Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या बाबतीत मेघना रागाच्या
त्या बाबतीत मेघना रागाच्या वरचढ आहे पण, काही म्हणा!
तिला घेतील त्या बोट पार्टीत!
नंतर स्वतः उड्या टाकतील पाण्यात ते अलाहिदा!
मला त्या addमध्ये ती काय
मला त्या addमध्ये ती काय बोलते ते आज इथे कळलं, इतके दिवस ती काय बोलते ते कळतच नव्हतं<<<
अन्जू, तिच्या म्हणण्याचा सारांश असा आहे की भारतीय महिलांनी टीव्ही सिरियल्स बघताना आपल्या मुलांना जवळ घेऊन बसू नये.
मेघना ने त्या आन ला,काय काय
मेघना ने त्या आन ला,काय काय गोष्टिंचि जाणीव करून दिलेलि आहे म्हणे....कायबाय गवसल कीच लय गवसतो अस मेघनानेच सांगितल म्हणे.....अजून काय काय बरच शिकवल हि आहे म्हणे....
ह्या मॅडम स्वयंपाक येत नव्हता म्हणून...नाहितर त्याला ते हि शिकवलच असत.....अदु,तूच रोज स्वयंपाक करत जा,गिटार वाजवत केलेला स्वयंपाक जास्त लयबद्ध असतो.....
त्या अदु ला अस दाखवलय कि, ६४ कला काय त्या सगळ्या ह्याचाकडेच.
पण एक हि धड नाहि 'जॅक ओफ ऑल्,मास्टर ओफ नन'......
>>>अन्जू, तिच्या म्हणण्याचा
>>>अन्जू, तिच्या म्हणण्याचा सारांश असा आहे की भारतीय महिलांनी टीव्ही सिरियल्स बघताना आपल्या मुलांना जवळ घेऊन बसू नये.<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खतरनाक आहे. साबांना गंमत
खतरनाक आहे. साबांना गंमत म्हणोन दाखवली तर त्यांना वाटले टोमणा मारतेय मी म्हणोन जराश्या कसंनुसं हसल्या. नवरा हसत म्हणाला, मी जाईन आईशिवाय...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ती अॅड मधली मुलगी, "तंदूर तिका मायसाला .." असं म्हणते ना चक्क....
त्या सर्व अॅडच विनोदी आहेत. http://www.youtube.com/watch?v=I1S8hHMcp0E
http://www.youtube.com/watch?v=GOdtoyRLBf4
महाविनोदी व तितकीच खरी
------------
बरं, मेघनाचे कितकं रडू झालं? मध्ये ती परीक्षा संपली म्हणून सगळ्यांना खाउ घालणार होती ना??
घातलं की नाही?
'इन्दियन मेन! सो स्वीत! बट दे
'इन्दियन मेन! सो स्वीत! बट दे लिव वित देअर मामा! इव्हन दे वॉच तीवी सोप अॅन्ड क्राय वित देअर मामा! कम तू माय बोत पार्ती बत दोन्त कम विथ यूवर ममा'>> ही अॅड रागा ला वापरून फिरतेय सोशल साईट्स वर![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नणंदबाईचा पाय मुरगळला....
नणंदबाईचा पाय मुरगळला.... त्यावर तिने जो काही कांगावा केला की बास्स ! अर्चुबाई पडल्यावर इथे अमेरिकेत लोक नक्की म्हणाले असते, "It's a Karma ( उच्चार 'क्खार्मा' असा) thing you know !"![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फाजील लाडावलेली आहे झालं ( पण मेघनाला काही वेळेला बोलते ते बरोबर बोलते )
अर्चू जर मेघनाला बोलत नसती तर
अर्चू जर मेघनाला बोलत नसती तर तिला प्रतिसाददात्यांनी राईट ऑफच केलेले असते आत्तापर्यंत!
काय एकेकाचे क्वॉलिफिकेशन आहे मालिकेत टिकण्याचे, कोणी मेघनाला बोलते म्हणून टिकते, कोणी तिला शिरा भरवते म्हणून, कोणी तिच्याशी लग्न करून तिचाच जुना प्रियकर शोधण्यात तिची मदत करते म्हणून!
फाजील लाडावलेली आहे
फाजील लाडावलेली आहे झालं++११११
मलापण अर्चुने पडल्यावर
मलापण अर्चुने पडल्यावर आरडाओरडा केला ते अजिबात आवडले नाही, एरवी ती आवडते मला.
तो अर्चूचा आरडाओरड विचित्र
तो अर्चूचा आरडाओरड विचित्र वाटला.. त्यात ते मेघनाचे नाव घेतले म्हणून तिनेच मला शिव्या घातल्या म्हणून मी पडले... हे अतिच होते.
अर्चू पात्र गंडायला सुरुवात झाली आता...
आ न ला कसं कळलं की मेघनाने
आ न ला कसं कळलं की मेघनाने आदे ला सगळं सांगितलं आहे ? असचं कोणी प्रेयसीच्या नवर्याशी बोलेल का - की माझं तिच्यावर प्रेम होतं...................
फाजील लाडावलेली आहे
फाजील लाडावलेली आहे झालं
>>>
++++1111111
lagnala 10 warsh zali tari akkal nahi ali ho ajun hila![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
to satish kasa rahato ani tarihi ewadh prem karato hichyawar dev jane
bahuda mai ani nanankade pahun rahat asava.
अर्चू पात्र गंडायला सुरुवात झाली आता...>>> +1111111111111111111111
ti paDali tya episode madhye ticha abhinay baghun ek khadkan muskadat thevun dyavishi vataleli
ti paDali tya episode madhye
ti paDali tya episode madhye ticha abhinay baghun ek khadkan muskadat thevun dyavishi vataleli>>>>>>>>>>>
म्हणजे तिने ते कॅरेक्टर मस्त उभं केलंय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला दर एपिसोडनंतर ऐकावं लागतं नशीब समज तुला अशी नणंद नाही मिळाली.
ti paDali tya episode madhye
ti paDali tya episode madhye ticha abhinay baghun ek khadkan muskadat thevun dyavishi vataleli>>>>>>>>>>>
म्हणजे तिने ते कॅरेक्टर मस्त उभं केलंय. >>>>> नाही अंजली मलाही आजपर्यंत अर्चुच कॅरेक्टर आवडत होत. पण त्या पडण्याच्या सीनमध्ये तिचा आरडाओरडा उगीच वाटला. ओढुन ताणुन केल्यासारखा
आणि पडली पण ती खोटी खोटी असच
आणि पडली पण ती खोटी खोटी असच वाटलं
आणि पडली पण ती खोटी खोटी असच
आणि पडली पण ती खोटी खोटी असच वाटलं >>>> हो अनिश्का. हे मी बर्याच मालिकांमधुन नोटीस केलय... पडण्याच्या सीनमध्ये अॅक्टींगची बोंब असते सार्यांची.
माझ्या आठवणीत हम आपके मध्ये रेणुका पायर्यांवरुन पडते तो सीन अगदी अस्सल वाटला मला
हो....तेव्हा मी लहान होते पण
हो....तेव्हा मी लहान होते पण अजुनही हा मुव्ही लागला की मी फक्त लो चली मै या गाण्यापुरताच मुव्ही बघते....
आणि अर्चुचा आवाज एकदम कर्कश्य
आणि अर्चुचा आवाज एकदम कर्कश्य आहे...म्हणुन जेव्हा ती बोलते अस ताडताड तेव्हा कधी कधी ती डोक्यात जाते.....बाकी निगेटिव्ह रोल तीला मस्त जमतात
उंमाझो मधे तर ती यापेक्षा
उंमाझो मधे तर ती यापेक्षा जास्त कर्कश्य आवाजात बोलायची.....सतत भांडायची. एकदा तो आवाज ऐकून माझा मुलगा रडायला लागला आणि मी ती मालिका बघायची सोडून दिली.
ती शर्मिष्ठा राउत मला कधीच
ती शर्मिष्ठा राउत मला कधीच आवडली नव्हती पण अर्चुच्या भूमिकेत आवडली पण पडण्याची acting बेकार, अति आरडाओरडा, गंडत चाललंय सर्व.
हां पडण्याचा सीन गंडलाय खरा..
हां पडण्याचा सीन गंडलाय खरा.. पण तिची बाकी अॅक्टिंग कॅरेक्टरला शोभून दिसते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
... पडण्याच्या सीनमध्ये अॅक्टींगची बोंब असते सार्यांची.
खरंय
*नाना म्हणाले कि मी त्या
*नाना म्हणाले कि मी त्या नवर्याच्या जागी असतो तर मी स्वतः तिचे तिच्या प्रियकराबरोबर लग्न लावून दिले असते.
*आज मेघना खिडकीत रडत होती.
ता. क. : उद्या ती तिच्या
ता. क. : उद्या ती तिच्या माहेरी रडणार आहे.
आजचा भाग... वाईट्ट! काहीही
आजचा भाग... वाईट्ट!
काहीही चालले होते. मेघनाबाईंनी " अभी ना जाओ छोडके" इतके बेसुर म्हटले की त्या आदित्यच्या कानावर अत्याचार. बिचार्याला नाटक करावे लागले, आवडल्याचे.
शिवाय ते कार्टे पल्लव, काकू, आता कंटिन्यु म्हणे.....काय आगावुपणा
त्या मंडळीलाच कळत नाहीये, हा
त्या मंडळीलाच कळत नाहीये, हा सगळा गोंधळ शेवटापर्यंत कसा न्यायचा ते!
मेघनाबाईंनी " अभी ना जाओ
मेघनाबाईंनी " अभी ना जाओ छोडके" >>>ना नाही, 'धीरे धीरे मचल' होते ते.
ए. हो. हो. मी लिहायला एक
ए. हो. हो. मी लिहायला एक घेतले आणि इथे कोणितरि अभि ना जाओ म्हणत होते. तेच लिहिले.
आनचं माहित नाही पण आमच्या
आनचं माहित नाही पण आमच्या कानावर लईच अत्याचार.
अगदीच बेसुर.
मला वाटतं मेघना आणि आदुचं
मला वाटतं मेघना आणि आदुचं कळलं तर आनंदाने देसाई family त्यांचे लग्न लावून देईल आणि खुश होईल, आपल्या पाठीमागची रडवी ब्याद गेली.
Pages