जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस हि त्यांचा घरात 'प्रायव्हसि' ला आजिबात 'प्रायव्हसि' नाहि मिळत.
त्या अदे ,मेदे चि खिडकि सदा उघडी असते...<<<

कर नाही त्याला डर कशाला?

बेफिकीर Lol

त्या अदे ,मेदे चि खिडकि सदा उघडी असते..>>>आणि बर्याचदा दिग्द. खिडकी बाहेरून चोरट्यासारखा बघत असतो.

गोपिका ते चोमडेपणा नाही करणार .. सहज ...अगदी सहज म्हणून कोणीतरी काहितरी शोधायला जाणार आणि मेघनाचा खजिना हाती लागणार.

देसाईवाडीत एक जरी चोमडा/डी असता तर आतापर्यंत मेदेचा निकाल लागला असता.

काल माझी मावशी आणि तिची मैत्रिण या मालिकेबद्दल बोलत होत्या.. त्यांना चक्क ती मेघना आवडते, हे ऐकल्यावर मी दुसरीकडे तोंड वळूवन हसायला लागले. (मनात विचार आला इतर प्रेक्षकांनी किंवा या सीरियलमधल्या कोणीही ही इथली चर्चा वाचली तर चक्कर येऊन पडतील सगळे..) कोणाला मेघना कशी काय आवडू शकते? मला तो आदित्य आधी थोडा आवडायचा, पण आता तो फारच बुळचट वाटायला लागला आहे. प्रेम आहे म्हणून काय एवढं नमतं घ्यायचं प्रत्येकवेळेस? स्वाभिमान वगैरे काही आहे की नाही? मेघनाच्या निर्णयाची वाट बघत सतत आपली तिची बाजू घेत असतो, तिच्या घरच्यांची जबाबदारी काय घेतो? आणि हे सगळं कशासाठी तर म्हणे तिच्यावर प्रेम आहे, पण उद्या जर ती त्याला सोडून तिच्या 'आदू'कडे (अरेरे किती इरिटेटिंग short form आहे नावाचा.. at least 'आदि' असं तरी ठेवयाच, थोडं स्मार्ट वाटतं..) निघून गेली तर हा काय करणार? म्हणजे खायापिया कुछ नही, गिलास तोडा बारा आना.. अशी गत होईल त्याची..!
ही मालिक ज्या चित्रपटावरून घेतली आहे, तो 'हम दिल दे चुके सनम' बराच चांगला आहे मालिकेपेक्षा.. त्यात at least बरी दिसणारी ऐश्वर्या आणि चांगला अभिनय करणारा अजय देवगण तरी होता..
इथे कोणाचा चेहरा आणि कोणाचा अभिनय बघणार? सुकन्या मोने आणि गिरीश ओक यांच्यासाठी पूर्ण मालिका नाही झेलू शकत रे बाबा आपण...!

या दोघी इतक्या बालीश काय वागतात? त्यांची मुलं पण बर्‍यापैकी मॅच्युअर्ड दाखवली आहेत. प्रत्येक गोष्ट यांना समजली पाहीजे हा अट्टाहास का असतो यांचा? अर्चू खरंच चोंबडी आहे. (शेंडेफळ नाहीये ना हे मग?) आणि विजया तिच्या हो ला हो! आता जाणारेत नक्षीदार ज्वेलरी बॉक्स खोलायला. आणि फायनली पँडोराज बॉक्स वोप्पन होणार मग काय देसाई वाडीत वोप्पन गँगनम स्टाईल...

घाबरलेला ससा बरे डोळे भिरभिरवतो... अगं बाई मेघना जरा घाबरण्यातल्या तरी वराईटीज दाखवून मायबाप प्रेक्षकांना धन्य धन्य कर माते...

काल झी talkies वर खो खो चित्रपटामध्ये मेदे बाई दिसल्या, अभिनय तर दोन्हीकडे सारखाच - चित्रपट काय आणि सीरिअल काय.

ते मेदे मेदे वाचून.. शरीराभोवती साठलेला मेद दिसायला लागतो ...
मेदाळलेली जाड जुड माणसे डोळ्यासमोर येतात , आमची मेघना नाही हो तशी, रडकी असली तरी सुंदर आहे

दक्षे, फुटबॉलसारखी गरगरीत. जाम हसतेय मी.

ह्या मालिकेसाठी तिची निवड कशी झाली, अनेक कोड्यांपैकी हे एक कोडेच आहे.

कर नाही त्याला डर कशाला? >>>> आगदि अशक्य आहात....तुम्हालाच हे अस लिहिण सुचु शकत...
दक्षिणा >> तो खो खो मि हि पाहिलेला....आगदि बे(भि)कार चित्रपट आहे तो....

तिथे हि तिने घरातलेच कपडे(जो घागरा तिने गाण्यात घातला आहे तो तिचा दिवाळी चा ड्रेस असावा) घातले आहेत.
त्या बद्दल इथे सांगावे असे सुद्धा वाटले नाहि.तुझि सहन शक्ति खूप आहे Proud

आता त्या आदे चा प्रचंड राग यायला लागलाय.

तो संत आणी ही बया संथ

गोपिका मस्तच, तो संत आणि ती बया संथ.

ही सिरीयल शब्दकोष वाढवायला मदत करतेय, काय एकेक सुचतंय मस्त सगळ्यांना.

गोपिका Lol

ते सावर्डे प्रकरण अगदी आयुष्यात पहिल्यांदा ऐकल्या-पाहिल्यासारखे रियॅक्ट होत आहेत सगळे.

देवाशप्पथ! त्या पेटीतल्या वस्तू काढून कुठेतरी ठेवायच्या एवढी साधी अक्कल नाही? आणि आता मेदेला आदेची दया येतेय म्हणे! आज डॉक्याचा पार भजा झालां. खरं तर तो आदे तिच्यावर उपकार करतो आहे. एक तर ते शिरियल काढणारे ठार वेडे आहेत किंवा 'पुढे काय झालं?' म्हणून बघणारे माम्ही प्रेक्षक.

तो संत आणी ही बया संथ <<<

ही ओळ तरहीसाठी मस्त आहे.

तो संत आणी ही बया संथ
वैवाहिक आयुष्याची फक्त रवंथ

त्या अदे ,मेदे चि खिडकि सदा उघडी असते..>>>आणि बर्याचदा दिग्द. खिडकी बाहेरून चोरट्यासारखा बघत असतो.>>> तेव्ढ्यावरूनच त्या दिग्द. चि अक्कल लक्षात येते...

कॅमेराचा अँगल ही नीट जमूनये?????

ही ओळ तरहीसाठी मस्त आहे. >>> हे मला नाहि नीट समजले

तो संत आणी ही बया संथ
वैवाहिक आयुष्याची फक्त रवंथ >>>> खरय...

मला पण काल तेच वाटल होत . नवीन पेटी आणायला कशाला जायचं? त्या पेटीतली पत्र कुठेतरी काढून लपवून ठेवता येत नाही का ? काहीच्या काही Happy
गोपिका Happy

ऑस्सं कॉस्सं ती पत्रं दुसर्‍या जागी ठेवायची ?? केवढ्या त्या ग्रेट मेघनाबाई, केवढं ते त्यांचं ग्रेट प्रेम, केवढी ग्रेट ती पत्रं, केवढी ग्रेट ती पेटी, त्याच्याशी जुळलेल्या भावना, असं असताना ती पत्रं त्यातून काढणं सुचतंच कसं तुम्हाला, म्हणते मी !

कित्येक वर्षात एलदुगो चे काही भाग सोडून कोणतीही सिरियल बघितली नव्हती. यावेळी साबा इथे असताना ही बघायला घेतली, अन आता पश्चात्ताप होतोय अगदी. सुरुवातीला देसाईंचं घरं, माणसं, संवाद वगैरे चांगलं वाटलं होतं म्हणून पहात गेले.

पराग, कालचा प्रसंग नक्कीच हवेतला कारण 'पुढील भागात' दोघं जमिनीवर येऊन नेहेमीचंच दळण दळत होते. शिवाय खरे प्रसंग रविवारच्या भागात शेवटच्या मिनिटासाठी राखून ठेवलेले असतात Wink

त्या पेटीबद्दल अगदी ! काहीही लिहितात हे लेखक. पेटी बदलण्यापेक्षा पेटीतले जिन्नस उचलून दुसरीकडे ठेवावे हे कुणालाही सुचेल. आता अमित बघेल आणि म्हणेल "ती ही नव्हेच !" Proud

Lol
सगळेच Rofl

बाकी ते त्यांचं स्वप्नातलं प्रेम कित्ती वेळ दाखवत होते Uhoh
हातात हात... डोळ्यत डोळे... कमर्‍यात कंबर Uhoh

काही वेळातचं गरगरायला लागलं Uhoh

ह्या:! स्वप्न काय! त्यांच्या चेहर्‍यांवर काळोखात बॅटरी हनुवटीखाली धरून पडतो तसा विचित्र उजेड दिसत होता. भूत म्हणून कोणाला घाबरावयला उत्तम!

Pages