जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्यजित मुधळखोर

दर दोन आठवड्यने सगळा कुशल मंगल होते आणि तोच घीसापिटा गाणी लागतो …
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना

>> मी हे लगेच चालीवर म्हणुन बघितले. एकदम पर्फेक्ट Lol

मेघना मनापासुन हसली कि छान दिसते. - विजयाचे मत.
मेघना चुकुन जरी हसली तरी अमानवीय दिसते. - हेमावैम. Happy

ती अर्चू एकदम बरोबर बोलते. सारख हीच तोंड आपल वाकड. आत्ता आईबाबा आश्रमात राहायला गेले तर त्यात काय एवढे रडण्या सारख. ते मेघनाच पात्र अगदीच पात्र रंगवलंय. अर्थात मेघना यात काय करणार म्हणा. तिला पण सारख रडक राहून राहून कंटाळा येत असेल Happy

सुजा खरंच,ती अर्चू बरेचदा करेक्ट बोलते. कालच्या भागातले तिचे डायलॉग मस्त होते. अभिनय पण चांगला केलाय तिने.

काल आदे तिला विचारत होता की मी आधी भेटलो असतो तर माझ्यावर प्रेम केलं असतंस का? Lol मेघनीच्या जागी मी असते तर उत्तर दिलं असतं. " हो $$$$ केलं असतं की. पण लग्न मग त्या आदित्यशी केलं असतं.
आदे - ???

मेघी - ए असं नसतं रे आदु (आदे बर का हा कारण प्रेम आहे) प्रेम तुझ्यावर केलं की नाही? मग लग्न त्याच्याशीच Proud

Lol . Lol . Lol

अर्चूचं कधीकधी बरोबर असतं पण ती 'खवचट नणंद' मोडमधलीच आहे.
परीक्षा संपल्यावर आईबाबांकडे राहायला जायचं ठरलंय आणि काहीही न कळवता तिला टाळण्यासाठी आईवडील मुद्दाम आश्रमात निघून गेले. हे इतकंच माझ्याबाबतीत झालं असतं तरी मला तर फार वाईट वाटलं असतं.
त्यातून माहेरी आईवडीलांच्या मनासारखं वागून अजूनही तिला असं परकं करतात आणि सासरी माई-नानांचं मुलांशी अगदीच वेगळं वागणं !
अर्चूचा राग आला मला काल. तिच्या आईवडिलांनी तिच्याबाबतीत असं केलं असतं तर ही करवादली असती. मेघनाला ते जमत नाही म्हणून ती रडते. अंदाज अपना अपना Happy

काल आदे तिला विचारत होता की मी आधी भेटलो असतो तर माझ्यावर प्रेम केलं असतंस का? <<<

ह्याच्यावर मेघनाने एक गिरकी घेऊन स्वप्नील डोळे करून लाजर्‍या स्वरात सांगायला हवं होतं!

"अरे हाट्! मी आदू भेटेपर्यंत थांबून मग काय तो निर्णय घेतला असता"

मला अगदी नक्की म्हणजे ठामपणेच वाटत की या सिरीयलमधले कुणीतरी माबोचे वाचक असावेत, नाहीतर कुणीतरी फेबुवर या बाफची लिन्क दिली असावी.

ती अर्चु मेघनाला म्हणाली की तू हसली की छान दिसतेस म्हणून. नाहीतर कायम सुतकी चेहेरा करुन बसणारी मेघना फिदी फिदी का हसायला लागली एकदम्?:अओ::फिदी:

अगो दोन्ही आहे अर्चुचा रागही येतो ( जरा जास्तच स्पष्ट बोलते म्हणून ) पण बरेचदा बरोबर पण वाटत. कारण सारखच काही न काही मेघनाच्या बाबतीत बिनासतानाच दाखवलाय. एका पाठोपाठ एक सारख हिच्याच बाबतीत काही न काही गोंधळ होताना दाखवला आहे. एखाद्या माणसाला समजून घेण्याच्या बाबतीत अर्चू कडे पेशन्स कमी आहेत पण तिची कसर मेघनाच्या सासूने भरून काढली आहे ती मात्र खूपच समजूतदार दाखवली आहे. आणि सगळेच समजूतदार दाखवले तर नाट्यच नाही .
मेघनाचे सासू सासरे समजूतदार, नवरा समजूतदार, जाऊ -दीर समजूतदार मग काही तरी नाट्य नको का ?

मेघना खूपच भावूक / सगळ्याच गोष्टी मनाला लावून घेणारी आहे आणि त्या उलट अर्चू तडक फडक /व्यावहारिक आणि भावूकपणा कमी आहे तिच्या कडे. प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आणि त्याच्यातले भावनिक संबंध दाखवणे म्हणजे लेखकाची कसोटी आहे खरीच Happy

मेघनाच्या जवळ माहेरच्या घराची किल्ली आहे अस दाखवायला पाहिजे होत. मस्त ती घरी जाऊन बसली असती. आई -बाबा येत नाहीत म्हटल्यावर आदित्यला (नवर्याला ) बोलावून घ्यायचं आणि आरामात माहेरच्या घरी राहायचं. आई बाबा येई पर्यत. त्या बाबाजींची चांगली जिरली असती Happy आणि त्या नणंदेची बोलणी पण खायला नकोत Happy

अगो आणि मला अस वाटत ( नक्की माहित नाही )मालिकेला लेखिका आहे . अरुणा जोगळेकर. उंच माझा झोकाची. Happy

मेघना वारंवार चुका करते, सगळे समजून घेतात, तरी तेव्हा कोणीतरी हवंच ना बोलायला का फक्त सारखं तिच्या चुकांवर पांघरूण घालून वर तिचे लाड करायचे, असंच तर चालू असते. तेव्हा अर्चू तिला योग्य जागा दाखवते.

कुणीतरी फेबुवर या बाफची लिन्क दिली असावी.>> बरीच खुमखूमी होती पण मी नाही टाकली फेबूवर. पण जर खरंच दिली असेल आणि त्याने मेघना हे "पात्र" सुधारलं तर मनापासून आभार आणि शाब्बासकी त्या लिंक देणार्‍याला.
अर्चूचं पात्र मला तरी रिअलिस्टीक वाटतेय... नुस्ता गोग्गोड पणा म्हंजे काय....

दुस्वासाने हेव्याने बोटे मोडणारी बाहुली!!!

प्रेक्षक समजुतदार>> प्रेक्षक समजुतदारच असतात बिचारे Happy

कारण सारखच काही न काही मेघनाच्या बाबतीत बिनासतानाच दाखवलाय. एका पाठोपाठ एक सारख हिच्याच बाबतीत काही न काही गोंधळ होताना दाखवला आहे.>>>ती हिरोईन आहे ना मालिकेची म्हणून!!

सत्यजित मुधळखोर

दर दोन आठवड्यने सगळा कुशल मंगल होते आणि तोच घीसापिटा गाणी लागतो …
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना
ता ना ना तुम ताना तुम ताना ना

>> मी हे लगेच चालीवर म्हणुन बघितले. एकदम पर्फेक्ट>>>>> नाही पियू, मी पण म्हणून पाहिलं.... यात दुसर्या आणि चौथ्या ओळीत दोन ना ना कमी आहेत... Wink Lol

अर्चूचं पात्र मला तरी रिअलिस्टीक वाटतेय... नुस्ता गोग्गोड पणा म्हंजे काय....>>>आज तिचे ब्रेनवॉश केले.

पण मला एक कळत नाही तुम्ही सगळे मालिकेला इतकी नावे ठेवता पण मालिका बघणे कोणी सोडत नाही Uhoh

पण मला एक कळत नाही तुम्ही सगळे मालिकेला इतकी नावे ठेवता पण मालिका बघणे कोणी सोडत नाही

>> कारण

१. सुमो आणि तिच्या तोंडी दिलेले संवाद..

एरवी मी मालिका बघुन रडणार्‍या साबांना हसते पण काल सुमो अर्चुशी बोलतांना तिच्या तोंडी जे संवाद होते ते ऐकुन माझ्याही डोळ्यात पाणी आले.

विशेषतः घर हे घुमटासारखं असतं. 'आपण जे देतो तेच फिरुन (प्रतिध्वनीसारखं) आपल्याकडे परत येतं' हे वाक्य खुप आवडलं. न्यायप्रिय असावं आणि खरं बोलावं/ रागवावं पण दुसर्‍याला न दुखावता हेही आवडलं. (प्लीज नोट हे वाक्य फक्त घरच्या आणि आपल्या म्हणता येतील अश्या माणसांना अप्लाय होतं. बाहेरच्यांसाठी 'जशास तसे').

२. देसाई कुटुंब (मायनस मेघना)

मेघना सोडल्यास घरातल्या इतरांचं वागणं एक एकत्र कुटुंब म्हणुन किती छान दाखवलं आहे. अगदी खेळीमेळीचं. एकमेकांना समजुन घेणारं.

apalyala avadatat tya sagalyach goshti karan sodun dil ani tyawar hasan sodun dil tar kas honar apal? Wink

<,पण मला एक कळत नाही तुम्ही सगळे मालिकेला इतकी नावे ठेवता पण मालिका बघणे कोणी सोडत नाही>
शलाका तोच तर आमचा टाइम पास आहे. नाहीतर आम्हाला या धावपळीच्या आयुष्यात टाईमपास हायेच कुटे ? Lol
मालिकेतल्या चार लोकांना नाव ठेवली कि कस गार गार वाटत आम्हाला Happy

Pages