केले पण ओव्हर हायपर दाखवली काल ती. तसेच तो आशूही. सीन मधे विनोद स्वाभाविक पणे सुचला नाही तर काहीतरी हावभाव करून, आरडाओरडा करून विनोद निर्मितीचे प्रयत्न सुरू होते. तरूण शिक्षित लोक अशा प्रसंगी स्वाभाविकपणे जसे वागतील तसे हे वागत आहेत असे वाटत नाही.

फारेंड, मला हे सुरवातीपासून खटकत आहे. ओव्हरॉल सगळे उगाच हेल काढून बोलतात व बालिशपणे वावरतात. Uhoh (विशेषतः तो आशू.. )

आवडून घ्यायची आहे ही मालिका.. पण नाही जमत आहे.. जाऊदे.. फ्रेंड्सच पाहते परत मी.. Happy

आशूचा हेल मला जरा उलट थोडा वेगळेपणा देतो असे वाटले सुरूवातीला, बाकीच्यांच्या "प्रमाण" म्रराठीपेक्षा. अजूनतरी त्याच्या हेलाचा प्रॉब्लेम वाटला नाही पण ओढूनताणून विनोदनिर्मितीचा मात्र वाटला.

रश्मीचा विनोद करायचा प्रयत्न, त्यावर कैवल्यची कॉमेण्ट - तो प्रसंग जमला होता. तो ते वाद्य (पियानो की सिंथेसायझर) वाजवून चाल तयार करायच्या तयारीत असताना कोकम सरबत व कांदा याचे काय करायचे वगैरे प्रसंग ठीक होते पण जरा अजून खुलवता आले असते.

मिनलनेही जरा टोन डाउन व्हायची गरज आहे >> पहिल्या दिवसापासूनच. ओव्हरॅक्टिंग. डॅशिंग आणि स्ट्रेट फॉर्वर्ड स्वभाव असलेली कॅरेक्टर्स अशी सदासर्वकाळ वरच्या टोनात वावरत नसतात.
आणि कैवल्य पण शिकतोय हळुहळू ओव्हरअ‍ॅक्ट नि ओव्हरिअ‍ॅक्ट.

त्यामानाने रेश्मा फार्फार परवडली. Proud

रश्मीचा विनोद करायचा प्रयत्न>>>रेश्मा हो! उगाच माबोवरच्या रश्मीला का घेताय! ती एक कविता / गाणे रचेल यावर...:P

आशूची बोलण्याची स्टाईल मला आवडते. जशी मकरंद अनासपुरेची बोलीभाषा सुरुवातीला वेगळी आणि चांगली वाटायची. नंतर तोचतोचपणा आल्याने तो डोक्यात गेला ही गोष्ट वेगळी... हे उदाहरण मात्र आशूने लक्षात ठेवावे. (पुष्कराज चिरपुटकर ना त्याचं नाव?) तो खरंच विदर्भातला आहे का?

मीनलचं टोनडाऊन, रेश्माचं हायपर होण्याला अनुमोदन. टू मच वाटतंय ते.
आशूचा हेल तसाच राहायला हवा पण प्रत्येकवेळी विनोदनिर्मितीसाठीच त्याचा वापर करणं थांबवायला हवं. जनरली, अगदी कायमचं स्थलांतर केलं तरी आपल्या मूळ भाषेतले शब्द, हेल सुटता सुटत नाहीत. ते तसंच हवं आणि.

मला प्रादेशिक हेल नाही वाटला तो. मुद्दामहून बालिश बोलल्यासारखे वाटते. अर्थात मला काही बोलीभाषेच्या हेलांचे खूप ज्ञान नाही, सो असेलही त्याची बोलण्याची ढब मुळात तशी.. किंवा त्या कॅरॅक्टरची. असो.. Happy

मुद्दामहून बालिश बोलल्यासारखे वाटते>> नाही... बेअरींग घेतलं असेल तर हे असं बोलणं इतके दिवस कंटिन्यू करता येणं अवघड आहे. डेली सोप असल्यामुळे दिग्दर्शकाला रीटेकवर रीटेक घेणंही शक्य होणार नाही. त्याची बोलण्याची ढब नैसर्गिकच आहे.

आजचा सुजय व कैवल्यचा संवाद बराच सेन्सिबल होता. आणि मुख्य म्हणजे कैवल्याचा तो मित्र उगाच व्हिलन केलेला नाही, हे ही आवडले. तो व्यवसायातील वस्तुस्थिती सांगतो ते ही सेन्सिबल वाटले.

Pages