जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघना हे पात्र सरळ सरळ गंडलंय ह्यातलं.. या सिरीयलच्या कथा पटकथाकारकाने आणि दिग्दर्शकाने माझे मन तुझे झाले सिरीयल पाहावी... निदान त्यातली शुभ्रा थोडीतरी रियल व प्रॉमिसिंग, मुख्य म्हणजे फ्रेश वाटते... किती ते आंबट तोंड आणि किती एपिसोड्स!! भरीस भर म्हणून पुटपुटते सुटसुटते उसासे, सर्दाळलेला सूर आणि महाभयाण आवाज... वर कोणीतरी लिहीलंय गानू आज्जींची अंगाई म्हटल्यासारखा आवाज... सरसरून काटाच आला

मेघना हे पात्र सरळ सरळ गंडलंय ह्यातलं.. या सिरीयलच्या कथा पटकथाकारकाने आणि दिग्दर्शकाने माझे मन तुझे झाले सिरीयल पाहावी... निदान त्यातली शुभ्रा थोडीतरी रियल व प्रॉमिसिंग, मुख्य म्हणजे फ्रेश वाटते... किती ते आंबट तोंड आणि किती एपिसोड्स!! भरीस भर म्हणून पुटपुटते सुटसुटते उसासे, सर्दाळलेला सूर आणि महाभयाण आवाज... वर कोणीतरी लिहीलंय गानू आज्जींची अंगाई म्हटल्यासारखा आवाज... सरसरून काटाच आला

dreamgirl करेक्ट, झीच्या सिरीयल फालतू असून त्याच जास्त बघितल्या जातात. माझे मन कितीतरी उजवी आहे, त्यात सासू सुनेला हातात डबा देत नाही, शुभ्रा सकाळी पोळ्या भाजी करून जाते कॉलेजला. वरून नवरा-बायकोमध्ये प्रॉब्लेम्स असले तरी कसे फेस करावे, दुसऱ्यांना त्याची झळ लागू देऊ नये, हे सर्व माझे मन कडून रेशीमगाठीने शिकावं फक्त आडनाव कॉपी केलंय, तिथेपण देसाई इथेपण देसाई. इथे मेघना कशीही वागून सासू हातात आयता डबा देते. शेखर- शुभ्राचे नातेपण किती सुंदर चितारले आहे.

अंजली ही सिरीयल मागच्यावर्षी १५ जुलैपासून सुरु आहे. आता उलट मला भीती वाटते की तिथेपण इतर सिरीयलप्रमाणे मसाला टाकतायत की काय? हो ई टीव्हीवर रात्री ८.३० आणि रात्री ११ वाजता असते.

मेघना काय गेमर हाय यार... आता आई बापाची पण लाईफ टाईम सिक्युरीटी पदरात पाडुन घेतली, म्हणजे ही त्या नगरकर सोबत गेली तरी हा माठ्या पोसत बसेल त्यांना

बाकी आजचा भाग लईच विनोदी, ग्रुप बाबाजी Lol

किती तो पांचटपणा लावलाय त्या बाबाजींच्या नावाखाली. एक आख्खा एपिसोड खाल्लान त्या बाबाजीने. एकटी मेघनाची आई कमी म्हणुन आज सगळ्या देसायांना जपाला बसवल. उदय टिकेकर हुश्शार आहे त्याची चेष्टा करत होती बाबाजी करुन आता त्यानेच सगळ्यांना नादी लावल बाबाजींच्या Wink

आदित्य देसाई अगदीच पुस्तकी जावयासारखा वागतोय. राग लोभ मत्सर काय बाबाजींच्या चरणी वाहिलेत काय?

खरोखर हि मालिका .. मेघना ... सगळच गन्डलय.... आदे खुपच पुस्तकि वागतोय... त्यात ल्या त्यात ... सुमो आणि गिओ दोघान्चे सन्वाद छान असतात... बाकि .. its just not up to standards ... Zee must do something

मेघनानी त्या आदित्य देसायाला सांगून ठेवायला पाहिजे माझा निर्णय मी तीन महिन्यांनी किव्वा सहा महिन्यांनी सांगीन. सारखा सारखा माझ्या पाठी लागू नको . आणि त्या आदित्य नगरकरचा विचारही करू नको. मी बघेन माझ काय करायचं ते. आणि फायनल निर्णय तुला तीन महिन्यांनी/सहा महिन्यांनी सांगेन.

तो आदित्य देसाई पण ना जाम बोअर करतोय. सारखा सारखा तुझा निर्णय काय /तुझा निर्णय काय? अरे तिला विचार करायला थोडी उसंत तर दे
मेघनाला मारे सांगितलं तुझ्या वागण्याची झळ घरातल्या इतर कुणाला लागू देऊ नकोस आणि हा स्वता काय करतोय? सारखा आपला काही ना काही कारणांनी नाटक करतोय आणि घरातल्या सगळयांना ( स्पेशाली माई) जीवाला घोर लावतोय. सपशेल गंडलेय मालिका Happy

>>>सपशेल गंडलेय मालिका<,

+१
डायरेकटर डोक्यावर पडलयवसं आहे.
आदेने रोज रोज विचारलं तरी काय चूक नाही. त्याने उलट स्पष्ट सांगयचं की, तुला तुझा निर्णय घ्यायला मोकळीक असली तरी हा विचार थोssडा कर की माझे जीवनाच्या गोष्टीला उशीर होतोय. त्यामुळे कधीही तुला पाहिजे तेव्हा निर्णय घे ह्याचा अर्थ वर्षच्या वर्ष घालवु नको. जितका काळ अधिक जाईल तेवढा गुंता ज्यास्त हे लक्षात ठेव.
एरवी रोखठोक बोलणारा अगदीच बागुलबुवा दाखवलाय.

झीच्या सगळ्याच मालिका गंडतात, किंवा ते आपल्याला इथे मनोरंजनात्मक आणि सिरीयस दोन्ही प्रकारच्या पोस्ट लिहिण्यासाठी मुद्दामून गंडवतात.

सगळे पिक्चर पण गंडतात
एवढा गाजावाजा केला त्या आजोबाचा, इतका टुकार पिक्चर , मायबोली मुळे बघायला गेलो, पैशे वाया

आदित्य देसाई ने मेघनाला टाईम लिमिट दिल्येय अस दाखवायला पाहिजे होत . बाई ग ४ महिन्यात तुझा काय तो निर्णय मला सांग नाही तर मी समजेन तुला माझ्या बरोबरच राहायचं आहे आणि राहायचं असेल तर व्यवस्थित मिळून मिसळून राहायचं . ते मला वाटत त्याने आधीच सांगितलं आहे.
आणि त्यानी स्वतः पण त्या आदित्य नगरकर चा विचार करण सोडून दिल पाहिजे. तो कशाला त्याचा विचार करत बसलाय कळत नाही Happy

सानी | 12 December, 2013 - 18:36
मला सध्यातरी आवडतेय ही मालिका.. प्राजक्ता माळी मस्त अभिनेत्री आहे.. घाबरलेल्या, भेदरलेल्या कोकरासारखा अभिनय तिला छान जमतोय..>>>>

हा बाफ उघडला की सानीचा पहिलाच प्रतीसाद लगेच वाचायला मिळतो, पण आता जाणवत की मेघना नावाच भेदरलेले कोकरु मोठी बकरी बनलय, तरी बे बे नीट करत नाहीये.

सानी वाचत असशील तर दिवा घे.:फिदी:

रश्मी तिने भेदरलेपण दाखवण इतक मनावर घेतलय की घरात सणवार असला, सगळे आनंदी असले, स्वतः ती जरी आनंदी असली तरी ही भेदरलेलीच असते. Wink
मधे खिडकीत उभी राहुन कुठलेतरी गाणे म्हणत होती ते पण किती दडपणाखाली जस्काय हिने गाणे गायले नाही तर आदे तिला घराबाहेर काढणार आहे.

शुभान्गी खरे आहे ते.:फिदी: मला वाटत धीरे धीरे मचल ए दिले बेकरार गात होती ती. ते पण नीट मोकळेपणाने म्हणत नव्हती. काही वेळेस सिरीयस अ‍ॅक्टिन्ग ची अ‍ॅक्टिन्ग पण हे ओव्हर करतात.:फिदी:

झी वरच्या या सिरीयल बर्‍या म्हणायची वेळ आलीय, ई वर माझे मन तुझे झाले सोडले तर असावा सुन्दर आणी गन्ध फुलान्चा अशा भयानक सिरीयल आहेत. आणी डाळीत पाणी घालत सुटलेत तिकडे पण.

ई वरची माझे मन हीच चांगली आहे, मी लिहिलंय मागे की बाकी बाबतीत आनंदी आनंदच आहे (इथे हे वाक्य नाही लिहिले, दुसरीकडे लिहिलंय) बाकीच्या बघतच नाही पण झीच्या पण नाही आवडत. स्टार प्रवाहची बे दुणे दहा चांगली आहे. सध्या मी आवर्जून बे दुणे दहा, माझे मन आणि महाभारत बघते. ओम-ईशा आणि रेशीमगाठी येता-जाता कामे करत बघते.

असावा सुंदर आणि गंध फुलांचा साठी प्रचंड अनुमोदन. त्या बघायचं माझं डेरिंगच नाहीये, खरंच भयानक आहेत.

अन्जू ला अनुमोदन बे दुणे दहा खरच छान आहे. त्याच्यवर एक बाफ हवा खरतर.
बाकिबाजुयेरेगा च्या स्टोरी मध्ये दम नाही हेच खर. घर सोदावसा वाटाय्ल एक तरी कारण हव न मेघनाकद्डे.
सासु प्रेमळ्, सासरे खेळ्कर स्वभावचे, दीर जाउ तर किती समजूत्दर, हान नणन्द थोदी आटा ढील्ला असल्यासर्खी वागते पण ते कही घर सोडाय्ला पुरेस कारण नाही. नवरा म्हणजे बन्दर् के गले मोति का हार आहे. लव्करच आ.न. बद्दल घरच्यान कळ्ते असे दखवय्ल हावे तरच स्टोरी पुढे जैल.

अशोकमामानी जर असावा सुन्दर बघीतली ना, तर ते टिव्ही सुरु करायला सुद्धा बिचकतील, एवढी पाचकळ आणी नीतीमत्ता शून्य सिरीयल आहे ती.:फिदी:

पण काही वेळेस मला सुमोच्या व्यक्तीरेखेचे आश्चर्य वाटते की ती दुसरी बाजू बघतच नसावी का? की तिला धर्मराजासारखे सगळे चान्गलेच दिसत असावे. वास्तवीक वैयक्तीक आयुष्यात एकत्र कुटुम्बात एकमेकान्च्या प्रश्नात बाकीचे फार लक्ष घालत असतात, मग इथे अर्चु सोडली तर बाकी सारे मेघनावर आणी आदे वर अती विश्वास दाखवत आहेत असे वाटत रहाते.

अन्जू ला अनुमोदन बे दुणे दहा खरच छान आहे. त्याच्यवर एक बाफ हवा खरतर.

>> माबोवर झी सोडून इतर चॅनल्सच्या मालिकांवर स्वतंत्र बीबी नाही पाहिला मी अजुन. Sad

काल पुन्हा एकदा तो गाणी लागला …. ता ना ना तुम ताना तुम ताना ना
आता पुन्हा दोन आठवडे भांडण आणि जेवताना काहीतरी सॉलिड

ए लगोरी मी पण बघते ... अजुन तरी आवडते आहे ... पाणी नाही घातले .... झी वरच्या कोणत्याच बघत नाही हल्ली

Pages