Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि मग मेघना लग्नाच्या
आणि मग मेघना लग्नाच्या पहिल्या रात्री आन ला सांगेल कि मी आता आ दे वर प्रेम करते. मला ते उमगायच्या आत त्यांनी माझे लग्न तुझ्याबरोबर लावून दिले.
सही सोनाली, पण मग देसाई
सही सोनाली, पण मग देसाई family छानशी मुलगी बघून आ दे चं लग्न लावून देईल. मेघनाची परतीची वाट बंद. ह्या नोटवर सिरीयल संपली तर कित्ती मज्जा येईल.
मेघनाचे आ.न. बरोबर लग्न झाले
मेघनाचे आ.न. बरोबर लग्न झाले आहे...
नानानी अर्चूला वाड्यातून बाहेर काढले आहे..
सुमोनी विजयाला जरा 'चांगले कपडे घाल..' असे सुनावले आहे...
बायको अगर मावशीने कुडाळकरांच्या कानाखाली वाजवली आहे....
यापैकी एक किंवा अनेक शेवट सिरीयलला चालतील....
नानानी अर्चूला वाड्यातून
नानानी अर्चूला वाड्यातून बाहेर काढले आहे. >> हे कशाला?
नानानी अर्चूला वाड्यातून
नानानी अर्चूला वाड्यातून बाहेर काढले आहे. >> हे कशाला? << वाड्यात पडायला होते, आणि तिला पडताना अॅक्टिंग जमत नाही म्हणून...
परदेसाई एक्झाकटली, मीपण हेच
परदेसाई एक्झाकटली, मीपण हेच विचारणार होते की अर्चुला का घराबाहेर काढायचे, बाकी मुद्यांशी सहमत. पण तुमचे त्यावरचे उत्तर आवडले.
ती बिचारी विजया...चेहर्याचे
ती बिचारी विजया...चेहर्याचे काय झाले आहे तिच्या. थोडे दिवस मेकपला ब्रेक घे म्हणाव. बघवत नाहीये अगदी. पण ती प्रामाणिकपणे काम करते त्याचे कौतुक वाटते.
उन्हाळ्यातल्या त्या एका
उन्हाळ्यातल्या त्या एका लांबलेल्या उदास, उष्ण संध्याकाळी मेघना चे भेसुर गाणे एकुन गानुआजीची अंगाइ आठवली..आणि भुतकाळाच्या विक्रुत सावल्या आजुबाजुला फेर धरुन नाचु लागल्या.
-- feeling हादरलेला
.
.
.
.
प्राजक्ता माळी इतकी भयाण गात
प्राजक्ता माळी इतकी भयाण गात असेल ह्याची कल्पना नव्हती. काय आवाज लावला होता !
कशाला गायला लावायचे मग ? बजेटची बोंब असेल तर ओळखीत कुणा हौशी गायिकेला बोलावून डबिंगच्यावेळीच रेकॉर्ड करुन घ्यायच्या चार ओळी.
हनी सिंगच्या अल्बमात गायला
हनी सिंगच्या अल्बमात गायला लावा हीला.. चार बोतल वोडका डाउन सुर लागलेला तिचा..
ह्यॅट.. अस गातात का कुणी?
हो ना....वर त्या आदित्यला
हो ना....वर त्या आदित्यला जबरदस्ती छान गातेस हो म्हणायला लावलं. छ्छ्या....अरे लेका असेल हिम्मत तर सांगायचं सरळ, ए बाई आत्ता त्या नगरकराकडे सोडतो पाहिजे तर, पण गाणं आवर....एकीकडे रडूबाई आणि दुसरीकडे बेसूर गाऊबाई....नशीब माईसाहेबांनी नाही ऐकलं, नाहीतर दुसर्या दिवशी जाहीर मैफलच केली असती मेघनाची....
अरे, बिचारा आदे असल्या
अरे, बिचारा आदे असल्या गाण्याला पण मनापासून दाद देतोय म्हणजे किती होपलेसली प्रेमात पडला असेल ना! भावनाओंको समझो भाय!
मेघनाचे मेघनाचे गाणे चालु
मेघनाचे मेघनाचे गाणे चालु असताना मी सुट्टया पैशांसाठी पर्स शोधत होते. 'ए, चल सुट्टे नाहित, पुढे जा' असे म्हणावेसे वाटले त्या मेघनाला मला.
पाणी घालुन मालिका कशी वाढवायची याचे सध्याच्या काळातले ऊत्तम उदाहरण आहे हि मालिका. मेघनाचा सतत रडका चेहरा मालिकेचा युएसपी!
होपलेसली प्रेमात>> सो ट्रू
होपलेसली प्रेमात>> सो ट्रू
नुसती रेकत होती मेदे. शी! एक
नुसती रेकत होती मेदे.
शी! एक प्रेमात आंधळा माणूसच असे करतो.
भयानक बेसूर गाते ती मेघना.
भयानक बेसूर गाते ती मेघना. बजेट कमी होत तर एलतीगो मधून मधूला तरी बोलवायच. आज काल तिच्या सुरेल आवाजाचि जाहीरात म्हणून कि काइ तिला गाणी दिलेली असतात. ती तरि बरी गायली असती. म्हण्जे सुसह्य.
मेघनाच गाणं म्हणजे ...
मेघनाच गाणं म्हणजे ...:D !
अर्चू स्पष्टवक्ती वगैरे न वाटता कमी समज असल्याने काहीही बोलणारी वाटते.
अर्चू स्पष्टवक्ती वगैरे न
अर्चू स्पष्टवक्ती वगैरे न वाटता कमी समज असल्याने काहीही बोलणारी वाटते > +१००
प्रोमो मध्ये मेघना (एकदाचा)
प्रोमो मध्ये मेघना (एकदाचा) निर्णय घेणार आहे असं दाखवलंय. आदे म्हणतोय ती निर्णय घेणार आहे तेव्ह तो माझ्याविरूद्ध असेल तर मी एकटा आणि माझ्या बाजूने असेल तर तिच्यासोबत दर्शनाला येईन.
आता मला मेदे चा निर्णय काय असेल याची उत्सुकता लागून राहिले आहे.
ही हे दोघं सोडून तिसर्याच कुणाला तरी निवडेल आणि सिरियलला भयंकर मोठा सांस्कृतिक धक्का बसेल. :हाहा सॉलिड ट्विस्ट.
म्हणजे ये नही, वो नही,
म्हणजे ये नही, वो नही, तिसराथाच था असं का?
चिपोका आजकाल अपडेट्स देत नाहीत? पुतणीला नावं ठेवतात म्हणून?
दक्षिणा, येवढ्ढं कुठलं आपलं
दक्षिणा, येवढ्ढं कुठलं आपलं ( आणि त्या दोन्ही आदित्यांचं for that matter) नशीब असायला.... पण हे कथानक खेचायच्या नादात भरकटतंय ( मलेशियन अपघातग्रस्त विमानाचा शोध जसा भलतीकडेच चालू होता पहिले काही दिवस, तसं)
आता ह्या बयेला स्वातंत्र्य आहे, वाजवीपेक्षा जास्त वेळही दिलाय, मग घे की बाई आता निर्णय....नसेल सुधरत काही, तर दोन्ही आदित्यांनी दिलेली पेनं घेऊन १०,२०,३०,४० कर....म्हणजे एकदाचे सगळे सुट्ट्योSSSS....
एव्हढा वेळ घेऊन हि बया
एव्हढा वेळ घेऊन हि बया 'ओबडधोबड' निर्णय घेणार म्हणते!!!
मेघना आज आपल्या लहान भावाला
मेघना आज आपल्या लहान भावाला खूप समजावून सांगत होती काहीतरी!
मेघनाचा लहान भाऊ कोण??? नवीन
मेघनाचा लहान भाऊ कोण??? नवीन आलंय का कोणी पात्र ?? की आदे विषयी बोलत आहेत बेफी?? ती थोराडच दिस्ते म्हणा...
आदेबद्दलच बोलले असतील बेफि.
आदेबद्दलच बोलले असतील बेफि. ती त्याची ताईच वाटते.
दोन्ही आदित्यांनी दिलेली पेनं
दोन्ही आदित्यांनी दिलेली पेनं घेऊन १०,२०,३०,४० कर....म्हणजे एकदाचे सगळे सुट्ट्योSSSS....>>>>>>> सखी
बापरे! मला लहानपणी खेळायच्या आधी सगळे सुटायचो ते आठवल आणि आपण पहील सुटल की मनातल्या मनात हुश्श्श्श्श्श व्हायच तसा आदे करेल जर तो सुटला तर अस इमॅजिनल मी...
काही दिवसांपुर्वी आदे मेदेला
काही दिवसांपुर्वी आदे मेदेला सांगतो कि तु आन कडे निघुन जा. त्यावेळी हि बया त्याला म्हणते कि माझा निर्णय मला घेऊ दे. अग बये, आणखी किती दिवस/ महिने/ वर्ष हवी आहेत तुला निर्णय घ्यायला ते तरी एकदा सांग ना?
त्या आदेने तिला एकदा सरळ सुनावायला पाहिजे कि तु त्या आनकडे निघुन जायचे ठरवल्यावर आपल्या घटस्फोटाचे प्रकरण आवरून मला माझ्यासाठी दुसरी मुलगी बघायची आहे. आणखी किती वेळ मी तुझी वाट पहावी अशी अपेक्षा आहे? एकदा काय तो निर्णय घेऊन सोडव तरी मला या त्रासातुन कायमचे.
अगदी अगदी सारिका, तुला
अगदी अगदी सारिका, तुला अनुमोदन. ही दोघं म्हातारी होईपर्यंत हिचा निर्णय झाला नाही तर हिला सगळ्यांनी झेलायचं का?
Pages