दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैवल्य तर अर्ध्या अधिक वेळेला बनियन वरच असतो<<< म्हणून तर किंजल यायच्या आधी रेश्मा त्याल "तू पूर्ण कपडे घालशील का?" असं म्हणते. Happy

She is so fool.
She could have denied for the joint account atleast after knowing his real intentions. Angry

न्यूनगंडचा >> +१... जो तुम्हाला दोघांना असायला हवा पण नाहीये Proud
रेश्माने अकाऊंट ओपन केलं का तशीच निघून आली ? मधला थोडा पार्ट मिस झाला माझा.

ओह.. आता कळलं तू कालचा प्रतिसाद इतका चिडून का लिहिला होतास ते. मूर्ख आहे ती रेश्मा मग Angry

शेवट छान झाला कालच्या भागात नैतर रडूबाईन गेले २ भाग जास्तच फुटेज खाल्लेलं.....

राकेश रेश्माला तुला पैसे नकोच असतील ना अस म्हणतो अन ती म्हण्ते मी कशाला घेइन तुमचे पैसे. तेव्हा राकेशनं छान एक्स्प्रेशन दिलेत... (त्याला अपेक्षीत रिअ‍ॅक्शन आली ते पाहुन)

जुने एपिसोड बघतेय... निकम आजींची एंट्री असलेला भाग कसला भारी झाला आहे. गैरसमजांवर दोन-तीन भाग तरी सहज ताणता आले असते, पण हा कृत्रिमपणा या मालिकेचा स्वभावच नाही अजिबात. आजींच्या वयानुसार असलेला भोचकपणा, पण त्याचबरोबर मॅच्युरीटीही दाखवणं जबरदस्त!
कपडे, मेकप, नेपथ्य यापैकी काहीही कृत्रिम नाही. सगळ्यांचा अभिनय आणि वावर अगदी सहजसोपा. आणि सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे एक्स्प्रेशन्स! काय सुपर्ब एक्स्प्रेशन्स देत आहेत सगळे.. क्लासिकच अगदी!

>>निकम आजींची एंट्री असलेला भाग कसला भारी झाला आहे.>>
हा कुठला भाग..? मी कस मिसल हे ? कोण निकम आज्जी...?
जरा उलगडुन सांगाल का प्लीज...

हो हो. साहिर कुसुमाग्रज बोरकर वगैरे कोट करणार्‍या आज्जी आहेत. नंतर फारश्या दाखवल्या नाहीत. गरजेनुसार येतील बहुतेक!!

a/c ओपेन केलंय असा काही प्रसंग नाही दाखवला. ती डायरेक्ट रिक्षात बसून रडत घरी आलीये असं दाखवलं. नसेलही केलं a/c ओपन.

खालच्या दुकानदाराला ३ रू. द्यायचे राहिलेत ते तू दे. आम्ही तिघं नंतर शेअर करून तुला परत करू... Proud

a/c ओपेन केलंय असा काही प्रसंग नाही दाखवला. ती डायरेक्ट रिक्षात बसून रडत घरी आलीये असं दाखवलं. नसेलही केलं a/c ओपन.

>> तिचे रिक्षेत बसल्यावर ऐकवलेले विचार आणि नंतर ती फोनवर राकेशशी चिडून बोलते या दोन्ही वेळेस तिने सह्या केल्या आणि अकाऊंट उघडले याचा उल्लेख आहे.

Pages