दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आशू - ए स्कॉलर तुला कळलंय ना काय करायचयं ते? मग तेच कर.. फिदीफिदी>>
हे उच्च होतं...
आणि अजुन एक...
"आम्ही काय गिटार वर वदनी कवळ वाजवायची वाट पाहायची होती का ?"...बेक्क्कार हसले मी याला...
आशु सगळ्यात जास्त आवडायला लागलय मला...

आम्ही काय गिटार वर वदनी कवळ वाजवायची वाट पाहायची होती का ?"...बेक्क्कार हसले मी याला>>>> मीपण!!!

न्यूनगंडावरचा सायलेंट पंच पण सही होता!!!! मज्जा आली. रेश्माच्या प्रॉब्लेमवरून इकडे तिकडे फिरतात ते जरा बरंच आहे.

आशू भयंकर बोर करायला लागलाय. ऍना सुद्धा. कंटाळा आला आजच्या एपिसोडला. बालिशपणाची पातळी वाढत चाललीय हळू हळू.

टायटल साँग बघून बघून आवडायला लागले आहे आता. तो राकेश ला भेटल्यानंतरचा एपिसोड आहे त्याचा पुढचा भाग बरा होता. "मी वजन कमी करण्याची अ‍ॅड केली होती/ती लागतही नाही आता टीव्ही वर" वगैरे डॉयलॉग चांगले होते. एपिसोड च्या शेवटी रेश्मा अ‍ॅग्रेसिव होणे तेही आवडले.

एवढा क्लोज अप का मारतात, फ्रेण्ड्स सारखा जरा वाईड शॉट का घेत नाहीत? संवाद व त्यावरच्या प्रतिक्रिया एकाच अँगल मधून एकाच वेळी दिसल्या पाहिजेत स्वाभाविकपणे. इतर सिरीयल सारख्या एका सीन मधे डॉयलॉग व नंतर पुढच्या सीन मधे प्रतिक्रिया हे कृत्रिम वाटते.

कालच्या भागातलं अ‍ॅनाचं 'रानी को देखो, रानी को देखो' आणि आशुचं घडी-घडी 'येवरीबडी ऑन द डान्स फ्लोअर' म्हणणं भन्नाट होतं.

+1 Lol

पाणी घालणे सुरु झाले ?
होसुमीयाघ मधे माझ्या जानीचं पत्र हरवलं, ते कोणी फाडीलं चालू आहे,
जुयुरेगा मधे चित्राचं काय झालं चालू आहे,
...... आणि आता दिदोदु मधे अग्निशचा बड्डे चालू केलंय !!! प्लीजच, नॉट फेअर... परत पुढच्या भागात केके ची हिरोगिरी करत आयत्या वेळी मरायला टेकलेल्या पार्टीत येऊन गाणे म्हणणे असं दिसतंय. पुन्हा टिपीकल होऊ नये एवढी अपेक्षा.

ओह थॅन्क्स मित. हो ते पार्टी ची तयारी वगैरे पाहिली. पण हे नाव नव्हते लक्षात आले.

शनि-रवि नवीन भाग नसतात का?

एकूण ही सिरीयल लाँग रनिंग पोटेन्शियल असलेली आहे. सहा सिंगल्स म्हंटल्यावर असंख्य शक्यता दाखवू शकतात धमाल विनोदी. हा पहिला सीझन असणार. खरे म्हणजे आता २०-३० एपिसोडचे मटेरियल पॅक्ड असायला हवे. असे ताणावे का लागते कळत नाही.

नाही पाणी वाटत नाही, कैवल्यचे वडील पार्टीत येतात आणि त्याला बोलतात असा ट्रेलर पाहिला आताच.

एकूण ही सिरीयल लाँग रनिंग पोटेन्शियल असलेली आहे. >>>>+११११

दुष्काळातून आलीस का? नाही मी तर घरून आले आपण एकत्रच नाही का आलो?
लोन फिटतं माहितीय, पारणं कसं फिटतं?>>>धमाल आहे.

मालिका आता पंच घालवायला लागली आहे असं वाटतंय. एखादा भाग बुडला तरी चालतंय टाईप्स. अधूनमधून मस्त पंचेस येतात, पण तितपतच.

कैवल्यचे वडील पार्टीत येतात आणि त्याला बोलतात>>> हो बरच बोलले त्याचे वडील त्याला.
बास आता आयुष्यात परत कधीच गाणार नाही इति कैवल्य ::अरेरे:

मालिका आता पंच घालवायला लागली आहे असं वाटतंय. एखादा भाग बुडला तरी चालतंय टाईप्स. अधूनमधून मस्त पंचेस येतात, पण तितपतच.
>>
+१

Pages